आठवड्याचे समालोचन ६ एप्रिल २०१५ ते १० एप्रिल २०१५ – हसत खेळत मार्केट

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

ह्या आठवड्यामध्ये आमच्या मार्केटला बातम्यांचा खुराक चांगला मिळाला. त्यामुळे मार्केट हसत खेळत होतं. पण बातम्यांमुळे हिसडे बसले नाहीत.बुल्स किंवा बेअर्स कोणालाही रागावण्याची किंवा रुसण्याची संधी मार्केटने दिली नाही.

सोमवारी ऑरोबिन्दो फार्मा या कंपनीच्या ‘SILDENAFIL’ या हायपर टेन्शन साठी असणाऱ्या औषधाला ‘ USFDA’ ची मान्यता मिळाली. ‘SUN PHARMA’ आणी ‘RANBAXY’ यांच्या मर्जरची Ex-डेट आहे आणी मंगळवारी रेकॉर्ड डेट होती. ‘ADLAB’चे लिस्टिंग होतं. लिस्टिंग अपेक्षेप्रमाणे फारसे चांगले झाले नाही. इशू १.१ वेळा SUBSCRIBE झाला होता. रोबोट सिस्टम ही गोकुळदास EXPORTSची सबसिडीयरी रेमंड विकत घेणार होती. भेलचे प्रोविजनल RESULTS येणार होते. TORRENT फार्माला ‘Ex-forge generic’ साठी ‘USFDA’ ची मान्यता मिळाली. ‘MOIL’ने ‘MANGANESE ORE’ च्या किमती कमी केल्या. सन टी व्ही च्या मुदत ठेवी ‘ATTACH’ केल्या गेल्या.

मंगळवारी सगळे अग्रो शेअर्स वर होते. ‘RCF’, ‘ADVANTA’, ‘INSECTISIDES INDIA’ , ‘चंबळ FERTILIZERS’ , ‘TATA केमिकल्स’ हे शेअर्स वर होते.तांदुळनिर्यात करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स वर होते. रिझर्व बँकेने ‘POLICY’ मध्ये काहीही बदल सुचवले नाहीत. बॅंका कर्जावरच्या व्याजाचा दर कमी करायला तयार नाहीत उलटपक्षी ठेवीवरचे व्याजदर कमी करीत आहेत यासाठी रिझर्व बँकेच्या गव्हर्नरने नाराजी व्यक्त केली. म्हणून बँकांचे शेअर्स पडले. मेटल्सचे शेअर्स वर होते. कोटकचा MCX मध्ये स्टेक आहे परंतु कोटकना बोर्ड ऑफ DIRECTORS वर घेणार नाहीत असे समजले. त्यामुळे कोटक स्टेक विकणार असे वाटले. त्यामुळे MCXचा शेअर खाली आला. ‘भारती’ व ‘IDEA’ चे शेअर्स वर होते.

काही बातम्या मार्केट संपल्यानंतर आल्या. ऑरोबिन्दोफार्मा या कंपनीला ‘QIP’ साठी आणी ग्लेनमार्क फार्माला ४९%FDI साठी अप्रूवल मिळाले; सरकार रियल इस्टेट रेग्युलेटर नेमणार;  ‘MUDRA’ बँकेचे बुधवारी पंतप्रधान उद्घाटन करणार; याचा परिणाम बुधवारच्या मार्केटवर होईल असं वाटलं.

बुधवारी ‘REC’ च्या OFS ची किमत जाहीर झाली. फ्लोअर प्राईस Rs ३१५ ठरली. हा भाव मंगळवारच्या क्लोज भावापेक्षा २% कमी होता. किरकोळ गुंतवणूकदारांना ५%सूट दिलेली होती. OFS OVERSUBSCRIBE झाला आणि किरकोळ गुंतवणूकदारानी खूप पाठिंबा दिला. त्यामुळे सरकारच्या डायवेस्टमेंटच्या कार्यक्रमाची सुरुवात धडाक्यात झाली. सर्वांनी काहूर उठवले की कर्जावरील व्याजाचे दर कां कमी होत नाहीत ?, या दबावामुळेच बहुतेक ‘ICICI’ ‘HDFC’ या खाजगी बँकांनी तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयीकृत बँकेने कर्जावरील व्याजाचे दर अगदी NOMINALLY कमी केले. पंतप्रधानांनी ‘MUDRA’ (MICRO UNITS DEVELOPEMENT REFINANCE AGENCY) या छोट्या आणी किरकोळ उद्योगांना Rs५०००० ते Rs१०००००० पर्यंत कर्ज देणाऱ्या बँकेचे उद्घाटन केले. ‘MUDRA’ बँक मायक्रो फायनान्स कंपन्यांसाठी रेग्युलेटर प्रमाणे काम करेल.मायक्रो फायनान्स लेंडिंगची मर्यादा दुप्पट केली. त्यामुळे SKS मायक्रो फायनान्स आणी S. E. इनवेस्टमेंटच्या शेअर्सचे भाव वाढले. जपानचा CURRENT ACCOUNT SURPLUS झाल्याने जपानचे मार्केट वाढले. HANGSANG ५२१ पाईंट वाढले. ‘INDIA’ चे AVIATION SAFETY RANKING ‘USFAA’ ने UPGRADE केल्यामुळे SPICEJET व JET AIRWAYSचे शेअर्स वाढले. सरकारने ५०९ ESSENTIAL DRUGSच्या किमती ३.९४% पर्यंत वाढवण्यास परवानगी दिली.

गुरुवारी ‘INOX WIND’ चे लिस्टिंग झाले. अपेक्षेप्रमाणे , ग्रे मार्केटमध्ये Rs ७० प्रीमियम असल्यामुळे लिस्टिंग Rs ४०१ वर झाले. ‘SEBI’च्या बदललेल्या नियमाप्रमाणे मिनिमम लॉटसाठीच्या अर्जालाही आता शेअर्स मिळतात त्यामुळे बाकी सर्व (कंपनी, कंपनीचा उद्योग. कंपनीचे प्रमोटर्स, कंपनी उभारत असलेला प्रकल्प) समाधानकारक असल्यास आपणही IPO मधे मिनिमम लॉटसाठी अर्ज करून बघायला हरकत नाही. आपल्याला चांगला लिस्टिंग गेन होऊ शकतो.

MOODYS ने भारताचे रेटिंग कायम ठेवून (BAA3), OUTLOOK POSITIVE केला. बजाज कॉर्प आणी CMC चे RESULT चांगले आले. सरकार आवश्यक वैद्यकीय उपकरणांची यादी बनवून त्यांची किमत ठरवेल. ‘BUPA’ आपला ‘MAX INDIA’ मधील स्टेक वाढवणार आहे. २७%वरून ४९%करणार आहे. मला आज एक नवीन सूत्र समजले. जेव्हा बॉंड यील्ड कमी होते रुपयाचे मूल्य वाढते तेव्हा बँकांचे शेअर्स तेजीत असतात. आणी घडलेही तसेच. पण नेहेमी असे घडते कां? हे तपासून पहायला हवे.

TCS आणी CMC या दोन कंपन्यांचे मर्जर होणार असं समजलं. १०० CMCच्या शेअर्सला ७९ TCSचे शेअर्स मिळतील. महिंद्रा आणी महिंद्रा त्यांच्या अग्री डिविजनमार्फत महिंद्रा समृद्धीद्वारे डाळीचा उद्योग करणार आहेत. पेरणीपासून कापणीपर्यंत सर्व कामांत देखरेख करणार. शेतकऱ्यांकडून डाळ विकत घेवून त्याच्यावर प्रोसेसिंग करणार. CROMPTON GREAVES त्यांच्या बिझीनेंसचा काही भाग ADVENT आणी TAMASEC या कंपन्यांना Rs २७०० कोटींना विकणार आहे.
शुक्रवारी ‘SPARK’ आणी BALKRISHNA INDUSTRIES यांचा समावेश BSE२०० या इंडेक्स मध्ये करणार आहेत असं जाहीर झाले ALCOA या कंपनीचा नफा चांगला वाढला. इराणकडे विपुल प्रमाणांत क्रुडचा साठा आहे, USAकडेही INVENTORY पुष्कळ आहे त्यामुळे नजीकच्या काळांत क्रूडचे भाव वधारण्याची शक्यता नाही.

‘IDFC’ ला भागधारकांची परवानगी मिळाल्यामुळे १ ऑक्टोबर पासून IDFC बँक चालू होईल. बँकेच्या २० शाखा असतील. BALANCE SHEET साईझ Rs ७०,००० कोटी असेल. IDFC BANK ही OWNER ऑफ THE PAYMENT BANK असेल. एका IDFCच्या शेअरला एक IDFC बँकेचा शेअर मिळेल. ‘MTNL’ ला Rs १२० कोटी करपरतावा मिळाल्याने MTNLच्या शेअर्सचा भाव वाढला. INDUSIND बँकेने ABN AMRO बरोबर JEWELLERY बिझीनेसच्या संदर्भांत करार केला. ग्लेनमार्क फार्मा या कंपनीच्या दोन औषधांना APPROVAL मिळाले.

एप्रिल ते जूनपर्यंत निरनिराळ्या कंपन्यांचे वार्षिक निकाल येत असतात. या निकालांबद्दल तज्ञ आणी विश्लेषक वेगवेगळी मते वर्तवत असतात. या आठवड्यांत खालील कंपन्यांचे वार्षिक निकाल खाली दिलेल्या तारखांना जाहीर केले जातील

  • INDAG RUBBER, ११ एप्रिल २०१५
  • TITAGARH WAGONS १३ एप्रिल २०१५
  • ACC, 8K MILES SOFTWARE, ALANKIT, DCB BANK, १४ एप्रिल २०१५
  • BHARAT SEATS, RIIL, १५ एप्रिल २०१५
  • TCS, GRUH FINANCE,MINDTREE, JAY BHARAT MARUTEE १६ एप्रिल २०१५
  • AGRO TECH FOODS, CRISIL, R. S. SOFTWARE, RELIANCE १७ एप्रिल २०१५
  • LIC HOUSING FINANCE १८ एप्रिल २०१५

अशा प्रकारे कंपन्यांचे RESULTS कधी आहेत हे बघून थोडीशी गुंतवणूक करून फायदा मिळवण्याचा प्रयत्न करता येईल. जशी ADMISSION मिळणे परीक्षेच्या निकालावर अवलंबून असते त्याचप्रमाणे शेअरमार्केटमधील हालचाल सुद्धा या महिन्यांत कंपनीच्या निकालांवर अवलंबून राहील.

आता आपली भेट पुढच्या शुक्रवारी…

 

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे समालोचन ६ एप्रिल २०१५ ते १० एप्रिल २०१५ – हसत खेळत मार्केट

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s