तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – एप्रिल आणि मे २०१५

मार्चची प्रशोन्त्तरे वाचण्यासाठी इथे क्लिक करा

नाव: jyoti
तुमचा प्रश्न : mala share market made paise guntvayche ahet tr procedure kay ahe ani mimimun kiti paise guntau shakto

पैसे किती गुंतवावेत याला मर्यादा नाही. शेअर्स किती घ्यावेत यालाही काही मर्यादा नाही. Rs१०० चा शेअर खरेदी करून Rs ११३ला विकल्यास Rs १० म्हणजेच १०% फायदा होईल.म्हणजेच तुम्ही ज्या प्रमाणांत पैसे गुंतवाल त्या प्रमाणातच फायदा होईल. शेअरमार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी कोणत्या स्टेप घ्याव्या लागतात हे तुम्हाला ब्लोगमधील लेख वाचल्यावर कळेल

नाव: rashmi v. surve
तुमचा प्रश्न : mala stock marketbaddal suruvatipasun shikayche ahe. mi shiku shaken ka ? mala tyabaddal kahich mahit nahi.

तुम्ही नक्की शिकू शकाल. याबद्दल कोणतीही शंका बाळगू नका. सुरुवातीला पैसे गुंतवताना विचार करून गुंतवा. आणी थोड्या प्रमाणांत गुंतवा. शक्यतो धोका पत्करू नका. मी माझ्या अनुभवावरून सांगते तुम्हाला नक्की यश मिळेल.

नाव: Hemant Baliram Bhagat
तुमचा प्रश्न : Sir, I am 54 years old Marathi person residing in Thane & interested to enter into Share Market.However, I am BIG ZERO in Share Market knowledge.How to get detail knowledge about Share Market?Please guide me about books to refer.
Eagarly waiting for your reply.

शेअरमार्केटवर अनेक गोष्टींचा परिणाम होत असल्यामुळे पुस्तके वाचून फारसा उपयोग होत नाही.क्रिकेटचा सामना पुस्तकातून वाचणे आणी प्रत्यक्ष खेळ सुरु असताना बघणे यांत जो फरक आहे तोच फरक पुस्तकातून अभ्यास करणे आणी शेअरमार्केट सुरु असताना निरीक्षण करणे, समजावून घेणे यांत आहे. त्यामुळे रोजच्या रोज काही वेळ शेअरमार्केट समजावून घेण्यासाठी दिलांत तर अधिक चांगले. अधिक माहितीसाठी ब्लॉगवर दिलेले लेख वाचलेत तरी आपल्याला माहिती मिळू शकेल. शेअरमार्केटच्या अभ्यासांत सातत्य आणी नियमितपणा जरुरीचा आहे कारण सभोवतालची परिस्थिती कायदे,नियम, सरकारी धोरण हे सर्व काही बदलत असते आणी त्याचा परिणाम शेअरमार्केटवर होत असतो.

नाव: Anjali
तुमचा प्रश्न : Namaskar madam, Mi tumche lekh nehamich vachate aani tyamadhun milnari mahiti khup upayukt tar astech pan tya madhe ek aplepana janavto. ase vatate ki tumhi agadi samor basun marketchi mothali kodi aagadi sahag ulgadun sangata tya sathi shatashah dhanyavad………maza prashan asa aahe ki market cha baddal tv var ji mahiti detat tya madhe Derivatives ha word barchada vapartat plz tyacha arth aani tya sambandhi mahiti denyachi krupa karavi

DERIVATIVES म्हणजे वायदा बाजार, पुढील काळाचा अंदाज घेवून पोझिशन घेतली जाते. वायदा बाजारामध्ये लॉटमध्ये खरेदी विक्री करावी लागते. पैसे कमी गुंतवावे लागतात पण धोका जास्त असतो. मी वायदा बाजारामध्ये व्यवहार करीत नाही. त्यामुळे खुलासेवार माहिती देवू शकत नाही.

नाव: Amol Bidwe
तुमचा प्रश्न : What a banking npa?

N. P. A. म्हणजेच NON-PERFORMING ASSETS म्हणजेच न वसूल होऊ शकणारे कर्ज. हे NPA जास्त असल्यास त्या बँकेची गुणवत्ता कमी आहे असे समजले जाते.

नाव: Tushar Prakash Hire
तुमचा प्रश्न : Madm tumche sarv blog vachunch mi share market madhe thodi thodi guntvnuk karayla survat keli ahe ani tumche blog ya sathi khup changle prernadayi ahet thax madm

असाच प्रयत्न चालू ठेवा आणी यशस्वी व्हा.

नाव: भूमेश
तुमचा प्रश्न : मैडम मला मार्केट शेयर टिप्स ( short term १०-१२ दिवस ) शेयर करावय्याचा आहेत . कुठे शेयर करू.

कुठलेही टिप्स शेअर करू नका. कोणाला टीप देऊही नका आणी कुणाकडून टिप्स घेवूही नका.स्वतः अभ्यास करून निर्णय घ्या आणी त्या निर्णयाची जबाबदारी स्वीकारा.

नाव: Akshay
तुमचा प्रश्न : Madam tumhi dilelya mahiti baddal mi aapale manapasun aabhar manto….maza prashna asa aahe ki mazya gavat broker office nahit aani jar mi online trading keli tyasatipan instruction slip bharun dyavi lagte ka?

तुम्ही ONLINE ट्रेडिंग करीत असाल तर तुमच्याकडून अकौंट ओपन करतानाच PO (POWER ऑफ ATTORNEY)भरून घेतलेला असतो. त्यामुळे INSTRUCTION स्लीप भरून द्यावी लागत नाही.

नाव: Dattatray
तुमचा प्रश्न : Hello Madam, Mala Share market madhe paise guntvayche ahet. mala yabaddal kahich mahiti nahi tari mala tyache sagale knollege ghyayche ahe.. mala sagali mahiti kuthe bhetel..please margdasrhan karave..

आपण माझ्या ब्लॉगवरील सर्व लेख वाचा. दूरदर्शनच्या वाहिन्यांवरून दिली जाणारी माहिती ऐका. निरीक्षण करा.

नाव: Vishwanath Patil
तुमचा प्रश्न : Namaste madam Madam me Onelife capital ya company che 500 share 157Rs ne ghetle hote intradaysathi. Pan me stoploss lavlo naslymule to 20% khali ala. Ata tychi price 100Rs ahe. Me marketmadhe navin ahe maje sarv paise hya share madhe adkun padle ahet. Please mala sanga ki yachi price parat var jail ka nahi. Ani geli tari maximum kiti jail ani me kitila to share viku. Help me.

सध्या मार्केट पडत आहे. प्राईसवाईज व टाईम वाईज करेक्शन चालू आहे. त्यामुळे शेअरचा भाव पडला आहे. परंतु कधीही एवढे शेअर्स घेवू नका. पांच पंचवीस शेअर्स घेवून फायदा होतो कां ते पहा. ब्लूचीप कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करा. नवीन असताना कधीही आडवाटेने जाऊ नये एवढेच मला सुचवायचे आहे.

नाव: PRAVIN SALUNKE , AKOLA
तुमचा प्रश्न : MADAM, FUTURE AND OPTION CHI MARATHI BOOKS CHI LIST SANGAL KA? 

आपण BSE( BOMBAY STOCK EXCHANGE) आणी NSE(NATIONAL STOCK EXCHANGE) या साईटवर गेल्यास आपल्याला ही माहिती मिळू शकेल.

नाव: siddharth
तुमचा प्रश्न : madam namaskar, ani share bazar baddal itki chan mahiti puravalya baddal thank u…madam majha prash asa ahe ki mi shares madhe trading karu ichito ani tyasathi demat ani trading account open karnyasathi mi internet varun mahiti ghetali… mala yaat tumchi help pahije karan evadh sagalh vachlya nantar confusion create jhal ahe tari mala aapan sangave ki mi kuthe trading ani demat acoount open karav…..

तुम्ही ट्रेडिंग आणी ‘DEMAT’ अकौंट तुमच्या सोयीनुसार व घराजवळ असलेल्या ठिकाणी उघडा. आणी कोणावरही अवलंबून न राहता स्वतः प्रत्येक व्यवहाराकडे लक्ष द्या. कोणावरही काहीही सोपवू नका.

नाव: Meenakshi Gend
तुमचा प्रश्न : Namaskar madam, mala share marketchi kontihi mahiti nahi, mala tyabaddal sarva shikayache aahe tyasathi mi kasa referance ghetala pahije?

ब्लॉगवरचे लेख वाचा आठवड्याचे समालोचन वाचा. कोणत्याही कंपनीच्या बाबतीत काही बातमी आल्यास त्या बातमीचा परिणाम कसा आणी किती प्रमाणांत त्या कंपनीच्या शेअरवर होतो याचे निरीक्षण करा.

नाव: Nathuram Belkar
तुमचा प्रश्न : Mala IntraDay Trading badal Mahiti Pahije ?

नाझ्या ब्लॉग वरील लेख नंबर ३२, ३३, ३४, ३५, ३६ वाचा हे सर्व लेख डेट्रेडिंग बद्दल आहेत.ते वाचा

Advertisements
This entry was posted in Question and answers and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

8 thoughts on “तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – एप्रिल आणि मे २०१५

  1. surendraphatak

   ​तुम्ही स्टेट बँकेत ‘DEMAT ‘ आणी ट्रेडिंग अकौंट उघड्लांत हे उत्तम झाले. तुम्ही ३३,३४,३५ ,३६, ३८ ,४० ,४१, ४५ हे ब्लोग वाचावेत.आणी सध्या सुरु असलेल मागोवा गेल्या आठवड्याचा हे सदर वाचावे. तुम्ही मार्केटमध्ये नवीनच आहांत असे जाणवते शक्यतो ‘A’ ग्रूपमधले शेअर्स खरेदी करा. थोड्या प्रमाणांत खरेदी करा. धोका पत्करू नका.
   माझे टेलिफोन नंबर खालीलप्रमाणे : ०२२२५३३५८९७ मोबाईल : ९६९९६१५५०७ ​

 1. vitthal

  Namaste madam maze demat account open honyasathi thoda time aahe topryant me trading karu shakkto ka? Mazyakade laptop/computer nahi pan mi ha buisseness mobile Varian karu ichito aani 1 varshat hat ji income hoilntyatun computer ghenar as hi jidd aahe. Pan mobile madhun trading kase Karachi te sanga. aani share madhe kiti group astay te mala mahit nahi ‘A’ group madhil share konte tehi sanga.pl comment tumala milala ki lavkar margdarshan kara.

  1. surendraphatak

   ‘A’ ग्रुपच्या शेअर्स साठी तुम्ही ‘GOOGLE SEARCH ‘ मध्ये ‘A GROUP SHARES’ म्हणून सर्च केला तर ‘A ग्रुपच्या शेअर्सची यादी मिळू शकेल . बाकीच्या माहितीसाठी माझी वहिनी या विभागातील दिवाळी अंकाचा म्हणजे ११ वा पोस्ट वाचा. तुम्ही मोबाईलवरून शेअर्सचे भाव जाणून घेवून ब्रोकरकडे फोन करून खरेदी विक्री करू शकता. तुम्हाला जर मोबाईलचा वापर करून ओंन लाईन ट्रेडिंग करायचे असेल तर तुम्ही जिथे ‘DEMAT’ अकौंट उघडला असेल त्यांचे मोबाईलवरून ट्रेडिंग करण्यासाठी जी ‘APP’ ची सुविधा असेल ती डाउन लोड करावी लागेल. मोबाईल बँकिंगची सुविधा हवी आहे असे तुम्हाला ‘DEMAT’ आणी ट्रेडिंग अकौंट उघडताना कळवावे लागते. बाकीचे मार्गदर्शन तुम्हाला तुमचा ब्रोकर करेल.

 2. पिंगबॅक तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – June २०१५ | Stock Market आणि मी

 3. vitthal

  Namaste madam tumache stat chya margdarshan mule mi share market madhe invest karat aahe statchya margdarshana baddl mi tumcha kup kup aabhari aahe . mala SEBI madhe registered brokers chi list pahije. Aani mi eka company chi mahiti ghenyashati khup praytan kelo pan pahije tashi mahiti milat nahi . Tasech NIFTY,SENSEX, S&P kashashi nigdit aahet tyacha aarth Kay? Share chi price pahatana VOLUME ha ek shabbd yeto tyacha aarth Kay aahe.mala ha business band karayach aasel tar kay processor aahe.DP Account kay aahe.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s