आठवड्याचे समालोचन – 3 ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०१५ – हाजीर तो वजीर

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

चौथ्या वर्षीचा पहिला पोस्ट लिहिताना मला खूप मजा येतीये. देवाची लीला अगाध आहे असंच म्हणावं लागेल. मंगळवारी वर्तमानपत्रांत छापून आलेली बातमी वाचून मला आश्चर्य वाटले. देशांतील सर्वांत श्रीमंत देवस्थान तिरुपती बालाजीला शेअर्स दान करता येणार आहेत. यासाठी देवस्थानने ४ ऑगस्ट २०१५ रोजी ‘DEMAT’ अकौंट उघडला आहे. शेअर्सच्या रूपांत दान स्वीकारणारे हे पहिलेच देवस्थान आहे. याला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल अशी बातमी आहे.या मुळे शेअरमार्केट म्हणजे सटटा जुगार ही प्रतिमा  पुसली जाण्यास मदत होईल हे मात्र नक्की. म्हणून आता तुम्ही सर्व भीती सोडून तिरुपती बालाजीची प्रार्थना करून शेअरमार्केटमध्ये व्यवहार करून देवाला शेअर्सचे दान देऊच असा निश्चय करा.

‘SPARC’ या ट्रेडमार्कबाबत जो विवाद होता तो समाधानकारकरीत्या सुटला. क्रूडच्या किमतीत घट झाल्यामुळे ‘ATF’ च्या किमतीही कमी झाल्या. ऑटोविक्रीचे आकडे आले. यावेळी अशोक LEYLAND चे विक्रीचे आकडे चांगले आले,. पंतप्रधानांची शुगर कंपन्यांशी बोलणी झाली. इथेनाल ब्लेंडिंग आणी एक्स्पोर्टला परवानगी देण्याची शक्यता आहे. सरकारने १ ऑक्टोबर २०१५ पासून शिलकी साखरेची निर्यात सक्तीची करण्यांत येईल.तसेच  प्रत्येक कंपनीला निर्यातीसाठी कोटा निश्चित करण्याचीही शक्यता आहे.असे जाहीर केले.  मारुती लिमिटेडचे विक्रीचे आकडे चांगले आले पण यांत डोमेस्टिक विक्रीचे प्रमाण जास्त आहे. टेक कंपन्यांचे आकडे आले.मार्केट नेहेमी रिलेटीव(RELATIVE) परफॉरमन्स पहाते. अब्सोलूट(ABSOLUTE) परफॉरमन्स पहात नाही. फक्त ठराविक कंपनीचा निकाल पाहून खरेदी केली जात नाही तर त्या क्षेत्रातील सर्व कंपन्यांचा तुलनात्मक अभ्यास करून खरेदी केली जाते. शेअरची किमत आणी कंपनीची साईझ कंपनीच्या नफ्यातील सातत्य विचारात घेतले जाते.  TCS ( TATA CONSULTANCY SERVICES) नेहेमी इंडस्ट्रीच्या सरासरीपेक्षा चांगला रिझल्ट देते आहे. परंतु TCSचा शेअर महाग झाला आहे.’इन्फोसिसच्या बाबतीत म्हणाल तर गेल्या तीन वर्षांत कंपनीची प्रगती चांगली नसल्याने लोकांनी  INFOSYSचे शेअर्स विकून टाकले होते. व्यवस्थापनाच्या कॉमेंट्रीने लोक उत्साहित झाले आता हळू हळू या कंपनींत पैसे गुंतवायला हरकत नाही असे लोकांना वाटले. KKR ही कंपनी ‘JBF’ इंडस्ट्रीमध्ये Rs ९३० कोटींची गुंतवणूक करणार आहे.

भारत फोर्जचा रिझल्ट ठीकठाकच म्हणावा लागेल. PAT, आणी मार्जिन अपेक्षेप्रमाणे होते. दुसऱ्या तिमाहीमध्ये मागणीमध्ये सुधारणा दिसत आहे.असे सांगत भारत फोर्जने अर्निंग अपग्रेड जाहीर केले. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कपाशीच्या किमती कमी झाल्यामुळे KPR मिल्स, लंबोदरं टेक्स्टाईल, रुबी मिल्स, अरविंद या कंपन्याना फायदा झाला.

‘FOXCONN TECHNOLOGY GROUP’( APPLE IPHONES बनविणारे)  येत्या ५ वर्षांत मोबाईल, टी व्ही, इलेक्ट्रोनिक पार्ट्स इत्यादीचे उत्पादन करण्यासाठी युनिट स्थापन करण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमांतर्गत Rs १२८०० कोटीची गुंतवणूक करणार आहे. या कंपनीबरोबर अडाणी एन्टरप्रायझेस JOINT वेंचर करणार आहे. महाग असणाऱ्या शेअर्समध्ये चांगले volume होते. उदा. MRF Rs ४५६००, BOSCH Rs २६०००, टाईड वाटर ऑईल Rs १८६००, EICHER MOTORS Rs २०१८० , ORACLE, GLAXO इत्यादी..

रिझर्व बँकेने छोट्या बॅंका आणी पेमेंट बँक्स यांचे लायसेन्स कोणाला देणार हे या महिन्याअखेर कळेल असे जाहीर केले.रिझर्व बँकेने आपल्या पॉलिसीमध्ये CRR (कॅश रिझर्व रेशियो) ४%, REPO रेट ७.२५ % आणी रिवर्स रेपो रेट ६.२५% मध्ये कोणताही बदल केला नाही. तसेच सर्व सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील बँकांनी  कर्जावर आकारत असलेल्या दरांमध्ये कपात करावी असे सुचविले.

मंगळवारी रिझर्व बँकेने रेट कट न केल्याने मार्केट कोसळले, पुन्हा सुधारले आणी पुन्हा पडले. क्रूड पडते आहे. ही फायद्याची गोष्ट आहे. ग्रीसचे संकट अवर्षणाचे संकट, चीनमधील घडामोडी या सर्व हळू हळू मार्केटच्या,पटलावरून अदृश्य होत गेल्या. अन्नपदार्थांच्या वाढत असलेल्या किमती, मान्सूनचे विस्कळीत पडणे ह्या गोष्टी तात्पुरत्या असल्या तरी FED सप्टेंबर मध्ये रेट वाढविण्याची शक्यता आहे. त्यावेळी परदेशातील गुंतवणूक भारताबाहेर जाण्याची शक्यता आहे. ह्या सर्व गोष्टींचा विचार करता सध्यातरी रेट कट करणे लांबणीवर टाकावे लागले असे रिझर्व बँकेच्या GOVERNORने सांगितले.

FSSAI ने MAGGIला क्लीन चीट दिली. CENTRAL FOOD TECH RESEARCH INSTITUTE या FSSAI ची मान्यता असलेल्या संस्थेने MAGGI ला क्लीन चीट दिली. याचा परिणाम नेस्लेच्या शेअरवर होऊन शेअर Rs ६०० वाढला.1 जून ते ५ ज्ञून  ‘भीतीच्या भिंती ( आठवड्याचे समालोचन ) या भागातून मी नेस्त्ले च्या संदर्भांत लिहिले होते. एक चांगला शेअर कमी भावांत मिळतो आहे असे आपणास सांगितले होते. त्यावेळी शेअरचा भाव Rs ५५०० ते Rs ५८०० होता. ५ ऑगस्ट रोजी हाच शेअर Rs ६८०० ते Rs ६९०० होता म्हणजेच दोन महिन्यांत २०% शेअरची किंमत वाढली.शेअरमार्केटमध्ये हाजिर तो वजीर हेच खरे ठरते. नेस्त्ले या कंपनीच्या बाबतीत उलटसुलट बातम्या गेले दोन महिने सातत्त्याने येत आहेत. अजूनही हे पुराण संपलेले नाही. त्यामुळे वाईट बातमी आली की खरेदी आणी चांगली बातमी आली की विक्री असे करता येऊ शकते. पण विचार करून निर्णय घेणे हे काम तुमचे आहे मी फक्त वाटाड्या आहे.   CLARIS LIFESCIENCES या कंपनीच्या ऑफिसमध्ये आयकर अधिकाऱ्यांनी शोध घेतला. INDUS IND बँकेला IFSC युनिटसाठी परवानगी मिळाली. ‘DECCAN CHRONICLE’ ची मालमत्ता  कर्जवसुलीसाठी आंध्र बँक विकणार आहे. BSNL आणी MTNL यांना CDMA स्पेक्ट्रम परत करण्यास सरकारने तत्वतः परवानगी दिली. तसेच दोन्ही कंपन्यांना मिळून Rs ६२०० कोटी स्पेक्ट्रम साठी भरपाई देण्यास मान्यता दिली.

BSNLच्या ६५००० टावरसाठी वेगळी सबसिडीअरी बनवण्याचा सरकारचा विचार चालू आहे ह्या कंपनीचे मूल्य Rs २०००० कोटी असेल.DLF च्या शेअरची किमत आज वाढली. त्यांनी आपली तीन युनिट्स इन्व्हेस्टरकडे गहाण ठेवून कर्ज घेतले. तेव्हा ज्या ज्या वेळी शेअरची किंमत अचानक वाढते तेव्हा आपण त्या वाढीच्या कारणाचा जरूर मागोवा घेण्याचा प्रयत्न करा. DLFच्या बाबतीत म्हणाल तर शेअरच्या किंमतीतील वाढ टिकाऊ नाही.

सरकारने EPFO ला १% रक्कम सिक्युरिटीजमध्ये गुंतवण्यास परवानगी दिली. ह्या वर्षी हा पैसा Rs ५००० कोटींपर्यंत येईल.त्यामुळे हा पैसा हळू हळू मार्केटमध्ये यायला सुरुवात होईल. सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील १० कंपन्यातील डायव्हेस्टमेंटसाठी मर्चंट बँकर्सची नियुक्ती केली. L@T ने SALZER मधील स्टेक Rs ५४ कोटींना विकला. मनरेगाचे पैसे आता थेट लाभार्थीच्या बँक खात्यांत जमा होतील.

ब्रिगेड एन्टरप्राईझेस, सिमेन्स, मेरिको यांचे रिझल्ट्स चांगले आले. DR. रेड्डीज ही AMGEN या कंपनीबरोबर ३ औषधांसाठी STRATEGIC  COLLABORATION करणार आहे. ‘COGNIZANT’ या जगातील IT ( इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) क्षेत्रातील दिग्गज कंपनी चे रिझल्ट्स चांगले आल्याने आणी त्यानी भविष्यातील ‘GUIDANCE’ चांगला दिल्यामुळे भारतातील IT क्षेत्रातील  कंपन्यांचेबाबतीत गुंतवणूकदार आश्वस्त झाल्यामुळे या कंपन्यांचे शेअर्स वधारले. AVIVA INTERNATIONAL त्यांच्या डाबर इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन बरोबर असलेल्या AVIVAA INDIA या JOINT वेंचर मध्ये आपला स्टेक ४९% पर्यंत वाढवणार आहे.

‘भारती एअरटेल’ ह्या कंपनीने आज दिल्ली एन सी आर मध्ये 4 G लौंच केले. ही कंपनी SAMSANG आणी FLIPKART या कंपन्यांच्या सहकार्याने काही आठवड्यातच २९६ शहरांमध्ये 4 G लौंच करेल.. 3 G च्या दरातच 4 G सध्यातरी उपलब्ध होईल. नवीन 4 G प्लान  Rs ९९९ पासून उपलब्ध केला जाईल असे कंपनीने जाहीर केले.’NOVARTIS’ या कंपनीने ZOMETA पेटंट इंफ्रिंजमेंट साठी ऑरोबिन्दो फार्मा विरुद्ध दावा दाखल केला.

सरकारने मोनेटरी पॉलिसीवर निर्णय घेण्यासाठी MPC( MONETARY POLICY COMMITTEE)चे  गठन केले. या कमिटीत सरकारचे तीन आणी रिझर्व बँकेचे तीन असे सहा प्रतिनिधी असतील. रिझर्व बँकेच्या गवर्नरला टायब्रेकिंग सोडवण्यासाठी दुसरे मत उपलब्ध करून देण्यांत आले आहे. ‘ POWER MECH PROJECT LTD.’ या कंपनीचा IPO ७ ऑगस्टला २०१५ ओपन होऊन ११ऑगस्ट २०१५ ला  बंद होईल. प्राईस BAND Rs ६१५ ते ६४० आहे शेअर्स ची दर्शनी किंमत Rs १० आहे मिनिमम लॉट २० शेअर्सचा आहे.  BGR ENERGY सारखीच ही कंपनी आहे. कॅपिटल गुड्सशी संबंधीत कंपनी आहे. ह्या सेक्टरमध्ये परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत थांबावे लागेल.

M &M, GRASIM या कंपन्यांचे रिझल्ट्स चांगले आले. भेलचे रिझल्ट्स मात्र खूपच निराशाजनक आले. टाटा मोटर्सचे रिझल्ट्स खूपच खराब आले नफा ४९%ने कमी झाला.KEI इंडस्ट्रीज, फोरटीस हेल्थकेअर, प्राज  इंडस्ट्रीज, ORACLE, या कंपन्यांचेही तिमाही रिझल्ट्स चांगले आले. MAX इंडिया या कंपनीच्या RESTRUCTURINGला शेअरहोल्डर्सची मंजुरी मिळाली. गोव्यामध्ये वेदांताच्या ३ खाणींमध्ये काम सुरु करायला सर्व प्रकारची मंजुरी मिळाली.

NSEL च्या संबंधीत केसमध्ये चांदीचे शिक्के खरेदी करताना नियमांचे पालन केले नाही म्हणून MMTCच्या अधिकाऱ्यांवर ५ केसेस दाखल क्रेल्या. काही काही वेळा शेअरमार्केटच्या संदर्भांत ऐकत असताना स्वभाव आणी किमतीची सांगड घातली पाहिजे असे वाटते. आज कॉर्पोरेशन बँकेचे रिझल्ट्स आले. या शेअरची बुक VALUE Rs १२२ आहे. शेअरचा भाव Rs. ५३ आहे. गेल्या आठवड्यांत बँकिंग शेअर्समध्ये जी rally आली त्यांत या बँकेचा सहभाग नव्हता. म्हणजे या बँकेचे रिझल्ट्स खराब लागणारच असे गृहीत धरूनच मार्केट चालले होते. जसे एखाद्या मुलाला मार्क कमी पडणार अभ्यासांत  त्याला डोक नाही असे लोक गृहीत धरतात. पण समजा पहिल्या प्रयत्नांत ३७% मार्क मिळून तो दहावी पास झाला तरी त्याचे तोंड भरून कौतुक होते.त्याचप्रमाणे कॉर्पोरेशन बँकेचे रिझल्ट्स अपेक्षेप्रमाणे बरे  आल्यामुळे शेअरची किंमत वाढली.

पंतप्रधानांनी ‘इंडिया HANDLOOM BRAND’चे उद्घाटन केले. त्यांनी कन्झुमर अफेअर्स मंत्रालयाला NESTLE (MAGGI)  बाबत  सर्व वस्तुस्थिती समोर आल्यावरच वक्तव्य करण्यास सांगितले. स्वतःच्या वक्तव्यामुले देशातील गुंतवणुकीवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी असे बजावले.

पुढच्या आठवड्यांत  महागाईचे आकडे आणी IIPचे आकडे येणार आहेत. पावसाची दिशा महत्वाची ठरणार आहे. १३ ऑगस्टला संसदेचे पावसाळी अधिवेशन समाप्त होईल. सरकार अजूनही याच अधिवेशनांत GST बिल मंजूर होण्याविषयी आशावादी आहे. पुढ्या आठद्व्द्यांत निफ्टीत असलेल्या १२-१३ कंपन्यांचे रिझल्ट्स येणार आहेत. पाहू या काय होते ते.

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

3 thoughts on “आठवड्याचे समालोचन – 3 ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०१५ – हाजीर तो वजीर

  1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – 10 ऑगस्ट ते १४ ऑगस्ट २०१५ – नाच गं घुमा | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s