आठवड्याचे समालोचन – २५ मे ते २९ मे – दर्शन कंपनीच्या कामकाजाचे

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

रिझल्ट्स म्हटले की परीक्षांचे निकाल आपल्या डोळ्यासमोर येतात. इयत्ता १ ली ते इयत्ता ९ वीच्या रिझल्टकडे कोणाच लक्ष नसतं. पण १० वीच्या , १२ वीच्या निकालांकडे मात्र सगळ्यांचे लक्ष असतं.अगदी देवाला नमस्कार करायला मुले आलेली दिसतात. मिठाईच्या दुकानातील ,पेढ्यांचे भाव वाढलेले असतात.पेढे संपलेले असतात. एवढी या निकालाची उत्सुकता, गर्जना वाच्यता सगळीकडे होते. त्याचप्रमाणे शेअरमार्केटमध्येसुद्धा निफ्टीमध्ये आणी सेन्सेक्समध्ये जे शेअर्स असतात किंवा ब्लूचीप कंपन्यांच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष असते. या कंपन्या म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेचे प्रतिबिंबच आहे.

मला मात्र मागे वळून पहाताना आज हसायला येते. मी शेअरमार्केटममध्ये प्रवेश करण्याआधी कधीही ह्या कंपन्यांच्या निकालांकडे लक्ष दिले नव्हते.या निकालांचे महत्व माझ्या लक्षांतच येत नव्हते. आता कदाचित शेअर्समध्ये पैसा अडकलेला असतो त्यामुळे शाळा कॉलेजच्या अभ्यासाप्रमाणे ह्या कंपन्यांचे निकालही अभ्यासावे लागतात. शेवटी काय वासुदेवाची ऐका वाणी : जगांत नाही राम दाम करी काम वेड्या दाम करी काम. कंपनीची प्रगती या निकालांवरून समजते. कंपनीच्या C.E.O दिलेल्या मुलाखतीतून किंवा मोठ्या कंपन्यांच्या बोर्डरूमच्या कार्यक्रमातून त्या कंपनीला त्या तिमाहींत/ वर्षभरांत काय अडचणी आल्या, त्या अडचणी तात्पुरत्या होत्या की टिकाऊ होत्या, कंपनीला या संकटांशी आणखी किती काळ झुंज द्यावी लागेल, तोटा सोसावा लागेल, सरकारी धोरणांत काय प्रतिकूल बदल झाला आहे तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींचे प्रतिसाद कंपनीच्या कार्यक्षेत्रांत किती प्रमाणांत प्रतिकूल बदल घडवतील हे समजते.

उलटपक्षी कंपनीचा रिझल्ट चांगला आला तर कंपनीने कोणते नवे प्रोजेक्ट कार्यान्वित केले, काही टेक्निकल अपग्रेडेशन केले कां,? सरकारी धोरणांत काही अनुकूल बदल झाला कां? तसेच आंतरराष्ट्रीय वातावरणांत काही अनुकूल बदल झाला कां ? या सर्वांची चर्चा होते. कंपनीची विक्री वाढली कां ? तिच्या विक्रीचा मार्केटशेअर वाढला कां ? तसेच कंपनीच्या कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये वाढ झाली कां घट झाली हेही महत्वाचे असते. आणखी एक महत्वाचा item म्हणजे EXCEPTIONAL /ONE TIME LOSS किंवा GAIN. किंवा केलेली प्रोविजन. याचा परिणाम +- करूनच कंपनीची कार्यक्षमता वाढली की कमी झाली हे समजते. या सर्व विश्लेषणावरून आणी कंपनीने दिलेल्या भविष्यातील त्यांच्या GUIDANCE वरून शेअरचा भाव वाढेल की कमी होईल याचा अंदाज आपण बघू शकतो.

कंपन्याचे दर तीन महिन्यांनी रिझल्ट्स येतात. पण ज्याप्रमाणे तिमाही सहामाई नौमाही परीक्षांचे निकाल जर निराशाजनक आले तर विद्यार्थी वार्षिक परीक्षेत अभ्यास करून फारसी सुधारणा करू शकत नाही.  तसेच काहीसे कंपन्यांच्या रिझल्ट्सचे असते. आपण आपल्याकडे असलेल्या शेअर्स आहेत त्या कंपन्यांच्या तिमाही रिझल्ट्सकडे लक्ष ठेवा.

या आठवड्यात कॅनरा बँकेचा रिझल्ट खराब आला. PNR INFTATECH चे लिस्टिंग फारसे चांगले झाले नाही.DISH टी व्ही चा रिझल्ट्स चांगले आले. CROMPTAN GREAVES ला स्मार्ट ग्रीड साठी पोर्तुगालकडून ऑर्डर मिळाली.सदभाव engg या कंपनीने आपळी सब्सिसिअरी SADBHAAV इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या IPO साठी DRHP दाखल केले. MAITHAN ALLOYS या कंपनीने १:१ बोनस दिला. रुपया US$ च्या तुलनेत मार्केट संपताना पडला (६३.९८) BHELचा रिझल्ट मार्केटच्या अपेक्षेपेक्षा चांगला आला. मार्केटमधील अस्थिरतेमुळे आणी पॉवर क्षेत्रातील किमतीच्या अनिश्चिततेमुळे NTPC आणी BHEL या कंपन्यांमधील DIVESTMENT पुढे ढकलली.

स्वीस ऑथोरिटीने गुप्ततेचे कवच दूर करून आपल्याकडील खातेधारकांची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली. नेसलेच्या MAGGI या उत्पादनांत हानिकारक द्रव्य प्रमाणाबाहेर वापरलेले आढळून आल्यामुळे त्यांची केस फूड SAFETY आणी STANDARD AUTHORITYकडे पाठवली,. NHPC RS ३९७५ कोटीचा बॉंड इशू आणीत आहे. MET ने जाहीर केले की या वर्षीचा मान्सून सामान्य राहील. पंतप्रधानांनी ‘किसान वाहिनी’ सुरु केली. IDBI बँकेचा रिझल्ट बऱ्यापैकी आला. ग्रॉस आणी नेट N.P.A. चे प्रमाण घटले. नफ्यांत माफक वाढ झाली. टेक महिंद्राच्या नफ्यांत घट झाली. याचे त्यांनी फोरेक्स तोटा आणी फोरेक्स हेडविंड्स( विनिमय दरातील चढउतार) आणी SALARY मधील वाढ असे दिले. MCXSX आणी MSXI यांचे मर्जर होण्याची शक्यता आहे असे जाहीर झाले. टाटा मोटर्सचे रिझल्ट्स खराब आले मार्जिन कमी झाले.
भारती एअरटेल जुन २०१५ मध्ये गुरगावमध्ये 4G लौंच करणार आहे. कंपनी दिल्लीमध्ये डिसेंबर २०१५मध्ये तर मुंबईत मार्च २०१६ मध्ये 4G चालू करणार आहे. ५०% 3G ग्राहकांचे 4G ग्राहकांमध्ये रुपांतर केले जाईल.

सरकारने घोषणा केली की PUBLIC-PRIVATE PARTNARSHIPसाठी एक समिती नेमणार आहे ही समिती ३ महिन्यांत रिपोर्ट देईल. १ जुलै पासून खतकारखान्यांसाठी GAS POOLING अमलांत येईल. NSEIT इंडेक्समध्यी 20 ऐवजी १० शेअर असतील. कोणत्याही शेअरचे WEIGHTAGE १०%पेक्षा जास्त असणार नाही. या IT इंडेक्स मध्ये असे शेअर्स असतील ज्यांचा DAILY AVE5RAGE VOLUME Rs १७०० कोटी किंवा त्यापेक्षा जास्त असेल.

CLARISला INJECTIBLE युनिटसाठी USFDA कडून फार्म ४८३ मिळाला त्यामुळे हा बिझीनेस विकण्यांत अडचण येत आहे.. INDIGO ही विमानकंपनी IPO आणणार आहे. NFL(NATIONAL FERTILIZERS CORPORATION), बलरामपुर चीनी, GAIL या कंपन्यांचे रिझल्ट्स खराब आले.MAX INDIA, ZEE LEARN या कंपन्यांचे रिझल्ट्स चांगले आले.,
गुरुवारी अरविंद LTDच्या डीमर्जरची एक्सडेट आहे. १० अरविंद LTDमधील शेअरला १ शेअर अरविंद INFRA चा मिळेल.
BATA चा रिझल्ट चांगला आला. त्यांनी शेअर्सचे १:२ असे स्प्लिट जाहीर केले.

६ निफ्टी कंपन्यांचे रिझल्ट्स आज जाहीर झाले. COAL INDIA चा रिझल्ट चांगला आला.जर COAL INDIAने ठरलेल्याप्रमाणे ४ वर्षांत दुप्पट उत्पादन केले तर शेअर्सची किमर वाढेल. PFC चे रिझल्ट्स चांगले आले. ONGC चा रिझल्ट अपेक्षेपेक्षा कमी चांगला आला. परंतु क्रूडची प्राईस US$ १०० वर गेली तर कंपनीला ९०% सबसिडी द्यावी लागेल. पण तोपर्यंत सबसिडी द्यावी लागणार नाही. BPCL या कंपनीचे रिझल्ट्स चांगले आले. HPCL चे रिझल्ट्स बऱ्यापैकी आले. HINDALCO आणी NMDC चे रिझल्ट्स निराशाजनक आले.

अलाहाबाद हायकोर्टाने उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांना Rs९८०० कोटी बाकीपैकी ५०% ३० जून पर्यंत, ७५% १५ जुलैपर्यंत भरण्यास सांगितले. MAX INDIA पुष्पांजली क्रोस ले हॉस्पिटलमधील ७६% हिस्सा Rs २८७ कोटींना घेणार आहे. गोदरेज इंडस्ट्रीजचा रिझल्ट्स चांगला आला. IRAQ हा देश क्रूडची निर्यात २६% ने वाढवणार आहे. अमेरिकेंत क्रूडची INVENTORY वाढली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये क्रूडची किमत ढासळत आहे.

आता तुमच्या मनांत नक्कीच प्रश्न आला असेल क्रूडचे भजन वारंवार कां ? त्याचा शेअरमार्केटशी काय संबंध ? ऐका तर.:- क्रूड हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणाच म्हणला पाहिजे. क्रूडचे भाव गेले वर्षभर ढासळत आहेत. मागणी आणी पुरवठा यामध्ये विसंगती आहे. ओपेक आणी अमेरिका यांच्यांत रंगलेले राजकारण याला जबाबदार आहे. पण दोघांचे भांडण तिसऱ्याला लाभ यामुळे क्रूडच्या घटत्या किमतीचा भारताला खूपच फायदा झाला. भारताला क्रूडची मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागते. क्रूड स्वस्त झाल्याने आयातीवर होणारा खर्च कमी झाला. त्यामुळे CAD (CURRENT ACCOUNT DEFICIT) कमी झाली. त्यामुळेच फारशी मेहेनत न घेता अर्थव्यवस्था सुधारली म्हणूनच पंतप्रधांना ‘नशीबवान’ म्हणतात.बऱ्याच कंपन्यांचा क्रूड हा कच्चा माल असल्याने उत्पादनखर्च कमी झाला त्यामुळे त्या कंपन्यांचे शेअर वधारले. ज्यांचा क्रूड हा पक्का माल आहे त्यांची विक्री कमी झाल्याने ( रुपयांत) त्या कंपन्यांचे शेअर ढासळले. त्यामुळेच मार्केट उघडल्याबरोबर क्रूडचा भाव किती आहे याकडे सर्वांचे लक्ष असते.

बँक ऑफ इंडियाचे रिझल्ट्स खूपच वाईट आले. बँकेने Rs ६६कोटी तोटा दाखविला. बँकेने एस्सार स्टील हा अकौंट N. P. A. झाला असे कारण या तोट्यासाठी दिले. बँकेच्या ग्रॉस आणी नेट N. P.A. मध्ये वाढ झाली. ऑरोबिन्दो फार्मा या कंपनीने १:१ असा बोनस जाहीर केला. DISHMAN फार्मा, इंडिया सिमेंट, BEL, CUMMINS या कंपन्यांचे रिझल्ट्स चांगले आले. M & M चे रिझल्ट अपेक्षेच्या मनाने चांगले आले. ‘BOSCH’ चा रिझल्ट फारसा चांगला आला नाही त्यांनी Rs८५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

बऱ्याचशा कंपन्यांचे रिझल्ट्स लागले. आता बोनस आणि  स्प्लिट यांच्या तारखांकडे लक्ष दिले पाहिजे. पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे २ जूनला रिझर्व बँकेची पॉलिसी जाहीर होईल. त्याकडे आता मार्केटचे लक्ष आहे. पाहूया काय होते ते ! आता आपली भेट पुढील शुक्रवारी.

बहुतेक महत्वाचे कॉर्पोरेट रिझल्ट्स आतापर्यंत येवून गेले. पुढील आठवड्यांतील महत्वाचे रिझल्ट्स पुढीलप्रमाणे :-
३० मे २०१५ (१) बिनानी INDUSTRIES (२) जिंदाल पॉली (३) L & T (४) MARKSANS फार्मा (५)
MTNL (६) NALCO (७) SADBHAAV ENGG (८) TIDEWATER OIL (९) वक्रांगी

 

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे समालोचन – २५ मे ते २९ मे – दर्शन कंपनीच्या कामकाजाचे

  1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – १ जून ते ५ जून २०१५ – भीतीच्या भिंती | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s