आठवड्याचे समालोचन -११ मे २०१५ ते १५ मे २०१५ – शेअरमार्केटच्या तब्येतीत सुधार

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

गृहिणी ते शेअरमार्केट या प्रवासातील अनेक टप्पे मी वाचकांसमोर उलगडून सांगत आहे. परंतु ‘मागोवा गेल्या आठवड्याचा’ हे सदर सुरु केल्यापासून हा प्रवास फारच वेगाने होतो आहे असं मला वाटतं.प्रत्येकच ठिकाणी वेग महत्वाचा नसतो. तुम्ही किती वेळांत एख्याद्या ठिकाणी पोहोचलांत यापेक्षा तुम्ही कसे पोहोचलांत, तुम्हाला मजा आली कां तुम्ही काय काय बघितल हे ही तितकंच महत्वाचं. हीच गोष्ट तंतोतंत शेअर मार्केटच्या प्रवासालाही लागू पडते. त्यामुळे शेअर मार्केटच्या प्रवासातील मजा सांगत सांगतच गेल्या आठवड्याचा नागोवा घ्यावा ,असं मी ठरवलय.

पण आजपासून काही गोष्टी समजावून सांगणार आहे. जेणेकरून मला जो त्रास झाला तो तुम्हाला होऊ नये असे मला वाटते
सध्या जशा मुलांच्या परीक्षा, रिझल्ट्स आणी सुट्टीत कुठे जायचे या चर्चा सुरु आहेत त्याचप्रमाणे मार्केटमध्येसुद्धा १ एप्रिल पासून कंपन्यांचे क्वार्टरली/वार्षिक रिझल्ट्स सुरु होतात. परंतु शाळा कॉलेजप्रमाणे किती तारखेला रिझल्ट्स लावावे हे बंधन नसते व सुट्टीही नसते.कंपन्यांचे नवे वर्ष १ एप्रिलपासून सुरु होते. त्यामुळे बोनस,स्प्लीट,लाभांश अशा सर्व घोषणांची रेलचेल असते. या सगळ्याला कार्पोरेट action असे म्हणतात त्याचा  उल्लेख मधे मधे ब्लोगमध्ये आला आहेच.

सोमवारी मार्केट तेजीत होते. गेल्या सोमवारीही मार्केट तेजीतच होते. याची.कारणेही मजेशीर बरे. गेल्या सोमवारी सलमानखानला बेल मिळाला तर या सोमवारी म्हणजेच तारीख ११/०५/२०१५ला जयललीताची निर्दोष सुटका झाली.मार्केटला आनंद झाला. राजा जसा त्याला आनंद झाला की लोकांना भेटी देतो तसेच मार्केटचा मूड सारे काही ठरवतो . पण हे पूर्णपणे खरं आहे कां? बऱ्याच उद्योगधंद्यांवर या दोन्ही व्यक्तीमुळे परिणाम होत होता आणी होत आहे. हे विचार केल्यानंतर समजले. सलमानमुळे चित्रपटव्यवसाय तर जयललिता तर तामिळनाडूची मुख्यमंत्रीच. तिच्या गैरहजेरीत तामिळनाडूचे सर्व काम ठप्प झालं होतं.

सोमवारी रीलाक्सो फुटवेअर या कंपनीने १:१ बोनस जाहीर केला. म्हणजेच तुमच्याजवळ या कंपनीचा एक शेअर असेल तर तुम्हाला आणखी एक शेअर फुकट मिळेल. या ठिकाणी लोकांची समजूत अशी होते की आपल्या १०० शेअर्सचे २०० शेअर्स होतील व भाव मात्र तोच राहील.. असे मात्र घडत नाही. शेअरचा भावही त्याप्रमाणांत कमी होतो. म्हणजेच भावही अर्धा होतो. फेडरल बँकही बोनस देणार आहे हे कळल. याबाबत निर्णय १६ मेला घेतला जाईल. बोनस जाहीर होणार आहे या अपेक्षेमुळे शेअरची किमत खूप वाढते आणी त्यावेळी शेअर्स घेतले तर महागांत पडतात. बोनस जाहीर झाल्यापासून ते आपल्या ‘DEMAT’ ला जमा होईपर्यंत बराच कालावधी लागतो. – या दरम्यानच्या काळांत शेअर स्वस्त मिळाल्यास खरेदी करावी. HUL(हिंदुस्थान युनिलिवर लिमिटेड) GILLETTE P&G ,आणी GLAXO या कंपन्यांचे रिझल्ट्स चांगले आले. सियाराम सिल्क या कंपनीचा नफा ६०% ने वाढला.

मंगळवारी रुपया वेगाने घसरला. त्याने ६४ची मर्यादाही ओलांडली.आता रुपया घसरला म्हणजे काय तर रुपयाची किमत दुसऱ्या देशांच्या चलनांच्या तुलनेत कमी झाली. आपण नेहेमी म्हणतो ना अहो पूर्वी Rs १०० घेवून बाजारांत गेलो तर पोतंभर धान्य येई आता पिशवीभरही येत नाही. यालाच रुपयाचे अवमूल्यन असे म्हणतात. याची कारणे अनेक आहेत

 • अमेरिकन अर्थव्यवस्थेत सुधार
 • शेअर बाजाराची घसरण
 • आयात करणाऱ्यांची US $ ची वाढलेली मागणी

इतके दिवस ‘गंगा मैली हो गयी’ हा संवाद तुम्ही ऐकला असेल त्यावरून बरेच राजकारण रंगले. मोदी सरकार आल्यावर ‘नमामी गंगा’ प्रोजेक्ट जाहीर झाला. सरकारने अंदाजपत्रकांत पैशाची तरतूदही करून ठेवली. या योजनेला बुधवारी मंजुरी मिळाली. या प्रोजेक्टचा फायदा कोणाला होईल याचा विचार झाला. ताबडतोब त्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत बदल दिसू लागले. जसे CONCOR, ITD सिमेंटेशन, DREDGING कॉर्पोरेशन. म्हणजेच या ज्या कंपन्याना या कामांत EXPERTISE आहे.

NTPC आणी IOC या दोन्ही सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपन्या आहेत. यातील सरकारच्या हिश्यापैकी अनुक्रमे ५% आणी १०% हिस्सा सरकार डायवेस्ट करणार आहे. नवे युरिया धोरण जाहीर झाले. त्यामुळे खतांचे शेअर्स झळकले. मार्केटमध्ये बेसावध राहून चालत नाही. मार्केट कोणत्याही बातमीला लगेच प्रतिसाद देतं.

IIP ( INDEX OF INDUSTRIAL PRODUCTION) आणी CPI(CONSUMER PRICE INDEX) चे आकडे जाहीर होणार याची चाहूल लागल्याने प्रत्येकजण आपले पाउल जपूनच टाकीत होता. IIP वरून आपल्याला औद्योगिक उत्पादन कमी झाले कां जास्त झाले हे समजते. यावरून उद्योगांची स्थिती समजते. CPI म्हणजे रोज आपण ज्या गोष्टी वापरतो (म्हणजेच धान्य भाजी कपडा इत्यादी ) त्यांचे भाव वाढले की कमी झाले हे समजते. मार्च महिन्यांत IIP २.१ (पूर्वी हा ४.९ होता) म्हणजेच औद्योगिक उत्पादन कमी झाले असे समजते. एप्रिल CPI ४.८७ ( पूर्वी ५.१७) म्हणजेच महागाई कमी झाली. परंतु आपल्या गृहिणींना महागाई कमी झालेली आहे असे दिसते कां ? नाही ना ? हे आकडे काही वेगळेच दर्शन देतात. खरा देव आणी उत्सवमूर्ती यांत नेहेमी फरक असतोच.

आज ‘‘LUPIN’ ने निराशा केली. रिझल्ट्स अपेक्षेप्रमाणे आले नाहीत. जणू उनपावसाच्या खेळाप्रमाणे मला मार्केट वाटले. प्रथम ३०० पाईंट वर नंतर पुन्हा लालेलाल, पुन्हा तेव्हढेच वर याचा अर्थ काय तर मार्केट पडल्यानंतर ही चांगली संधी समजून लोकांनी खरेदी केली. अशा CORRECTION ला मार्केटच्या भाषेत ‘RUNNING CORRECTION’ असे म्हणतात.

गुरुवारी WPI (WHOLESALE PRICE INDEX चे आकडे जाहीर झाले. पूर्वी -२.३३ वरून -२.६५ झाला. पंतप्रधानांची चीन यात्रा सुरु झाली. तुम्ही म्हणाल याचा मार्केटशी काय संबंध ? परंतु अशा दौऱ्यानमध्ये बरेच व्यापारी करार केले जातात. बऱ्याच भारतीय कंपन्यांच्या शाखा चीनमध्ये आहेत. कंपन्यांच्या काही अडचणी असतात. त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे हिटाची, भेल, टाटा मोटर्स, भारत फोर्ज, रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या शेअर्सकडे सर्वजण लक्ष ठेवून आहेत.

शुक्रवारी शेअर मार्केट एकदम शांत आणी स्थिर होते. . मार्केट पडेल म्हणून भराभर विकुन टाका अशी भीती नव्हती किंवा पटापट खरेदी करा नंतर महाग पडेल अशी धांदलही नव्हती. ज्याप्रमाणे कंपन्यांचे रिझल्ट्स येतील त्याप्रमाणे शेअर्सच्या भावांत बदल होत होता. क्रूडच्या किमती पुन्हां कमी व्हावयास सुरुवात झाली. रुपयाही थोडासा वधारला.CADILA हेंल्थ केअर आणी JUBILANT फूड्स या कंपन्यांचा निकाल चांगला आला. JSW STEEL या कंपनीचा निकाल मात्र निराशाजनक आला.

पंतप्रधानांच्या चीन यात्रेमुळे मार्केट सुधारायला काही मदत होते कां ? हे आपण पुढील आठवड्यांत पाहू.

पुढील आठवड्यात लागणारे रिझल्ट्स

 • १६ मे २०१५ (१) CORPORATION बँक (२) जम्मू अंड काश्मीर बँक
 • 18 मे २०१५ (१) एशियन पेंट्स (२) GLAXO (३) HSIL (४) M&M फायनान्स
 • १९ मे २०१५ (१) PIDILITE INDUSTRIES
 • २० मे २०१५ (१) ARCHIES (२) बजाज फायनान्स (३) भारत फोर्ज (४) B.S.. LIMITED (५) DLF
  (६) टाटा स्टील
 • २१ मे २०१५ (१) बजाज ऑटो (२)BRITANNIA (३) CESC (४) दीपक FERTILIZERS (४) ICRA
  (५ RCF (६) SCI (७) शक्ती पंप्स (८) TTK (९) VOLTAS
 • २२ मे २०१५ (१) CEAT (२) FINANCIAL TECH (३)ITC (४) कर्नाटक बँक (५) MMTC
  (६) MPHASIS (७) NBCC (८) स्टेट बँक ऑफ इंडिया

 

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

2 thoughts on “आठवड्याचे समालोचन -११ मे २०१५ ते १५ मे २०१५ – शेअरमार्केटच्या तब्येतीत सुधार

 1. sandip shirsath

  Respected Madam……

  Thanks 4 ur guidance…

  I am an engineering student …

  i have been stared trading in stock market 1 year ago…
  in the past i dont know anything ABCD of this …

  i m also googling to know inormation….
  after lot of search i found ur blog… and my search was over…

  i have read alll u postss .. gudlines and much more..
  really helpful biog …

  i m just only 21 year
  i started trading+investing with 3400 rs made profit 5400 due to modi efect…
  in dec 2014 … i telll my father incrises investment to 50,000 and in mar 15 made 10000+ profit …
  i us these profit to paid my college fees.. my father proud of me only becozz of u .. and ur blogs….many many thanks .to u mam..
  ur method of analysis of market and “aathdyache samalochan” is best one. and really helpful to new investor and treader…
  keep it up …

  thanking u …

 2. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – १८ मे ते २२ मे २०१५ – दिलसे नही दिमागसे | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s