तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – March २०१५

फेब्रुवारीची प्रशोन्त्तरे वाचण्यासाठी इथे क्लिक करा

नाव: स्वप्नील मोकाशी
Email: swapnil.mokashi4@gmail.com
तुमचा प्रश्न : नमस्कार मैडम मी मागील ३ महिन्यांपासून शेअर मार्केट मध्ये शोर्ट टर्म ट्रेडिंग (डेली) करतो आहे. पण जो मि सुरवातीला घेतलेला शेअर आहे तो दिवसेंदिवस घसरत चालला आहे. त्यामुळे मी माझी त्या शेअर साठी गुंतवलेली रक्कम दुसरा शेअर विकत घेण्यासाठी नाही करू शकत का ?

तुमची अडचण मला समजली. तुम्ही एकदा म्हणता शार्ट टर्म आणी एकदा म्हणता डेली  म्हणजे काय समजावे. पण ज्या अर्थी तुम्ही खरेदी केलेल्या शेअरचा भाव घसरतो आहे त्याअर्थी तुम्ही डिलिव्हरी घेतली असेल असे मी समजते . तुम्हाला त्या शेअरचे पैसे दुसरे शेअर्स खरेदी करण्यासाठी वापरायचे असल्यास ते शेअर्स विकावे लागतील. मी ‘derivatives’मध्ये ट्रेडिंग करीत नाही पण यामध्ये ही व्यवस्था आहे.

नाव: tushar parakash hire
Email: tusharhire315@gmail.com
तुमचा प्रश्न : madam blue chip share mhanje konte astat

ज्या शेअर्सला volume आहे, लिक्विडीटी आहे, कंपनी प्रगतीपथावर आहे,लाभांश देते आहे तसेच कंपनीची  आर्थिक परिस्थिती चांगली असून कार्पोरेट governance  चांगला असतो. या कंपन्या त्यांच्या उद्योगांत किंवा क्षेत्रांत सुस्थापित समजल्या जातात. सामान्यतः “A’ ग्रूपमधील कंपन्या ब्लू चीप म्हणून ओळखल्या जातात.

नाव: FIROJ BABASO KANWADE
Email: SHAGUN_COMMUNICATION1@REDIFFMAIL.COM
तुमचा प्रश्न : MADAM NAMASTE, MALA SHARE MARKET MADHE PAISE LAVNAYACHI ICHYA HAI PAN MALA THODI BHAUT MAHITI HAI PARANTU MI PRIVETE JOB KARIT HAI JOB KARTA KARTA TRADING KARNE YOGYA HAI KA.ASEL TAR MI KONA KADE DEMAT A/C.KADNE YOGYA ASEL.

T+२ या पद्धतीप्रमाणे सोमवारी घेतलेला शेअर गुरुवारी ‘DEMAT’ अकौंटमध्ये जमा होतो. त्यानंतर ते शेअर्स कधीही विकता येतात. पेईन आणी पेOUT ही प्रक्रिया पूर्ण होण्यास ट्रेडिंग डे सोडून दोन दिवस लागतात. त्यानंतर २४ तासांत शेअर्स ‘DEMAT’ अकौंटवर जमा होतात किंवा विकलेल्या शेअर्सचे पैसे तुम्हाला मिळतात

नाव: भाऊ यशवंत बाबर
Email: bhauybabar@gmail.com
तुमचा प्रश्न : कोनताही शेर विकत घेतलेला तारीख पासुन डिमेट खात्यामधे किति दिवसात जमा होतो उदारन शेर विकत घेतले नन्तर तिन दीवसात भाव वाडला तर आपन विकू शक्तो काय पे इन व पे औट किती दीवसचे आसते ते कळवा

T+२ या पद्धतीप्रमाणे सोमवारी घेतलेला शेअर गुरुवारी ‘DEMAT’ अकौंटमध्ये जमा होतो. त्यानंतर ते शेअर्स कधीही विकता येतात. पे in आणी पे OUT ही प्रक्रिया पूर्ण होण्यास ट्रेडिंग डे सोडून दोन दिवस लागतात. त्यानंतर २४ तासांत शेअर्स ‘DEMAT’ अकौंटवर जमा होतात किंवा विकलेल्या शेअर्सचे पैसे तुम्हाला मिळतात.

नाव: Sukhadev Jadhav
Email: sukhadev100@gmail.com
तुमचा प्रश्न : SIP विषयी थोडी माहिती सांगु शकाल का? मार्केट मध्ये (मॅच्युअल फंड किंवा इतर) अशी योजना आहे का, जिच्यातून आपल्याला गरज पडेल तेव्हा काही प्रमाणात पैसे काढून घेता येईल?

हे सर्व तुम्ही म्युचुअल फंडाच्या बाबतीत विचारीत आहांत.त्याबाबतीत मी आपल्याला काहीही सल्ला देऊ शकत नाही.

नाव: atul
Email: deolekar.atul@gmail.com
तुमचा प्रश्न : ‘Loan’ amount ‘trading’ sathi vapar nya var kahi restrictions aahet ka.

तुम्ही एकदा लोन घेतल्यानंतर ठराविक कारणासाठी कर्ज घेतलेले नसल्यास ते तुम्ही कोणत्याही कारणासाठी वापरू शकता.उदा :  शिक्षणासाठी, घरासाठी, कारसाठी घेतलेले कर्ज तुम्हाला त्याच कारणासाठी वापरावे लागते.

नाव: dev suryawanshi
Email: devsuryawanshi2@gmail.com
तुमचा प्रश्न : Sir Sir mala share market chi sagli mahiti havi udharna- share stock kase vikat ghyache an konte share ghyache etc

तुम्ही माझा ब्लोग आणी माझी वहिनी या मासिकात आलेले लेख वाचा तरीही काही अडचण राहल्यास विचारा.

नाव: sandeep untwale
Email: sandeepuntavale@rideffmail.com
तुमचा प्रश्न : p e = industry p e = eps = samgun sanga

पी. इ.  म्हणजे प्राईस अरनिंग रेशीओ. प्रत्येक शेअरची किमत आणी उद्योगाचे उत्पन्न काय असावे याचे परिमाण ठरलेले असते. INDUSTRY P.E. हा INDUSTRY किती मार्जिनवर काम करते यावर अवलंबून असतो. E. P. S. म्हणजे EARNING पर. शेअर.

नाव: kishor patil
Email: kishpatil@yahoo.in
तुमचा प्रश्न : Madam mala asa vicharayache hote ki long term sathi aaapan aadi share vikala aani nantar to share kharedi karun trade purn kela tar chalto ka??

हा प्रश्न तुम्ही DERIVATIVES च्या  संदर्भांत विचारीत आहात. SPOTच्या बाबतीत नाही. त्यासाठी पोझीसन रोलओवर करावी लागते मी DERIVATIVESमध्ये ट्रेडिंग करीत नाही.

नाव: akash kadam
Email: akash.kadam7482@rediffmail.com
तुमचा प्रश्न : Madam tumacha navin gudi padwa 2015 blog mast aahe…mala tyat he vicharayache hote tyatil tharavik news mala kalyach nahit…tyasathi ky karave lagel..ex. ongc, suzlon, IPO chi mahit hoti pn aajun aahet..kalalyach nahit mahnje me news pahun sudha mala mahit nahi ki magchya aathavadyat ky ky zale hote…tya news tumala broker kadun samjatat ka…ka swatach vachun tv pahun baghvya lagatat…maza prashna vichtra aahe pn samjun ghya karan me navin aahe…

तुम्ही लक्ष देवून ऐकलंत वाचलत तर तुम्हालाही सर्व बातम्या  समजतील. एखाद्या शेअरचा भाव अचानक पडू लागला किंवा वाढू लागला तर त्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करा.

नाव: smita
Email: smitababar8@rediffmail.com
तुमचा प्रश्न : ata market down ahe. mala shares ghyayache ahet. tar te April 1 st week paryant ghetale tar chaltil ka? I want to prefer Bank Shares. Is it ok or not?

मार्केट तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तितकेसे खाली नाही. तुम्हाला बँकांच्या शेअर्समध्ये इंटरेस्ट आहे असे तुमच्या प्रश्नांवरून समजते. सद्या वार्षिक RESULTSचा मौसम आहे त्यामुळे बँकांचे वार्षिक RESULTS पाहून तुम्ही तुमचा निर्णय घ्या. RESULTS  पाहताना प्रत्येक  बँकेच्या ‘’NPA LEVEL’ कडे लक्ष द्या.

नाव: amol dhakane
Email: amoldhakane250@gmail.com
तुमचा प्रश्न : mla share market made utaryache ahe tar mla kahi tips sanga.mla kami risk gheun yat utaryche ahey.plz tell me

मी टिप्स देत  नाही. तुम्ही माझ्या ब्लॉगवरची माहिती वाचा काही अडचण असल्यास विचारा.सुरुवातीला थोड्या प्रमाणांत व्यवहार करा स्वतःचे गुंतवलेले भांडवल सांभाळा. टिपांच्या आहारी न जाता स्वतः अभ्यास करून निर्णय घ्या.

नाव: Onkar Madav
Email: oncar722@yahoo.com
तुमचा प्रश्न : Madam, jar eka share chi price rs100 dakhvat astil tar aapan 100 rs lach vicku shakto ki tyat buyer bargin karto ka mhanje rs99 kiva rs98.50? Ani jar bargain karatat tar mag he intra-day (short sell)madhypan hote ki faqta long term trading madhye?karan intra-day madhye 50paise cha fayda hot aslyas bargain kase karnar fayda tar khup kamich hoil na?
कुठला ब्लोग पोस्ट वाचून हा प्रश्न पडला?: Bhag – 27

इतर मार्केटप्रमाणे शेअर मार्केटमध्ये बार्गेन करता येत नाही. परंतु तुम्हाला ज्या भावाला खरेदीविक्री करायची असेल त्याप्रमाणे ऑर्डर टाकता येते.

नाव: Pankaj Gawali
Email: gawalipankaj@yahoo.com
तुमचा प्रश्न : share kasa kharedi karayacha ahe te kalale va kelehi. Pan nifty kharedi kashi karayachi, bank nifty mhanje kay, ti kuthe milel ? Ticha bhav kay asto?

निफ्टी किंवा बँक निफ्टी मध्ये शेअर्सप्रमाणेच खरेदीविक्री होते.सर्व इंडेक्स दूरदर्शन वाहिन्यांवर दाखवले जातात.

नाव: PRAVIN SALUNKE , AKOLA
Email: pravinsalunke.2009@rediffmail.com
तुमचा प्रश्न : Earning from stock market is taxable and how it is calculated.

एक वर्षाच्या आंत  तुम्ही शेअर्सची विक्री केल्यास तुम्हाला TAX  जास्त बसतो. एक वर्षानंतर STOCK  EXCHANGEच्या माध्यमातून विकल्यास TAX लागत नाही तुम्हाला मिळालेल्या लाभांशावरही TAX लागत नाही पण आपण आपल्या वैयक्तीक कर सल्लागाराचा सल्ला घ्यावा. हे उत्तम.

नाव: Santosh pange
Email: pange.santosh66@gmail.com
तुमचा प्रश्न : Sharemarketbabat surwat kashi karavi ya babat.
कुठला ब्लोग पोस्ट वाचून हा प्रश्न पडला?: Aapli site pahun

तुम्ही ब्लोगवरील सर्व पोस्ट वाचा. त्यातून तुम्हाला खुलासेवार माहिती मिळेल.

नाव: tushar prakash hire
Email: tusharhire315@gmail.com
तुमचा प्रश्न : madam majh saveing a/c ahe , dmat a/c open karaych ahe tar tya sobt mala ttreding a/c pan open karava lagel ka
कुठला ब्लोग पोस्ट वाचून हा प्रश्न पडला?: 18

होय तुम्हाला ट्रेडिंग अकौंटही ओपन करावा लागेल. ‘DEMAT’ अकौंट तुमच्या शेअरच्या खरेदीविक्रीची नोंद ठेवतो. ‘DEMAT’ अकौंट तुम्ही बँकेतही उघडू शकता. शेअर्सची खरेदीविक्री करण्यासाठी मात्र तुम्हाला ट्रेडिंग अकौंट उघडावा लागतो. ट्रेडिंग अकौंट मात्र ब्रोकरकडेच उघडावा लागतो.

नाव: aayesha
Email: aayesharafi@gmail.com
तुमचा प्रश्न : mala share markei ht madhe interest aahe me ek gruhini aahe kamitkami kiti hajar ne suruwat karavi lagel

Rs१००० पासूनही तुम्ही सुरुवात करू शकता. तुमच्या निवडीप्रमाणे आणी शेअर्सच्या किमती प्रमाणे शेअर्स खरेदी करून तुम्ही सुरुवात करू शकता.उदा. Rs१००० चा एक शेअर किंवा Rs १०० चे १० शेअर्स किंवा Rs. १० किमतीचे १०० शेअर्स खरेदी करू शकता. पण आपण हे लक्षांत ठेवा की गुंतवणुकीच्या प्रमाणांतच फायदा होणार.

नाव: Vaibhav Dhotre
Email: vrdhotre@gmail.com
तुमचा प्रश्न : मला पडलेले काही प्रश्न:
१) आतासुद्धा बँकेत instruction sleep भरणे गरजेचे आहे का?
२) sharekhan.com वर demat व trading खाते काढल्यावर मला brokerage द्यावे लागणार नाही का?
३) securities म्हणजे नेमके काय?
४) माझा demat खाते काढल्यावर मी as a broker काम करू शकतो का? नसेल तर त्यासाठी काय करावे लागेल?
५) समजा मी stop-loss लाऊन शेअर विकत घेतलो आणि विकण्यासाठी वाट पाहत आहे पण तोपर्यंत मार्केट बंद झाले तर तीच position दुसर्याही दिवशी राहते का वेगळे order लावावे लागते?
६) Demat account काढल्यावर मी आपोआप depository participant बनतो का?
७) option ट्रेड काय आहे?
८) A group, B Group shares कुठे mention केलेले असते?
कुठला ब्लोग पोस्ट वाचून हा प्रश्न पडला?: Not Particularly

(१) आपला जेथे ‘DEMAT’ अकौंट असेल तेथे instruction स्लीप द्यावी लागते. जर बँकेत असेल तर बँकेत जर ब्रोकरकडे असेल तर ब्रोकरकडे द्यावी लागते.आपला अकौंट ब्रोकरकडे असेल व आपण POWERऑफ ATTORNEY दिली असेल तर मात्र INSTRUCTION SLIP द्यावी लागत नाही.
(२) ब्रोकरेज ही तुम्हाला ब्रोकर जी सेवा देतात त्यासाठी आकारलेली फी असते.त्यामुळे यातून सुटका होत नाही.
(३) रोख पैशांचा व्यवहार वगळता ज्या ज्या प्रकाराने व्यवहार होतो त्याला SECURITIES असे म्हणतात. उदा : शेअर्स सरकारी कर्जरोखे, डिबेंचर्स..
(४) ‘DEMAT’ अकौंट उघडल्यावर तुम्ही ट्रेडिंग अकौंट उघडून स्वतःसाठी शेअर्सची खरेदीविक्री करू शकता. तुम्ही ‘DEMAT’ अकौंट उघडल्यावर AS A ब्रोकर काम करू शकत नाही. आपण ब्रोकर्स बनण्यासाठी काय काय करावे लागते ते BSE वा NSE च्या साईटवर जाऊन माहिती करून घेवू शकता.
(५) तीच पोझीसन राहत नाही पुन्हा ऑर्डर लावावी लागते.
(६) ‘DEMAT’ अकौंट उघडल्यावर तुम्ही ‘DIPOSITORY PARTICIPANT’ होत नाही.
(७) BSE किंवा NSE च्या साईटवर कंपनीचे नाव टाका. कंपनीची साईट उघडल्यावर त्या कंपनीचे शेअर्स कोणत्या ग्रूपमध्ये आहे ते लिहिलेले आढळते.
(८) मी DERIVATIVES मध्ये काम करीत नाही.

Advertisements
This entry was posted in Question and answers and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

4 thoughts on “तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – March २०१५

 1. sameer

  hello mam
  my age is 28 years .i dont know any thin about share market(from basic). 1#what is share market .2#what should i do first to enter in this business.3#how can i buy shares .4#how much minimum and maximum i can invest.5# is there any short term and long term investment facility. 6# if yes then how long i can invest my money.7#what is broker 8#where can i find these brokers

  1. surendraphatak

   तुमच्या प्रश्नांवरून असे आढळते की तुम्ही माझ्या ब्लोगवरील सगळे लेख वाचले नाहीत. जर तुम्ही सगळे लेख वाचलेत तर तुमच्या सर्व शंकांचे निरसन होईल हा मला विश्वास आहे. त्यानंतरही काही शंका राहिल्यास संपर्क साधा

 2. पिंगबॅक तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – एप्रिल आणि मे २०१५ | Stock Market आणि मी

 3. krushna

  सर मी करेन्सी मार्केट मध्ये ट्रेडिंग करतो पण मी नवीन आहे मला मार्केट चा अन्दाज काढता येत नाही. त्यामुळे खूप नुकसान होत आहे . तरी मला मार्गदर्शन करावे

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s