आठवड्याचे समालोचन १३ एप्रिल ते १७ एप्रिल २०१५ – कंपन्यांच्या वार्षिक परीक्षांचा निकाल

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

शेअरमार्केटची तुलना क्रिकेट या खेळाशी अगदी तंतोतंत होते. मैदानांत उतरेपर्यंत संघ अतिशय सुंदर असतो. फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण विकेटकीपिंग सगळे कसे सुंदर असते. पण प्रत्यक्षांत मैदानांत उतरल्यानंतर सगळे पितळ उघडे पडते. तसेच मार्केटमध्ये कोणत्या कंपन्यांचे रिझल्ट कसे येतील. काय होईल.कुणास ठाऊक याचेच दर्शन या आठवड्यांत झाले.

क्रिकेटमधील अनिश्चितता शेअरमार्केटमध्येही अनुभवास येते. एखाद्या कंपनीचा फार सुंदर रिझल्ट लागतो. तर एखाद्या कंपनीच्या रिझल्टचा पार धुव्वा उडतो.पण माणूस आशेवर जगतो, हा महिना असाच आशा निराशेच्या खेळांत जाईल.
फ्रेंच कंपनी AREVA बरोबर L& T ने MOU सही केले. सरकारने १० ते १५ सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांची DIVESTMENT करणार असे जाहीर केले. BEL, RCF, PFC NBCC MMTC इत्यादी कंपन्यांचा यांत समावेश होता. त्यामुळे या कंपन्यांवर टांगती तलवार लटकत राहिली म्हणून या शेअर्सचे भाव पडले.VRL LOGISTICSचा IPO १५ तारखेला ओपन होणार असे जाहीर झाले. या IPOचा प्राईस BAND १९५ ते २०५ असा आहे. मिनिमम लॉट ६५ शेअरचा आहे. या IPOमध्ये किरकोळ गुंतवणूकदाराकरीता सूट नाही .ही कंपनी दक्षिण भारतातली LOGISTC उद्योगातील जुनी आणी सुस्थापित कंपनी आहे. हा इशू १७ एप्रिलला बंद होत आहे. IIP चे आकडे आले. २.६वरून ५% पर्यंत वाढ झाली.

मंगळवारी मार्केट बंद होते. परंतु ACC आणी DCB बँक यांचे रिझल्ट लागले. ACCचा Q1 चा रिझल्ट फारसा चांगला लागला नाही. DCBचे NPA कमी झाले. ASSET QUALITY सुधारली. नफा वाढला. ३९ कोटींवरून नफा ६३ कोटी झाला. FLIPKART आणी AIRTEL यांचा करार रद्द झाला. CPI मधील वाढ ५.३७ वरून ५.१७ इतकी कमी झाली. IMF ने भारताच्या प्रगतीचे अनुमान ६.५% वरून ७.५% केले. दीपक FERTILIZER ने मंगलोर केमिकल्समधील १२.१% स्टेक विकला. ICICI आणी AXIS बँकांनी होम लोनवरील व्याजाचे दर कमी केले.

बुधवार : BIOCON ही तिच्या SWENGENE या सबसिडीयरीचा IPO आणण्याच्या विचारांत आहे. BIOCONचा या कंपनीत ८५% स्टेक आहे. AXIS बँकेची या IPOचा मर्चंट BANKER आहे. WPI INFLATION -२.३३ % वरून -२.०६ झाले CPI मध्ये प्रायमरी आर्टिकलचा वाटा जास्त असतो. WPI मध्ये हा वाटा तेव्हढ्या प्रमाणांत नसतो. ८० पैसे पेट्रोल. आणी १.३० रुपयाने डीझेलचा भाव कमी केला. OILINDIA आणी GAIL यांना सबसिडीच्या BURDENमधून वगळण्यात आले. मार्केट जवळजवळ ३०० पाईंट पडेल असा अंदाज नव्हता. भारत सरकारने कॅनडाच्या सरकारबरोबर युरेनियमच्या पुरवठ्यासाठी करार केला. CHEMICO CORP ही कंपनी हा पुरवठा करेल. क्रूडचे दर वाढण्यास सुरुवात झाली. त्यामुळे CAIRN आणी ONGC या शेअर्सच्या किमती वाढल्या. गुजरात GAS या कंपनीला ठाणे येथे विस्तार करण्यासाठी परवानगी मिळाली. त्यामुळे त्यांचे SUBSCRIBERS १० लाखाने वाढतील असा अंदाज व्यक्त केला गेला.

गुरुवारी INDUSIND बँकेचा रिझल्ट चांगला लागला. गृह फायनान्स या कंपनीचा रिझल्ट चांगला लागला परंतु GROSS NPA चे प्रमाण वाढल्यामुळे शेअर्सच्या किमतीवर परिणाम झाला. TCSचा रिझल्ट फारसा चांगला आला नाही. OTHER INCOME असल्यामुळे नफा दिसला. volume ग्रोथ कमी झाली. कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना लिस्टिंग होऊन १० वर्षे झाली म्हणून बोनस जाहीर केला.भागधारकांनाही Rs २४ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. MIND TREE या कंपनीची रिझल्ट चांगला आला नाही. GLAUCUS RESEARCH GROUP यांनी आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की रोल्टा ही कंपनी FOREIGN BONDSचे पेमेंट करू शकणार नाही. कंपनीचे कर्ज वाढले आहे. कंपनीने EBITDA जास्त दाखवला आहे. रोल्टा ही कंपनी डिफेन्ससाठी बीड करणाऱ्या CONSORTIUM ची सदस्य असेल म्हणून या कंपनीचा शेअर जानेवारी महिन्यापासून वाढत होता.त्यामुळे या कंपनीच्या शेअर्सची किमत कमी झाली. महिंद्रा आणी महिंद्रा ही कंपनी इटलीमधील ऑटो DESIGN करणारी कंपनी खरेदी करण्याच्या शेवटच्या टप्प्यांत आहे.TATA मोटर्सच्या RIGHTS इशुला चांगला प्रतिसाद मिळाला.

शुक्रवारी CRISILचा रिझल्ट लागला. विक्री आणी नफा दोन्ही कमी झाले. त्यामुळे शेअर घसरला. RS SOFT WEARचा रिझल्टही फारसा चांगला आला नाही. VRL LOGISTIC या कंपनीचा IPO आज बंद झाला.

ताजा कलम : ब्लोग लिहित असतानाच RILचा रिझल्ट आला. GRM दोन वर्षाच्या उच्च स्तरावर पोहोचले. Rs ६३८० कोटी नफा झाला. Rs १० प्रती शेअर लाभांश जाहीर केला. RIL चा रिझल्ट चांगला आला. काही गोष्टी निरीक्षणातून समजतात. नेहेनी NIFTY आणी सेन्सेक्स याचे प्रमाण १:३ असते. म्हणजे निफ्टी १०० पाईंट वर असेल तर सेन्सेक्स 300 पाईंट वर असतो. पण आज मात्र निफ्टी ६६ पाईंट पडला होता त्यावेळीही सेन्सेक्स ११८ पाईंट पडला होता. याचा अर्थ LARGE कॅप शेअर्सचे प्रमाण पडणाऱ्या शेअर्समध्ये जास्त होते.

या आठवड्यांत अपेक्षा आणी निकाल यांचे गणित न जुळल्यामुळे शेअरमार्केटमध्ये मंदी आली. पुढच्या आठवड्यांत लागणारे कंपन्यांचे निकाल पुढीलप्रमाणे

  • १८ एप्रिल २०१५ LIC हौसिंग फायनान्स
  • २० एप्रिल २०१५ हिंदुस्थान झिंक. PERSISTENT, TATA SPONGE
  • २१ एप्रिल २०१५ HCLTECH, SYMPHONY, VST, विप्रो
  • २२ एप्रिल २०१५ MASTEK, YES BANK
  • २३ एप्रिल २०१५ ADVANTA, CAIRN , HDFC BANK, L&T फायनान्स, M & M FINANCE, MRF
  • २४ एप्रिल २०१५ INFOSYS, SIEMENS.

 

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

2 thoughts on “आठवड्याचे समालोचन १३ एप्रिल ते १७ एप्रिल २०१५ – कंपन्यांच्या वार्षिक परीक्षांचा निकाल

  1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – २० एप्रिल ते २४ एप्रिल २०१५ – बडा घर पोकळ वासा | Stock Market आणि मी

  2. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – १३ जुलै ते १७ जुलै २०१५ – शेअरमार्केटचा रुबाब राजाचा | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s