आठवड्याचे समालोचन – आठवडा ३०मार्च ते १ एप्रिल – स्मार्ट आणी हुशार शेअर मार्केट

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

हा आठवडा खरे पाहतां ३च दिवसांचा म्हणायचा. कारण गुरुवारी महावीर जयंती, आणी शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी. या आठवड्याची चर्चा बरेच दिवस चालू होतीच. सर्व ट्रेडर्स तयारीतच होते. याच आठवड्यांत २०१४-२०१५ या आर्थिक वर्षाचा शेवट आणी २०१५-२०१६ या आर्थिक वर्षाची सुरुवात होणार. हे सर्व मार्केटने हेरून एप्रिल फुल केलेच. ३०० पाईंट मार्केट तेजींत ठेवून सगळ्यांना सुखद धक्का दिला. जणू मीच तुमच्यापेक्षा हुशार असं चिडवलं

मार्केटमधील विश्लेषक मार्केट किती खाली येईल याची चर्चा करीतच होते. जशी कोणतीही आई आपल्या मुलाबद्दल खात्रीलायकरीत्या काही गोष्टी सांगत असते. माझा मुलगा अमुक गोष्ट करीत नाही, अमुक अमुक गोष्ट खात नाही आणी नेमके परक्या माणसांसमोर त्या विरुद्ध घडते. लहान मुलं आयांना नाचवतात. पुन्हा सांगतात- “त्या मावशींनी जसं बनवलं तसं तू बनवत नाहीस म्हणून मी खात नाही”, असंच या आठवड्यांत मार्केटने केलं .सोमवारी मार्केट चांगले ५०० पाईंट वर होते. कुणालाही वाटले नव्हते मार्केट एवढे वर जाईल.

तशा फारश्या बातम्याही नव्हत्या. सरकारने सिगारेट्सवर EXCISE ड्युटी वाढवल्यामुळे ITC चा शेअर १३% पडलाच आहे.त्यातच कर्नाटक राज्यसरकारने VAT ही आकारण्याची घोषणा केली. जरी ITCने सिगारेट्सच्या किमती वाढवल्या तरी विक्रीवर त्याचा परिणाम होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण ही अवस्था फक्त भारतातच आहे असं नाही  स्मोकिंग व तंबाखूचा वापर कमी करण्यासाठी प्रयत्न सगळे देश करीत आहेत. ITC च्या शेअर्सचा P. E.(प्राईस-अर्निंग) रेशीओ २८ आहे. ITCच्या नफ्यामधील ४७% हिस्सा सिगारेट्सपासून मिळतो. असे असले तरी ITC चे हॉटेल्स, पेपर, FMCG, AGRI ,हे व्यवसायही चांगले चालू आहेत. ITC त्यांचे बिझीनेस वेगळे करण्याच्या विचारात आहे.आता हे सर्व बिझिनेस ITC या एकाच नावाच्या कंपनीत एकत्र आहेत.यामुळे ‘ITC’ शेअर रोजच्यासारखा न पडता वाढला.

‘IDEA’ ही कंपनी स्पेक्ट्रमसाठी बिड केलेले पैसे (जवळजवळ ३०००० कोटी ) कसे भरेल, कंपनी एवढे पैसे कसे उभे करील असे वाटत होते. पण कंपनीने सांगितले – “आम्ही एकदा ही रकम भरली की ३० वर्षांसाठी स्पेक्ट्रमविषयी काळजी करण्याचे कारण रहाणार नाही.यामुळे बिसिनेसमधील अनिश्चितता नष्ट झाल्यामुळे आम्हाला व्यवस्थापन करणे सोपे जाईल. जी रकम भरायची आहे त्याचे हफ्ते ठरलेले आहेत. त्याप्रमाणे आम्ही हफ्ते भरण्याची व्यवस्था करू शकू”, त्यामुळे ‘IDEA’ च्या शेअर्सची किमत वाढली.

मंगळवारी ‘INOX WIND’ या IPO मधील शेअरची किमत Rs३२५ ठरवली आहे असं कळलं. किरकोळ गुंतवणूकदारांना शेअर Rs३१० ला मिळेल. मंगळवारी ‘VIDEOCON D2H’ चे ‘NASDAQ’ वर लिस्टिंग झाले. स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांचा ‘NSE’(NATIONAL STOCK EXCHANGE) आणी BSE ( BOMBAY STOCK EXCHANGE) मधील स्टेक विकणार आहे. त्यांचा ‘NSE’ मध्ये १०% म्हणजे Rs २००० कोटी आणी ‘BSE’ मध्ये ५% म्हणजे Rs.४०० कोटी स्टेक आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांचा SBI LIFE मधला १०% स्टेक विकणार आहे.”MASTEK’ त्याच्या MAGESTO चा ‘IPO’ आणणार आहेत. “HDFC LIFE’ चा ‘IPO’ ही नजीकच्या काळांत येणार आहे. ‘GVK POWER’ त्यांच्या AIRPORT युनिटचा ‘IPO’ आणणार आहे.L&T ला संरक्षण खात्याची मोठी ऑर्डर मिळाली.

एप्रिल २०१५ ते सप्टेंबर २०१५ या काळासाठी $५.०५ प्रती MMBTU वरून $४.६६ प्रती MMBTU पर्यंत GASची किमत कमी केली. NCV (NET CALORIFIC VALUE) प्रमाणे GASची किमत बदलतात. मार्केट संपल्यानंतर सरकारने खते निर्माण करणाऱ्या कंपन्यांसाठी ‘GASPOOLING’ चा निर्णय घेतला. याचा फायदा खते निर्माण करणाऱ्या कंपन्यांना होईल.

बुधवारी सर्व ऑटो कंपन्यांचे विक्रीचे आकडे आले. MARUTI ची विक्री घटल्याने शेअर पडला. M&M ची निर्यात वाढली पण विक्री कमी झाली. ‘अतुल ऑटो’, ‘ASHOK LEYLAND’ , ‘EICHER MOTORS’ यांची विक्री वाढली. ‘बजाज ऑटो’ची विक्री कमी झाली. ‘HEROMOTO’ विक्रीत फारसा फरक पडला नाही. ‘आंध्र बँक, युनायटेड बँक, पंजाब आणी सिंध बँक आणी देना बँक यांची लाभांश देण्यातून सुटका होईल अशी चिन्हे आहेत.

सुप्रीम कोर्टाने कुमारमंगलम बिर्लांना कोल स्कॅम मध्ये SUMMONSवर स्थगिती देऊन दिलासा दिल्यामुळे हिंदाल्कोचा शेअर वाढला. ‘IOC’ ने जेट एंअरवेजला ATF कमी दराने देण्याचे मान्य केले. ‘ONGC ENERGY CENTRE’ ला HYDRO GENERATION PROCESS’ साठी US पेटंट मिळाले. आश्चर्यकारकरीत्या बुधवारी मार्केट चांगलेच वर राहिले. जणू सगळ्यांना मार्केटने ‘HAPPY NEW FINANCIAL YEAR’च्या शुभेच्छा दिल्या. सर्वसाधारणपणे जेव्हां जेव्हां अशी लांबलचक सुट्टी असते तेव्हा मार्केटमध्ये ट्रेडर्स पोझिशन ठेवत नाहीत. या आठवड्यांत पुन्हा एकदा मार्केटने असे सिद्ध केले की तुमच्या सर्वांपेक्षा मार्केट स्मार्ट आणी हुशार आहे.कितीही आणी कोणीही विश्लेषणे केली तरी मार्केटचाच वरचष्मा राहतो.

बुधवारी मार्केट संपल्यानंतर माननीय वाणिज्य मंत्री निर्मला सिथारामन यांनी ‘विदेशी व्यापार नीतीची घोषणा केली. त्यांनी सर्व निर्यातदारांना ‘QUALITY, RELIABILITY आणी ZERO DEFECT PRODUCT वर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. तसेच उत्पादन आणी सेवा क्षेत्र यांना जरूर ते प्रोत्साहन दिले जाईल आणी उद्योग करण्यासाठी अधिकाधिक सुलभता उपलब्ध होईल असे प्रयत्न केले जातील. असे सांगितले. ‘PHARMA’ AUTO COMPONENTSच्या निर्यातीस प्रोत्साहन दिले जाईल आणि निर्यातीचे उद्दिष्ट $९०० BILLION सन २०२०पर्यंत निश्चित केले आहे हे हि कळलं.

या विदेश व्यापार नीतीचा परिणाम आपल्याला सोमवारी मार्केटमध्ये दिसेलच.

 

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे समालोचन – आठवडा ३०मार्च ते १ एप्रिल – स्मार्ट आणी हुशार शेअर मार्केट

  1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन ६ एप्रिल २०१५ ते १० एप्रिल २०१५ – हसत खेळत मार्केट | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s