परी लाभाचा चटका असू द्यावा!!
पत्रिका जुळते का हे पाहून, कान्देपोह्याचा कार्यक्रम होतो . वधूवरची पसंती होते. त्यावेळी आईवडील एकच गोष्ट सांगतात ‘ सुखाने आनंदाने संसार करा” शेवटी आनंद सुख समाधान हेच संसाराचे अंतिम ध्येय असते.
त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा गेले वर्षभर तयारी करीत आहात . माहिती मिळवत आहात. DEMAT ACCOUNT, ट्रेडिंग अकौंट सेविंग अकौंट ही उघडला असेलच थोडीशी भांडवलाची सोय केली असेल.. ज्या पद्धतीच्या व्यवहारासाठी भांडवल लागत नाही त्या पद्धतीचा ट्रेड म्हणजेच intra day ट्रेड तोही मी तुम्हाला समजावून सांगितला आहे ,
संसाराचे अंतिम ध्येय म्हणजेच सुख समाधान आनंद त्याचप्रमाणे कुठल्याही व्यवसायाचे मुख्य ध्येय नफा मिळवणे हे होय . शेअरमार्केट हा एक व्यवसायच आहे . यामध्ये आपण शेअर्स खरेदी करतो व काही काळाने वाढलेल्या भावाला तेच शेअर्स विकतो . विक्री किमत वजा खरेदी किमत म्हणजे नफा किंवा फायदा होय. संसारातील जे जे प्रश्न संसार करताना येतात तेच प्रश्न शेअर्स खरेदी करतानाही पडतात. मी जेव्हा मार्केटमध्ये शिरले तिचा माझ्या समोरही अनेक प्रश्न उभे राहिले. पण मी धैर्याने गुंता सोडवला.
प्रथम बँकेत खात्यावर किती पैसे आहेत ते पाहिले. यजमानांना विचारले
“आपल्याकडे किती पैसे असतील जे आपल्याला लगेच लागणार नाहीयेत? आणि अगदी लागलेच तर ते कधी लागतील?”
विचारायचा मुद्दा असा कि माझे अंथरूण केवढे आहे आणि पाय किती पसरता येतील ? आणि ते तसे पसरून किती वेळ ठेवता येतील? म्हणजेच मार्केट मध्ये किती भांडवल गुंतवता येयील आणि किती कालावधीसाठी हे मला कळले.
आता प्रश्न आला नफ्याचा किंवा फायद्याचा, तिथे मी साधे व सोपे गणित घातले. त्या काळात बँक मुदत ठेवीसाठी १०%व्याज देत असे . ..हीच १०% वाढ मला १ वर्षापेक्षा कमी कालावधीत मिळाली तर सोन्याहून पिवळे असा विचार केला
आता माझ्या जवळ अनुभव आहे पण तेव्हा काहीच समजत नव्हते . परंतु माझ्याजवळ दुसरा कोणताही पर्याय नव्हता. मी १०-१५ शेअर्सची निवड केली होती. ज्या शेअर्समध्ये सतात चढउतार असे. मी माझे जुने शेअर्स विकून भांडवल गोळा करीत होते आणि साईड बाय साईड शेअर मार्केटचे जाणीवपूर्वक आकलन करीत होते .
लहान लहान मुली जसा भातुकलीचा खेळ खेळतात . त्याचप्रमाणे मी खोटा खोटा शेअर मार्केटचा व्यवहार करीत होते. कारण आमच्या घरात शिकवायला किंवा सांगायला कुणीही नव्हते . मी माझ्या वहीतल्या वहीत खरेदी करीत असे . तेथेच भाव वाढला की शेअर्स विकले असे लिहित असे त्याच्या बाजूला नफ्याचा आकडा लिहित असे .. पण तेथे एक चूक झाली. मी त्या फायद्यातून दलाली व इतर कर वजा केले नाहीत. पण त्या वहीमुळे मालाविश्वास मिळाला की मला फायदा होऊ शकतो .
थोड्या पैशात जसा गृहिणी टुकीने संसार करते तीच अवस्था माझी मार्केटमध्ये होती . असलेल्या पैशात अनेक गरजा भागवावयाच्या होत्या.
माझे यजमान म्हणाले “ही रकम जूनपर्यंत लागणार नाही. तेव्हा तू हे पैसे जूनपर्यंत वापर.’
तेव्हा मला लक्षात आलं नाही पण यालाच मार्केटच्या भाषेत हा मध्यम कालावधीसाठी केलेला व्यवहार… आज १२ वर्षांनी ही आणि अशी बरीच अक्कल आलीये.
टीवीवरच्या वाहिनीवर जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा सुद्धा तुम्ही पाहिले असेल की शेअरचे नाव, खरेदीसाठी योग्य भाव व किती कालावधीसाठी शेअर्स खरेदी करावा हे सांगतात. शार्ट टर्मसाठी म्हणजे ३ महिन्यापर्यंत, मिडीयम टर्मसाठी म्हणजे ३ महिने ते एक वर्षपर्यंत. दीर्घ मुदतीसाठी म्हणजे १ वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी म्हणजेच गुंतवणुकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केलेली खरेदी होय.
३ महिने, ६ महिने ठरवले म्हणून तुम्ही मुदत पूर्ण होईपर्यंत थांबायची गरज नाही. ती काही मुदत ठेवीची पावती नाही की मध्ये तोडली तर तुम्हाला व्याजात नुकसान होईल. तुम्ही शेअर्स कधीही (४ दिवसानंतर कधीही म्हणजेच DEMAT अकौंटवर गेल्यावर) विकू शकता. तुम्हाला पाहिजे तेव्हढा फायदा जेव्हा होत असेल तेव्हा विकून रिकामे व्हा. गुरुकिल्ली काय तर किती दिवस पैसे गुंतले व फयदा किती होतो आहे याची सांगड घाला म्हणजे शेअर विकून आलेली रकम पुन्हा पुन्हा गुंतवता येते.
पूर्वी मला कळत नव्हते परंतु आतापर्यंत आलेल्या अनुभवावरून मी सांगू शकेन की तुमच्याजवळ जानेवारी ते जून एवढ्या कालावधीसाठी पैसे गुंतवायला उपलब्ध असतील तर तुम्ही शेअर्सची निवड कशी करावी . पण यासाठी पुढील भागाची वाट पहावी लागेल
पिंगबॅक भाग ३७ – फट(FAT) म्हणता ब्रह्महत्या !! | Stock Market आणि मी
खुप खुप आभारी आहे मँडम.
खुप दिवसांपासून शेअर मार्केट बद्दल माहिती शोधत होतो, पण अपेक्षित व समाधानकारक अशी माहिती अद्याप मिळाली नव्हती.
आपण खुप सोप्या शब्दात ती समजावली त्यासाठी आपला मी खुप त्रूणी आहे.
आपला दुरध्वनी क्र. मिळाला तर मी खुप आभारी असेन. कारण अजून काही गोष्टी आहेत त्या विचारून समजावून घेईन.
आपल्या आगामी कार्यासाठी खुप खुप शुभेच्छा..
धन्यवाद. माझ्या लिखाणानी तुम्हाला मदत होतीये हे वाचून आनंद झाला.. तुम्ही मला ०२२२५३३५८९७ वर फोन करू शकता.
Thank you madam… But mala demat account che tote have aahet…. Please help karaa
EMAT’ अकौंट तुम्ही जर सर्व नियम सांभाळून ऑपरेट केला तर DEMAT अकौंट मध्ये तुमचा कोणताच तोटा संभवत नाही. जर तुम्ही लाईफ टाईम DEMAT अकौंट उघडून शेअर्समध्ये काहीच व्यवहार केला नाही तर मात्र ते चार्जेस फुकट जातात,
Madam me kutuhalapoti apla blog wachla. Khup awadla. shears madhe thodifar guntavnuk karavi ashi iccha zali. saddy sarva vachu abhyas karto v tyanantar guntavnuk karto.Krupa karun margadarshan karave.
jar mi majha broker change kela tar mala parat navin DP account / DEMAT account ughadave lagel ??
जर तुम्ही ब्रोकर बदलला तर नवीन ‘DMAT’ अकौंट उघडला पाहिजे असे बंधन नसते.
जर समजा ‘अ ‘ हा तुमचा ब्रोकर आहे ज्याच्याकडे तुमचा ‘DMAT’ अकौंट व ट्रेडिंग अकौंट आहे. जर आता तुम्ही ब्रोकर बदलून ‘ब ‘ ब्रोकरकडे गेलात तर ‘ब ‘ कडे ट्रेडिंग अकौंटद्वारा शेअर्स विकलेत तर त्याची ‘INSTRUCTION SLIP’ मात्र तुम्हाला ‘अ ‘ ब्रोकरकडे जिथे तुमचा ‘DMAT’अकौंट असेल तेथेच द्यावी लागेल. फक्त ट्रेडिंग अकौंट ‘ब’कडे व ‘DMAT’ अकौंट ‘अ ‘ कडे असेल तर ‘DMAT’ चार्जेस जास्त आकारले जातात. साधारण RS. 10 चा फरक पडतो .
Madam , tasa market madhe mi navinch aahe .. IT company madhe job karto ..navin thikani gelyavar ICICI 3-1 salary account madhe trading account milale aahe..kaam nahi ajun kahi mhanun mag basto trade karat .. kahi hi kalat nahi bagha .. tumhi gruhini asun baryach pudhe gelat .. majha prashn asa aahe ki.. he Intra Day trade madhe mala kahi hi samajat nahi .. ni tumchya tya Slip madhe mi brokerage far far kami baghitle .. ICICI che far brokerage aahe .. kami brokerage asalele kuni sangal kaay?
जास्तीत जास्त ब्रोकरेज किती आकारावयाचे हे बंधन ‘BSE’ व ‘NSE’ यांनी घातले आहे. परंतु या ब्रोकरेजमध्ये ‘CONCESSION’ किंवा ‘DISCOUNT ‘ किती द्यावा हे तुमच्या ट्रेडिंग अकौंटमधील टर्नओवरवर आणी ब्रोकरच्या मर्जीवर अवलंबून असते. हा नियम ‘INTRADAY’ , MEDIUM TERM INVESTMENT, या सर्वांसाठी आहे आता तुम्ही जर खरेदी भावात ब्रोकरेज, ‘TAXES’ ANEE STAMP DUTY मिळवलीत तर तो खरा खरेदीभाव होतो. तसेच तुमच्या विक्रीच्या किमतीतून ब्रोकरेज व ‘TAXES’ वजा केलेत तर तुम्हाला खरा विक्रीचा भाव मिळेल.
याप्रमाणे खरेदीचा भाव+ब्रोकरेज+’TAXES’, याप्रमाणे ठरल्यावर त्यात आपल्याला हवे असलेले फायद्याचे प्रमाण मिळवून, आपल्याला विक्री किमत-ब्रोकरेज –‘TAXES’ एवढी किंवा त्यापेक्षा जास्त मिळत असेल तरच ट्रेड करावा. म्हणजे आपल्याला प्रत्येक ट्रेड फायद्याचा होईल.
Thank you madam.
atishay sopya bhashet share market baddal mahiti dilya baddal aabhar.
aaj marathit madhye share market baddal mahiti search kartana mala tumcha blog sapadla aani manatle barech prashna sutle.
Madam, share market baddal Marathi madhe uttam ritya mahiti dilyabaddal Mi tumcha aabhari aahe.
Tumche share market baddal kahi magazine asel tar saanga.
Aani June te December paryant konte share ghene yogya tharel….
part 39-42 are missing can you give me the links please..
Option madhe trade karne kiti pramanat dhokadayak aahe.. ni ya baddal savistar pane liha thode se
Madam khup changli ani sopya bhashet mahiti sangitali tumi. Gele kahi divas mahiti vachtey tumchi aani side by side sarva a/c aaj final open zalet. Aajpasun suruvat kartey. Tondi bryach janankadun mahiti milali pan ti varvar. Tumchi mahiti jast deep ani systematic ahe. Suruvat kartana thodi Bhiti vattey tumchyabarobarch amche ek mamahi ahet madtila.
Tumhala namskar karate. Mazya share marketmadhil pahilya guru tumhi ahat.
तुम्ही सुरुवात करणार असाल तर जास्त धोका पत्करू नका. जपून पण विश्वासाने ‘A’ ग्रूप च्या शेअर्समध्ये ट्रेडिंग करा. प्रथम वहीतल्या वहीतच विकत घ्या आणि वहीतल्या वहीत विका. असा ट्रेड बरोबर येऊ लागला की खराखुरा ट्रेड करा. काही अडचण आल्यास फोन करा . आपल्या शेअरमार्केटमधील वाटचालीला माझे आशीर्वाद आणि मनापासून शुभेच्छा.
MOBILE नंबर : ९६९९६१५५०७
LANDLINE : ०२२२५३३५८९७
Mam mala pn share market join karayche ahe tyasathi ky karave lagel plz sanga
Ani me college kartoy
Hi madam
khoop diwas tumcha blog vachatey tumache aabhar manavet tevade thodecha ahet kararn marathi madhade aschi mahit chan mandani ahe
mala 1st blog pasun salag mail var milu shakatil ka
Very inforamtive…… khup goshti naniv ahet maza sathi…..
what the meaning of ….तुम्ही शेअर्स कधीही (४ दिवसानंतर कधीही म्हणजेच DEMAT अकौंटवर गेल्यावर) विकू शकता…. tycah adhi viku nahi shakat ka… I mean not intraday but on 2nd day… ?
दुसरे दिवशी नियमाप्रमाणे शेअर्स विकू शकत नाही.शेअरविक्री आणी खरेदी या साठी T+२ ही पद्धत चालू आहे. त्यानुसार तुमच्या ‘DEMAT’ अकौंट ला शेअर्स जमा झाले आहेत की नाही हे पाहूनच विकल्यास धोका नसतो. नाहीतर ‘AUCTION’ होवू शकतो. त्यामुळे फायदा होण्याच्या ऐवजी नुकसान होते.
Hi mam
Mala share 1ac madhun dusrya ac made transfer karaiche ahet (mazyach dusrya a/c). Kase karu?
एका DEMAT खात्यामधून दुसऱ्या DEMAT खात्यांत शेअर्स बदली करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे
(१) आपण प्रथम जेथे आपल्याला शेअर्स बदली करायचे आहेत तेथील DEMAT अकौंट उघडण्याची प्रक्रिया पुरी झाली आहे याची खात्री करून घ्यावी.
(२) आपला नवीन DEMAT अकौंट NSDL किंवा CDSL यापैकी कोणत्या डीपोझीटरिशी सलग्न आहे त्याची चौकशी करावी
(३) जर दोन्ही DEMAT अकौंट एकाच डीपोझीटरिशी सलग्न असतील तर ज्या DEMAT अकौंटमध्ये शेअर्स जमा असतील त्या अकौंटची INSTRUCTION स्लीप भरून ऑफ लाईन TRANSACTION करून ते शेअर्स आपल्या दुसऱ्या अकौंटमध्ये जमा करण्यासाठी द्यावी
जर DEMAT अकौंट वेगवेगळ्या डीपोझीटरिशी सलंग्न असतील तर ज्या DEMAT अकौंटमध्ये आपले शेअर्स जमा असतील तेथून आपल्याला इंटरडीपोझीटरी स्लीप घेवून ऑफलाईन TRANSACT ION करून ती स्लीप भरून तेथे जमा करावी लागेल.या प्रमाणे आपण आपल्या दुसऱ्या किंवा दुसऱ्याच्या DEMAT अकौंटमध्ये शेअर्स बदली करू शकता. या साठी मार्केटमध्ये शेअर्स विकण्याची गरज नाही.
Respected Madam
So much informative n useful info. to stand in market as a beginner.
Thanks a lot.
Namaskar madam ,
Mi aplya blog cha niyamit vachak ahe.
Aplya blog madhun share market baddal barach kahi shiklo. Ho ani te pan kahich mahit nastana.
Mala systematic investment plan for long term baddal mahiti Havi ahe.
Hello mam
Me tumche blog nehmi read karat aste, share market baddal barich mahiti milali tumchya blog mule,,, mala intraday shikaych ahe, but mala konta share kdhi buy or sell karaycha te kalat nahi..aani intraday sathi konte stocks select karayche ,tyabaddal thodi savistar mahiti sangu shakal kay?
धन्यवाद मॅडम ,
एवढी सगळी माहिती दिलयाबद्दल, आजच्या पिढीला अशी माहिती साध्या सरळ भाषेत दिल्याबद्दल.
नमस्कार! मी वर्धा येथे रहात असुन 55 वर्षे वयाचा आहे। अपघात झाल्याने प्रायव्हेट रिमीटेड कंपनीची नोकरी सुटली व सध्या बेरोजगार! पेन्शन फक्त 1234/-, शिल्लक लाखभर!त्यातही जीवन कंठायचे असल्याने दहा हजारपर्यंत डे ट्रेडींगमध्ये गुंतवून रोजीरोटी कमाऊ शकेन काय? जबाबदार्या कमी आहेत।केवळ महिना दहा हजारही चालतील। काण करू म्हणजे जीवन कंठता येईल? मला शेअरमार्केटचे ज्ञान शून्य।म्युच्युअल फंडात पैसे पुरेसे मिळणार नाहीत। शेअरबाजाराचे ज्ञान नसले तरीही आवड आहे।