आठवड्याचे समालोचन – २७ जुलै ते ३१ जुलै २०१५ – रुको हम भी कुछ कम नही

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

या आठवड्यांत मार्केटवर बऱ्याच घटनांचा परिणाम झाला. रिझल्ट्स तर एका मागोमाग एक येत आहेतच त्यांत बुधवारी FOMC MEETING चा निर्णय येणार,FED सप्टेंबरपासून दर वाढवणार हे तर ठरलेलेच परंतु त्यांच्या US अर्थव्यवस्थेविषयीच्या निरीक्षणांकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. त्यातच माननीय राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या निधनामुळे ३ दिवस अधिवेशन बंद ठेवण्यांत आले. त्यातून SIT on BLACK MONEY च्या P नोट्स वरील टिपणीमुळे P नोट्सविषयी संभ्रम निर्माण झाला. याबाबतीत सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. त्यातच या आठवड्यांत ‘EXPIRY’ होती.

बँकांनी दिलेले रिझल्ट्स मात्र फसवे वाटले. लोन RESTRUCTURING आणी ५-२५ या योजनेमध्ये कर्जे बदली करून N.P.A. (NON PERFORMING ASSETS) कमी झाल्यासारखे वाटते पण वस्तुस्थितीमध्ये फारसा फरक पडला नाही. ICICI बँकेचा शेअरसुद्धा JP ग्रुपला ‘DEFAULT’ रेटिंग दिल्यामुळे अडचणीत आहे. त्यामुळे शेअर सतत पडतो आहे. कित्येक वर्षांनी HDFC चा निकालही गुंतवणूकदारांच्या पचनी पडला नाही.

मार्केट फार हुशार असतं. मला पूर्वी वाटायचे की टी व्ही वर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या किंवा चर्चा कोण ऐकत असेल बरं ! एवढा कुणाला वेळ ! पण जेव्हा शेअरच्या भावांत फटाफट फरक दिसू लागतो तेव्हा जाणवत की लोक हे सर्व ऐकतात अगदी लक्षपूर्वक ऐकतात.

काही काही वेळां कंपनीचे रिझल्ट्स अतिशय सुंदर येउनही कंपनीच्या शेअर्सचा भाव खाली येतो. अशा वेळेला समजावे की शेअरचा भाव येणाऱ्या चांगल्या रिझल्ट्सच्या अपेक्षेने खूपच चढला होता. काही काही वेळेला एखाद्या शेअरची किंमत stock अलर्ट म्हणून दाखवली जाते. अशावेळी त्या शेअरच्या बाबतीत काही बातमी आहे कां ते पहावे. आणी बातमी नसल्यास सुरक्षित अंतर ठेवावे.

लुपिन या कंपनीने ‘TEMMLER’ या जर्मन कंपनीचे ACQUISITION केले. EXPIRY वीकमध्ये काय केले पाहिजे हे सांगण्याची गरज नाही.कारण पूर्वीच्या ब्लॉगमधून याची चर्चा केली आहे. २७ जुलै २०१५ पासून BIOCON’ कंपनीशी संबंधीत SYNGENE हा IPO(INITIAL PUBLIC OFFER) येत आहे.

सोमवार २७ जुलै २०१५ रीजी PFC (POWER FINANCE CORPORATION) ची ऑफर फोर सेल आली. याची फ्लोअर किंमत Rs २५४ आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना ५% सूट दिली जाईल. शुक्रवारची किंमत Rs. २५९ आहे. म्हणजेच फ्लोअर किंमत या किमतीच्या २%कमी आहे. सरकारने डेक्कन गोल्ड या कंपनीचे लायसेन्स ‘GANAAJUR’ खाणीसाठी मंजूर केले.
US$ आणी रुपयाचा विनिमय दर US$१=INR ६४ झाला.

P नोट्स चा फटका  – P नोट्स (PARTICIPATORY NOTES) हे एक परदेशी DERIVATIVE INSTRUMENT आहे. ह्या p-नोट्स परदेशी गुंतवणूकदार ज्यांना भारतीय सिक्युरिटीजमध्ये इंटरेस्ट आहे आणी SEBI (SECURITIES EXCHANGE BOARD OF INDIA) कडे रजिस्ट्रेशन करायचे नाही, ते वापरतात. SEBI कडे रजिस्टर केलेले परदेशी ब्रोकर्स किंवा स्वदेशी ब्रोकरची परदेशातील ऑफिसे या P नोट परदेशी गुंतवणूकदारांना देतात. ब्रोकर्स भारतीय सिक्युरिटीज (शेअर्स डिबेंचर्स DERIVATIVES) खरेदी करतात आणी आपल्या ग्राहकांना P नोट इशू करतात. काही काही केसेसमध्ये या P नोट्सचा खरा मालक ओळखणे कठीण असते. सुप्रीम कोर्टाने काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी उपाय सुचविण्यासाठी नेमलेल्या SIT (स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम) ने SEBIने याबाबतीत आणखी काम करणे जरुरीचे असल्याचे मत व्यक्त केले. यामुळे मार्केट पडेल असा अंदाज होता. SEBIच्या कडून हे स्पष्ट केले गेले की SIT ने Pनोट्सवर बंदी घाला असे कुठेही सुचविलेले नाही. SEBI कडे P नोट्सच्या खऱ्या मालकांची गेली ३ ते ४ वर्षे माहिती येत असते. त्यामुळे मार्केटला दिलासा मिळाला.

राजेश एक्सपोर्ट या कंपनीने वाल्काम्बी ही गोल्ड रीफायनरी ४०० लाख US$ ला विकत घेतली. मेडिया सेक्टरसाठी (दूरदर्शन वाहिन्या, F M रेडीओ, प्रिंट मेडिया ) FDI लिमिट २६% वरून ४९% पर्यंत वाढवणार आहेत. याचा खालील कंपन्याना फायदा होईल : झी एन्टरटेनमेंट, सन टी व्ही,, डिश टी व्ही, ENIL, HT मेडिया, PVR इत्यादी. आज जे रिझल्ट्स लागले त्यांत जिंदाल SAW, MRF, श्री कलाहस्ती पाईप्स यांचे रिझल्ट्स चांगले आले.

पूर्वी मार्केट किती पडले होते समजा निफ्टी ७९०० पासून ८६०० पर्यंत वाढले. जर येथून मार्केट ५०% पर्यंत पडले तर बऱ्याच वेळा मार्केट तेथून उसळी घेते. किंवा तांत्रिक भाषेत सांगायचे तर २०० DMA ( DAILY MOVING AVERAGE) ज्या ठिकाणी येते तेथून मार्केट वाढते कां हे लोक पहात असतात. या वेळेला मार्केट पडण्यामध्ये बँक निफ्टीचा पुढाकार होता..

PFC च्या ५% OFS मधून सरकारला Rs १६०० कोटी उभारण्याची अशा आहे. OFS (OFFER FOR SALE) मधून जो पैसा मिळतो तो सरकारी तिजोरीत जातो.तो कंपनीची प्रगती होण्यासाठी वापरला जाईलच असे नाही.त्यामुळे बर्याच वेळेला OFS झाल्यानंतर शेअरचा भाव पडतो.

‘REAL ESTATE’ च्या बाबतीत बोलायचे झाल्यास घरे विकली जात नाही आहेत. एका बाजूने घर घ्यायला गेल्यास किंमत परवडत नाही व दुसऱ्या बाजूने गुंतवणूकीच्या उद्देश्याने घर घेतल्यास त्या प्रमाणांत ‘RETURN ON INVESTMENT’ मिळत नाही. महागाईच्या प्रमाणांत उत्पन्न वाढत नाही. आणी बेकारी दिवसेंदिवस वाढतच आहे. म्हणून REALITY सेक्तार्च्या शेअर्समध्ये मंदी आहे. उदा :DLF, HDIL.

मंत्रिमंडळाच्या सभेमध्ये खालील बिले मंजूर झाली. GST संशोधन बिल ( यांत केंद्र सरकार राज्य सरकारला GST मुळे येणाऱ्या तुटीची १००% भरपाई ५ वर्षे करेल) , ग्राहक संरक्षण बिल, ‘NATIONAL INVESTMENT AND INFRASTRUCTURE FUND’ उभारला जाईल. हा फंड Rs २०००० कोटींचा असेल. सुरुवातीची गुंतवणूक Rs. ५००० ते Rs १०००० कोटींची असेल. या फंडामुळे इन्फ्रास्ट्कचर सेक्टरसाठी येणाऱ्या अडचणी दूर होतील अशी आशा व्यक्त करण्यांत आली. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये कार्यरत असलेल्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वाढले.

येस बँक, अलाहाबाद बँक, UPL, IIFL होल्डिंग्स, वेदांत, या कंपन्यांचे रिझल्ट्स चांगले आले तर जिंदाल स्टील, नेसले (MAGGI प्रकरणामुळे) यांचे रिझल्ट्स निराशाजनक आले. चीनचे शेअरमार्केट पडल्यामुळेही आपल्या मार्केटच्या पडझडीला हातभार लागला. PERSISTANT SYSTEMS या कंपनीने एपोना टेलीकॉम ही कंपनी ACQUIRE केली.

‘TATA’ ३ नवीन उद्योग 4G सेक्टरमध्ये सुरु करणार आहेत;
(१) ओंन- लाईन अग्रीग्रेशन प्लाटर्फॉर्म (२) डिजिटल ऑनलाईन हेल्थकेअर (३) बिग डेटा ANALYTIC बिझीनेस

SEBI प्रमुखांनी सांगितले की शेअरहोल्डर प्रोटेक्शनमध्ये भारताचा ७ वा नंबर आहे., त्यामुळे आतातर गुंतवणूकदारांना घाबरण्याचे कारण नाही असे दिसते. कोलगेट लिमिटेड चे रिझल्ट्स ठीक आले, कंपनीने १ :१ या प्रमाणांत बोनस जाहीर केला. ITC या FMCG क्षेत्रातील कंपनीचे रिझल्ट्स चांगले आले. त्यामुळे या दोन्ही शेअर्सची किंमत वाढली.

OBC (ओरिएनटल बँक ऑफ कॉमर्स ) EXIDE, HCC(हिंदुस्थान कंस्त्रक्शन कंपनी) कोटक महिंद्र बँक या कंपन्यांचे रिझल्ट्स निराशाजनक आले. कोटक महिंद्र बँकेचे NPA वाढले आणी ING वैश्या बँकेच्या ACQUISITION खर्चामुळे नफा कमी झाला. ग्रीव्झ कॉटन, J. M. फायनांशीयल, ग्लेनमार्क फार्मा, ICICI बँक, यांचे रिझल्ट्स समाधानकारक आले.

छत्रसाल कोल ब्लॉक रद्द करण्याविरुद्ध रिलायंस पॉवरने अर्ज दाखल केला. सरकारने ५-६ PSU मध्ये हिस्सा विकण्यासाठी इन्व्हेस्टमेंट बँकर्सची मीटिंग बोलावली. सरकार OIL, EIL, NTPC, BEL या PSU मधील हिस्सा विकण्याच्या विचारांत आहे.

रिलायंस इन्फ्रास्ट्रक्चर मधील ५०% हिस्सा विकण्यासाठी ८ कंपन्यांशी बोलणी चालू आहेत. अदानी ट्रान्समिशनचे लिस्टिंग शानदार झाले.. सरकारने जाहीर केले की GST संशोधित बिल तसेच बँक कॅपिटलायझेशन( Rs१२०१०कोटी), इत्यादी महत्वाची बिल्स आम्ही संसदेमध्ये पास करून घेण्याचा प्रयत्न करत आहोत.. यातील बँक कॅपिटलायझेशन हे बिल संसदेने पास केले. मात्र यातील २०% कॅपिटलायझेशन हे बँकांच्या PERFORMANCEच्या आधारावर दिले जाईल. त्यामुळे शुक्रवारच्या मार्केटच्या घोडदौडीमध्ये बँकांनी चोख भूमिका बजावली असे जाणवले.

या आठवड्यातील उलटसुलट घटनांनी मार्केटमध्ये गोंधळ घातला. उन पावसासारखा खेळ केला. परंतु ३१ जुलै रोजी ‘रुको हम भी कुछ कम नही’ असे म्हणत जोरदार उसळी घेतली. सेन्सेक्स २८००० च्या वर आणी निफ्टी 8550 च्या जवळपास पोहोचला. टीकाकारांची तोंडे आपोआप बंद झाली.. असे हे चतुर लबाड आणी खट्याळ मार्केट आहे बर…

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

2 thoughts on “आठवड्याचे समालोचन – २७ जुलै ते ३१ जुलै २०१५ – रुको हम भी कुछ कम नही

  1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – 3 ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०१५ – हाजीर तो वजीर | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s