आठवड्याचे समालोचन २३ मार्च २०१५ ते २८ मार्च २०१५ – बेअर्सनी केली मात

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

या आठवड्यातही शेअर मार्केट कण्हत रडतखडत कुरकुरत सुरु झालं. या आठवड्यात “DERIVATIVE EXPIRY” गुरुवारी होणार त्याचं ग्रहण मार्केटला सोमवारपासूनच लागलं

मला “DERIVATIVE MARKET” जरुरीपुरतेच समजतं. पोझिशन ‘क्लोज’कराव्या लागतात किंवा ‘रोल ओव्हर’ कराव्या लागतात. आणी नव्या सिरीजसाठी पोझिशन घेतली जाते व त्याप्रमाणे कॅश मार्केटमधील शेअर्सच्या किमतीत बदल होतो. त्यामुळे एकंदरीत लक्षांत काय घ्यायचे ? या आठवड्यांत किमतीत होणारे बदल हे ‘EXPIRY’ ला अनुसरून होत आहेत. मग आपण काय करायचं ? हा प्रश्न तुम्हाला पडत असेल. एखाद्या शेअरमध्ये ‘ओपन इंटरेस्ट’ वाढत असेल किंवा ‘SHORT- COVERING RALLY’ येण्याची शक्यता असेल तर ते शेअर्स ३-४ दिवसांसाठी विकत घ्यायचे व थोडासा फायदा घेऊन विकायचे इतकच.

मार्च महिन्याच्या शेवटी सुट्ट्या खूप आल्या आहेत. PAY-IN PAY-OUT चा प्रॉब्लेम येईल. चेक मिळायला अर्थातच कॅश मिळायला उशीर लागणार हे ओघानेच आले.ही सुट्टी फक्त भारतातच आहे. परदेशांतील शेअर मार्केट्स चालू रहाणार आहेत. त्याचा परिणाम सुट्टी संपल्यानंतर जेव्हां मार्केट उघडेल त्या दिवशीच्या व्यवहारावर होणार.

सध्या मार्केटला नजीकच्या भविष्यांत काहीच ट्रिगर नाही. उलटपक्षी जमीन अधिग्रहण विधेयक पास झाले नाही. G.S T. (GOODS AND SERVICES TAX) लागू होण्यास अजून एक वर्ष बाकी आहे. परदेशातून येणारा पैशाचा ओघ थांबेल ह्याची भीती सतावते आहे.या सर्व कारणांमुळे मार्केट मंदीत आहे.पूर्वी मार्केट ‘’BUY ON DIPS’ होते आतां ते ‘SELL ON RISE किंवा RALLIES’ मध्ये रुपांतरीत झाले आहे. त्यामुळे मार्केट मंद गतीने वाढत आहे आणी वेगाने पडत आहे असं वाटतंय.

सोमवारी COAL BLOCKच्या CANCELLATIONचे नाटक चांगलेच रंगले. JSPL(जिंदाल स्टील आणी पावर) आणी ‘उषा मार्टिन’ या शेअर्सच्या किमतीवर परिणाम झाला.JSPLने HIGH कोर्टांत धाव घेतली HIGH कोर्टाने त्यांना थोडासा दिलासा दिला. हे कळल्यानंतर ज्स्पल्च्या शेअर्सचा भाव थोडा सुधारला. सोमवारी निफ्टी ८५५० पाईंट वर बंद झाला.

मंगळवारी RANBAXY आणी SUN PHARMA यांच्या मर्जरमधील सर्व बाबी पूर्ण झाल्या असे सांगितले. SUN PHARMAAचे १० शेअर्स ज्याच्याजवळ असतील त्याना RANBAXYचे 8 शेअर्स मिळतील. किंवा SUN PHARMAAच्या १ शेअरला RANBAXYचे .०.८ शेअर मिळतील. BULLS वर BEARS नी मात केली. २५० पाईंट मार्केट वर होते परंतु डोळ्याचे पाते लवते न लवते तो हे मार्केट लाल लाल दिसू लागले. सगळ्या बँकांचे शेअर्स पडत होते. निफ्टी पाडवायला BANK NIFTY ने पुढाकार घेतला.

बुधवारी ‘टाटा मोटर्स’ या कंपनीने RIGHTS ISSUE ची घोषणा केली तुमच्याजवळ ‘टाटा मोटर्स’ चे १०९ शेअर्स रेकॉर्ड डेटला असतील तर तुम्हाला Rs ४५० प्रती शेअर या दराने सहा शेअर्स किंवा Rs २७१ प्रती DVR शेअर या दराने ६ DVR शेअर्स मिळतील असे जाहीर केले.IDEA ने दिल्लीमध्ये 900 MHZ ची ३G सेवा सुरु केली. सरकारने NTPCला ५ कोल ब्लॉक आणी SAIL या कंपनीला १ कोल ब्लॉक दिला. ‘ULTRATECH CEMENT’ आणी ‘CENTURY TEXTILE’ याचे मर्जर होणार असे समजले. ‘IPCA LABORATORIES’ या कंपनीला त्यांच्या इंदोर आणी सिल्वासा येथील प्लांटसाठी USFDAने IMPORT ALERT जाहीर केला त्यामुळे शेअर Rs१०० पडला. सरकारने GAS POOLINGची घोषणा केली. यानुसार ‘GAIL’
( GAS AUTHORITY OF INDIA LIMITED) GAS आयात करेल आणी नंतर सर्व पॉवर प्लांटना देईल.यामुळे GAS BASED पॉवर प्लांटना GAS मिळण्याची शक्यता निर्माण झाली.GAS च्या किमती WORLD-WIDE कमी होत आहेत. त्यामुळे GAS वाजवी किमतीत उपलब्ध करता येणे शक्य होईल.  वर्तमानपत्रातून, टी व्ही वाहिन्यांवरून असे सांगितले की ब्रोकर्स आपल्या क्लायंटना पोझिशन हलकी करा, नंतरचे नंतर बघू असे सांगत आहेत. त्यामुळे मार्केट पडत आहे.
‘कहां पकडे और कहां निकले समझता नही ‘ अशी अवस्था झाली आहे. थोडा थोडा नफा घेत गेल्यास धंदा होतो आहे. ८-१० दिवसांसाठी पोझिशनल ट्रेड करतां येतो आहे.

गुरुवार हा ‘EXPIRY’ चा दिवस.विश्लेषकांच्या अंदाजापेक्षाही खालच्या पातळीला EXPIRY झाली. बहुतेकांनी नफावसुली केली असावी असे मला जाणवले. एप्रिलमध्ये सर्व कंपन्यांचे वार्षिक निकाल जाहीर होतील ते निकाल पाहूनच पुढील व्यवहार करावा. ‘ नवी विटी नवे राज्य’असेच सर्वानी ठरवल असाव असं मला वाटलं

रिझर्व बँकेने युनायटेड बँकेला कर्ज देण्याची परवानगी दिली.बजाज ऑटोने नवीन PULSAR RS २०० हे नवीन मॉडेल मार्केटमध्ये आणले. IDEA आणि यस बँक यांचा निफ्टीमध्ये समावेश करणार आणी DLF, JSPL यांना निफ्टीमधून वगळणार असे समजले. सरकारच्या GAS POOLING नीतीचा फायदा GSPL आणी TORRENT पॉवर यांना होईल. अशा बातम्या आल्या पण या बातम्यांचा परिणाम होऊन मार्केटचा रागरंग बदलला नाही. मार्केट पडतच राहिले. सुरुवातीला मार्केट कमी वेगाने पडले पण ८४०० पाईंट निफ्टीने पार केल्यानंतर मार्केट जोरदार आपटले. बेअर्सनी बुल्सवर मात केली. जशी  ऑस्ट्रेलियाने भारतावर बाजी मारली. मार्केटमधल्या बुल्सनी व भारतीय क्रिकेटवीरांनी ‘घरवापसी’ केली कि काय असा प्रश्न पडला.

गुरुवारी मार्केट ८३४२ निफ्टी आणी २७४५७ SENSEX वर बंद झाले.. गुरुवारचे मार्केट बंद झाल्यानंतर ज्या वेळेला काय काय घडले याचा मागोवा घेतला तेव्हां असे आढळले की लोकांनी शार्ट कवर करण्याच्याऐवजी जास्त शार्ट केले, शार्ट साईडला रोलओवर जास्त झाले.

शुक्रवारी सकाळी मार्केट अंदाजाप्रमाणे तेजीतच उघडलं. त्यावेळी निफ्टी ८४११ होता. पण तेव्हढ्याच वेगाने आपटलं ८३६० पर्यंत एका मिनिटांत निफ्टी घसरला. याचाच अर्थ प्रत्येक rally विकली जात होती. अशा वेळी INDIAVIX हा VOLATALITY इंडेक्स बघावा.. मार्केटचा मुख्य प्रवाह मंदीचा असल्याने मार्केटमधील तेजी फार काळ टिकत नाही. काही वेळा मला कळत नाही की काही शेअर्स कां वाढत आहेत. SPECTRUM किंवा कोळशाची खाण लिलावांत मिळाली तरी त्याचे पैसे देण्यासाठी कर्ज काढावेच लागणार. कर्जाच्या व्याजाचा भार कंपनीला पेलावा लागणार. येव्हढा मी विचार करत असतानाच BHARATI व IDEA या दणकून पडला. म्हणजेच हे माझे विश्लेषण बरोबर होते.

सरकारच्या नवीन LNG पोलिसीमुळे  ‘PETRONET LNG’ यां कंपनीवर परिणाम होईल. सरकार GAS च्या किमती $५.६१ MMBTU वरून $५.०२ MMBTU पर्यंत कमी करणार ही वार्ता समजल्यामुळे ‘RELIANCE’चा शेअरही आपटला. ACCENTURE ने त्यांचा GUIDANCE वाढवला त्यामुळे I.T. क्षेत्रातील सर्व शेअर्स तेजीत होते. THOMAS COOK त्यांच्या IKYA चा IPO आणणार आहे असं ऐकू आलं.. ‘GRASIM INDUSTRIES’ ‘LIVA’हा ब्रांड मार्केटमध्ये आणत आहे.आज सर्वांत नवल म्हणजे DOLLAR STRONG होता EQUITY WEAK होत्या तरीही रुपया फर्म होता. SENSEX २७४५३.६० आणी निफ्टी ८३४१.४० वर बंद झाला.

पुढच्या आठवड्यात काय होतंय ते बघू पुढच्या शनिवारी .. भेटूच लवकर

 

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे समालोचन २३ मार्च २०१५ ते २८ मार्च २०१५ – बेअर्सनी केली मात

  1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – आठवडा ३०मार्च ते १ एप्रिल – स्मार्ट आणी हुशार शेअर मार्केट | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s