आठवड्याचे समालोचन – २० एप्रिल ते २४ एप्रिल २०१५ – बडा घर पोकळ वासा

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

या वर्षी शेअरमार्केटने सेन्सेक्सची ३००००ची पातळी आणी निफ्टीने ९०००ची मजल मारली. ही HOPE rally होती याकडे लोकांचे दुर्लक्ष झाले.  सर्व काही सुंदर वाटू लागले, पण प्रत्यक्षांत इतके सुंदर आहे कां या वास्तवतेकडे कोणीच लक्ष दिले नाही.

“ तुला येईल रे, तू हुशार आहेस, तुला चांगली डोकं आहे, तुझी स्मरणशक्ती चांगली आहे “ असे आईने किंवा शिक्षकाने वारंवार सांगितले तर मुलाच्या मनातील भीती नष्ट होते आत्मविश्वास वाढतो, परंतु त्याला अभ्यास केल्यानंतरच चांगले मार्क मिळणार हे उघड आहे. त्याचप्रमाणे सरकार बदलल्यानंतर वातावरण बदलले , नवीन आशावाद वाढीस लागला पण प्रत्यक्षांत गुंतवणूक होऊन ऑर्डर मिळून त्याचे फायद्यांत रुपांतर झाल्याशिवाय कंपन्यांची स्थिती सुधारणार नाही. शेअरमार्केट कायम आशेवरच जगते आणी वास्तवाच्या पुढे धाव घेते हे पुन्हा एकदा या आठवड्यांत पटले.

सोमवारी ‘ALPROZOLAM’ या औषधासाठी USFDA ची संमती NATCO PHARMA या कंपनीला मिळाली.VRL LOGOSTICचा IPO ७४.२३ वेळा SUBSCRIBE झाला यात किरकोळ गुंतवणूकदारांसाठी असलेला क्वोटा मात्र ७.९२ वेळा SUBSCRIBE झाला. ‘DELTA’ या कंपनीचा रिझल्ट चांगला आला. कंपनीचे कामकाज ‘TURN AROUND’ झाले. कंपनी तोट्यातून फायद्यांत आली. २ कोटीचा तोटा होता तेथे यावर्षी ८ कोटी फायदा झाला.

‘CLARIANT CHEMICALS’ ची २२ तारखेला BUY- BACK वर विचार करण्यासाठी बैठक होती . जेव्हां कंपनी BUY- BACK जाहीर करते तेव्हां प्रमोटर्सचा कंपनीवरचा विश्वास स्पष्ट होतो. LIC HOUSING फायनान्स या कंपनीची रिझल्ट चांगला आला. टीटाघर WAGANSचा रिझल्ट चांगला आला. आणी शेअर १:५ सा SPLIT झाला. HINDUSTHAN झिंक या कंपनीचा रिझल्ट चांगला आला.सरकारने ‘MAT’ च्या बाबतीत कडक धोरण स्वीकारल्यामुळे मार्केट पडले.
मंगळवारी ‘LIC’ णे DR. REDDY, LAB मधील स्टेक कमी केला. “DAIICHI SANKYO’ ही जपानी कंपनी SUN PHARMAA या कंपनीचे २१५लाख शेअर्स (८.९% स्टेक) Rs ९३० किमतीला विकणार आहे. ‘DAIICHI’ ने हे शेअर्स Rs ७३७ ला घेतले होते.यापैकी एकही शेअर SUN PHARMAच्या प्रमोटरने खरेदी केला नाही म्हणजेच स्वतःचा स्टेक वाढविण्यामध्ये त्यांना रस नाही असे जाणवले. HCLTECH चा STANDALONE NET PROFIT Rs १५६५ कोटी झाला. CROSSCURRENCY मुळे मार्जिन २१ % राहिले. HAVELLS LTD ही कंपनी ‘PROMPTEE RENEWABLE’ मधला ५१% स्टेक घेण्याच्या तयारीत आहे.

बरेच दिवस US $ची किमत ६२रुपयांवर स्थिर होती. आज US$ची किमत Rs६३.१५ झाली. ८ जानेवारीनंतर आज प्रथमच US$ ची किमत Rs६३ च्या पुढे गेली.आज विप्रोचा रिझल्ट फारसा चांगला आला नाही. रीशाद प्रेमजी विप्रोचा पूर्ण वेळ डायरेक्टर झाले. हा अझीम प्रेमजी यांचा मुलगा आहे. PERSISTENT SYSTEMS चा रिझल्ट फारसा चांगला लागला नाही.’VST INDUSTRIES’ ने Rs ७० प्रती शेअर लाभांश जाहीर केला. TOKYO RUBBER FUTURES ५ % वर होते. क्रूडचे ही दर वाढले. डोमेस्टिक रबराच्या किमती १५ % वाढल्या.याचा परिणाम TYRE कंपन्यांवर होईल.

बुधवारी ‘IMD’ (हवामान खाते) ने रिपोर्ट दिला की २०१४ मध्ये सरासरीच्या ८८ % पाउस पडला होता. या वर्षी तो ९३% पडेल. ‘EL NINO’ (वादळाचे नाव) चा प्रभाव असेल.’YES बँकेचा’ रिझल्ट चांगला आला. ‘ITC’ ने ‘CENTURY TEXTILES’ चा पेपर बिझिनेस घेण्यात ‘इंटरेस्टेड आहोंत असे सांगितले.CENTURYने सिमेंट बिझि नेस ‘ULTRA TECH’ ला विकला. MASTEKचा रिझल्ट फारसा चांगला लागला नाही. ‘KSB PUMP’ या कंपनीचा फायदा कमी झाला. ‘DOUBLE TAXATION’ साठी ज्या देशांबरोबर करार झाला आहे (उदा. सिंगापूर., मारिशस) अशा देशातल्या गुंतवणूकदारांना ‘MAT’ लागणार नाही अशी सरकारने घोषणा केली. अशाप्रकारे ‘MAT’ बद्दल चालू असलेला गोंधळ दूर झाल्यामुळे मार्केट सुधारले.’’CIMMCO’ या कंपनीला डिफेन्स इक्विपमेंटसाठी लायसेन्स मिळाले.

गुरुवारी ‘HDFC’ बँकेचा रिझल्ट चांगला आला. ‘NPA’ ची स्थिती सुधारली. HDFC बँकेने आपले मार्जिन आणी त्याबाबतचा लौकिक कायम ठेवला. “CLARIANT CHEMICALS’ ने BUYBACK ची किमत Rs९५० जाहीर केली,. त्यांचा रिझल्टही चांगला आला नाही. मार्केटमधील किमतीपेक्षा (Rs ९७७) BUYBACKची किमत कमी आहे.
‘सामान्यसे कम बारिश’ असे सांगितले जाते तेव्हा सिमेंट कंपन्याच्या शेअर्समध्ये मजबुती येते. कारण पावसाळ्यांत जो बिसिनेस पाऊस जास्त झाल्यामुळे थांबतो तो न थांबता सुरु राहतो.

RALLIES INDIA या कंपनीने ब्राझीलच्या चलनाचे अवमूल्यन आणी अवकाळी पाउस यांचा कंपनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होईल असे सांगितले. . रेल्वेने असे जाहीर केले की ते सुमारे १००० स्थानकांवर ‘WATER VENDING’ मशीन बसवणार आहेत. या साठी खालील कंपन्यांना shortलिस्ट केले आहे असे जाहीर झाले. (१) HUL (२) V.TECH (३) VOLTAS (४) ION (५) UREKA FORBES. (६) टाटा केमिकल्स. या मशीनवर Rs५ प्रती लिटर या दराने पाणी मिळेल.रेल्वेमध्ये BURGER SERVEकरण्यासाठी ‘DABUR’ या कंपनीबरोबर करार होण्याची शक्यता आहे. L&T फायनान्स या कंपनीचा रिझल्ट चांगला आला. ‘CAIRN’ इंडियाचा रिझल्ट त्यांनी तोटा जाहीर केल्यामुळे ही क्रूडच्या घटत्या किमतीचा परिणाम आहे असे वाटले. परंतु त्यांनी TAXच्या संबंधात प्रोविजन केल्यामुळे हा लॉस ONE TIME लॉस आहे हे स्पष्ट झाले. त्यामुळे कंपनीचा शेअर हळूहळू सुधारला. ‘MRF’चा रिझल्ट अतिशय चांगला आला. शेअरची किमत Rs१६००ने वाढली. EVEREST INDUSTRIES’ चा रिझल्ट चांगला आला.MEP INFRA चा IPO या आठवड्यांत क्लोज झाला. फारसा गाजावाजा झाला नाही. MSCI इंडेक्समध्ये ‘ AXIS’ बँकेचा समावेश होण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी सकाळपासूनच मार्केट पडत होते. सगळ्यांची आशा “INFOSYS’ च्या रिझल्टवर होती. हा रिझल्ट चांगला आला तर ते एकप्रकारचे मार्केटला संजीवन मिळेल आणी मार्केट वाढू शकेल असे वाटत होते. परंतु ‘INFOSYS’ चा रिझल्टही अपेक्षेप्रमाणे आला नाही. त्यामुळे कंपनीने १:१ बोनस आणी Rs२९.५० प्रती शेअर लाभांश जाहीर करूनही कंपनीचा शेअर Rs१४० ने खाली आला. ‘INFOSYS’च्या रिझल्टमुले मार्केटमधील घबराट आणखी वाढली आणी मार्केट वेगाने पडू लागले.
मार्केटने २०० DMA ची पातळी जवळजवळ गाठली.

मार्केट पडणं म्हणजेच समुद्राला ओहोटी येणं असं समजा. तेजी मंदी भरती ओहोटी हे सर्व घडणारच हा निसर्गाचा नियम आहे यांत नवे असे काही नाही. मार्केटमध्ये व्यवहार करणाऱ्या लोकांनी या घडामोडींशी स्वतःला रुळवून तसेच जुळवून घेतले पाहिजे. घाबरून जाऊन आकाशपाताळ एक करण्याचे काहीच कारण नाही. मार्केट पडणे ही सुवर्णसंधी समजून चांगले शेअर्स कमी भावाला खरेदी करण्याचा प्रयत्न करावा.एवढेच मला सर्व नव्याने शिकणाऱ्या लोकांना सुचवायचे आहे. पानगळतीनंतर पुन्हा नव्याने पालवी फुटतेच हे ध्यानात ठेवा

 

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे समालोचन – २० एप्रिल ते २४ एप्रिल २०१५ – बडा घर पोकळ वासा

  1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – २७ ते ३० एप्रिल २०१५ – बेअर्सचा प्रभाव आणी बुल्सची पीछेहाट | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s