आठवड्याचे समालोचन – १८ मे ते २२ मे २०१५ – दिलसे नही दिमागसे

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

सरकारने पेट्रोल आणी डीझेलचे दर वाढवले. क्रूड कमी होत असताना सरकार दर कां वाढवीत आहे कोणालाच समजत नव्हत. पण शेअरमार्केटचा दृष्टीकोण वेगळाच ! शेअरमार्केट प्रत्येक क्षण जगते. ‘ जुने जाऊ द्या मरणालागुनी’’ अशी अवस्था मार्केट्ची. आज किमती वाढल्या तरी लगेच काही घडतं कां? पण मार्केटमध्ये आकडेमोड लगेच होते. OIL आणी gas कंपनीच्या शेअर्सचे भाव लगेच वाढले. सरकारच्या निर्णयामुळे कोणत्या कंपनीचा फायदा किती वाढेल त्याचा शेअरच्या किमतीवर किती परिणाम होईल याचा विचार एका क्षणांत होतो. समजा दोन तासांनी दुसरा प्रतिकूल निर्णय आला तर लगेच ते शेअर पडतात. आपल्या मार्केटमध्ये कांदेपोहे, साखरपुडा, लग्न आणी काडीमोड सर्वकाही एका क्षणात होते. त्या एका क्षणामध्ये आपल्यालाही खरेदीविक्रीची संधी साधावी लागते.

रिझर्व बँकेने रेटकट करावा असे उद्योगपती, राजकारणी, सर्वजण सुचवीत आहेत. दबाव आणत आहेत. आणी याचा फायदा घेवून रिझर्व बँक जूनच्या धोरणात रेटकट करणार अशी हवा निर्माण करण्यात बुल्स यशस्वी होत आहेत. आता प्रश्न आला बुल्स म्हणजे काय ? तुम्हाला कसे माहीत असणार?

‘बुल्स’ म्हणजे काय ? त्याचा शब्दशः अर्थ बैल. आणी बेअर्सचा शब्दशः अर्थ अस्वल. ‘बुल्स’ म्हणजे प्रथम खरेदी करून नंतर फायदा घेवून विकणारे. ‘बुल्स’ कायम आक्रमक, आशावादी, आणी सकारात्मक वृत्तीचे असल्यामुळे शेअर्सच्या किमती वाढतात. आणी मार्केटचा स्तरही वाढतो. जेव्हा अर्थव्यवस्था प्रगतीपथावर असते, बेकारी आणी महागाई आणी किमती कमी होत असतात,.त्यावेळेला ‘बुल्स’ आक्रमक होतात. आपण जर बैल आक्रमण कसा करतो ते पाहिले तर तो शिंगावर घेवून हल्ला करतो. त्याप्रमाणे ‘बुल्स’चे मार्केटमध्ये वर्चस्व असेल तर शेअर्सच्या किमती वाढतात.

बेअर्स म्हणजे मंदीमध्ये खेळणारे.प्रथम विकून नंतर कमी भावांत खरेदी करणारे. याला एक ऐतिहासिक संदर्भ आहे. पूर्वी इंग्लंडमध्ये अस्वलाच्या कातडीचा व्यापार मोठ्या प्रमाणांत चाले. व्यापारी त्यांच्या हातांत अस्वलांची कातडी येण्याच्या आधीच कातडी विकण्याचा सौदा करीत. नंतर कातडी बाजारांत आल्यावर ती स्वस्तांत खरेदी करून आपला पूर्वी केलेला विक्रीचा व्यवहार पुरा करीत. यालाच शेअरमार्केटच्या टेक्निकल भाषेत ‘shorting’ करणे असे म्हणतात म्हणजेच .स्वतःजवळ शेअर्स नसताना आहेत असे समजून विकायचे आणी नंतर कमी भावांत खरेदी करायचे. तुम्ही अस्वल डोळ्यासमोर आणा. संथ आणी सावध चाल, सहसा हल्ला न करण्याची प्रवृती. त्याचप्रमाणे ‘बेअर्स’ निराशेनेग्रस्त, बचावात्मक पवित्रा घेणारे असतात. त्यामुळे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री होऊन मार्केट कोसळते. अस्वल जेव्हा आक्रमण करते तेव्हा माणसाला खाली पडून आपली नखे त्याच्या अंगांत घुसवते.
अशाच प्रकारे वेगवेगळ्या प्राण्याची नावे वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूकदारांना दिलेली आढळतात. आपल्याकडे कसे बाळू, बापू , बंड्या अशी टोपणनावे आढळतात तसेच .

(१) बारहशिंगा किंवा सांबर::- ‘IPO’ मध्ये शेअर्स खरेदी करून लिस्टिंग गेन्स घेवून विकून टाकतात. ते सहसा सेकंडरी मार्केटमध्ये व्यवहार करीत नाहीत. (२) कोंबड्या: दुसऱ्याकडून टिप्स घेवून खरेदी विक्री करतात आणी डुबतात
(३) डुक्कर : कोणताही अभ्यास न करता कोणत्याही शेअर्समध्ये गुंतवणूक करतात आणी योग्य वेळेला न विकता अजून भाव वाढतील असा हव्यास करतात आणी डुबतात.
(४) लांडगे : चुकीच्या मार्गाने मार्केट वाढवण्याचा किंवा पाडवण्याचा प्रयत्न करतात.
(५) शहामृग : जेव्हा वाळूचे वादळ येते तेव्हा शहामृग वाळूत तोंड खुपसून स्वतःचा बचाव करते, वादळ संपण्याची वाट बघते. परिस्थिती सुधारेल अशी आशा करते.म्हणजेच जे गुंतवणूकदार अभ्यास करून विचार करून शेअर खरेदी करतात त्याना समजते की वाळूच्या वादळाप्रमाणे आलेली वाईट परिस्थिती फार काळ टिकणारी नाही. त्यामुळे ते घाबरत नाहीत. शांतपणे परिस्थिती बदलण्याची वाट पहातात. शेवटी काळ हेच सुंदर औषध असते.

मार्केट पडतं किंवा वाढतं याला अशीच काही कारण असतात. त्यामुळे शेअरमार्केटला खतपाणी मिळते. बुल्स यशस्वी होत असतील तर आपणही वाहत्या गंगेत हात धुवून घ्यावेत. आणी जे शेअर्स बरेच दिवसापासून अडकून पडले असतील ते विकून मोकळे व्हावे. आणी जर बेअर्सचा मार्केटवर प्रभाव असेल तर चांगल्या कंपन्यांचे शेअर्स स्वस्तात खरेदी करण्याचा प्रयत्न करावा.

सोमवारच्या मार्केट वाढण्याला ऐशीयन पेंट्सने गालबोट लावले. ताबडतोब मार्केटने शिक्षाही फर्मावली. शेअर्सचा भाव कमी झाला.पीडिलाइट या कंपनीचे रिझल्ट्स आले त्यांची विक्री कमी झाली. गेल्या वर्षभरांत शेअर्सची किमत खूप वाढलेली असल्यामुळे अपेक्षेप्रमाणे रिझल्ट्स न आल्यामुळे शेअर्सची किमत कमी झाली. कोलगेटचा रिझल्ट्स चांगला असूनही व्यवस्थापनाने शेअरहोल्डरच्या लाभांश, बोनस विषयीच्या अपेक्षांना योग्यसा प्रतिसाद न दिल्यामुळे शेअर्सची किमत कमी झाली.

सरकारने जाहीर केलं की सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपन्या, ज्या UNLISTED आहेत त्यांतील स्टेकही विकण्याचा सरकार विचार करीत आहे. यामुळे सरकारच्या DIVESTMENT कार्यक्रमाला खूपच मदत होईल. FED जूनपासून रेट वाढवेल असा अंदाज होता परंतु त्यांनी आता सप्टेंबरपर्यंत रेट वाढतील असा अंदाज व्यक्त केला.

सरकारने ‘GOLD MONETISATION SCHEME’ जाहीर केली. यामध्ये तुमच्याकडील सोने किंवा सोन्याचे दागिने बँकेकडे ठेवून तुम्हाला त्यावर पैश्याच्या किंवा सोन्याच्या स्वरूपांत व्याज मिळू शकेल. तुम्हाला तुमचे ठेवलेले सोनेही परत मिळू शकते. परंतु ही योजना किरकोळ गुंतवणुकदार किंवा मध्यमवर्गासाठी फारशी उपयोगी नाही. या योजनेखाली ठेवलेल्या सोन्याला आयकर, इस्टेट ड्युटी किंवा कॅपिटल गेन्स TAX आकारला जाणार नाही.

भारत फोर्जचा रिझल्ट चांगला येवूनही शेअरची किमत कमी झाली. बजाज ऑटो फायनान्स चा रिझल्ट चांगला आला. शेअर्सची किमत वाढली. लुपिन या कंपनीला त्यांच्या ‘AZITHROMYCIN’ या औषधासाठी USFDA ची मंजुरी मिळाली. अल्ट्राटेक सिमेंट ‘J. P.GROUP’ चा भिलाई प्लांट Rs २१०० ते Rs २२०० कोटींना खरेदी करत आहे.

एप्रिल महिन्यामध्ये प्रत्यक्ष करापासून होणारे उत्पन्न वाढले. तसेच व्यक्तीशः आयकराची वसुलीही वाढली. STT ( SECURITY TRANSACTION TAX) पासून होणारे उत्पनाही वाढले. NHPC ला त्यांच्या DIBANG MULTI PURPOSE प्रोजेक्टसाठी पर्यावरणाचा हिरवा सिग्नल मिळाला. ITDC च्या ७ हॉटेल्सचा सरकार लिलाव करणार आहे. महाराष्ट्र सरकारने अशी घोषणा केली की आता झोपुयोखाली ( झोपडपट्टी पुनर्वसन योजना) redevelopement करण्यासाठी ७५% ऐवजी ५१% लोकांची समंती पुरेशी होईल

ALKEM LABS ही कंपनी त्यांच्या CHRONIC THERAPY चा प्रसार भारतामध्ये करणार आहे. या कंपनीचा NOV-DEC २०१५ मध्ये ‘IPO’ येईल.
RELIANCE INDUSTRIES LIMITED (RIL) णे खालील घोषणा केल्या.
(१) FY १५ मध्ये ३०० पेट्रोल पंप पुन्हा सुरु केले.
(२) FY २०१६ च्या शेवटपर्यंत १४०० पेट्रोल पंप सुरु करणार आहोत.
(३) GROWTH POTENTIAL असणाऱ्या सेक्टरमध्ये १ लाख कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करणार आहे.देशभरांत 4G स्पेक्ट्रमच्या नेटवर्कची चाचणी चालू असून या क्षेत्रांत ७०५२ कोटी रुपये गुंतवणूक केली आहे.
(४) RIL ONLINE ग्रोसरी शॉप उघडणार आहे.

इमामी ही कंपनी ‘केशकिंग’ हा ब्रांड Rs १८०० कोटींना खरेदी करण्याच्या विचारांत आहे. बजाज कॉर्पने ह्या साठीच्या डीलमधून माघार घेतली आहे. CADILLA HEALTHCARE ही कंपनी CLARIS LIFE चा INJECTABLE बिसिनेस Rs ३१०० कोटींना खरेदी करण्याची शक्यता आहे. IRB इंफ्राला आग्रा-इटावा हायवेसाठी Rs २६०० कोटींचे कंत्राट मिळाले. सरकारने जाहीर केले की ते सर्व खनिजांचा लिलाव करणार आहे. या लिलावासाठी प्राधान्याचे कुठलेही नियम नाहीत. टाटा स्टील आणी बजाज ऑटो यांचे रिझल्ट्स खराब येणार आहेत अशी कुणकुण लागली होती. टाटा स्टीलचा रिझल्ट खराब आलाच परंतु बजाज ऑटोने मात्र Rs ५० लाभांशाची घोषणा केली. पण रिझल्ट्स वाटले होते तेव्हढे खराब आले नाहीत त्यामुळे शेअर वाढला..

M & M ने मित्सुबिशी अग्रीकल्चर मशीनरी या जपानी कंपनीत ३३% हिस्सा Rs १६० कोटींमध्ये खरेदी केला. STRIDES ARCOLAB या कंपनीने ESPEN या कंपनीचा ऑस्ट्रेलिया आणी मारिशस येथील जनरिक ड्रग्सचा बिझिनेस खरेदी केला. CIPLAने QUALITY CEMICAL या युगांडातील कंपनीमध्ये ५१%हिस्सा US$ ३०लाख किमतीला खरेदी केला. ब्रिटानिया आणी व्होल्टास या दोन्ही कंपन्यांचे रिझल्ट्स चांगले आले. WOCKHARDTS च्या WCK ४८७३ या प्रोडक्टला QIDP STATUS मिळाले.

मार्केट जर सतत पडत असेल तर दोन खुणा अशा आहेत की त्या दर्शवतात की आता मार्केटची स्थिती सुधारेल.

(१) LIC मार्केटमध्ये खरेदी करायला लागली
(२) म्युचुअल फंडांचे रीडम्प्शन कमी होते.

आपणाला अशी कळकळीची विनंती आहे की कोणत्याही कंपनीत पैसे गुंतवताना त्या कंपनीची माहिती करून घ्या.एकाच कंपनीत कोणाच्याही टीपवरून आपले सगळे भांडवल गुंतवू नका. आपल्या भविष्यातील गरजांप्रमाणे निरनिराळ्या कंपन्यांत योग्य त्या प्रमाणांत गुंतवणूक करा. ज्या कंपन्याना भांडवलाची सतत गरज लागत नाही, सरकारी धोरणांचा अडसर कमी असेल अशा कंपन्यांत गुंतवणूक करा. ज्या कंपनीच्या प्रगतीची खात्री नसेल त्या कंपनीच्या शेअरची किमत कमी झाली तरी सहसा त्याच्या वाटेला जाऊ नये.

स्टेट बँक ऑफ इंडिया चा रिझल्ट चांगला आला. N.P.A (NON-PERFORMING ASSET) कमी झाले. N.I.I (NET INTEREST INCOME) वाढले. नफा २३% ने वाढला. पण शेअरचा भाव मात्र पडला. त्यामुळे लोकांची निराशा झाली.ITC च्या रिझल्टची सर्वजण वाट बघत होते. परंतु ४ वाजेपर्यंत तरी रिझल्ट जाहीर झाला नाही.

असे रिझल्ट जुलै महिन्यापर्यंत चालू राहतील. तुमच्या कडे ज्या कंपन्यांचे शेअर्स असतील त्या कंपन्यांचे रिझल्ट कधी आहेत हे पाहून खरेदीविक्रीचा निर्णय घ्या. लाभांश किती जाहीर होतो आहे याकडेही लक्ष असू द्या , कारण बजाज ऑटोने जसा Rs ५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला तसा मोठ्या कंपन्या लाभांश देण्याची शक्यता असते

पुढील आठवड्यांत काही निवडक कंपन्यांचे रिझल्ट्स येतील. ते खालीलप्रमाणे :

 • २३ मे २०१५ (१) ARCHIDPLY INDUSTRIES (२) DIVIS LAB
 • २५ मे २०१५ (१) कॅनरा बँक (२) बॉम्बे डाईंग (३) डिशमन फार्मा (४) JYOTHY LAB (५)सोलार
  INDUSTRIES (६) PTC INDUSTRIAL फायनान्स
  २६ मे २०१५ (१) बँक ऑफ इंडिया (२) DREDGING कॉर्पो (३)IDBI (४) टाटा मोटर्स
  (५)युनायटेड स्पिरीटस
 • २७ मे २०१५ (१) GAIL (२) टाटा केमिकल्स (३) TRENT (४) इंजीनीअर्स इंडिया (५) SJVN
  (६) अबन ऑफशोअर (७) गोदरेज इंडस्ट्रीज (८) TTK प्रेस्टीज (९) बाटा इंडिया
 • २८ मे २०१५ (१) अक्झो इंडिया (२) अपोलो हास्पिटल (३) BPCL (४) कोल इंडिया (५)PFC
  (५) ONGC (६) NMDC (७) पॉवर ग्रीड (८) WOCKHARDT फार्मा (९) ऑरोबिन्दो फार्मा (१०) हिंडाल्को (११) PTC
 • २९ मे २०१५ (१) बर्गर पेंट्स (२) सिप्ला (३) ग्लेनमार्क फार्मा (४) M & M (५) IOC (६)
  MOIL (७) NHPC (८) NTPC (९) OIL (१०) SAIL (११) जेट एअरवेज (१२)
  SUN फार्मा (१३) सन टीव्ही (१४) रिलायंस कॅपिटल (१५) JUST DIAL (१६)
  वेंकी’स (१७) बन्नारी अम्मा शुगर

 

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे समालोचन – १८ मे ते २२ मे २०१५ – दिलसे नही दिमागसे

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – २५ मे ते २९ मे – दर्शन कंपनीच्या कामकाजाचे | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s