आठवड्याचे समालोचन – १५ जून ते १९ जून 2015 – खेळ आशा निराशेचा

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

आपण सर्वांनी गेल्या आठवड्यांत ‘ये रे घना’ असे म्हणून पावसाला बोलावले आणी खरेच की एखाद्या आज्ञाधारक पुंडलिकाप्रमाणे त्याने आपले ऐकले. आणी जणू एका चुटकीसरशी सगळ्यांना आनंदित केले. वेधशाळेचे भाकीत खोटे ठरविले. या आठवड्यांत मार्केटच्या दृष्टीकोणातून वातावरण सुधारले.

 1. WPI (WHOLE SALE PRICE INDEX )वाढण्याचे प्रमाण -२.३६ झाले
 2. रुपया वधारला
 3. सरासरीपेक्षा आत्तापर्यंत १७% पाऊस जास्त पडला
 4. FOMCच्या मीटिंगमध्ये सध्यातरी रेट वाढवणार नाही असे सांगण्यांत आले.ही रेटमधील वाढ आता डिसेंबर २०१५ च्या आसपास होईल असे फेडने सांगितले. U.S.A. ची अर्थव्यवस्था जेवढी सुधारायला पहि८जे होती तेवढी सुधारली नाही.
 5. सरकारने बॅंका RECAPITALISE करायला मान्याता दिली.
 6. कृद्चे भाव घसरण्यास सुरुवात झाली.
 7. ट्रेड डेटाही चांगला आला. भारताचा ट्रेड डेटा म्हणजे आयात निर्यात व्यापाराची आकडेवारी. पूर्वी व्यापारातील तूट ११.२३ होती ती आता १०.४ झाली. कोळसा आणी सोने यांची आयात कमी झाली.

युरोप मध्ये ग्रीसची ECUमध्ये राहण्याची धडपड चालू आहे. GDP(GROSS DOMESTIC PRODUCT ) च्या १७७% कर्ज, आणी २६% बेकारीच्या वाढत्या दराबरोबर झुंज चालू आहे. जूनअखेर युरो १६०कोटी इतके कर्ज चुकवायचे आहे. ग्रीस हे कर्ज परत करण्यांत DEFAULT करेल अशी एक सार्वत्रिक भीती आहे.

वेदान्ता आणी CAIRN(इंडिया) या कंपन्याच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी दोन्ही कंपन्यांच्या मर्जरसाठी मंजुरी दिली. ज्या माणसाजवळ १ CAIRN (इंडिया) चा शेअर आहे त्याला १ वेदांताचा इक्विटी शेअर आणी एक Rs १० दर्शनी किमतीचा ७.५% लाभांश असलेला REDEEMABLE PREFERENCE शेअर मिळेल. हा शेअर १८ महिन्यांनंतर REDEEMABLE होईल. या दोन कंपन्यांमध्ये .L. I. C चा स्टेक आहे. त्यामुळे L.I. C.ची टीम या मर्जरचा अभ्यास करून निर्णय घेईल. त्यामुळे L.I C याबाबतीत काय निर्णय घेते या कडे तुम्ही लक्ष ठेवा. L.I. Cने HINDALCO मध्ये २% हिस्सेदारी वाढवली. L I.C. करीत असलेल्या गुंतवणुकीकडे आपणही लक्ष ठेवावे.

दिलीप संघवी HEALTH विमा आणी म्युचुअल फंडाच्या उद्योगांत उतरायच्या विचारांत आहेत. त्यांनी पेमेंट बँकेसाठी अर्ज केला आहे.जून ते डिसेंबर या काळांत लिहिल्याप्रमाणे शिक्षणक्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्सच्या किमती वाढत आहेत. उदा: EDUCOMP, MT EDUCARE, CARREER POINT झी LEARN, NIIT. गृहमंत्रालयाने सन टी व्ही च्या ३३ वाहिन्यांच्या नूतनीकरणाचा पुनर्विचार करू असे सांगितले. त्यामुळे सन टी व्ही च्या किमतीमध्ये थोडी सुधारणा झाली.

OIL EXPLORATION करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स वर होते. RCOMचे सीस्टेमा श्याम टेलीकॉम बरोबर मर्जर होणार आहे. INFOSYS आज Ex -DIVIDEND आणी Ex-बोनस झाला. INFOSYS च्या शेअर्सची किमत Rs १००० च्या आसपास होती. BSNLने रोमिंग फ्री केले. आज ADVANCE TAX भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे वेगवेगळ्या कंपन्यांचे ADVANCE TAX चे आकडे येण्यास सुरुवात झाली. हे आकडे चांगले होते.

 1. M&M ने एअरबससाठी एअरो-स्पेसबरोबर डील केले.
 2. अडानीनी राजस्थान सरकारबरोबर सोलरपार्कसाठी करार केला.
 3. T-MOBILE पोलंड’स CONTRACT विप्रोला मिळाले.
 4. UFLEX ही कंपनी नेस्ले कंपनीला PACKAGING MATERIAL पुरवीत असे, त्यामुळे या कंपनीचेही नुकसान होण्याची शक्यता आहे.

ACC (ASSOCIATED CEMENT COMPANY) ने बरगढमध्ये चुनखडीच्या खाणीचा उपयोग सुरु केला. पावसाची जोरदार सुरुवात झाल्याने सर्व FMCG शेअर्स वर होते. तुम्ही विचाराल कां ?तर ही आहे मार्केट्ची मजा FMCG म्हणजे FAST MOVING CONSUMER GOODS म्हणजेच काय तर दिवसभर वापरण्यांत येणाऱ्या वस्तू (तेल साबण टूथपेस्ट चहा साखर इत्यादी). मार्केट नेहेमी एखाद्या घटनेभोवती गुंफण करीत असते. प्रत्येक गोष्ट मार्केटला चटकन दिसते. कशी ते मला विचारू नका. पाऊस जास्त पडला म्हणून शेतकी उत्पनांत वाढ होणार त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातांत पैसा येणार. खेडोपाड्यातील मागणी वाढणार आणी ही मागणी प्रामुख्याने FMCG क्षेत्रातील वस्तूंना येणार.त्यामुळे अशा कंपन्यांचा फायदा वाढणार. म्हणून त्या कंपन्यांच्या शेअर्सना मागणी आली. अशाप्रकारे विणकाम आणी भरतकाम गृहिणीप्रमाणे शेअरमार्केट करीत असते.

सरकारने ‘CAIRN’च्या TAX बाबतीत खंबीर भूमिका घेतली. RAMKY INFRA या कंपनीला CDR PACKAGE मंजूर झाले. मावाना शुगर, राणा शुगर इत्यादी ६ साखर कारखान्याविरुद्ध उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांचे पैसे चुकते न केल्याबद्दल FIR दाखल केली.

EICHER MOTORS ही कंपनी प्रगतीपथावर आहे. ह्या कंपनीचा मार्केटशेअर आणी कन्झुमर बेस वाढत आहे. ROYAL ENFIELD ची निर्यात वाढत आहे. ही कंपनी छोटे उद्योग करणारे आणी शेतकऱ्यांच्या गरजा लक्षांत घेवून MULTIX या नावाने नवीन PERSONAL UTILITY VEHICLE बाजारांत आणीत आहे. EICHER ही POLARIS USA च्या सहकार्याने ह्या वाहनाचे जयपूर येथे उत्पादन करणार आहे याची किमर २.३ ते २.७ लाख असेल.

सरकारने FLAT STEEL PRODUCTSच्या काही VARIETIES वर CUSTOM ड्युटी १०% तर LONG STEEL PRODUCT वर ७.५% केली. सरकारने LOWCOST HOUSING साठी इंटरेस्ट SUBVENTION SCHEME जाहीर केली. ६.५ इंटरेस्ट सबसिडी देणार. आहे. YIPPEE नूडल्सच्या वेष्टणावरून ‘NO ADDED MSG’ हा रिमार्क काढून टाकू असे ITC ने जाहीर केले.

तांदळाच्या मिनिमम सपोर्ट किमतीत Rs ५० प्रती क्विंटल वाढ केली. डाळीसाठी Rs२०० प्रती क्विंटल बोनस जाहीर केला. भारती एअरटेलने DELHI NCR मध्ये 4G TRIAL सुरु केल्या. SBBJ, HDFC YESबँक या बँकांनी आपल्या बेस दरांत घट केली तर AXIS बँकेने मुदत ठेवींवरील व्याजाचे दर कमी केले.हे ही गणित सामान्य माणसाला कळत नाही. रिझर्व बँकेने रेट कमी केल्यानंतर बँकांनी कर्जावरचे व्याज कमी करायला हवे होते त्याऐवजी ठेवीवरचे व्याज दर कमी केले जात आहेत. त्यामुळे योग्य तो परिणाम साधला जात नाही.

AMTEK ग्रुपच्या कर्ज देणाऱ्या बँकांनी JOINT LENDER FORUM स्थापन केली आहे. ही कंपनीला एक धोक्याची सुचना आहे. त्यामुळे अम्टेक ग्रुपच्या शेअर्सचे भाव कमी झाले. STRIDES ARCOLAB आणी SHASUN PHARMA या कंपनींच्या मर्जरला FIPB ने मंजुरी दिली नाही.

या आठवड्यामध्ये RELIANCEच्या शेअरने पुढाकार घेतल्यामुळे मार्केट्ची बढत वाढली. RELIANCEच्या बाबतीत एक वाईट बातमी येऊन थडकली खरी-  RELIANCE INDUSTRIES LIMITED (RIL) आणी RELIANCE PETROCHEMICALS LIMITED (RPL) यांचे मर्जर होण्याच्या आधी RIL ने RPLचे काही शेअर विकून साधारण ५००कोटी रुपये फायदा मिळवला होता. त्या केसच्या संदर्भांत RIL ला २५ कोटी रुपये दंड होईल अशी वार्ता होती. पण शेअरच्या किमतीवर फारसा परिणाम झाला नाही.RILची परीस्थिती दिवसेंदिवस सुधारत आहे RILने जी भांडवली गुंतवणूक केली होती त्याची फळे आता मिळावयास लागतील. RELIANCE JIO चे आगमन होणार आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा शेअर पडेल तेव्हा तेव्हा खरेदी करण्यास योग्य होईल असे मला वाटते. येणाऱ्या बुल रनमध्ये RIL चा पुढाकार असेल असे वाटते.

चीनचे शेअर मार्केट आणी भारतीय शेअर मार्केट याच्यांत होणारी वाढ आणी घट एकमेकांवर अवलंबून आहे असं दिसतंय. प्रत्येक मार्केटचा RELATIVE PERFORMANCE विचारांत घेवून FII गुंतवणूक करतात किंवा गुंतवणूक काढून घेतात त्यामुळे मार्केट वाढण्याचा किंवा मार्केट पडण्याचा वेग जास्ती आहे.

टाटा स्टील U.K. युनियन्सची आज नवीन पेन्शन प्लानबाबत बैठक आहे. बहुतेक युनियन्स पेन्शन प्लान मंजूर करतील असं दिसतंय. या पेन्शन प्लानमध्ये निवृत्तीचे वय ६० वरून ६२ केले आहे आणी पेन्शन सहभागावर १.७५% जास्तीतजास्त मर्यादा घातली आहे. २२ जूनला जाहीर केलेला संप पुढे ढकलण्याची शक्यता आहे. पावसाने महाराष्ट्रांत आपली चांगलीच हजेरी लावली. येत्या दोन दिवसांत मान्सून छत्तीसगड, ओरिसा, बंगालमध्ये पोहोचेल. आज ATTORNEY GENERALने SECURITY CLEARANCE बाबतीत सन टी व्ही च्या बाजूने कौल दिला. PREMIER EXPLOSIVES या कंपनीला इंडिअन लायसेन्स फोर डिफेन्स मिळाले.

कधी कधी मला वाटते शेअरमार्केट म्हणजे आशा निराशेचा खेळ आहे. मार्केट अतिशय लहरी आहे. मूड चांगला असेल तर तर वाईट बातमीकडे दुर्लक्ष करते. आणी मूड खराब असेल तर चांगल्या बातमीलाही दाद देत नाही. त्यामुळेच BSE चा तेजी मंदी दाखवणारा जो निर्देशांक आहे त्याला SENSEX (SENSITIVE INDEX) असे म्हणतात. त्यामुळे मार्केटमध्ये कधीही अशा सोडायची नाही. कोणता शेअर कधी वाढेल आणी तुमच्या तोट्यांत गेलेल्या शेअरचे कधी फायद्यांत रुपांतर होईल हे सांगता येत नाही. आशा अमर आहे हेच खरे.

 

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

3 thoughts on “आठवड्याचे समालोचन – १५ जून ते १९ जून 2015 – खेळ आशा निराशेचा

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – २२ जून ते २७ जून २०१५ – राजा बोले, मार्केट हाले | Stock Market आणि मी

  1. surendraphatak

   ​माझ्या ब्लोग मधून तुम्हाला उपयुक्त माहिती समजते आहे हे तुमच्या सूचनेवरूनच जाणवते. सध्या आम्ही वाचकांच्या प्रश्नांना उत्तरे महिन्याला देत आहोत. पण ​योग्यवेळी तुमच्या सूचनेप्रमाणे दर आठवड्याला हा विभाग सुरु करू.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s