आठवड्याचे समालोचन – 4 मे ते ८ मे २०१५ – गोंधळात गोंधळ

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

या आठवड्यांत मार्केटने चांगलेच रंग उधळले. बुल्स आणी बेअर्सनी आपापल्या पोळ्या भाजल्या. परंतु सामान्य किंवा किरकोळ गुंतवणूकदार मात्र गोंधळात पडला. एक दिवस ५०० पाईंट मार्केट वर तर दुसऱ्या दिवशी ७०० पाईंट मार्केट खाली. अशा वेळी कधी कधी हसायला येते. २४ तासामध्ये कंपन्यांची आर्थिक परिस्थिती एवढ्या मोठ्या प्रमाणावर कशी काय बदलू शकते. त्यामुळे हा काहीतरी गोंधळ आहे इतकं काय ते समजलं. बाकी फार काही कळल नसेल पण या आठवड्यांत मार्केट पडण्याची कारणं मात्र कळली.

 • क्रूड US$ ६८ पर्यंत पोहोचले
 • US$ च्या तुलने मध्ये रुपयाची किमत कमी झाली. ६४ रुपयाला १ US$ हा रेट झाला.
 • बॉंड यील्ड वाढले आणी बोंडच्या किमती कमी झाल्या
 • ‘MAT’ (मिनिमम आल्टरनेट TAX) मुळे परदेशी गुंतवणूकदारांमध्ये घबराट झाली भारतीय शेअर मार्केट EXPENSIVE झाले त्यामानाने चीनचे मार्केट विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षक वाटू लागले. त्यामुळे त्यांनी भारतीय बाजारातून पळ काढला.
 • अवकाळी पावसामुळे पिंकांचे नुकसान झाल्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील मागणी कमी झाली.
 • राज्यसभेतील विरोधी पक्षांच्या असहकारामुळे GST, जमीन अधिग्रहण विधेयक इत्यादी ठराव पास होण्याची शक्यता मावळली

सोमवारी आदित्य बिर्ला ग्रूपने आपली MADURA FASHION AND LIFESTYLE DIVISION वेगळी काढून त्याचे PANTLOON FASHION AND RETAIL(PFR) या तोट्यामध्ये असणाऱ्या लिस्टेड कंपनीमध्ये मर्जर केले PFRचे नाव बदलून आदित्य बिर्ला FASHION AND रिटेल(ABFR) असे होईल.यामुळे रिटेल क्षेत्रांत एक नवी आणी आर्थिकदृष्ट्या सक्षम कंपनी अस्तित्वात येईल. या व्यवस्थेनुसार ज्याच्याकडे १०० आदित्य बिर्ला नुवोचे शेअर्स आहेत त्याला ABFR या नवीन कंपनीचे ५२० शेअर्स ADDITIONAL मिळतील.

रबरच्या किमती घसरल्या. सरकारने एक्साईज ड्युटी लावली. OIL INDIA आणी ONGC या कंपन्याना सबसिडीचा भार उचलावा लागणार नाही असे सरकारने जाहीर केल्यामुळे मार्केटला भक्कम आधार मिळाला.मार्केट वाढले आणी टिकले सुद्धा. ऑटो विक्रीचे आकडेही चांगले आले. अशोक LEYLAND ची विक्री ४३% ने वाढली. बजाज ऑटोची पडझड थांबली. मारुतिने चांगली प्रगती दाखवली. त्यांची निर्यातही वाढली. M&M ची विक्रीही वाढली. UK आणी USA बरोबर ‘DOUBLE TAX AVOIDANCE AGREEMENT’ असली तरी त्यातील तरतुदीनुसार या देशातील ‘FII’ना MAT संबंधी तरतुदी लागू होतील असे सरकारने जाहीर केले. फक्त सिंगापूर, मारिशस आणी सायप्रस या देशांतील ‘FII’ ना झिरो कॅपिटल गेन्स TAX लागेल असे जाहीर केले. मार्केट संपल्यावर CANFINAA HOMES आणी SKS मायक्रोफायनान्स या कंपन्यांचे रिझल्ट्स जाहीर झाले. हे रिझल्ट्स चांगले आले

सोमवारच्या आकडेवारीवरून ‘FII’ नी विक्री थांबवली खरेदी मात्र फारशी आढळली नाही. सोमवारी बँक हॉलिडे असल्यामुळे एल आय सी मार्केटमध्ये नव्हती. बँक ऑफ बरोडाने बेस रेट .२५ पाईंटने कमी केला. एका हातानी द्या आणी दुसऱ्या हातानी घ्या अशी LPG मधली हालचाल आहे. सवलतीच्या दरांत जे सिलेंडर दिले जातात त्या सवलतीच्या (सबसिडीवर) पैशावर आयकर लावावा असे घाटत आहे. आज जे रिझल्ट लागले त्यांत ट्यूब इन्वेस्ट मेंट, डाबर, आणी स्टेट बँक ऑफ हैदराबाद यांचे रिझल्ट्स चांगले आले. बर्जर पेंटने महाराष्ट्रांत पावडर कोटिंग प्लांट सुरु केला. क्रुडऑइलच्या किमती वाढत आहेत. जेव्हा असे मार्केट पडत असते तेव्हां BOTTOM तयार झाला की नाही हे समजत नाही, STOPLOSS झटकन TRIGGER होतात त्यामुळे VOLUME कमी करावेत.

सुप्राजीत इंजिनिअरिंग ह्या कंपनीला PHOENIX LAMP या कंपनीमधील ५१% ते ६१% शेअर्स Rs ८९ प्रती शेअर या किमतीने खरेदी करायला .शेअरहोल्डर्सनी परवानगी दिली. ही कंपनी २६% शेअर्स अक्वायर करण्यासाठी Rs१०० प्रती शेअरने ओपन ऑफर आणणार आहे. KEC, त्रिवेणी टर्बाईनस, फोर्स मोटार्स, GIC हौसिंग, चे रिझल्ट चांगले आले. कोटक महिंद्रा बँकेचे रिझल्ट अपेक्षेपेक्षा चांगले आले. बँकेने १:१ असा बोनस जाहीर केला.

बुधवारी मार्केट ७०० पाईंट पडले. दूरदर्शन वरील सर्व वाहिन्यांवरील विश्लेषक लोकांनी इंट्राडेसाठी खरेदी करायला सांगितली होती. कुणीही ७०० पाईंट मार्केट पडेल असा अंदाज वर्तवला नव्हता. मुलभूत परिस्थिती बदलल्याची चिन्हे टेक्निकल ANALISIS दर्शवत नाही. क्रूड वाढले, रुपया घसरला, GST, जमीन अधिग्रहण विधेयक पास होण्याची चिन्हे नाहीत.प्रत्येक रीफार्मसाठी अडसर समोर येत आहेत, आणी त्यांत भरीसभर म्हणून सलमानखानच्या विरोधांत आलेला कोर्टाचा निकाल या सर्वांचे प्रतिबिंब टेक्निकल विशेशानांत दिसत नाही. कारण तो फक्त शेअरच्या किमतीतील हालचालींवर आधारलेला असतो.

आमच्या गृहिणीच्या भाषेत बोलल्यास रेसिपी बनवताना प्रत्येक पदार्थाचे प्रमाण दिलेले असते. परंतु पदार्थ कोणत्या गुणवत्तेचा हवा हे सांगत नाहीत. मैदा जुना असेल किंवा भाकरीचे पीठ जुने असेल तर साधे साधे पदार्थ बिघडतात.त्यामुळे तुम्हाला मुलभूत गोष्टींचे ज्ञान असणे गरजेचे आहे.कारण शेअर्स स्वस्तांत मिळतो आहे की महागांत? INDUSTRY P. E. किती आहे, उद्योगाला आणी कंपनीला वाद होण्यासाठी किती स्कोप आहे, सरकारी धोरण काय आहे हे सगळं पाहावच लागत. जर शेअर महाग पडला असे वाटले तर चटकन विकून किंवा थोड्या फायाद्यांत विकून मोकळे व्हावे. जेव्हा मार्केट पडत असते तेव्हाही जे शेअर्स पडत नाहीत त्या शेअर्सकडे ध्यान दिले पाहिजे. ते शेअर कां पडले नाहीत याचे विश्लेषण करून असे शेअर्स थोड्या थोड्या प्रमाणात जमा करावेत.

आज मार्केट पडायला एक कारण म्हणजे निफ्टीची मोठ्या प्रमाणांत विक्री झाली. आज निफ्टी ८२२४ असताना ३.८ लाख निफ्टी, ८२१८ असताना ३.२ लाख निफ्टी, आणी ८२३३ निफ्टी असताना ३.१ निफ्टीची विक्री झाली. ही विक्री 9 वाजून ५३ मिनिटांनी झाली. या प्रकारच्या ट्रेडना ALGORITHAM ट्रेड असेही म्हणतात. इंडेक्स जसजसा खाली जाईल तसतशी विक्रीची ऑर्डर होईल असा प्रोग्रॅम सेट केलेला असतो. उदा: निफ्टी ८३३० TRENDLINE SUPPORT, ८२७० २०० DAYS MOVING AVERAGES निफ्टी आणी ८२१० EARLIER DAY LOW ह्या तीन PIVOT पाईंटच्या खाली निफ्टी गेल्यामुळे ALGOTRED TRIGGER झाले आणी निफ्टी पडावयास सुरुवात झाली.

गुरुवारी IDBI बँकेने .२५ पाईंटने बेस रेट कमी केला. हा कमी केलेला रेट ११ मे पासून लागू होईल. PNB नेसुद्धा बेस रेट कमी केला. F & O मध्ये ७ कंपन्यांचे शेअर्स सामील केले जाणार आहेत. रुपयाचे WEAK होणे थांबले नाहि . रुपया सप्टेंबर२०१० नंतर आज प्रथमच ६४.२० झाला. बॉंड यील्ड वाढले आणी बोंडच्या किमती कमी झाल्या.

शुक्रवारी सरकारने ‘MAT’ वर विचार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमली.. त्यामुळे मार्केट मध्ये पुन्हा एकदा खरेदी झाली. पण PNB, IOB, या राष्ट्रीयीकृत बँकांनी निराशाजनक निकाल दिले. त्याच बरोबर HUL,अलाहाबाद बँक यांचे रिझल्ट्स चांगले आले. HEROMOTOCORPच्या रिझल्ट्सने निराशा केली.मार्केट पुन्हा ५००पाईंट वर गेले. दिवसभरांत एकदाही मंदीची चिन्हे जाणवली नाहीत. मार्केटने निफ्टी ८२०० चा टप्पा पार केला.व पुन्हा एकदा विश्लेषकांना कोडे घातले. सांगा पाहू पुढच्या आठवड्यांत मार्केट वर राहील की खाली ?

या आठवद्यांत भारती रिटेल आणी PANTLOON रिटेल यांचे मर्जर होणार असे जाहीर केले. PNC INFRATECH या कंपनीचा ‘IPO’ आला. प्राईस BAND Rs ३५५ ते Rs ३७८ आहे. ही कंपनी रस्ते बांधण्याच्या उद्योगांत आहे. कंपनी आर्थिकदृष्ट्र्या सक्षम असली तरी शेअर महाग आहे.

जणू काही मार्केटने या आठवड्यांत उनपावसाचा खेळच दाखवला. एक दिवस मार्केट ७०० पाईंट खाली तर दुसरे दिवशी ५०० पाईंट वर अशा प्रकारे बुल्स आणी बेअर्सची म्हणले तर शिमगा म्हटले तर दिवाळी साजरी झाली. पण मधल्यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांच्या मनांत मात्र भीती आणी गोंधळ निर्माण झाला. एकाचा होतो खेळ आणी एकाचा जातो जीव ही म्हण खरी होताना दिसली.

पुढील आठवड्यांत जाहीर होणारे निकाल:

 • ९ मे २०१५ युनिकेम lab, syndicat बँक
 • ११ मे २०१५ बँक ऑफ बरोडा, हवेल्ल्स , SRF
 • १२ मे २०१५ अपोलो टायर्स, अशोक LEYLAND, सेन्ट्रल बँक, DRREDDY’S, मदरसन सुमी, पंजाब सिंध बँक, सोभा DEV, UCO बँक ,UNION बँक, VIJAYA बँक
 • १३ मे २०१५ अडाणी ENTERPRISES, इमामी, लुपिन
 • १४ मे २०१५ AHMEDNAGAR FORGING, CASTROL INDIA, GRINDWELL NORTON, INDIAN बँक JK TYRES, बँक ऑफ महाराष्ट्र, NCC MCX , OBC, PC JEWELLERS
 • १५ मे २०१५ अमृतांजन, ILFSTRANSPORT, BF UTILITIES, TORRENT PHARMA, देना बँक, CADILLA HEALTH

 

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे समालोचन – 4 मे ते ८ मे २०१५ – गोंधळात गोंधळ

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन -११ मे २०१५ ते १५ मे २०१५ – शेअरमार्केटच्या तब्येतीत सुधार | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s