आठवड्याचे समालोचन – 10 ऑगस्ट ते १४ ऑगस्ट २०१५ – नाच गं घुमा

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

GST (GOODS and SERVICES TAX) ने मार्केटला चांगलाच नाचवलं!, नेहमी मार्केट सर्वांना नाचवते.पण कधीना कधी शेरास सव्वाशेर मिळतोच.शेअरमार्केटला GST मुळे स्थैर्य येण्यास उसंत मिळालीचं नाही. दोन मिनिटांत मार्केट २०० पाईंट पडत होतं आणी तेव्हढेच सुधारत होते. सर्वांनाच GSTचे बिल मंजूर व्हावे असे वाटत होते. GST बिल मंजूर होऊन जर १ एप्रिल २०१६ पासून अमलांत आले तर डबल डीजीट GDP (GROSS DOMESTIC PRODUCT) GROWTH होईल असे अंदाज वर्तवले जात आहेत.पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजलं. भूमी अधिग्रहण बिल आणी GST याची चर्चा भरपूर झाली पण प्रत्यक्षांत काही घडले नाही. मार्केटची मात्र ‘आशा सुटेना देव भेटेना’ अशी स्थिती झाली. STOPLOSS लावता लावता आणी काढता काढता ट्रेडर्सची दमछाक झाली.

GST च्या विषयावर मार्केट नाचून नाचून दमले. तोपर्यंत चीनने त्यांच्या YUAN ह्या चलनाचे १.९% अवमूल्यन केले असेच अवमूल्यन तीन दिवस केले गेले. गुरुवारपर्यंत हे अवमूल्यन ४.५%. पर्यंत पोहोचले. ब्रम्हास्त्रच वापरले चीनने म्हणा की ! यामुळे एकप्रकारे आंतरराष्ट्रीय पातळीवर चलन युद्धाला आमंत्रण मिळाले असे म्हणावे लागेल. यामुळे चीनमधून होणारी निर्यात स्वस्त झाली आणी चीनमध्ये येणारी आयात महाग झाली. मार्केटचे फावले. मार्केटचा नाच सुरूच राहिला. ज्या कंपन्यांचा चीनशी व्यवहार होता त्यांचे शेअर्स पडले.चलनातील गोंधळामुळे रुपयाही पडू लागला. गुरुवारी US$१=Rs ६५ झाला.तेल कंपन्यांकडून US$ची मागणी वाढली त्यामुळे रुपया घसरला असे RBIने सांगितले. म्हणजेच चलनाने ही नाचण्याकरता घुंगरू बांधले.संसदेच्या ५ दिवसांच्या संयुक्त अधिवेशनांत GST बिल पास होईल असा सुगावा मार्केटला लागलेला दिसला रेट सेन्सिटीव असलेले शेअर्स म्हणजेच (ऑटो realty आणी बँका ) वाढले त्यमुळे शुक्रवारी मार्केट मनापासून नाचले.

TRAI (TELECOM REGULATORY AUTHORITY OF INDIA ) ने काही अटी घालून स्पेक्ट्रम शेअरिंग साठी परवानगी दिली. त्यामुळे भारती IDEA हेही शेअर्स नाचांत सामील झाले.  या नाचामध्ये नेस्लेचा शेअरही सामील झाला. कोर्टाने नेस्लेवरील maggiच्या बाबतीतला मनाई हुकुम रद्दबातल ठरवला. नेस्लेने प्रत्येक batchची ५ sample हैदराबाद, जयपूर आणी मोहाली अशा तीन ठिकाणच्या टेस्टिंग lab मध्ये दिली पाहिजेत. सहा आठवड्यांनी याचा रिपोर्ट मिळेल. तोपर्यंत maggiचे उत्पादन आणी विक्री करू नये असे सांगितले. सरकारनेही राष्ट्रीय ग्राहक मंचाकडे तक्रार केली शक्रवारी कंपनीने सरकारला Rs ६४० कोटी नुकसानभरपाई म्हणून दिले. अशा प्रकारे नेस्लेच्या शेअरचा भाव आठवडाभर कमीजास्त होत होता.

महागाईच्या आकड्यांनी नाचामध्ये बहार आणली. CPI मध्ये ४.५ वरून ४.३४ झाली जुलै WPI -४.०५ %झाले त्यामुळे लोकांना आशा वाटू लागली की रिझर्व बँक रेट कट करेल.  वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्यांचे तिमाही निकाल येत राहिले. त्यामुळे शेअर्सच्या किमतीत फरक पडत होताच.M&M, MARKSANS फार्मा, ONGC, ग्लेनमार्क फार्मा, टाटा स्टील, जेट एअरवेज या कंपन्यांचे रिझल्ट चांगले आले. टाटा मोटर्स, BHEL, JUBILIANT फूड्स या कंपन्यांचे रिझल्ट्स निराशाजनक आले.  या नाचामध्ये काही झेंडे फडकत होते.

(१) वेदांत गोव्यामध्ये मायनिंग ऑपरेशन सुरु करणार आहे त्यासाठी आवश्यक त्या सर्व मजुरी त्यांना मिळाल्या आहेत

(२) बायोकॉनची सबसिडीयरी ‘SYNGENE’ च्या शेअर्सचे लिस्टिंग चांगले झाले. Rs २५० ला दिलेल्या शेअरवर Rs ६० लिस्टिंग गेन मिळाला.

(३) ज्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडे शिलकी पैसा आहे त्यांनी जास्त लाभांश द्यावा असे सरकारने एक पत्र पाठवून या कंपन्याना सांगितले आहे. सरकारच्या शेअरहोल्डिंगवरील लाभांश INFRASTRUCTURE फंडामध्ये जमा केला जाईल.रिझर्व बँक ऑफ इंडियाने त्यांच्या जवळील अतिरिक्त रक्कम Rs ६५८९६ कोटी सरकारकडे जमा करू असे सांगितले याचा उपयोग INFRASTRUCTURE डेव्हलपमेंट साठी केला जाईल.

(४) बुधवारी रुपया US$१ = Rs ६४.८० पर्यंत गेला. त्यामुळे ज्या कंपन्यांना निर्यातीतून (उदा : फार्मा आणी IT सेक्टर ) फायदा होतो त्यांच्या शेअर्सची किंमत वाढली.

(५) विमानकंपन्यांनी किंमतीबाबतचे युद्ध सुरु केले. जेट एअरवेजने फ्रीडम सेलची योजना आखली. प्रवासी भाड्यांत ३०% सूट मिळेल असे सांगितले. त्यामुळे आपोआपच बाकी कंपन्यांनाही त्यांचे धोरण बदलावे लागेल.

(६) २९ सप्टेंबरपासून निफ्टीमध्ये ‘अदानी पोर्ट ‘ चा समावेश केला जाईल. NMDC चा शेअर निफ्टीच्या बाहेर होईल.३१ ऑगस्टपासून GLOBAL STANDARD INDEX मध्ये इंडिया बुल्स हौसिंग आणी ग्लेनमार्क फार्मा यांचा समावेश होणार आहे. आणी त्यातून JSPL बाहेर पडेल

(७) DIVI’s, COLGATE, दिवान हौसिंग फायनान्स यांनी १:१ बोनस जाहीर केले. NATCO फार्मा आणी CADDILLA HEALTHCARE यांनी १ शेअरचे ५ शेअर्समध्ये स्प्लिट जाहीर केले. (नुकतेच बोनसवरचे पोस्ट टाकले आहे लवकरच स्प्लिटवरचे पोस्ट टाकू)

सध्या मार्केटमध्ये काय घडते आहे हे समजावून घेण्याचा प्रयत्न करा पण समजत नसेल तर गप्प बसा जेव्हा मार्केट पडेल तेव्हा शक्य असल्यास थोड्या प्रमाणांत जपून पावले टाकत खरेदी करा.

श्रावण महिन्याचे स्वागत करावे म्हणून की १५ ऑगस्टला सलामी द्यावी म्हणून माहीत नाही पण मार्केट नाचले. आता पुढील आठवड्यांत नाच नाचुनी अती मी दमले असे म्हणते की आपला नाच चालू ठेवते. हे पाहू या.

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे समालोचन – 10 ऑगस्ट ते १४ ऑगस्ट २०१५ – नाच गं घुमा

  1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन -१७ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट – बुडत्याला काडीचा आधार | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s