आठवड्याचे समालोचन – १ जून ते ५ जून २०१५ – भीतीच्या भिंती

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

या आठवड्यांत गोंधळच गोंधळ माजला होता. मंगळवारी रिझर्व बँकेची पॉलिसी जाहीर होणार होती. या पॉलिसीमध्ये रिझर्व बँक काय करेल, इंटरेस्ट रेट कमी करेल की नाही, करावा कां? गरज किती? यावर खुसखुशीत चर्चा सुरु होती. कुणाला या चर्चेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर रस असेल हे मात्र कळत नव्हते. आता रिझर्व बँकेची पॉलिसी म्हणजेच रिझर्व बँकेचे वित्तीय धोरण. शेअरहोल्डरना बाकी काही समजत नाही. ONE TRACK MIND असते त्यांचे! शेअरच्या किमतीवर काय परिणाम होईल, शेअर विकत घ्यावा की विकावा? short करून फायदा होईल की LONG करून?

रिझर्व बँक काय करते तर बँकांना द्यायच्या किंवा बॅंका कडून घ्यायच्या पैशांवर देण्यांत येणाऱ्या व्याजाच्या दरांत बदल करून बँकेला स्वस्त वा महाग दराने पैसे पुरविते.पण अंतिम उद्देश हा की बँकांनी त्यांच्या ग्राहकांना देण्यांत येणाऱ्या कर्जावरील व्याजाच्या दरांत त्याप्रमाणे बदल करावा. रिझर्व बँकेने व्याजाचा दर कमी केला तर, त्याला अनुसरून बँकांनी त्यांच्या ग्राहकांना देण्यांत येणाऱ्या कर्जावरील व्याज दर कमी केला तर उद्योगधंद्यांसाठी कर्ज स्वस्तांत उपलब्ध होईल. होम लोन घेणारयांचा E. M. I. ( EQUATED MONTHLY INSTALEMENT) कमी होईल. पण लोन स्वस्त झाल्यामुळे लोन घेणाऱ्यांची संख्या वाढून बँकांचे N.I.I.( NET INTEREST INCOME) वाढेल. परंतु गेल्या दोन्ही वेळेला रिझर्व बँकेने .२५ ने व्याजाचा रेट कमी करूनही बँका स्वतः लोनवर आकारत असेलेले व्याजाचे दर कमी करेनात, उलटपक्षी बँकांनी मुदत ठेवीवर त्या ठेवीदारांना देत असलेल्या व्याजाचे दर कमी करायला सुरुवात केली. त्यामुळे अर्थव्यवस्थेत अपेक्षित परिणाम साध्य झाला नाही.

या वेळी तर अजूनच महाभारत झाले. रिझर्व बँकेने सर्व बाजूंनी येणाऱ्या दबावामुळे उदा : अर्थमंत्रालय. औद्योगिक क्षेत्र, व्याजाचा दर .२५ ने कमी केला. पण जी कर्जे वसूल होण्यासारखी नाहीत त्यासाठी ताबडतोब तरतूद करण्याची बँकांना सुचना केली. त्यामुळे वस्तुस्थितीचे खरेखुरे दर्शन घडवावे लागल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका आणी सर्व FINANCIAL INSTITUTIONचे शेअर्स पडले. NHPC, जेपी इन्फ्रा, आय आर बी इन्फ्रा, या कंपन्यांचे वार्षिक निकाल चांगले आले. SAILच्या रिझल्ट्सने मात्र पूर्ण निराशा केली. निफ्टी ५० मध्ये दिवाण हौसिंगचा समावेश होण्याची शक्यता आहे

१ जून २०१५ पासून सर्विस TAX चा दर १२ % वरून १४% झाला. सोमवारी ITDC चा शेअर वरच्या सर्किटला होता कारण ते त्यांची ८ हॉटेल्स विकणार आहेत. शेअर्सची किमत एका दिवसांत जास्तीत जास्त किती वाढू शकेल आणी कमीतकमी किती पडू शकेल या संबंधी जे नियम असतात त्यांना सर्किट असे म्हणतात. बहुतेकवेळा हे आदल्या दिवशीच्या बंद भावाच्या ५% ते २०% वर किंवा खाली असते.

ऑटो सेल्सचे आकडे आले. त्यांत अशोक LEYLAND, HEROMOTO, तसेच EICHER मोटर्सचे विक्रीचे आकडे चांगले आले. मंगळवारी येणाऱ्या रिझर्व बँकेच्या पॉलिसीमध्ये किती रेट कमी होणार, CRR SLR कमी होणार कां याच चर्चेमध्ये सोमवार संपला. रिझर्व बँकेने रेपो रेट .२५ ने कमी केला. CRR SLR मध्ये काही बदल केले नाहीत. परंतु मान्सूनविषयीची अनिश्चितता तसेच भविष्यातील अर्थाव्यवस्था कशी असेल, याविषयी चिंता व्यक्त केली. बँकांच्या वाढत्या N. P. A. ( NON PERFORMING ASSET) बद्दल चिंता व्यक्त केली. आणी बँकांनी या समस्येवर स्वतःच आणी त्वरीत उपाय शोधावेत असा सल्ला दिला. या वर्षी आणखी रेट कमी होतील या आशेवर पाणी फिरविले.

या सर्व गोष्टीमुळे मार्केट पडले. मार्केट पडले की जे लोक इंट्राडे ट्रेड करतात आणी STOP-LOSS ठेवत नाहीत त्यांना घाटा होतो. किंवा टिप्सची कालमर्यादा न समजल्यामुळे आणी शेअर्स जास्त काळ ठेवल्यामुळे SHORT-TERM TRADERला ही घाटा होतो. ह्या सर्व लोकांना विनंती आहे की आपला संताप किंवा नुकसानीचा राग आपल्या घरातील मंडळीवर काढू नका 🙂 शेअरमार्केट बंद झाल्यावर त्याविषयी असलेला विचार दुसऱ्या दिवशी शेअरमार्केट उघडेपर्यंत मनातून काढून टाका. शेअरमार्केटमध्ये होणारा नफा किंवा घाटा हे व्यवहारातील सहज घटक आहेत हे मनाला समजवा.

अडाणी पोर्टला FII लिमिट ४०% पर्यंत ठेवण्याची परवानगी मिळाली. ५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीसाठी तामिळनाडू सरकारने पॉवरकपातीत ढील दिली. सिप्ला UCB’S जनरिक बिझीनेससाठी बीड करणार आहे. सिप्लाच्या JV PARTNER च्या औषधाला युरोपमध्ये ‘ORPHAN DRUG’ म्हटले जाणार आहे. ओंकार स्पेसिलिटीने हेपटायटीस सी वरच्या औषधाच्या पेटंट करता अर्ज केला. कन्टेनर कॉर्पोरेशन मध्ये सरकार ५ % डायवेस्टमेंट करणार आहे.

BAYER CROPCHEM (शेअरचा भाव ३७००च्या आसपास) ने Rs ४००० प्रती शेअरला BUY-BACK जाहीर केला. CAIRN INDIA (सध्याचा भाव Rs.१९०) ने Rs २२० ला BUY-BACK जाहीर केला. जेव्हा शेअर्स BUY-BACK केले जातात तेव्हा कंपनीच्या भविष्याविषयी लोकांचा विश्वास वाढतो. सगळ्या बँकांनी मुदत ठेवीवरचे दर कमी करायला सुरुवात केली.

आता थोडेसे ‘ MAGGI’ विषयी.NESLEY या कंपनीचे उत्पादन असलेल्या ‘MAGGI’ या उत्पादनांत मोनोसोडियम ग्लुटामेट व लेड ( शिसे) यांचे प्रमाण जरुरीपेक्षा जास्त म्हणजे अपायकारक प्रमाणांत सापडले असे जाहीर झाले. उत्तराखंड, उत्तरप्रदेश. जम्मू आणी काश्मीर, दिल्ली तसेच तामिळनाडू राज्यसरकारांनी ‘MAGGI’ वर बंदी घातली. महाराष्ट्र गोवा आणी कर्नाटक सरकारने मात्र MAGGIत काहीही अपायकारक आढळले नाही असे जाहीर केले. अन्नमंत्र्यांनी हा गंभीर प्रश्न असल्याचे सांगितले. या सर्व प्रकारांमुळे NESLE चा शेअर खूप पडला. अशा संकटकाळांत या मोठ्या कंपन्यांची परीक्षा होते आणी त्या किती लवकर या सर्व प्रकारातून तावूनसुलाखून बाहेर पडतात यावर त्यांची गुणवत्ता आणी किमत ठरते. एक ब्लू चीप शेअर कमी किमतीत उपलब्ध होत आहे.

एकदा मार्केट पडू लागले की कोणतीही चांगली बातमी आली तरी शेअर्सवर परिणाम दिसत नाही.मार्केटमध्ये जास्त कर्ज असलेल्या, तसेच ज्यांच्या उत्पादनांची विक्री ग्रामीण भागातील समृद्धीवर आणी मान्सूनवर अवलंबून आहे अशा कंपनींच्या शेअर्सच्या किमती कमी झाल्या. सेन्सेक्स आणी निफ्टी त्यांच्या २०० DAYS MOVING AVARAGEच्या खाली आले.
वोल्वो EICHER मोटर्समधील आपला स्टेक संपूर्ण विकणार आहे. मारुतीने आपले DIESEL CELERIO हे नवे मॉडेल मार्केटमध्ये आणले.

केंद्रसरकारने प्रीमियम GAS प्राइसिंग प्रपोझल आणले आहे. ‘ULTRAA-DEEP’, ‘HIGH-PRESSURE’ ‘HIGH TEMPMPERATURE’ या प्रकारच्या DIFFICULT झोनमध्ये NOV २०१४ नंतरच्या . GAS उत्पादनासाठी सरकार खास रेट देवू करेल. टाटा स्टीलच्या U. K. ( UNITED KINGDOM) मधील कामगारांनी पेन्शन आणी इतर मागण्यासाठी संप करण्याच्या बाजूने मतदान केले आहे. जर वाटाघाटीतून काही मार्ग निघाला नाही तर १५ जूनला संपाविषयी अंतिम निर्णय होईल. COAL मंत्रालयाने जाहीर केले की दुसऱ्या टप्प्यांत १० कोळसा खाणींचा लिलाव होईल. त्याबरोबरच COAL LINKAGESचाही लिलाव केला जाईल. ही कार्यपद्धती संपूर्णतः पारदर्शक असेल.

उद्या दोन आंतरराष्ट्रीय महत्वाच्या घडामोडी आहेत. पहिली म्हणजे ग्रीसने IMF कडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीचा शेवटचा दिवस आहे. ग्रीसच्या पंतप्रधानांनी सांगितले की आम्ही DEFAULT करणार नाही. OPEC ची मीटिंग आहे आशा आहे की त्या मीटिंगमध्ये उत्पादनांत कपात करण्याचा निर्णय घेतला जाणार नाही.

शुक्रवारी ‘MAGGI’ चे आख्यान आणखी रंगले. FSSA ( FOOD SAFETY STANDARD AUTHORITY) ने MAGGIच्या उत्पादनावर, वाटप आणी विक्रीवर बंदी घातली. NESLEच्या CEOने ठणकावून सांगितले की आज भारतांत ३० वर्षे MAGGI वापरली जात आहे. आमच्या टेस्टिंगमध्ये MAGGI पूर्णपणे यशस्वी ठरली आहे. ग्राहकाचे हित आणी त्याची सुरक्षितता ही आमच्या कंपनीची कायम ध्येय आणी धोरण राहिली आहेत. परंतु आता उठलेले मोहोळ लक्षांत घेता आम्ही आमची सर्व MAGGI उत्पादने मार्केटमधून काढून घेत आहोत.

मान्सून केरळमध्ये पोहोचला. त्यामुळे मान्सूनविषयीची अनिश्चितता कमी झाली. भूषण स्टील या कंपनीच्या परतफेडीची मुदत 8 वर्षावरून २५ वर्षे करण्यांत आली.ही कर्जाची पुनःरचना ५/२५ योजनेखाली करण्यांत आली.

शुक्रवारी JUST DIAL या कंपनीने BUY-BACK ऑफ शेअर्स जाहीर केले. हे शेअर BUY-BACK Rs १५५० प्रती शेअर या भावाने केले जाईल. तसेच हे BUY-BACK PROPORTIONATE तत्वावर असेल.

आता गोष्ट अडाणी ग्रूपच्या डीमर्जरची अडाणी ग्रुपने खालीलप्रमाणे डीमर्जर जाहीर केले होते या डीमर्जरची ऐक्स-डेट होती ०३/०६/२०१५. व रेकॉर्ड डेट होती ०४/०६/२०१५.

(१) डीमर्जर पोर्ट अंडरटेकिंगचे ‘ अडानी पोर्टस एंड स्पेशल इकोनॉमिक झोन्स’(APSEZ) या कंपनीमध्ये.ज्याच्याकडे अडाणी एन्टरप्राइसेसचे १०००० शेअर्स आहेत त्याला APSEZ या कंपनीचे १४१२३ शेअर्स मिळतील/

(२) डीमर्जर पॉवर अंडरटेकिंगचे ‘अदानी पॉवर लिमिटेड’ या कंपनीमध्ये. ज्या माणसाकडे अडाणी एन्टर प्राईसेस चे १०००० शेअर्स आहेत त्याला अडाणी पॉवरचे १८५९६शेअर्स मिळतील.

(३) डीमर्जर ट्रान्समिशन अंडरटेकिंगचे ‘अदानी ट्रान्समिशन लिमिटेड’ या कंपनीमध्ये. अडाणी ट्रान्समिशन ही कंपनी BSE आणी NSE वर लिस्ट होईल. ज्याच्या कडे अडाणी एन्टरप्रायसीस चा एक शेअर आहे त्याला अडाणी ट्रान्समिशनचा एक शेअर मिळेल. अडाणी मायनिंग या कंपनीचे अडाणी ट्रान्स्मिशनमध्ये मर्जर केले जाईल. २ जूनपर्यंत ज्यांनी अडाणी एन्टरप्रायसीसचे शेअर्स खरेदी केले असतील त्याना वरील कंपन्यांचे शेअर्स सांगितलेल्या प्रमाणांत मिळतील.

अशाप्रकारे या आठवड्यांत पडणाऱ्या मार्केट्ची भीती, क्रुडऑइलच्या किमती वाढण्याची भीती, ग्रीसच्या DEFAULTची भीती, MAGGI आपल्याबरोबर बाकीच्याही PACKAGED फूड्सना आपल्याबरोबर विवादांत ओढते की काय ही भीती, FED दर वाढविते की काय ही भीती आणी सर्वांत मोठी भीती अवर्षण आणी त्यामागे येणारी अर्थव्यवस्थेची पिछेहाट, ग्रामीण मागणीमध्ये घट, वाढती महागाई आणी वाढती सर्व वस्तूंची टंचाई यासारख्या भीतीच्या भिंती निर्माण झाल्यामुळे मार्केटपासुन दूरच रहावे असे सर्वांना वाटले असेल.

आता आपण विचार करायला पाहिजे की घाबरून नुसते बसून राहायचे कां ? मुळीच नाही अशा दिवसांत आपल्याला ‘CALCULATED RISK’ आणी ‘INFORMED DECISION’ घेण्याची गरज आहे. अज्ञात आणी धोकादायक क्षेत्रांत जाऊ नका. अंधारांत तीर मारु नका. जवळचा फायदा सोडून लांबच्या फायद्याची आशा बाळगून आपले नुकसान करून घेऊ नका. जर आपल्याला कुठल्याही शेअरमध्ये नफा होत असेल तर तो घरी घेवून या. माहिती जमवा माहितीचे सतत परीक्षण करा, त्यातील बदलाचा मागोवा घ्या. अशा परीस्थितींत घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी माणूस दुसऱ्यावर ढकलत नाही. सत्कारही तुमचा आणी धिक्कारही तुमचा!

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

3 thoughts on “आठवड्याचे समालोचन – १ जून ते ५ जून २०१५ – भीतीच्या भिंती

 1. समित म्हात्रे

  सर्वप्रथम मराठीमध्ये शेअरमार्केटविषयी एवढे सुंदर सदर सादर करण्याबद्दल सर्वांकडुन अभिनंदन व अाभार.
  माझे चार प्रश्न अाहेत.
  १. युनिटेकचा शेअर एका दिवसात ४८% ने पडल्यावरही लोअर सर्किट का लागले नाही ?
  २.सर्किट हे exchange कडुन लावले जाते की SEBI कडुन ?
  ३.सर्किट ब्रेकर म्हणजे काय ?
  ४. आणि शेवटचे म्हणजे Insider Trading अाणि BuyBack of Shares मध्ये काय फरक अाहे ?

  1. surendraphatak

   युनिटेक हा शेअर F &O सेगमेंट मध्ये असल्यामुळे या शेअरला सर्किट फिल्टर लागू होत नाही.

   शेअरची किमत वाढणे किंवा घटणे याबाबतीत सेबीने घातलेल्या मर्यादा म्हण जेच सर्किट फिल्टर. पण काही काल ट्रेडिंग थांबल्यानंतर पुन्हा ती मर्यादा ओलांडून व्यवहार चालू होतो. त्याला सर्किट ब्रेंकर असे म्हणतात.
   SEBI सर्किट ठरवते आणी लावते.

   इनसाईडर ट्रेडिंग म्हणजे इनसायडरने केलेले ट्रेडिंग. कंपनीशी संबंधीत व्यक्ती म्हणजेच डायरेक्टर, ऑफिसर , कर्मचारी, किंवा व्यावसायिक किंवा बिसिनेसशी संबंधीत असल्यामुळे ज्या सर्व व्यक्तींना भावी कार्पोरेट एक्शन विषयी थेट वा कोणामार्फत ‘शेअरच्या किमतीवर प्रभाव पाडणारी अप्रकाशित माहिती असते किंवा सर्वसामान्यतः ते ही माहिती ACCESS करु शकतात. इनसायडरने ही माहिती बाहेरच्या व्यक्तीला किंवा दुसऱ्या इनसायडरला पुरवू नये असा संकेत आहे. या माहितीच्या आधारावर जे ट्रेडिंग केले जाते त्याला इन्सायडर ट्रेडिंग असे म्हणतात याला तीन अपवाद आहेत (१) कायदेशीररीत्या (२) विहित कर्तव्यपालन करताना (३) एख्याद्या कायदेशीर हेतूसाठी.

   BUY-BACK ऑफ शेअर्स कंपनी आपलेच शेअर्स ठराविक अवधीत ठराविक किमतीपर्यंत खरेदी करते त्याला BUY -BACK असे म्हणतात. कंपनीकडे कॅश उपलब्ध असेल आणी प्रगतीच्या आणी गुंतवणुकीच्या योग्य संधी उपलब्ध नसतील, आणी मार्केट मंदीत असेल तर शेअर्सचा भाव स्थिर राहण्यासाठी कंपनी शेअर्स BUY- BACK करते.

 2. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – ८ जून २०१५ ते १३ जून २०१५ – ये रे घना ये रे घना | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s