माझी वाहिनी – लेख १

(हा लेख पहिल्यांदा ‘माझी वाहिनी’ या मराठी मासिकात प्रकाशित झाला होता)

छोटी छोटी पाऊले टाकत २०१४ साल दाराजवळ येवून ठेपले आहे नुकत्याच संपलेल्या दीपोत्सवाच्या प्रकाशात न्हाऊन निघाल्याने नवीन विचार, नव्या दिशा , नव्या वाटा दिसू लागल्या असतील. आपण सर्वानी गुंतवणुकीच्या सर्व संधींचा विचार केला असेल व नव्या वर्षाला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाला असाल. बचतीचा व खर्चाचा एक आराखडा तयार केला असेल..

आपण २०१४ मध्ये गुंतवणुकीसाठी जुन्या विचारांची कात टाकून नवा विचार करूया का ?बदललेल्या काळाचा, व तंत्रज्ञानाचा विचार करून काही गुंतवणुकीच्या नव्या संधींचा विचार करूया का !आपली गरज, मिळणारा वेळ,आपले वय, जवळ असलेला पैसा व गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न, या सर्वांचा विचार करून अनुरूप गुंतवणूक केली तर!

आपण सर्वजण इतके दिवस पोस्ट, बॅंका, मुचुअल फंड ,सोने, घर, शेतजमीन, विमा, कर्जरोखे करमुक्त उत्पन्न असलेले सरकारी वा बिन सरकारी Bonds,यामध्ये गुंतवणूक करत असाल. केली असेल, करणार असाल . त्यामध्ये असणारे फायदे तोटे आपल्याला माहिती असतील पण या साऱ्या गुंतवणुकीमध्ये शेअर बाजारातील गुंतवणुकीला स्थान आहे का ?

दचकलात! घाबरलात! गोंधळलात! की बाचकलात! की बिथरलात! अहो,पण तुमची तरी काय चूक आहे म्हणा! तुमचेही बरोबर आहे .कारण आजपर्यंत तुम्ही शेअरबाजारात व्यवहार करून फसलेल्या लोकांच्या कथाच ऐकलेल्या आहेत . शेअर्स खरेदी केल्यानंतर मिळालेली शेअरसरटीर्फिकेट खोटी होती. शेअर्स विकल्यानंतर रक्कम मिळायला खूप उशीर लागला. आपले शेअर्स कोणत्या भावाला विकले गेले किंवा खरेदी केले याला कोणतेही प्रमाण नव्हते. ब्रोकर जी किमत सांगेल त्यावर विश्वास ठेवावा लागे.असे शेअरबाजाराबद्दल अनेक गैरसमज आहेत. शेअरबाजार हा एक बागुलबुवाच निर्माण केला गेला .राख फासून जाण्याची बुद्धी झाली का ? शेअरबाजाराच्या नादी लागून अमका देशोधडीला लागला हे व असे सर्वत्र बोललेले ऐकू येते. परंतु सध्या अशी परीस्थिती नाही . तंत्रज्ञानात होत असलेली सुधारणा व व्यवहारात आलेली पारदर्शकता व कायद्याचे संरक्षण या कारणामुळे तुम्ही शेअर बाजारातील गुंतवणुकीचा विचार करू शकता  वाचकहो ! तुम्ही म्हणाल “तुम्ही कोण ? आम्हाला हे सर्व का सांगत आहात ?

अहो!मी सुद्धा तुमच्यातीलच एक आहे मी जेव्हा शेअरबाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तेव्हा मी एक गृहिणीच होते घर मुले नवरा हेच माझे विश्व होते. आमच्या घरात सासरी किंवा माहेरी कुणीही शेअरमार्केटमध्ये व्यवहार करत नव्हते.बरयाच लोकांनी मला तुमच्यासारखेच शेअरबाजारातले किस्से ऐकवले, धोके सांगितले. परंतु मी सर्व माहिती करून घेवून शेअरमार्केटचे शिवधनुष्य पेलायचे ठरवले. प्रयत्न, चिकाटी, जिद्द, सावधगिरी व परमेश्वरी कृपा या जोरावर गेली दहाबारा वर्षे शेअरमार्केटमध्ये यशस्वी वाटचाल करीत आहे .   शेअरबाजारातील खाचखळगे धोके मला समजले आहेत . त्यामुळे तुम्हाला गुंतवणूक करताना ठेच लागू नये किंवा तुम्ही दूर फेकले जाऊ नयेत असे मला वाटते.त्याचबरोबर तुम्हाला चांगले उत्पन्न मिळावे असे मला वाटते मी जेव्हा समाजात वावरते लोकांबरोबर शेअरमार्केटबद्दल बोलते तेव्हा मला त्यांच्या मनात असणारे शेअरबाजाराबद्दलचे आकर्षण,कुतूहल जाणवते. लोक मला विचारतात शेअरबाजारात व्यवहार कसा चालतो, शेअरबाजारातील गुंतवणूक अनेक पटीने वाढते हे खरे आहे का? हे सर्व समजण्यासाठी तुम्हाला शेअरमार्केट नीट समजावून घ्यावे लागेल.परावलंबी जिणे व पुस्तकी विद्या शेअरमार्केटमध्ये व्यर्थ ठरते. पाऊस पडेल तशी छत्री धरावी या नियमाप्रमाणे प्रसंगावधान व समयसूचकता यांचा वापर करून वेळोवेळी निर्णय घ्यावा लागतो  अनुभवातून शहाणपण हेच शेअरबाजारातील सूत्र आहे तुम्ही सुरुवातीला माझे बोट धरून शेअरबाजारातील वाटचाल करू शकता आणि नंतर स्वावलंबी होऊन स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकता. तुम्हाला काही अडचण आल्यास मला विचारू शकता. हे सर्व काम आपल्याला “ माझी वहिनी “ या अंकातून प्रकाशित होणार्या लेखाद्वारे करायचे आहे.

अहो आता काळ बदलला आहे व्यवहारात पारदर्शकता आली आहे. भाजी  बाजाराप्रमाणेच प्रत्येक व्यवहार तुम्ही प्रत्यक्ष पारखून निरखून करू शकता. ब्रोकरमार्फत व्यवहार करायचा नसेल तर घरात बसून इंटरनेटचा उपयोग करून Online शेअर्सची खरेदी विक्री करू शकता ग्राहकहितासाठी बरेच कायदे केले गेले आहेत . आजकाल “Investor forum “ मार्फत तुमची गुंतवणूक सुरक्षित व्हावी म्हणून काळजी घेतली जाते.गुंतवणूकदारांचे हितरक्षण करण्यासाठी SEBI(Securities & exchange Board of India) सज्ज आहे जर आपण आपला मोबाईल नंबर व मेलअड्रेस दिला तर दरदिवशी झालेल्या व्यवहारांची माहिती आपल्याला थेट STOCK EXCHANGEकडून कळवली जाते. त्यामुळे फसवणुकीची शक्यता कमी होते. सगळीकडे माहितीचा पूर लोटला आहे. भाषेचा अडसर येत नाही. शेअरबाजारातील व्यवहार इंग्लिशमध्ये तसेच हिंदीमध्ये सांगणारे बरेच channelउपलब्ध आहेत वर्तमानपत्रातूनही माहिती मिळवता येते. डोळे व कान उघडे ठेवून आपण माहिती मिळवली व त्याचा योग्य उपयोग केला तर शेअरबाजारातील उलाढालीत यश मिळवणे सहज शक्य आहे .

त्याहूनही फसवणूक झाली तर “Grievances Cell” याची दखल  घेते आहे.  प्रत्येक व्यवहाराचे बील मिळते. सर्व व्यवहार चेकने होतात. शेअर्स विकल्यानंतर चौव्थ्या दिवशी त्या रकमेचा चेक मिळतो. आजपर्यंत मला मिळालेला कोणताही चेक परत आलेला नाही.यावरून तुम्हाला शेअरमार्केटवर विश्वास ठेवण्यास हरकत नाही हे पटेल.  कोणालाही, कुठेही कसल्याही प्रकारची लाच द्यावी लागत नाही जो भाव समोर दिसतो आहे त्या भावाला विकण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी कुणीही तुम्हाला अडवत नाही. बाकीच्या गुंतवणूक प्रकारात जसे व्याज मिळ्ते तसा येथे लाभांश (Dividend) मिळतो. लाभांशाच्या रकमेवर आयकर लागत नाही. शेअर खरेदी करून १ वर्षानंतर विकल्यास आयकर लागत नाही.

घरातून, घराबाहेरून, परदेशातून कुठूनही फोनचा, मोबाईलचा वापर करून व्यवहार करता येणे शक्य आहे. गुंतवणुकीला कमाल रकमेची मर्यादा नाही तसेच गुंतवणुकीला किमान रकमेचीही मर्यादा नाही. ही मी मस्करी करीत नाही ! हे पूर्णपणे सत्य आहे . वयाची अट नाही. कळत्यासवरत्या वयाच्या माणसापासून अगदी जेष्ठ नागरिकापर्यंत कुणीही व्यवहार करू शकतो. व्यवसायातले  सर्व फायदे आहेत परंतु कोणत्याही प्रकारचा परवाना लागत नाही.कसलेही दडपण नाही चोरी होईल किंवा अतिक्रमण होईल याचीही भीती नाही. शेतजमिनीत किंवा घरात गुंतवणूक केली तर जसे वार्षिक उत्पन्न किंवा घरभाडे मिळ्ते आणी शेतजमिनीच्या घराच्या किमती वाढतात त्याचाही फायदा होतो तसेच शेअर्सवर लाभांश मिळतो व शेअर्सचा भाव वाढतो त्याचाही फायदा घेता येतो.परंतु शेअरबाजाराच्या बाबतीत चोहीकडून अनेक शिफारशींचा (ज्याला बोली भाषेत “टीपा” म्हणतात )वर्षाव होत असतो. या टीपा स्वीकारायच्या किंवा नाही हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असते. जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला हे कायम लक्षात ठेवावे !  लोकांकडून टीपा घेवून व्यवहार करण्यात लोक स्वतःला धन्य समजतात .त्यामुळे खरे शेअरमार्केट व त्यातील गुंतागुंत यापासून ते कोसो दूर असतात. डोळे असून आंधळेपणाने व्यवहार करत असतात असेच म्हणावे लागते ..शेअरबाजारात घाम न गाळता व कष्ट न करता पैसा मिळतो हा लोकांचा समज पूर्णपणे चुकीचा आहे. कुणाकडून तरी गुंतवणुकीच्या “टिपा “ घेवून शेअरबाजारात खरेदी विक्री केल्यास धोका संभवतो. त्यामुळे व्यवस्थित माहिती करून घेणे हितावह आहे. आपण फक्त दर महिन्याला येणारा “आमची वहिनी” हा अंक वाचायचा , आपल्याला जे काही योग्य वाटेल ते टिपून ठेवायचे जी काही माहिती हवी असेल  तर संपर्क साधून विचारावी.

तुम्ही सांगा हो मला धोके कुठे नाहीत? प्रवासात धोके आहेत म्हणून कुणी प्रवास करणे सोडले आहे का ?अपघात होण्याचा धोका आहे म्हणून कुणी वाहन चालवणे बंद केले की शॉक लागेल म्हणून विजेचा वापर करणे बंद केले ! नाही नाही त्याऐवजी आपण वाहतुकीचे नियम पाळतो. क्लच गिअर ब्रेक याची माहिती करून घेतो. पण हीच गोष्ठ शेअरबाजाराच्या बाबतीत आढळत नाही. पूर्णपणे माहिती करून न घेता जर गुंतवणूक केली तर हात पोळणारच ! तुम्ही एक विचार करा. बाकीचे जे गुंतवणुकीचे प्रकार आहेत त्यात धोके नाहीत का ? पण तरीही तुम्ही गुंतवणूक करत असता! कधी सही बरोबर नाही म्हणून पैसे मिळायला त्रास, तर कधी बँकाचे घोटाळे, कधी घराचे पझेशन मिळत नाही, तर कधी कागदपत्र चुकीची असतात , जेव्हा दागिने मोडायला जातो तेव्हाच समजते तुम्ही फसला आहात. असे धोके आहेतच ना ! मुचुअल फंडातून तर गेल्या ५ वर्षात फायदा होत नाही आहे. मग एखादी नवी वाट चोखाळायला काय हरकत आहे!

गेल्या १०-१२ वर्षांच्या काळात मी तेजीचा व मंदीचा दोन्ही काळ अनुभवला आहे.माझी ही सर्व “क्रियेवीण वाचाळता नाही””आधी केले मग सांगितले” या उक्तीप्रमाणे मी प्रथेम अनुभव घेऊनच आता तुमचे गैरसमज दूर करावेत हा विचार आहे. शेअरबाजारातून कमीतकमी वेळात जास्तीतजास्त उत्पन्न मिळवता येणे शक्य आहे. ही काही जादू नव्हे मेहेनत, कष्ट माहिती,प्रयत्न व शेवटी परमेश्वरी कृपा यामुळे साध्य झाले आहे.तुमचा निर्णय योग्य असेल तर तुम्हाला बक्षीस , तुमचा निर्णय चुकीचा असेल तर शिक्षाही तुम्हालाच हा जगाचा न्याय आहे. सत्कारही तुमचाच आणी धिक्कारही तुमचाच आणी त्याला कारणही तुम्हीच ! दुसर्याला दोषारोप मात्र करता येत नाही आणी करूही नये. एवढे लक्षात असू द्या

मी तुम्हाला सर्व प्रकारे मदत करेन. ब्रोकर कसा शोधावा, ट्रेडिंग अकौंट कसा उघडावा, Demat अकौंट कसा उघडावा ,कुठे आणी कितपत विश्वास ठेवावा.सर्व माहिती कशी मिळवावी काय काय तयारी करावी हे सर्व मी तुम्हाला सांगेन. सर्व माहिती झाल्यावर स्वतःचा निर्णय तुम्ही स्वतः घ्यावा व स्वावलंबी बनावे एव्हढीच माझी आणी “आमची वहिनी “  यांची इच्छा.

नवीन आर्थिक वर्ष सुरु होण्यास अवधी आहे तिथपर्यंत तयारी करून नवीन वाटेवरचा प्रवास सुरु करू या का ?

पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Advertisements
This entry was posted in Uncategorized on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “माझी वाहिनी – लेख १

  1. पिंगबॅक माझी वाहिनी – लेख २ | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s