आठवड्याचे समालोचन – ८ जून २०१५ ते १३ जून २०१५ – ये रे घना ये रे घना

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

या आठवड्यात बातम्यांचा खुराक मार्केटला भरपूर होता. परंतु हा खुराक लागू होण्यासारखी परीस्थिती मात्र नाही . सगळीकडे निराशेचे वातावरण आहे. सध्याची परीस्थिती फार वेगळी आहे. अर्थव्यवस्था ढासळलेली नाही परंतु ज्या प्रकारचे ‘अच्छे दिन’ लोकांना अपेक्षित होते तसे ‘अच्छे दिन’ आले नाहीत. जे काही रिफोर्म्स किंवा सुधारणा झाल्या त्या सुधारणा सामान्य माणसापर्यंत पोहोचायला वेळ लागेल असे दिसते.

आता पहा जर एखाद्या आईने मुलाला पैसे दिले आणी सांगितले “ जा तुला जे आवडेल ते खा” तर त्या मुलाने वडा-पाव घेवून गटारीच्या कडेला उभा राहून आनंदाने खाल्ला असता. पण जर एखादी आई म्हणाली “ मी घरांत वडे करते तू पाव आण.” पण असा वडा-पाव मुलाला आवडत नाही. ती आई वाईट ठरते. तेच झालं सरकारचं,  जे पैसे कोळसा आणी स्पेक्ट्रमच्या लिलावातून आले ते जर प्रत्येक नागरिकाला दिले असते किंवा ५ किलो साखर फुकट दिली असती तर सर्वजण खुश झाले असते. ‘समाजकारण’ हा फारच किचकट भाग.  गेले वर्षभरांत काहीच सुधारणा झाल्या नाहीत असे वाटून त्याचा परिणाम जनमतावर, उद्योजकांवर होतोय, त्याचे प्रतिबिंब शेअमार्केटमध्येही दिसत आहे.

शनिवार आणी रविवार थोडासा पाऊस पडल्याने हा उत्साह मार्केटमध्ये आढळतो कां हे पहायचं होतं
टाटा मोटर्स खूप पडतो आहे. खूप ‘shorts’ आहेत. आता ओवरसोल्ड झोनमध्ये आहे. पण ‘मारुती’ आउटपरफॉर्मर आहे
सन टी. व्ही. च्या ३३ वाहिनीना गृह मंत्रालयाने सुरक्षिततेच्या कारणासाठी मंजुरी दिलेली नाही. परंतु ‘INFORMATION AND BROADCASTING मंत्रालय ही लायसेन्स रद्द करण्याच्या विरुद्ध आहे. या मुळे सन टी व्ही च्या शेअर्सची किमत कमी होऊ लागली.

सरकारने मलेशिया, चीन, कोरिया या देशातून येणाऱ्या ‘FLAT स्टील ‘ आणी ‘HR FLAT स्टील’च्या काही उत्पादनांवर NTI-DUMPING ड्युटी लावली. याचा फायदा ही उत्पादने करणाऱ्या स्वदेशी कंपन्यांना होईल. युनायटेड स्पिरीटस ही कंपनी ‘DEIGEO’ ने विकत घेतली. आता ‘DEIGEO’ विकण्यासाठी दुसऱ्या राउंडची चर्चा चालू आहे. US$ च्या तुलनेत जपानीज येन १३ वर्षातील खालच्या स्तरावर आहे याचा फायदा ‘मारुती’ ला होईल. ‘WOCKHARDT’ ने पुन्हा एकदा निर्यात केकेली औषधे परत मागविली. यस बँकेला’ FII’ कडून ७५% परदेशी गुंतवणूक स्वीकारण्याची परवानगी मिळाली.

सिप्ला या कंपनीला स्टेमसेल औषध ‘STEMPENCEL’ साठी जपानमध्ये पेटंट मिळाले. GSK आणी सनोफिल या दोन फार्मा कंपन्यांवर CCAने Rs ९४ कोटी दंड लावला. OPEC आपले अनुमान बदलावयास तयार नाही क्रुडऑइलची किमत US$ ७० च्या वर जाणार नाही. US$ च्या तुलनेत रुपयाची किमत Rs६४ झाली.

‘MAGGI’ विरुद्ध उठलेल्या वादळाचा वेग वाढतच आहे. गोव्यातही ‘MAGGI’ वर बंदी घालण्यांत आली. केंद्र सरकारने ‘नेस्ले’ या कंपनीकडून नुकसानभरपाईची मागणी केली आहे. FSSA ( FOOD SAFETY AND STANDARDS AUTHORITY) ने राज्यसरकारांना पास्ता, मक्रोनी, नूडल्सच्या सर्व कंपन्यांच्या ‘BRANDS’ ची तपासणी करून १९ जून पर्यंत रिपोर्ट द्यावयास सांगितले.

पश्चिम भारतामध्ये वादळ येण्याची शक्यता असल्यामुळे पाऊस आपली हजेरी उशिरा लावेल. वादळामुळे कर्नाटक महाराष्ट्र गोवा या तीन राज्यांत खूप पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला गेला.

“GOLD MONETISATION SCHEME’ मध्ये KYC नॉर्म्समध्ये खालीलप्रमाणे सूट देण्यांत येणार आहे. विवाहित महिलांना ५०० GRAM सोन्यासाठी तर अविवाहित महिलांना २५० GRAM सोन्यासाठी तर पुरुषांना १०० GRAM पर्यत KYC नॉर्म्स तसेच सोने कुठून घेतले इत्यादी प्रश्न विचारले जाणार नाहीत. वरील योजनेमध्ये सोन्याचे दागिने वितळवायला लागत असल्याने ही योजना मध्यम वर्ग, गरीब, आणी उच्च मध्यम वर्ग यांत लोकप्रिय होईल असे वाटत नाही. बँक ऑफ बरोडा, OBC(ORIENTAL BANK ऑफ COMMERCE) , स्टेट बँक ऑफ इंडिया, अलाहाबाद बँक यांनी मुदत ठेवीवरचे व्याजदर घटवले.

कोल इंडिया आपल्या उत्पादनापैकी १०% उत्पादन E CHANNEL द्वारा विकेल. हुंडाई कंपनीने नवीन SUV ‘CRETA’ या नावाने बाजारांत आणली.  ‘TATA STEEL’ चे U. K. मधील सर्व कर्मचारी पेन्शनच्या बाबतीत असलेल्या DISPUTE मुळे जर सर्वमान्य तोडगा निघाला नाहीतर २२ जूनपासून संपावर जाण्याची शक्यता आहे. नेस्लेला ‘MAGGI’च्या बाबतीत थोडासा दिलासा मिळाला. सिंगापूर सरकारने भारताने बंदी घातलेले सर्व नूडल्स आयात करायला परवानगी दिली.

रिझर्व बँकेने ‘STRATEGIC DEBT CONVERSION’ ही योजना जाहीर केली. या योजेनेद्वारे ज्या कंपन्यांनी CDR( CORPORATE DEBT RESTRUCTURING) च्या अटींचे उलंघन केले असेल त्या कंपन्यांच्या कर्जाचे रुपांतर कर्जदार ऋणको कंपनीच्या ‘ MAJORITY EQUITY स्टेकमध्ये करू शकतात. आता प्रत्येक CDRच्या करारामध्ये ही अट घातली जाईल. कर्जाचा ‘REVIEW’ घेतल्यानंतर ३० दिवसाच्या आंत हा निर्णय कर्जदारांनी घ्यावयाचा आहे. या साठी ७५% कर्जाच्या रकमेच्या आणी ६०% संख्येने कर्जदारांची मंजुरी आवश्यक आहे. हा निर्णय घेतल्यानंतर सर्व कर्जदारांनी ९० दिवसांच्या आंत मंजूर केला पाहिजे. या कर्जाच्या इक्विटीमध्ये रुपांतर केल्यानंतर सर्व कर्जदार मिळून ऋणको कंपनीच्या ५१% किंवा जास्त भागभांडवलाचे मालक होतील.सर्व कर्जदारांची एक समिती कंपनीच्या कारभारावर आणी प्रगतीवर बारीक लक्ष ठेवेल. त्यासाठी कर्जदारांची समिती नवीन व्यावसायिक व्यवस्थापन कंपनीत आणू शकते.नवीन व्यवस्थापनाला कंपनीत ५१% स्टेक घ्यावा लागेल तसेच नवीन प्रमोटर्सपैकी कोणीही जुन्या प्रमोटरपैकी किंवा त्यांच्याशी संबंधीत असू नये. आशा आहे की या उपायानंतर तरी सार्वजनिक क्षेत्रातील बँकाचे N.P.A..(बुडीत कर्जे उर्फ NON PERFORMING ASSETS) कमी व्हायला मदत होईल.

वेन्दांता या कंपनीने ‘CAIRN’ आपल्या कंपनीत मर्जर करण्यासाठी लवकरच दोन्ही बोर्ड ऑफ डायरेक्टरची बैठक बोलावण्याचा निर्णय जाहीर केला आहे.बजाज फायनान्स सर्विसेस चा QIP इशू Rs ४२७५ प्रती शेअर्स या किमतीवर फार थोड्या वेळांत सबस्क्राईब झाला. ग्रासिम या कंपनीमध्ये आदित्य बिरला केमिकल्सचे मर्जर होणार आहे. KEC INTERNATIONAL या कंपनीला Rs १००२ कोटीची ऑर्डर UAE कडून मिळाली. सानोफी या कंपनीने ‘MULTAQ’ या औषधाच्या बाबतीत लुपिन या कंपनीवर कोर्टांत केस दाखल केली. EROS INTERNATIONAL या कंपनीने पाकिस्तानच्या HUM टीव्ही बरोबर करार केला.

NCDRCने (THE NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION) UNITECH या कंपनीला बुकिंग केलेल्या ‘ APARTMENTS’ ग्राहकांच्या ताब्यांत वेळेवर न देण्यासाठी दरवर्षी १२% प्रमाणे नुकसानभरपाई देण्याची ऑर्डर केली. ही ऑर्डर गुरगावमधील UNITECHच्या VISTAS या प्रोजेक्टसंबंधांत दिली गेली. ही सर्व FLAT किंवा APARTMENT बुक केलेल्या आणी वेळेवर ताबा मिळत नसलेल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. या केसमुळे एक चांगले PRECEDENT तयार झाले.

पश्चिम भारताकडे सरकणारे ‘अशोभा’ नामक वादळ येमेनच्या दिशेने भारतापासून ८०० किलोमीटर दूर गेले.. AIRCEL-MAXIS या केसमध्ये मारनच्या (प्रमोटर्स) ची सर्व मालमत्ता ATTACHED केल्या. केंद्रसरकार साखर उद्योगाला शेतकऱ्यांचे बाकी असलेले पैसे देण्यासाठी Rs ६००० कोटी व्याजमुक्त कर्ज १ वर्षासाठी देणार आहे.ह्या योजनेखाली सरकारी तसेच प्रायवेट साखरकारखान्यांना कर्ज मिळेल. १ ऑक्टोबर पासून साखरकारखान्यांकडून ‘एथनाल ‘ Rs ४९ प्रती लिटर या दराने विकत घेतील.

आज भूतान, बांगलादेश नेपाल, आणी भारत या चार देशांत मोटार व्हेइकल अकोर्ड झाले. यामुळे या देशांत आपापसातील व्यापार वाढेल. MANGALORE CHEMICALS अंड FERTILIZERS, MADRAS FERTILIZERS आणी SPIC या कंपन्यांना ‘NAPHTHA’ पासून युरिआ उत्पादन करण्यास मंजुरी दिली. जर तामिळनाडू आणी कर्नाटक राज्यसरकारांनी संमती दिली तर NAPHTHA वर लागू होणारी VAT आणी एन्ट्री कर माफ केला जाईल.

मदरसन सुमी या कंपनीने १:२ असा बोनस जाहीर केला. म्हणजे तुमच्या जवळ २ शेअर्स असतील तर तुम्हाला एक बोनस शेअर मिळेल. PVR या कंपनीने DLF कडून DT सिनेमाज विकत घेतले.. IOC (इंडिअन ओईल कोर्पोरेशन) ‘TAMILNADU PETROPRODUCTS’ ही कंपनी विकत घेण्याच्या विचारांत आहे.

NBCC या कंपनीला दिल्ली रेल्वे स्टेशनच्या पुनर्वसनाचे काम मिळाले. स्पेक्ट्रम ट्रेडिंग आणी शेअरिंगसाठी नियम बनवून ते मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यांत आले. NOVARTISचा शेअर DELIST होण्याची शक्यता आहे. या कामोनीत प्रमोटर्सचा स्टेक ७५% आहे ASTRAZENECA या कंपनीने डायबेटीस २ साठी औषध इभारातांत LAUNCH केले. पॉवर ग्रीड कॉर्प.ला वर्ल्ड बँकेकडून US$ ६०० लाख मिळणार. गुरुवारी मार्केट सतत पडत गेले. ८०००च्याही खाली निफ्टी गेला. तर सेन्सेक्स २६३७० वर थांबला.

अल्झायमरसाठी ORCHID फार्माच्या ‘RIVASTIGMINE’ या औषधाला मंजुरी मिळाली. सुजेवर CELECOXIB या लुपिन कंपनीच्या औषधाला परवानगी मिळाली. टाटा मोटर्स फियाट बरोबर ३००० कोटींचा असेम्ब्ली प्लांट लावणार आहे. रिलायंसची आज A. G. M. होती. जी भांडवली गुंतवणूक कंपनीने केली आहे तिचे परिणाम २०१६-२०१७ तसेच २०१७- २०१८ या वर्षांत दिसायला लागतील असे समजते. चीनने कपाशीची आयात कमी केली, म्हणून COTTON मार्केटमध्येही मंदी आहे. अनुह फार्मा या कंपनीने १:२ असा बोनस जाहीर केला. म्हणजे ज्याच्या जवळ २ शेअर्स असतील त्याला १ बोनस शेअर मिळेल.

पाऊस उर्फ मान्सून सगळ्यांची परीक्षा बघतोय. सगळे जणू वरुण देवाच्या आगमनासाठी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. रिझर्व बँकेने आपले ‘रेट कट’ पावसासाठी लांबवले. ग्रामीण डिमांड पावसावर अवलंबून असल्यामुळे ऑटो, FMCG, कंपन्यांचे शेअर्स पडत आहेत शेअरमार्केटवरही अवर्षणामुळे एक निराशा आहे. या सगळ्याचे उत्तर एकच  – पाऊस आला तर जादूची कांडी फिरल्याप्रमाणे सर्व परिस्थिती सुधारेल आणी शेअरमार्केटची निराशा नाहीशी होईल. नवीन पालवी फुटेल. म्हणून आता सर्वांनी ‘ये रे घना ये रे घना ‘ असं म्हणायला हवं.

 

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे समालोचन – ८ जून २०१५ ते १३ जून २०१५ – ये रे घना ये रे घना

  1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – १५ जून ते १९ जून 2015 – खेळ आशा निराशेचा | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s