आठवड्याचे समालोचन – २२ जून ते २७ जून २०१५ – राजा बोले, मार्केट हाले

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

हा आठवडा म्हणजे एक्सपायरीचा आठवडा. म्हणजेच ‘SETTLEMENT’ चा आठवडा. वायदा बाजारामध्ये ३ महिन्याचा वायदा असतो. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी त्या महिन्याच्या CONTRACTची एक्सपायरी असते. जून महिन्याचे CONTRACT या गुरुवारी संपले. सप्टेंबर महिन्यासाठी CONTRACT २६ जून पासून सुरु झाले. एक्स्पाय्ररीच्या आठवड्यांत काही शेअर अचानक वाढतात. आपले काही शेअर्स जर अडकले असतील तर ते फायद्यांत निघू शकतात.त्याचप्रमाणे मार्केट फोर्सेसला एक अंदाज असतो की निफ्टी किंवा सेन्सेक्सच्या एका लेव्हलला SETTLEMENT होईल. तशी होत नसेल तर ते ती लेव्हल आणण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळेला ज्या शेअर्सना सेन्सेक्स किंवा निफ्टीमध्ये ‘WEIGHTEGE’ असते असे शेअर्स ३-४ दिवसांसाठी अगदी थोड्या प्रमाणांत घेतले तर किंवा ज्या शेअर्समध्ये SHORT पोजिशन आहे असे शेअर घेतल्यास ४% ते ५% फायदा होऊ शकतो ‘WEIGHTEGE’ असलेले शेअर्स म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज, स्टेट बँक, मारुती मोटर्स, INFOSYS, हिंदुस्थान युनिलीवर,ITC, BHEL, ONGC, L&T इत्यादी. त्याचबरोबर कोणत्या शेअर्समध्ये किती रोलओवर झाला ते पाहून पुढील काळासाठी पोजिशन घेता येते. एक्सपायरीच्या आठवड्यांत मार्केट VOLATILE असते त्यामुळे कधी कधी शेअर्स अनपेक्षितपणे स्वस्तही मिळतात आणी चढ्या भावांत विकता येतात.

जे पी असोसिएटसचे सिमेंट युनिट हायडलबर्ग सिमेंट कंपनी Rs.५०० कोटींना विकत घेणार अशी बातमी होती. पण नंतर हायडलबर्ग सिमेंट कंपनीने या वृत्ताचा इन्कार केला. नवीन पेन्शन स्कीम कामगार युनियन्सनी स्वीकारली त्यामुळे टाटा स्टील U. K. मधील संप रद्द झाला. त्यामुळे या शेअरवरील दबाव कमी झाला आणी तो थोडासा वाढला. TCS ने मिड टर्म call देणार नाही असे सांगितले.तिमाही अपडेट देणार नाही असे सांगितले. ‘ग्रासिम इनडस्ट्रीज’ ने त्यांच्या नागदा प्लांटमध्ये प्रोडक्शन सुरु झाले असे जाहीर केले. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची ‘कॅपिटल ADEQUACY’ कमी आहे असे आढळून आल्यामुळे वित्तमंत्री अरुण जेटलींनी सांगितले की बँकांना या वर्षी US$ ३ बिलीयन आणी पुढील वर्षी US$ ६ बिलीयन भांडवल सरकार पूरवेल. ज्यांची कॅपिटल ADEQUACY १३ % पेक्षा कमी असेल त्या बँकांना सरकार हे भांडवल पूरवणार आहे. उदा: पी. एन. बी., आंध्र बँक, युनियन बँक.

पाऊस चांगला पडत असल्यामुळे पिके नष्ट झाल्यामुळे, बँकाचे N. P. A. उर्फ बुडीत कर्जे वाढतील ही भीती नाहीशी झाली. नाहीतर सरकारला ही शेतकऱ्यांची बुडीत कर्जे माफ करावी लागली असती. ‘हीरो मोटो कॉर्प’ या ऑटो क्षेत्रातील कंपनीने इलेक्ट्रोनिक क्षेत्रांत पदार्पण केले. ‘हिरो ELECTRONIX ‘ही नवीन कंपनी ‘MYBOX’ मध्ये Rs.५०० कोटी गुंतवणूक करून ५१% हिस्सा घेणार आहे. ‘MYBOX’ ही कंपनी सेट ऑफ बॉक्स SUPPLY करते.

मार्केटने ज्या गोष्टीमुळे आपला मूड घालवला होता त्या एकापाठोपाठ POSITIVE झाल्यामुळे मार्केट्चा मूड सुधारला.

(१) पाऊस कमी होवून अवर्षणामुळे पिकांचे नुकसान होवून दुष्काळ पडेल –  पावसाने चांगलीच हजेरी लावल्यामुळे ही भीती कमी झाली.
(२) फेड रेट वाढवेल –  फेडने जाहीर केले की रेट डिसेंबरच्या आधी वाढण्याची शक्यता कमी आहे.
(३) ‘INFLATION’ वाढेल –  परंतु इन्फ्लेशनच्या वाढीचा दर कमी झाला.
(४) रिझर्व बँक रेट कट करणार नाही – रिझर्व बँकेने .२५% रेपो रेट कमी केला.

या सर्व इव्हेन्ट्स घडण्याची तुम्ही वाट पहात योग्य ते शेअर घेतलेत तर तुम्हाला तो तो इव्हेंट घडल्यावर चांगला फायदा होऊ शकतो. यालाच EVENT-BASED BUYING असे म्हणतात.

‘LUPIN’ या कंपनीने AGMमध्ये Rs ७५०० कोटी इशू ऑफ सिक्युरिटीजद्वारे उभारण्यासाठी मंजुरी मागितली. JUBILIANTच्या GENERICK आर्मला ‘LEVOFLOXACIN’ या BACTERIAL INFECTIONच्या औषधासाठी USFDAची मंजुरी मिळाली. IT कंपन्यांना सरकारकडून US$ १ बिलीयन एवढे पैसे थकबाकी आहे. आता या कंपन्या सरकारला उशीरा मिळणाऱ्या पेमेंटवर जेव्हढा उशीर होईल त्या काळासाठी व्याज मिळावे अशी नवीन तरतूद GST करारांत करावी अशी मागणी करणार आहेत. काही कंपन्या सरकारकडील जुनी येणी बुडीत खाती जमा करण्याच्यादृष्टीने विचार करीत आहेत. या कंपन्यांत TCS, INFOSYS, TECHMAHINDRA, WIPRO यांचा समावेश आहे.

दीपक फरटीलायझर्सने ANP फरटीलायझर्सचे उत्पादन तळोजा FACTORYत सुरु केले. लार्सेन & टुब्रो आपल्या १००% सब्सिसिअरी ‘L& T INFOTECH’ मधील १०% भाग IPOद्वारा डिसेंबर २०१५पर्यंत विकण्याची शक्यता आहे. ही कंपनी डिसेंबर २०१५च्या आसपास लिस्ट होईल. या कंपनीने Rs९०० कोटीं नफा F.Y २०१६ होईल असे सांगितले. PROFIT- मार्जिन १७% ते १८% असेल. या कंपनीचे सध्या २०० ग्राहक आहेत. L& T ला ९ रोड बनविण्यासाठीचे काम मिळाले आहे. संरक्षणासाठीच्या कामांचा कंपनीच्या नफ्यांत समावेश होण्यास २०१८ पासून सुरुवात होईल. युनिटेक या रिअल्टी क्षेत्रांत काम करणाऱ्या कंपनीच्या गुरगावमधील ‘RESIDENCY’ या प्रोजेक्टमधील अपार्टमेंटचा ताबा देण्यांत उशीर झाल्यामुळे दर महिन्याच्या १० तारखेला १२% P. A. व्याज दंडाच्या स्वरूपांत अपार्टमेंटचा ताबा देईपर्यंत देण्यास सांगितले. हा निर्णय देशातील सर्वोच्च ग्राहक संस्थेने दिला.

सोन्याची आयात मे २०१५मध्ये वाढली. 250 MW युनिट आसामच्या NTPC च्या प्लांटसाठी सुरु केले,. COREALL TECH शेअरहोल्डर्सनी MAJESCO बरोबर आपल्या कंपनीचे मर्जर करण्यास मजुरी दिली. MAJESCOचे शेअर्स NYSEवर २९ जूनला लिस्ट होतील. VERTEX प्रोजेक्ट्स ही कंपनी GVK POWER या कंपनीतील २.२२ हिस्सा जून २९ला खरेदी करेल.
SEBI (SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA) ने IPO (INITIAL PUBLIC OFFER) च्या बाबतीत काही सुधारणा केल्या. या सुधारणा १ जानेवारी २०१६ पासून अमलांत येतील. ‘IPO’ ची मुदत ज्या दिवशी संपेल त्या दिवसापासून ६ दिवसांच्या आंत त्या ‘IPO’तील शेअर्सचे STOCK EXCHANGE वर लिस्टिंग झाले पाहिजे.तसेच ‘SEBI’ E-IPO ही नवीन संकल्पना इंटरनेटवरुन ON-LINE अमलांत आणणार आहे. यामुळे ‘IPO’चे छापील फॉर्म आणणे ते भरून पुन्हा फॉर्ममध्ये नमूद केलेल्या ठिकाणी नेवून देण्याची मेहेनत वाचणार आहे.

१ जानेवारी २०१६ पासून E-IPO च्या बाबतीत तुम्ही फक्त ASBA (APPLICATION SUPPORTED BY BLOCKED AMOUNT) या पद्धतीनेच अर्ज करू शकाल. या पद्धतीत आपल्या अर्जातील शेअर्स साठी आवश्यक रक्कम आपण दिलेल्या आपल्या बचत, चालू खात्यामध्ये BLOCKED केली जाते आणी शेअरची ‘ALLOTMENT’ झाल्यावर जेव्हढे शेअर्स आपल्याला ‘ALLOT’ झाले असतील तेवढ्याच शेअर्सला आवश्यक असणारी रक्कम आपल्या खात्यातून वजा केली जाते.यामुळे अर्ज करण्याचा दिवस व शेअर्स ‘ALLOTMENT’ होण्याचा दिवस या मुदतीसाठी आपल्याला बचत खात्यांत व्याज मिळते. तसेच सर्व ‘OFFER FOR SALE’ साठी नोटीस देण्याची मुदत दोन बँकिंग दिवस केली..’ STARTS UP’ कंपन्यांसाठी SEBIने एक INSTITUTIONAL TRADING PLATFORM’ सुरु केला आहे. या PLATFORM वर छोट्या आणी मध्यम कंपन्या ‘IPO’ न आणता भांडवल उभारू शकतील. परंतु या PLATFORM वर कमीतकमी अर्ज करण्याची रकम आणी ट्रेडिंग लॉटची रकम Rs.१० लाख ठेवली आहे. सेबीच्या म्हणण्याप्रमाणे या PLATFORM पासून किरकोळ गुंतवणूकदारांना दूर ठेवायचे आहे कारण पत्करावा लागणारा धोका मोठा असणार आहे.

M&M ने ‘जितो’ या नावाने नवीन छोटा ट्रक मार्केटमध्ये आणला. L&T ला ONGC कडून Rs.२७१५ कोटींची ऑर्डर मिळाली. JBM AUTO ही कंपनी Rs २०० कोटी गुंतवणूक करून सानंद येथे कारखाना उभारणार आहे. या कारखान्यात FORDMOTORS साठी काम केले जाईल. HUL( HINDUSTHAN UNILEVER LTD. ) ही कंपनी केरळमधील ‘इंदुलेखा’ ही कंपनी Rs ५०० कोटींना विकत घेणार आहे. सन टी व्ही या कंपनीच्या ३३ वाहिन्यांच्या नूतनीकरणाचा प्रश्न तीन मंत्रालयांच्या भोवऱ्यात सापडला आहे. असे समजते की पंतप्रधानांच्या कार्यालयाने या वादांत गृहमंत्रालयाच्या बाजूने आपले मत दिले आहे. पाहू या अंतिम निर्णय काय होतो ते. गृहमंत्रालयाने या ३३ वाहिनीन्च्या नूतनीकरणासाठी सुरक्षिततेच्या कारणांवरून परवानगी नाकारली होती.पण नभोवाणी आणी माहिती मंत्रालय हे नुतनीकरण करण्याच्या बाजूने आहे.

ग्रीसचा bailout प्रस्ताव धनको संस्थांनी फेटाळला. यात IMF ECB आणी अन्य संस्थांचा समावेश आहे. ग्रीसच्या bailout प्रस्तावावर विचार करण्यासाठी रविवारी पुन्हा वाटाघाटी होणार आहेत. बाल्टिक ड्राय इंडेक्स वाढला आहे. हे इंडेक्स शिपिंग फ्रेट रेट मधील हालचाल दर्शवते. फ्रेट रेट म्हणजे जहाजातून माल पाठविण्याचा खर्च. हे इंडेक्स वाढले की शिपिंग उद्योगाला बरे दिवस आले असे समजले जाते.

आज पंतप्रधानांच्या हस्ते ‘ATAL MISSION FOR REJUVENATION AND URBAN TRANSFORMATION SCHEME’ चे उद्घाटन झाले. ही योजना AMRUT(अमृत) या नावाने ओळखली जाईल. या योजनेअंतर्गत २ कोटी घरे शहरी गरिबांसाठी बांधण्यांत येतील. आणी ‘BASIC SANITATION आणी BASIC INFRASTRUCTURE’ची शहरी गरिबांसाठी व्यवस्था केली जाईल. पंतप्रधानांनी जाहीर केले की आपल्या शहराला ‘स्मार्ट शहर’ बनवण्याची जबाबदारी पालिका आणी महापालिका यांच्यावर असेल. पंतप्रधानांच्या या घोषणेनंतर घरांसाठी कर्ज देणाऱ्या कंपन्या उदा. REPCO HOMES, LIC हौसिंग फायनान्स, गृह फायनान्स, आणी बँकां तसेच कॅपिटल गुड्स कंपन्या,सिमेंट आणी इतर बांधकाम साहित्य पुरवणाऱ्या कंपन्या WATER TREATMENT करणाऱ्या कंपन्याच्या शेअर्सच्या किमती वाढल्या.

‘PERSISTANT STSTEMS’ या कंपनीने पहिली तिमाही आणी दुसरी तिमाही यांच्या नफ्यावर अनुक्रमे विसा चार्जेस आणी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पगारवाढीचा परिणाम होवून नफ्यांत घट होईल असे जाहीर केले. यालाच टेक्निकल भाषेत ‘GUIDANCE’ असे म्हणतात. यामुळे कंपनीचा शेअर खूप पडला. ‘INFOSYS’ या कंपनीचे निफ्टी, सेन्सेक्स, आणी एमएससीआय या महत्वाच्या निर्देशांकातील ‘WEIGHTEGE’ वाढून तो सर्वांत महत्वाचा शेअर होण्याची शक्यता आहे. जर कंपनी व्यावसायिकरीत्या MANAGE केली जात असेल आणी त्यांत कोणीही एका व्यक्तीला किंवा ग्रुपला प्रमोटर म्हणून मानता येत नसेल तर अशा प्रमोटर्सचे PUBLIC म्हणून वर्गीकरण केले जाते. आताच्या INFOSYSच्या प्रमोटर्सना PUBLIC प्रमोटर्स मानले जाऊ शकते असे SEBIने सांगितले.

आज स्टेट बँकेने जाहीर केले की की बंक लवकरच १० लाख कार्ड SWAPING मशीन POINT OF SALES मध्ये देईल. या मशीनवर कार्ड SWAP करून तुम्ही एक हजारपर्यंत पैसे काढू शकाल आणी तुमच्या कार्डाच्या मर्यादेत सामान खरेदी करू शकाल. यासाठी बँक तुम्हाला Rs १० प्रती transaction पर्यंत चार्ज आकारेल. या आठवड्यांत फेडरल बँकेच्या बोनस इशुची एक्सडेट आणी रेकॉर्ड डेट ठरवण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची २९ जून ला मीटिंग आहे.

या आठवड्यांत २४ जूनला मनपसंद बिवरेजीस या कंपनीचा ‘ipo’ ओपन झाला. प्राईस बंद Rs२९० ते Rs ३२० होता. मिनिमम लॉट ४५ शेअर्स्चा होता. इशू २६ जुनला बंद झाला. या इशुला गुंतवणूकदारांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
रिझर्व बँकेच्या ‘FINANCIAL STABILITY REPORT’ मध्ये बँकांच्या ASSET QUALITY’ बद्दल बरीच काळजी व्यक्त करण्यांत आली आहे. INFRASTRUCTURE आणी आयर्न आणी स्टील उद्योगाला दिलेल्या कर्जाविषयीही चिंता व्यक्त केली आहे. सरकार MEDIA सेक्टरमध्ये FDI ( FOREIGN DIRECT INVESTMENT) लिमिट वाढवण्याच्या विचारांत आहे. याचा फायदा EROS INTL, जागरण प्रकाशन, सन टी. व्ही., HT मेडिया , ENIL या कंपन्यांना होईल.

ग्रीस त्यांच्या कर्जाची परतफेड महिन्याअखेर करते की नाही हा मोठा प्रश्न मार्केटसमोर आहे. यावर बऱ्याचअंशी पुढील आठवड्यातील मार्केट्ची परिस्थीती अवलंबून राहील. जुलै ३१ २०१५ रोजी गुरुपोर्णिमा आहे या दिवशी ब्लोग सुरु करून ३ वर्षे पूर्ण होतील. आपण आपल्या ब्लोग बद्दल काही अभिप्राय, प्रतिक्रिया .तसेच आपले शेअरमार्केट बद्दलचे अनुभव कळवावेत.

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे समालोचन – २२ जून ते २७ जून २०१५ – राजा बोले, मार्केट हाले

  1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन -२९ जून ते ३ जुलै २०१५ – लांडगा आला रे लांडगा आला | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s