आजचं मार्केट – १३ जुलै २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १३ जुलै २०१८

कायम दिवाळी नसते तसा कायम शिमगाही नसतो. काल मार्केट उच्चतम स्तरावर पोहोचले होते. आज रुपया मजबूत, कमजोर क्रूड , मजबूत ग्लोबल संकेत ,VIX १२.५० असूनही पुट/कॉल रेशियो १.७३ होता. म्हणजेच ओव्हरबॉट झोनमध्ये मार्केट होते. त्यामुळे मार्केटने आज विश्रांती घेतली.

शेवटी फोर्टिस हेल्थकेअरचे स्वयंवर IHH हेल्थकेअर या मलेशियास्थित कंपनीबरोबर पार पडले. IHH ची बोली Rs १७० ची होती आता ओपन ऑफरही येईल. ४०% ACCEPTANCE रेशियो आहे. फोर्टिस मलारसाठी Rs ५८ ची ओपन ऑफर आहे.

HCL टेक चा ‘BUY बॅक ‘ Rs ११०० प्रती शेअर या दराने जाहीर झाला. १८१ शेअर्स असतील तर आपण किरकोळ गुंतवणूकदारांच्या कोट्यात असाल. कमीतकमी ७० शेअर्स आणि जास्तीतजास्त १२५ शेअर्स ‘BUY बॅक’ मध्ये स्वीकृत होतील. शेअरची किंमत Rs ९५० ते Rs ९७० पर्यंत आल्यास ‘BUY बॅक’ फायदेशीर ठरेल.

२१ जुलै २०१८ रोजी GST कौन्सिलची बैठक आहे. GST फिटमेन्ट समिती आणि राजस्व विभाग GST चे दर कमी करायला तयार नाही. त्यामुळे Rs १०,००० कोटींचे नुकसान होईल असे सांगितले जाते. त्यामुळे सिमेंट पेंट आणि मुव्हीज यावरील GST सध्या तरी कमी होण्याची शक्यता दिसत नाही.

महाराष्ट्र राज्यसरकारने असे जाहीर केले की १ ऑगस्ट २०१८ पासून मल्टिप्लेक्समध्ये खाण्याचे जिन्नस घेऊन जायला परवानगी आहे. त्यामुळे PVR, आयनॉक्स, सिनेलाईन हे शेअर्स दणकून आपटले.

JSPL चे प्रमोटर नवीन जिंदाल यांच्यावर कोळसा घोटाळ्यामध्ये लाच दिली आहे असा आरोप करण्यात आला. त्यामुळे हा शेअर पडला.

IDFC त्यांचा म्युच्युअल फंड बिझिनेस KKR ला विकणार आहेत. टाटा कम्युनिकेशन ( VSNL ) यांना त्यांची ७७३ एकर जमीन हेमिस्फिअर प्रॉपर्टीज इंडिया लिमिटेड मध्ये डीमर्ज करायला NCLT ने परवानगी दिली.

विशेष लक्षवेधी

 • इन्फोसिसच्या पहिल्या तिमाहीचे निकाल आले. Rs ३६१० कोटी प्रॉफिट झाले. प्रॉफिट ४% ने वाढले. रेव्हेन्यू Rs १९२१८ कोटी (१२ % वाढ) EPS १६.६२ आहे. ऑपरेटिंग मार्जिन २३.७% राहिले कम्पनीचे लिस्टिंग झाल्याला २५ वर्षे झाली म्हणून १:१ बोनस जाहीर केला.
 • HDFC बँकेची १७जुलै २०१८ रोजी प्रेफरंशियल इशूवर विचार करण्यासाठी बैठक आहे.
  म्युझिक ब्रॉडकास्ट ची २४ जुलै रोजी BUY बॅक वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक आहे.

वेध उद्याचा

१७ जुलै २१०८ रोजी अशोक लेलँड, क्रिसिल, फेडरल बँक, गोवा कार्बन, न्यूक्लिअस सॉफ्टवेअर, रॅलीज इंडिया आणि टाटा स्पॉन्ज १८ जुलै २०१८ रोजी बंधन बँक १९ जुलै २०१८ रोजी RBL बँक, कोटक बँक, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व आणि २०जुलै २१०८ रोजी बजाज ऑटो, सिएट, बाटा,हॅवेल्स, MCX यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर होतील .
RBI येत्या वित्तीय पॉलिसीमध्ये रेट वाढवेल असा अंदाज आहे.

चार्ट


मी आपल्याला गुरुवारचा कँडल स्टिक चार्ट देत आहे. या चार्टमध्ये शूटिंग स्टार पॅटर्न दिसतो आहे. हा पॅटर्न शॉर्ट टर्म करेक्शनची सूचना देतो. सावधानता बाळगावी असे हा पॅटर्न सुचवतो.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६५४१ NSE निर्देशांक निफ्टी ११०१८ आणि बँक निफ्टी २६९३५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
http://www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

Advertisements

आजचं मार्केट – १२ जुलै २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १२ जुलै २०१८

आज मार्केटने कमाल केली. बुल्सनी आपली ताकत अजमावली. १ फेब्रुवारी २०१८ नंतर प्रथमच निफ्टीने ११००० चा झेंडा फडकावला. आज सकाळी ११-३० च्या आसपास सेन्सेक्स ४२० पाईंट वर होते. तर निफ्टी ११०७३ वर होता. याला कारण ठरले क्रूड. क्रूड US $ ७४ वर पोहोचले , रुपया २३ पैसे सुधारला. त्यामुळे पेंट, टायर, प्लास्टिक, OMC आणि लेदर गुड्स बनवणाऱ्या कंपन्या,विमान वाहतूक कंपन्या यांच्यावर चांगला परिणाम झाला. आजच्या वाढीमध्ये रिलायन्सचा प्रमुख सहभाग होता. त्यातच भारत जगातील ६ वी मोठी अर्थव्यवस्था ठरली. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार भारताने फ्रान्सलाही मागे टाकले.चीन ट्रेडवॉरच्या बाबतीत USA विरुद्ध वर्ल्ड ट्रेंड ऑर्गनायझेशनकडे तक्रार करणार आहे.

आज फार्मा सेक्टरच्या बाबतीत मात्र सातत्याने खराब बातम्या येत होत्या.नोव्हार्टीसच्या व्होवोरोन इंजेक्शनला ड्रॅग कंट्रोल ऑथॉरिटीजने बॅन केले. या औषधात एक असे केमिकल मिळाले की ज्याचा मूत्रपिंडांवर परिणाम होतो. या औषधाची Rs ४०० कोटींची विक्री झाली आहे. अजंता फार्मा विरुद्ध ड्रग कंट्रोलरने पोलीस कम्पलेंट केली. मंजुरी न घेता परवाना न काढता भारतात औषध विक्री केल्याचा गंभीर आरोप अजंता फार्मावर केला. सन फार्माच्या १६ एप्रिल ते २० एप्रिल २०१८ या कालावधीत झालेल्या अहमदनगर युनिटच्या तपासणीत USFDA ने एक त्रुटी दाखवली.

सरकार ३१ ऑगस्ट पर्यंत कोल इंडियातला १ % ते १.५% स्टेक तर NLC मधील ७% ते १०% स्टेक विकणार आहे. यातून सरकारला Rs ३३०० कोटी ते Rs ३६०० कोटी मिळतील. प्रमोटर होल्डिंग ७५% आणि पब्लिक होल्डिंग २५% ठेवण्यासाठी दिलेली मुदत वाढवली जाणार नाही असे सेबीने स्पष्ट केले.

विशेष लक्षवेधी

 • बर्याच कालावधीनंतर बँकांचे चांगले निकाल येऊ लागले आहेत. आज कर्नाटक बँकेचा पहिल्या तिमाहीचा निकाल चांगला आला. प्रॉफीट वाढले आणि NPA कमी झाले.
 • आज रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप Rs ६.८६ लाख कोटींच्या पलीकडे गेली. टी सी एस नंतर US $ १०० बिलियन वर असलेली भारतातली दुसरी कंपनी ठरली. कंपनीच्या शेअरचा भाव Rs १०९० या लाईफ टाइम हाय स्तरावर होता.
 • टाटा मोटर्सला दिलेली १०००० इलेक्ट्रिक व्हेईकल्सची ऑर्डर रद्द झाली.
 • आज जून २०१८ या महिन्यासाठी CPI चे आकडे आले हे आकडे किरकोळ बाजारांत महागाई किती वाढली त्याचे द्योतक असतात. जून २०१८ मध्ये हा आकडा ५% ( मे २०१८ मध्ये ४.८७%) आहे. त्यामुळे महागाई फारशी वाढली नाही
 • या उलट मे २०१८ साठी IIP चे आकडे खूपच निराशाजनक आहेत. IIP ३.२% (एप्रिलमध्ये ४.९% )म्हणजे ८ महिन्यातील किमान स्तरावर आहे. हे आकडे औद्योगिक उत्पादनाविषयी कल्पना देतात.

वेध उद्याचा

 • उद्या इन्फोसिस चा पहिल्या तिमाहीचा निकाल जाहीर होईल. टी सी एस च्या पाऊलावर पाऊल ठेवून इन्फोसिसही आपले निकाल आणि भविष्यातील गायडन्स (US $ विषयीच्या गायडन्सविषयी आशंका असेल) चांगला देईल अशी अटकळ बहुसंख्य ट्रेडर्स आणि इन्व्हेस्टर्स धरून आहेत.
 • निफ्टी आणि सेन्सेक्स जरी अत्युच्च स्तरावर पोहोचले असले तरी मिडकॅप आणि स्माल कॅप निर्देशांकात मात्र हवी तेवढी वाढ दिसली नाही. त्यामुळे फक्त निवडक शेअर्समध्येच ही तेजी आली असे सामान्य गुंतवणूकदाराचे मत झाले.
 • फोर्टीज हेल्थकेअर या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची महत्वाची बैठक उद्या आहे. या मीटिंग मध्ये फोर्टीजसाठी बीड केलेल्या IHH हेल्थकेअर आणि मणिपाल ग्रुप यापैकी कोणाची बीड यशस्वी होते आणि स्वीकारली जाते यावर निर्णय होईल. तसेच या बैठकीत प्रेफरंशियल अलॉटमेंटवर विचार केला जाईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६५४८ NSE निर्देशांक निफ्टी ११०२३ आणि बँक निफ्टी २७०२६ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
http://www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट – ११ जुलै २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ११ जुलै २०१८

दोन दिवस मुसळधार पडणाऱ्या पावसाने आज थोडी विश्रांती घेतली त्याचप्रमाणे दोन दिवस तेजीत असणारे मार्केट आज विसावले. USA आणि चीन यांच्यातलया ट्रेंड वॉर ने पुन्हा डोके वर काढले. USA मध्ये चीन मधून होणाऱ्या US २००अब्ज आयातीवर USA ने १०% ड्युटी लावली. यामध्ये बरेच कंझ्युमर गुड्स आहेत. ट्रेड वॉरमुळे ज्या वस्तू आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्त्वाच्या आहेत त्यांच्या व्यापारावर परिणाम होईल असे दिसते.

टी सी एस च्या चांगल्या निकालामुळे आज IT क्षेत्रातील सर्व कंपन्या तेजीत होत्या. टी सी एस आज Rs १९९८ या लाईफ टाइम हाय पातळीवर होता.

आज वेगवेगळ्या प्रकारांनी फार्मा सेक्टर चर्चेत होता. शिल्पा मेडिकेअरच्या कर्नाटक मधील दोन युनिटला USFDA ने क्लीन चीट दिली आणि EIR दिला. तर कॅडीलाच्या हॉस्पिरा युनिटमध्ये दोन त्रुटी दाखवल्या. ५ एप्रिल ते १२ एप्रिल २०१८ या कालावधीत ही तपासणी झाली होती. PFIZER ने ट्रम्प यांनी केलेल्या आवाहनाला मान देऊन आपल्या औषधांच्या किमतीत USA मध्ये केलेली दरवाढ रद्द केली.

IDBI च्या बाबतीत एल आय सी कडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही त्यामुळे ओपन ऑफरच्या बाबतीत काहीही स्पष्टपणे भूमिका मांडता येणे शक्य नाही असे सेबीने स्पष्ट केले आज MCX च्या ट्रेडिंग मध्ये दोन वेळेला अडथळे आले. पण मार्केटने याकडे दुर्लक्ष केले. NSE आणि MCX यांची बोलणी चालू आहेत त्यामुळे कमोडिटी इक्विटी आणि वायदेबाजार यांचे ट्रेडिंग एकत्र चालेल. NSE ने मॉर्गन स्टॅनले तर MCX ने JP मॉर्गनला सल्लागार म्हणून नेमले आहे. BSEने सुद्धा MCX बरोबर अशी बोलणी केली होती असे ऐकिवात आहे.

निरव मोदीच्या केसमध्ये झालेला घोटाळा विचारात घेता चार्टर्ड अकौंटंन्टसवर बरीच बंधने लादण्यात येणार आहेत. NFRA (नॅशनल फायनान्सियल रेग्युलेटरी ऑथॉरिटी) स्थापन केली जाणार आहे. सर्व CA ना ह्या ऑथॉरिटीकडे रजिस्ट्रेशन करावे लागेल. प्रत्येक गोष्टीची चौकशी ही ऑथॉरिटी करेल. घोटाळ्यामध्ये ज्या CA फर्मची नावे येत आहेत त्यांच्यावर बंधने घातली जातील. पण यामुळे CA ची स्वायत्त संस्था असलेल्या ICAI चे अधिकार कमी होतील असे सांगितले जाते. PNB आणि कार्लाइल त्यांचा PNB हौसिंग मधील ५१% स्टेक विकतील.

विशेष लक्षवेधी

 • शालिमार पेंट्स ही कंपनी राईट्स इशुदवारा Rs २४० कोटी उभारणार आहे.
 • इथेनॉलवरीळ GST १८ % वरून १२% करावा अशी GOM ( ग्रुप ऑफ मिनिस्टर्स) नी शिफारस केली. यावर आता २० जुलै रोजी होणाऱ्या GST च्या बैठकीत निर्णय घेतला जाईल.
 • मंत्री मंडळाची बैठक शुगर सेस लावण्याच्या बाबतीत अनिर्णीत अवस्थेत संपली. काही राज्य सरकारांचा शुगर सेस लावण्याला विरोध आहे. या ऐवजी चैनीच्या वस्तूंवर १% ऍग्री सेस लावावा असा विचार जोर धरत आहे.

वेध उद्याचा

 • उद्या मे २०१८ या महिन्यासाठी IIP चे आकडे येतील. आणि जून २०१८ साठी CPI चे आकडे येतील. महागाई वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. उद्या रुपया US $१ = Rs ६९ ची पातळी ओलांडेल असे बोलले जाते.
 • HCL टेकच्या BUY BACK ची घोषणा उद्या होईल. BUY BACK Rs ११५० प्रती शेअर या भावाने केले जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
 • GST काऊन्सिलच्या दोन दिवसाच्या बैठकीत काय निर्णय झाले हे उद्या समजेल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६२६५ NSE निर्देशांक निफ्टी १०९४८ आणि बँक निफ्टी २६८१६ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
http://www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट – १० जुलै २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १० जुलै २०१८

एक दिवस तेजी एक दिवस मंदी हा खेळ मार्केटने थांबवला असे दिसते.निफ्टीचे १०८५०, १०९३० हे दोन्ही रेझिस्टन्स मार्केटने पार केले. आणी निर्णायक ब्रेकआऊट दिला. गेले आठ आठवडे चाललेले रेंज बॉउंड ट्रेडिंग थांबले. त्यामुळे पुन्हा मार्केट निफ्टी १११७०ची पातळी गाठेल अशी आशा लोकांना वाटू लागली. चांगले आंतरराष्ट्रीय संकेत, जून तिमाहीच्या निकालांविषयी आशादायी वातावरण आणि रिलायन्स आणि HDFC ची जोडी आणि मारुती या शेअरमध्ये आलेली तेजी त्यामुळे सेन्सेक्स ३०० पाईंट वाढले आणि सेन्सेक्सने ३६००० ची पातळी पार केली.

रिलायन्स ब्रिटिश पेट्रोलियम बरोबर जॉईंट व्हेंचर करून सिटी गॅस डिस्ट्रिब्युशनसाठी बोली लावणार आहे. इंडसइंड बँकेचा नफा २४% वाढला, NPA आणि प्रोव्हिजन यांच्यात नगण्य वाढ झाली. पण मार्केटची अपेक्षा जास्त असल्यामुळे शेअर पडला.

USA चे अध्यक्ष ट्रम्प यांनी फार्मा कंपन्यांना धडा शिकवण्याचा इरादा स्पष्ट केला. PFIZER या कंपनीचा उल्लेख USA मध्ये औषधाच्या किमती कारण नसताना वाढवल्या म्हणून आवर्जून केला. त्यामुले फार्मा क्षेत्रात मंदी आढळली

चीनमध्ये मेटल्सचे भाव वाढल्यामुळे टाटा स्टील, मिश्र धातू निगम, हिंडाल्को, SAIL हे शेअर्स तेजीत होते. चीन मधून येणाऱ्या पॉलिएस्टर यार्नवर सरकारने अँटी डम्पिंग ड्युटी लावली. याचा फायदा SRF, रिलायन्स, आणि गरवारे पॉलिएस्टर यांना होईल.

निफ्टीमध्ये काही बदल नजीकच्या काळात संभवतात. HPCL आणि ल्युपिन निफ्टीतुन बाहेर पडतील आणि ब्रिटानिया, गोदरेज कंझ्युमर किंवा JSW स्टील यांचा समावेश होईल.

आयडिया आणि वोडाफोन यांच्या मर्जरला सरकारने सशर्त परवानगी दिली. स्पेक्ट्रमसाठी Rs ३४०० कोटी आणि Rs ३३०० कोटींची बँक गॅरंटी द्यायला सांगितली.

विशेष लक्षवेधी

 • CHEVIOT या तागाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीने १:२ या प्रमाणात बोनस जाहीर केला.
 • HCL टेकची ‘BUY BACK’ वर विचार करण्यासाठी १२ जुलै २०१८ रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक आहे. पूर्वी १७% प्रीमियमवर HCL टेकने मार्च २०१६ मध्ये BUY BACK केला होता. HCL टेक कडे Rs १०७०० कोटी एवढी कॅश आहे.
 • शालिमार पेंट्सने राईट्स इशूवर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.
 • डिश टी व्ही चा पहिल्या तिमाहीचा निकाल चांगला आला. Rs ११ कोटी तोट्यावरून Rs २८ कोटी फायदा झाला.
 • एल आय सी IDBI साठी ओपन ऑफर आणेल किंवा प्रेफरेन्सियल अलॉटमेन्ट होईल.
 • टी सी एस चे पहिल्या तिमाहीचे निकाल अपेक्षेप्रमाणे आले. PAT Rs ७३४० कोटी, विक्री Rs ३४२६१ कोटी, EBIT Rs ८५७८ कोटी, मार्जिन २५.०४% ( २५.४०% वरून ) झाले. कंपनीने Rs ४ प्रती शेअर अंतिम लाभांश जाहीर केला. उद्या या निकालाचे मार्केट कसे स्वागत करते याची उत्सुकता सगळ्यांना राहील.

वेध उद्याचा

मार्केटला चांगली गती आली आहे. कारण क्रूडची किंमत US$ ७९ वर पोहोचूनही मार्केटने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. मार्केटचा बदललेला रागरंग स्वीकारून ‘BUY ON DIPS’ ही पॉलिसी अवलंबावी.

भाग्यश्री फाटक
http://www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट – ९ जुलै २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ९ जुलै २०१८

BSE ची स्थापना ९ जुलै १८७५ ला झाली. BSE आज १४३ वर्षांची झाली.म्हणूनच मार्केटचा रंग वेगळा होता कां? हे समजले नाही. BSE चा शेअर तरी वाढदिवस म्हणून वाढला नाही पण मार्केट मात्र ३०० पाईंटने वाढले.

‘रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा’ या उक्तीप्रमाणे आज मार्केटने स्वतःचा आगळावेगळा रंग दाखवला. आज मार्केटने निफ्टीने १०८५० ची रेझिस्टन्स लेव्हल लीलया पार केली. मिडकॅप निर्देशांकानेही रेझिस्टन्स पार केला. याला खाजगी बँकांची साथ मिळाली . कर्नाटक, फेडरल, DCB, येस, RBL या बँका वाढत होत्या. INDUSIND बँक आणि टी सी एस यांचे उद्या तिमाही निकाल असल्यामुळे ट्रेडर्स प्रॉफिट बुकिंग करत असावेत म्हणून मंदीत होते. आज मिडकॅप IT शेअर्सनी मात्र धुमाकूळ घातला. यात हेक्सावेअर, टाटा एलेक्सी, FIRST सोअर्स, MINDTREE यांचा समावेश आहे. AU स्माल फायनान्स बँकेचा शेअर मात्र शेअर्सचा लॉक-इन पिरियड संपल्यामुळे मंदीत होता.

आज दिवसभर स्टरलाइट टेक्नॉलॉजीज हा शेअर चर्चेत होता. ब्रॉडबँडमध्ये आणि फायबर नेटवर्कमध्ये जी वाढ दिसते आहे त्याचा परिणाम स्टरलाइट टेक्नॉलॉजीजवर होईल आणि त्याच प्रमाणे या कंपनीने इटालियन ऑप्टिकल केबल ही फर्म ४७ मिलियन यूरोज देऊन खरेदी केल्यामुळे शेअर वाढला. NCLT ने टाटा सन्सच्या बाजूने निकाल दिला. रतन टाटा विरुद्धचे सर्व आरोप रद्द केले.

GST फिटमेन्ट समितीची दोन दिवसाची बैठक आजपासून सुरु झाली. सिमेंट पेंट ऑटो पार्टस आणि होम-मेड प्रोडक्टस या सर्व उत्पादनांवरचा GST कमी होण्याची शक्यता आहे. नेहेमी ऑटो आणि सिमेंट क्षेत्राच्या विक्रीचे आकडे येतात, या वेळेला फार्मा कंपन्या सुद्धा विक्रीचे आकडे जाहीर करताना आढळल्या.

विशेष लक्षवेधी
इंडोको रेमिडीजच्या गोवा युनिटला कॅनडा ऑथॉरिटीजकडून क्लीन चिट मिळाली.

वेध उद्याचा
उद्या टी सी एस आणि इंडसइंड बँक CMC , ११जुलै २०१८ ला MIC इंडस्ट्रीज, RIIL, १२ जुलै २०१८ रोजी सायंट, कर्नाटक बँक, तळवलकर,सेरा सॅनिटरीवेअर, गोवा कार्बन, जय मारुती ,१३ जुलै २०१८ रोजी बजाज कॉर्प, हाटसन ऍग्रो, सिंटेक्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस तर १४ जुलै २०१८ ला CCL प्रॉडक्टस यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर होतील. १६ जुलै रोजी HUL चे पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर होतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५९३४ NSE निर्देशांक निफ्टी १०८५२ आणि बँक निफ्टी २६७५३ वर बंद झाला

भाग्यश्री फाटक
http://www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट – ६ जुलै २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ६ जुलै २०१८

आजपासून USA ने चीनमधून होणाऱ्या US $ ३४०० कोटी किमतीच्या आयातीवर लावलेली ड्युटी लागू झाली आठवड्याभरात आम्ही चीनमधून आयात होणाऱ्या आणखी US $ १६०० कोटी आयातीवर ड्युटी लावू असे USA ने जाहीर केले. चीनने सांगितले की आंम्ही या ड्युटीचा आमच्या USA ला होणाऱ्या निर्यातीवरील परिणामांचे मूल्यमापन करून निर्णय घेऊ. चीनने USA मधून आयात होणाऱ्या मालावर नवीन टारिफ लागू केली. चीनमध्ये USA मधून ४ लाख बॅरल क्रूड आयात होते. चीन या आयातीत कपात करण्याची शक्यता आहे.

UK कोर्टाने विजय मल्ल्याची UK मधील सर्व संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्याला आणि त्याच्या कंपन्यांना कर्ज देणार्या बँकांसाठी ही मोठी दिलासा देणारी बातमी होती.त्यामुळे आज बहुतेक बँकांचे शेअर्स थोडे थोडे वाढले. जहाज वाहतुकीच्या दरासंबंधात असलेले बाल्टिक ड्राय इंडेक्स गेल्या आठवडाभर वाढत आह याचा परिणाम जहाज मालवाहतुकीच्या क्षेत्रात कारभार करणाऱ्या कंपन्यांवर होतो. NPPA ने ५८ औषधांच्या किमती निश्चित केल्या.

बेटिंगवर बंधन असो वा नसो बेटिंग चालूच आहे. त्यामुळे बेटिंग कायदेशीर करण्यावर विचार करावा असे कोर्टाने सुचवले. याचा फायदा डेल्टा कॉर्पला होईल. सरकारने निरनिराळ्या खरीप पिकांसाठी मिनीमम सपोर्ट प्राइसेस जाहीर केल्या. यामुळे ग्रामीण भागात उत्पन्न वाढेल आणि त्याचा मोटर बाईक, ऑटो सेक्टरवर अनुकूल परिणाम होईल. त्यामुळे हिरो मोटो कॉर्प, बजाज ऑटो, महिंद्र आणि एस्कॉर्टस (ट्रॅक्टर्स, टिलर्स ) यांच्या शेअर्सचे भाव वाढले. साखर उत्पादकांचा कोटा कमी केल्यावर साखरेच्या किमती ५ दिवसांत १०% वाढल्या. CNG इंजिनसाठी आयशर मोटर्सला BS-VI मान्यता मिळाली. बर्जर पेंट्सने भारत नेपाळ मध्ये ऑटोमोटिव्ह पेंटसाठी तसेच जपानमधील रॉक पेंट्स बरोबर ऑटोमोटिव्ह पेंट बनवण्यासाठी करार केला. शोभा LTD आणि GM ब्रुवरीजचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

सिप्लाच्या इंदोर येथील प्लांटच्या USFDA ने १३ एप्रिलला केलेल्या तपासणीत ३ त्रुटी दाखवल्या. ऑरोबिंदो फार्माच्या मेडक येथील युनिटला USFDA ने क्लीन चिट दिली. अपोलो हॉस्पिटल्सने मेडिक्स लाईफ सायन्सेसमध्ये ५०% स्टेक खरेदी केला. ONGC विरुद्ध मर्केटर या कंपनीने Rs ९० कोटींची बोली रद्द केली म्हणून तक्रार केली आहे. महिंद्रा लाइफस्पेस २०१८ मध्ये ५ नव्या प्रोजेकट सुरु करणार आहे. मुंबई आणि पुणे येथे आपल्या बिझिनेसचा विस्तार करणार आहे.

विशेष लक्षवेधी

 • इलेक्ट्रोस्टील्स स्टील या कंपनीने ( ही कंपनी इंसॉल्वन्सी प्रोसिडिंग्समध्ये आहे) सांगितले की NSE ने त्यांना पहिल्या तिमाहीचे फायनान्सियल निकाल फाईल केले नाहीत म्हणून Rs १ कोटीपेक्षा जास्त दंड केला.
 • टी सी एस चा शेअर आज लाइफ टाइम उच्च किमतीला म्हणजेच Rs १९१९ वर होता.
 • एक्झो नोबलचा ‘BUY BACK’ऑफर आजपासून सुरु होऊन १९ जुलै २०१८ पर्यंत चालू राहील.
 • VARROC इंजिनीरिंगचे आज Rs १०१५ वर लिस्टिंग झाले. IPO मध्ये हा शेअर Rs ९६७ ला दिला होता.
  AU स्मॉल फायनान्स बँकेच्या ८% प्री IPO शेअर्स ची मुदत सोमवारी संपत असल्यामुळे ते शेअर्स मार्केटमध्ये विक्रीला येतील.
 • आयकर विभागाला अपोलो हॉस्पिटल्स, लीला, आणी मॅक्स या कंपन्यांमध्ये झालेल्या २००० व्यवहारात अनियमितता आढळली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५६५७ NSE निर्देशांक निफ्टी १०७७२ आणी बँक निफ्टी २६४९३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
http://www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट – ५ जुलै २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ५ जुलै २०१८

आजचा दिवस रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नावाने लिहिला गेला. आज रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा होती. रिलायन्सने आज ब्रॉडबँडचा धमाका उडवला. जियो गिगा फायबर यामार्फत रिलायन्स घरोघर पोहोचणार आहे.१ जुलै २०१८ पासून  जुना मोबाईल आणि Rs ५०१ दिल्यास नवीन मोबाईल ग्राहकांना मिळणार आहे. १५ ऑगस्ट पासून इतरांना Rs २९९९ मध्ये नवीन मोबाईल मिळेल. नवीन जियो गिगा राउटर आणि सेट टॉप बॉक्स बसवणार आहेत. नवीन स्मार्ट फोन मार्केटमध्ये आणणार आहेत. या सगळ्याचा परिणाम भारती एअरटेल, आयडिया,हाथवे नेटवर्क, डेन नेट वर्क  हे सर्व शेअर पडले आणि टी व्ही १८ मात्र तेजीत होता.  आज ‘BUY ON RUMORS, SELL ON  NEWS’ या म्हणीप्रमाणे गेला आठवडाभर वाढत असलेला रिलायन्सचा शेअर पडला.
ब्रेक्सिटमुळे  टाटा मोटर्सचे नुकसान झाले असे टाटा मोटर्सने कळवले. जाग्वारचे व्हॉल्युम कमी झाले.त्यामुळे टाटा मोटर्सचा शेअर पडला. USA मध्ये चीनमधून आयात होणाऱ्या मालावर उद्यापासून  ड्युटी  बसवली जाणार आहे.
कर्नाटक राज्य सरकारचे अंदाजपत्रक आज जाहीर झाले. यामध्ये मद्यार्क उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर ४% कर वाढवला. आणि शेतकी कर्ज माफ केले. परिणामी कर्नाटक बँक, उज्जीवन आणि रेडिको खेतान, सोम डिस्टिलरी यांचे शेअर पडले. फोर्टिस हेल्थकेअरसाठी बीड करण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. यामध्ये येस बँकेचा स्टेक आहे त्यामुळे  येस  बँकेचा शेअर वाढला.आज सजीव गोएंका ग्रुपचे बहुतेक शेअर्स पडत होते. KEC इंटरनॅशनल, CEAT ,ZENSAAR, RPG लाईव्ह चे शेअर्स पडले.
आजचा अपघात म्हणजे इन्फोसिसचा शेअर ! १३ जुलै ला इन्फोसिसचे पहिल्या तिमाहीचे  निकाल आहेत त्यामुळे प्रॉफिट बुकिंग करणे योग्य असे लोकांना वाटले असावे. म्हणून इन्फोसिसचा शेअर पडला. ९ जुलैला डिश टी व्ही चा, १० जुलैला इंडसइंड बँक आणि टी सी एस , १२ जुलैला कर्नाटक बँक आपापले पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.
अशा प्रकारे BSE च्या साईटवर जाऊन रिझल्ट कॅलेंडरमधून रिझल्ट्सच्या तारखा शोधून आपण ट्रेडिंग बेट  घेऊ शकता.
विशेष लक्षवेधी
थ्री व्हाइट सोल्जर्स हा कँडल स्टिक पॅटर्न मारुती LTD च्या बाबतीत झाला होता ओळीने तीन दिवस तेजी होती असे हा पॅटर्न दाखवतो. त्यामुळे जवळजवळ Rs ३०० ने शेअर वाढला होता. Rs ९४०० च्या आसपास किंमत जाताच लोकांनी प्रॉफिट बुकिंग केले. म्हणजेच जिथे जिथे प्रॉफिट मिळते आहे तिथे तिथे लोक प्रॉफिट बुकिंग करत आहेत.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५५७४ NSE निर्देशांक निफ्टी १०७४९ बँक निफ्टी  २६५०३ वर बंद झाले

 

भाग्यश्री फाटक
http://www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!