क्या बनेगा पैसा – आठवडा ९ मार्च ते १३ मार्च

आधीच्या आठवड्याबद्दल वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मार्केट या वर्षी आत्तापर्यंत सातत्याने वाढतच होतं. मार्केट नवनवीन उच्चांक गाठतच होतं. सेन्सेक्स ३०,००० व निफ्टी ९००० वर पोहोचला. यांत एक पंचाईत होत होती. नवीन गुंतवणूकदारांना शिरायला वावच उरला नव्हता.मार्केट थोडेसे पडले की पुन्हा वाढायला सुरुवात व्हायची. त्यामुळे हाताची घडी घालून बसण्याशिवाय पर्याय नव्हता. सगळ्यांना एक भीती सुद्धा होती – या भावांला खरेदी केली आणी मार्केट पडायला लागलं तर चढ्या भावांत शेअर गळ्यांत पडेल परिणामतः आपला पैसा अडकून पडेल.परंतु या आठवड्यांत या वाढीला लगाम लागला असं म्हणाव लागेल, अगदी आठवडाभर मार्केट पडतच होतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

या आठवड्यात मार्केट मस्त पडलं आणि मला तरी आनंद झाला. निफ्टीने ९००० पासून ८६७० च्याही खालची पातळी शुक्रवारी गाठली. मार्केट वाढले होतं त्यावेळी ज्यांनी शेअर्स विकून पैसे जमा केले असतील त्यांना शेअर स्वस्तात घेण्याची संधी शेअरबाजाराने दिली असेच म्हणावे लागेल. कांरणे काही कां असेनात.

गेल्या आठवड्यांत मार्केट ४ मार्च बुधवार आणी ५ मार्च गुरुवार या दिवशी आपटले होते.निफ्टी जवळ जवळ १०० पाईंट पडला. गेल्या शुक्रवारी धुलीवंदनाची सुट्टी होती. कोळश्याच्या खाणी आणी स्पेक्ट्रम यांचे लिलाव चालू होते आणी त्यांत संसदेचे अधिवेशन चालू, त्यांत महत्वाचे प्रस्ताव पास होतील की नाही हे समजत नव्हते त्यामुळे सर्वजण चाचपडत होते.
मार्केट २ दिवस सतत १००० पाईंट पडल्यामुळे कदाचित सोमवारी रिलीफ rally असेल असा सर्वांचा अंदाज होता.अहो तुम्ही म्हणाल रिलीफ RALLY म्हणजे काय? तर सतत मार्केट ढासळलेले बघून कंटाळलेल्या लोकांना थोडासा रिलीफ देणारी RALLY होय असे मला वाटते. अशा वेळेला मंदी करणारे घाबरतात आणी तेजी करणाऱ्यांना अंदाज येत नाही. सोमवारी ९ मार्चला असेच घडले. मार्केट्ची दिशा समजत नव्हती. मार्केट थोड्या वेळ पडत होते पण लगेच वाढत होते. अशी वेळ इंट्राडे करणाऱ्यांसाठी उत्तम. तुम्ही सतत मार्केट बघत असाल तर अख्खा दिवस इंट्रा करत बसा. जर ‘BUY’ पोझिशन असेल आणी इंट्रा झाला नाही तर मार्केट पडल्यानंतर तुम्ही शेअर घेतल्यामुळे स्वस्त पडतो. मार्केट पडत असताना गुंतवणूकदारांचा कल फार्मा शेअर्स खरेदी करण्याकडे असतो असे मला आढळले आहे.

यावेळी आपल्या मराठी भाषेत म्हणतात त्याप्रमाणे अवकाळी पाउस पडला. त्यामुळे शेतीशी संबंधीत शेअर्स पडले. पंजाब हरयाणा या राज्यांत या पावसाचा जास्त परिणाम झाला. बटाटा गहू आणी इतर रब्बीच्या पिकांवर विपरीत परिणाम झाला. लगेच विश्लेषकांनी स्पष्टीकरण दिले की याचा परिणाम , ‘CPI’ वर होईल असे वाटत नाही. कारण अशा वेळी सरकार बफर साठा बाजारांत आणते.परंतु काही दिवसांनी महागाईवर होणाऱ्या परिणामांमुळे लोक चिंतित आहेत. जिंदाल स्टील आणी पावर या कंपनीला पॉवर सेक्टरसाठी ठेवलेले कोल ब्लोक रिझनेबल किमतीत मिळतील अशी बातमी आली. युनायटेड स्पिरीट या कंपनीने हुगली (पश्चिम बंगाल) येथील युनिट बंद करीत आहे असे जाहीर केले. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशातील ‘JOB NUMBERS’ खूप चांगले आले त्यामुळे ‘DOLLAR’ मजबूत झाला. याचा रुपयाच्या किमतीवर परिणाम होतो. ‘IT’ कंपन्यांनी त्यांच्या उद्योगांत ‘SLUGGISHNESS’ येण्याची भीती व्यक्त केली.

मंगळवार दिनांक १० मार्च रोजी ‘ADLAB’ या कंपनीचा ‘IPO ’जाहीर झाला. प्राईस BAND २२१ ते २३० जाहीर झाला किरकोळ गुंतवणूकदारांसाठी Rs१२ची सूटही दिली आहे, ६५ शेअरचा मिनिमम लॉट हि जाहीर झाला. हा इशू मार्चमध्ये आला आहे. यावेळी लिक्विडीटीचा प्राब्लेम असतो. माझ्या अनुभवानुसार हा इशु मला जरा महाग वाटला. ‘IPO’ चा पैसा कर्ज फेडण्यासाठी वापरला जाणार आहे. प्रगतीसाठी नाही.त्यामुळे इशुला प्रतिसाद कमी राहील अशी भीती होती. हे अंदाज खरे ठरले आणी ‘ADLAB’ ला आपल्या इशुचा प्राईस BAND खाली आणावा लागला (१८० ते २१० ) तसेच इशुची मुदत १७ मार्च पर्यंत वाढवावी लागली. ही गोष्ट गुरुवारची.

गुजरात फ्लोरो ही कंपनी ‘INOX WIND’ या त्यांच्या स्टेक असलेल्या कंपनीचा ‘IPO’ आणत आहे. सध्या मार्केट FUNDAMENTALS वर चालू नसून लिक्विडीटीच्या उपलब्धतेवर चालू आहे असे म्हणावे लागेल. ग्राउंडलेव्हलवर मंदीच आहे असे म्हणावे लागेल. मार्केट ज्या प्रमाणांत आणी ज्या वेगाने सुधारत आहे त्या प्रमाणात अर्थव्यवस्था सुधारली नाही. ‘नितेश इस्टेट’ या शेअरचे सर्किट लिमिट २०% वरून १०%ची केली गेली. अशा शेअर्स पासून आपण सावध राहिलेले बरे. ‘टेक महिंद्र’ या कंपनीने गुगल टेक्नोलॉजी बरोबर पहिले ‘ EXCELLENCE’ सेंटर LAUNCH केले त्यामुळे शेअरची किमत वाढली. ९०० MHZचे बिडिंग क्लोज झाले त्यामुळे IDEA, R.COM, BHARATI AIRTEL या शेअर्समध्ये तेजी होती. ‘MONET ISPAT’ या कंपनीला कोल ब्लॉक मिळाल्यामुळे त्या शेअरचा भाव वाढला.

बुधवार दिनांक 10 MARCH रोजी रुपया कमजोर झाला. वेदांत ग्रूपच्या’ CAIRNS  INDIA’ या कंपनीकडे कॅपिटल GAINS TAX ची मागणी केली गेली. ही मागणी मोठ्या रकमेची असल्याने CAIRN INDIA च्या शेअर्सची किमत कमी झाली. ‘USFDA’ या अमेरिकन AUTHORITY ने ‘शिल्पा मेडिकेअर’ या कंपनीच्या API फोर ओंकोलोजी याला APPROVAL दिले त्यामुळे या शेअर्सच्या किमतीत जबरदस्त वाढ झाली. .

कालपासून चीन आणी इतर देशांकडून येणाऱ्या स्टेनलेस स्टील वर ‘ANTI DUMPING’ ड्युटी लावण्याचा सरकारचा विचार आहे अशी खबर होती. यामुळे ‘उत्तम गालवा स्टील’ व ‘जिंदाल स्टेनलेस स्टील’ या शेअर्समध्ये वाढ झाली. स्टेट बँक ,PNB तसेच CANARA बँक याना स्वतः बाजारातून पैसे उभारण्यास परवानगी मिळाली. ‘रिलायन्स कॅपिटल’ ‘कोटक’,’ MAX INDIA’ ‘DEN NETWORKS’ या कंपन्यांनी ‘FII’ (FOREIGN INSTITUTIONAL INVESTMENT) ची लिमिट ४९% वरून ७४% पर्यंत वाढवली. सिगारेटवरील ड्युटी वाढवल्यामुळे ‘ITC’ चा शेअर खाली आला होता. परंतु देवेश्वर (ITC चे CHAIRMAN) यानी सांगितले की आम्ही TAX एवढीच सिगारेटच्या किमतीत वाढ करणार आहोत त्यामुळे त्याचा परिणाम कंपनीवर कमी होईल. यामुळे शेअरच्या किमतीत वाढ झाली. ‘कोलगेट’ कंपनीचा शेअर वाढतो आहे कारण ही कंपनी बोनस देण्याची शक्यता आहे असा अंदाज आहे. या कंपनीत पेरेंट कंपनीचा स्टेक ५१% आहे बाकीच्या कंपन्यानमध्ये हा स्टेक ७४% असतो. डाबरकंपनीचा शेअर वाढतो याचे कारण त्यांचा इन्शुरन्समध्ये स्टेक आहे हेही आहे. रशीयातील अस्थिरतेमुळे आणी त्यांच्या चलनाच्या घटत्या किमतीमुळे ‘REDDYS’ आणी ‘ग्लेनमार्क’ या कंपन्यांचे शेअर्स पडले होते. ‘ग्लेनमार्क’ या कंपनीने अस्थमा इनहेलर मेडिकेशन मार्केटमध्ये प्रवेश केला. ‘CROMPTON GREAVES’ या कंपनीला सौदी इलेक्ट्रिककडून मोठी ऑर्डर मिळाली.

आज मार्केट बंद झाल्यावर जानेवारी २०१५ ‘IIP’ चे आकडे आणी INFLATION संबंधीत आकडेवारी आली.
‘IIP’ १.७% वरून २.६% पर्यंत वाढले. ही चांगली बातमी आहे पण ‘INFLATION’ ही ५.१९% वरून ५.३७% पर्यंत वाढले. त्यामुळे महागाईने आपला वाढण्याचा कल सुरु ठेवला. ‘NATCO PHARMA’ या कंपनीच्या हेपेटाइटीस सी च्या जनरिक औषध “SOVALDI’ साठी परवानगी मिळाली त्यामुळे शेअरची किमत वाढली.आज सरकारने संसदेत “INSURANCEबिल प्रस्तुत केले. हे बिल विरोधकांनी सुचवलेल्या दुरुस्त्या मान्य केल्यामुळे आता संसदेत पास होईल अशी अशा आहे. पण मार्केट बंद होईपर्यंत याची काही खबर आली नाही. ‘NTPC’ च्या बोनस डिबेंचर्स मिळण्यासाठी रेकॉर्ड डेट २३ मार्च आहे. तसेच ‘TECH महिंद्रा’ च्या बोनस आणी स्प्लिट साठी रेकॉर्ड डेट २० मार्च आहे.

आज मार्केट बंद झाल्यानंतर ‘INSURANCE’ बिल राज्यसभेतही पास झाले.. उद्या या क्षेत्रातील शेअर वाढतील असे सगळ्यांना वाटले होते. पण ‘BUY on RUMOURS आणी SELL on NEWS हे तत्व बहुतेक वेळेला मार्केट आचरते. आधी खिचडीचा वास येतो पण जेवायला बसल्यावर पातेलं रिकामेच असते असे म्हणावे लागते..त्याप्रमाणे शुक्रवारी अनुभव आला. ‘INSURANCE’ शी संबंधीत शेअर्स सुरुवातीची बढत टिकवू शकले नाहीत..

आज शुक्रवार १३ मार्च रोजी मार्केट खूप पडले. आज निफ्टीने ८६०० चे लेवेल तोडले. आज सरकारने आयात केलेल्या रबरावर आयात ड्युटी बसवली. याचा परिणाम म्हणून टायर कंपन्यांचे मार्जीन कमी होईल म्हणून त्यांचे शेअर पडले. कर्नाटक राज्य सरकारने सिगारेटवर ‘VAT’ आकारण्याचा निर्णय घेतल्याने पुन्हा एकदा ‘ITC’ चा शेअर पडला.

असे मार्केट पडायला लागलं की किरकोळ गुंतवणूकदार मार्केटमध्ये शिरायला घाबरतात. त्यामुळे स्वस्तांत चांगले शेअर्स मिळण्याची संधी हुकते आणी नंतर मार्केट वाढल्यावर धावत पळत बस किंवा लोकल गाडी पकडावी त्या पद्धतीने पुन्हा या भावांत आपल्याला शेअर मिळेल की नाही असे वाटून चढ्या भावांत शेअर खरेदी करतात त्यामुळे त्यांना कायमच ‘क्या बनेगा पैसा’ असे विचारावे लागते.

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “क्या बनेगा पैसा – आठवडा ९ मार्च ते १३ मार्च

  1. पिंगबॅक शेअरमार्केटचे पोस्ट-मार्टेम – १६ मार्च ते 20 मार्च | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s