आठवड्याचे समालोचन -१७ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट – बुडत्याला काडीचा आधार

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

तुम्ही म्हणाल अहो बुडतंय कोण ? आणी जरी बुडत असेल तरी आम्हाला काय सांगतां !त्याला वाचवणं आमचं काम आहे अस वाटलं की काय तुम्हाला !आणी समजा बुडत असेल तरी तो काडीच्या आधाराने वाचणार थोडाच ! अहो अगदी हेच मलाही म्हणायचे आहे. काडीच्या आधाराने तो वाचणार नाही. पण ‘काडीचा आधार’ market मधे मात्र तुम्हाला वाचवू शकेल.

या आठवड्यात अगदी तसचं काहीस घडले. सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही हे प्रत्येकालाच माहिती आहे. या बॅंकातील NPA (NON- PERFORMING ASSET) मध्ये  होणारी वाढ चिंताजनक आहे. NPA विकण्याची बँकांना परवानगी दिली आहे. या बॅंका NPA ची विक्री  ARC (ASSET RECONSTRUCTION COMPANY) ना करू शकतात. यामुळे बँकांची कर्जवसुलीपासून सुटका होते.NPAचे RESTRUCTURING करायची परवानगी दिली म्हणजेच लोनचा हफ्ता कमी करणे किंवा परतफेडीची मुदत वाढवून देणे किंवा व्याजाच्या दरांत सूट देणे इत्यादी उपायांनी परिस्थितीत फारशी सुधारणा दिसली नाही.म्हणून  सरकारने ७ कलमी इंद्रधनुष्य योजना जाहीर केली.  या योजनेखाली सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना Rs २०००० कोटी भांडवलाचा पुरवठा करेल. तसेच खासगी क्षेत्रातील मान्यवर आणी कर्तबगार व्यक्तींची बँकेचे चेअरमन आणी MANAGING डायरेक्टर म्हणून नेमणूक करण्यांत येईल. बँक बोर्ड ब्युरो म्हणून एक संस्था स्थापन करण्यांत येईल. ही सर्व बँकांना पॉलिसी, कार्यवाही, आणी नेमणुका या अनेक इतर महत्वाच्या बाबतीत मार्गदर्शन करेल. बँक बोर्ड ब्युरो मध्ये चेअरमन आणी इतर सहा सभासद असतील. सरकारने बँकांना आश्वासन दिले आहे की यापुढे बँकांच्या कामकाजांत कमीतकमी सरकारी हस्तक्षेप असेल.हे सर्व उपाय म्हणजे वरवर दिसणारी मलमपट्टी आहे.  बुडत्याला काडीचा आधार आहे झालं

रिझर्व बँकेने ११ कंपन्याना पेमेंट बँक चालू करण्यासाठी मंजुरी दिली. पेमेंट बँक खालील सेवा त्यांच्या ग्राहकांना पुरवू शकतात. या सुधारणा फायनांसीयल इन्क्लुजनअंतर्गत केलेल्या आहेत

(१)     ही बँक ग्राहकांकडून Rs१००००० पर्यंत डीपॉझीट स्वीकारू शकते. मात्र ही  बँक कोणत्याही प्रकारची मुदत ठेव स्वीकारू शकत नाही.

(२)     ही बँक ATM /डेबिट कार्ड देऊ शकते

(३)     ही  बँक कोणालाही कर्ज देऊ शकत नाही.

(४)     ही बँक क्रेडीट कार्ड देऊ शकत नाही

(५)     ही  बँक ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकाराने पेमेंट आणी पैसे पाठविण्याच्या सुविधा पुरवू  शकते

(६)     ही बँक युनिव्हर्सल बँकेची ( आजच्या खाजगी आणी सार्वजनिक खेत्रातील बँकांचे नवे नाव) प्रतिनिधी म्हणून काम करू शकते.

(७)     युनिवर्सल बँकेची प्रतिनिधी म्हणून  ती त्या बँकेच्या  इन्शुरन्स आणी मुच्युअल फंड आदींची विक्री करू शकते.

(८)     पेमेंट बँकेला रिझर्व बँकेच्या नियमांप्रमाणे CRR (CASH RESERVE RATIO) ठेवावा लागेल. आणी त्यांच्या डीपॉझीटपैकी ७५% डीपॉझीटची गुंतवणूक सरकारी BONDS मध्ये  करावी लागेल. २५% डीपॉझीट SCHEDULED  COMMERCIAL बँकांच्या चालू बचत किंवा मुदत ठेवीच्या स्वरूपांत ठेवू शकतात.

(९)     या बँकेचे पूर्ण कार्यसंचालन NETWORKED आणी TECHDRIVEN  असले पाहिजे. ही बँक ATM, मोबाईल, इंटरनेट आणी त्यांची  विक्रीकेंद्र या माध्यमातून सेवा देईल.

(१०) बँकेने ग्राहकांच्या तक्रारी ऐकून त्यावर कार्यवाही करण्यासाठी एक उच्चाधिकार असलेली ‘ग्राहक तक्रार निवारण सेल स्थापन केली पाहिजे.

अहो इमारत ढासळू लागली की बांबूचा किंवा लोखंडी बीमचा आधार देतात. परंतु लवकरांत लवकर इमारत दुरुस्त करून घेणे अपेक्षित असते. किंवा  एखादे मुल नापास झाले तर गाईड आणून देतात ट्युशन लावतात पण मुलाला अभ्यास करावाच लागतो.तरच प्रगती दिसते. त्याचप्रमाणे सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांनी भगीरथ प्रयत्न करून स्थिती सुधारून आधार फेकून दिले पाहिजेत. त्याच पद्धतीने कुणाचे पैसे बँकांच्या शेअर्समध्ये अडकले असतील त्यानासुद्धा हाच काडीचा आधार. अशा योजना जाहीर होतात तेव्हा या बँकांच्या  शेअरच्या किंमती वाढतात आणि विकायची संधी मिळते

NCDRC (NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESS COMMISSION) ने नेस्लेविरुद्ध सरकारने केलेली तक्रार दाखल करून घेतली आणी त्या संबंधांत नेस्लेला नोटीस पाठवली. सरकारने Rs ६४० कोटी नुकसानभरपाई मिळावी म्हणून हा अर्ज केलेला आहे. सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत टेस्टिंगसाठी SAMPLES निवडली पाहिजेत.NCDRCने पुन्हा ‘MAGGI’ च्या SAMPLES चे  टेस्टिंग करायला सांगितले.सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाने FSSAI ने दिलेल्या ADVISORY फॉर प्रोडक्ट APPROVAL वर घातलेली बंदी उठविण्यास नकार दिला.

‘बिर्ला कॉर्प’ या कंपनीने ला फार्ज या कंपनीच्या दोन सिमेंट सिमेंट युनिट्सची खरेदी Rs ५००० कोटींना केली.  सुप्रीम कोर्टाने FTIL (FINANCIAL TECHNOLOGIES) ला इंडिया एनर्जी एक्शेंज मधील २६% स्टेक एस्क्रो अकौंटमध्ये ठेवायला सांगितले.NCMS (NATIONAL COLLATERAL MANAGEMENT SERVICES)ने अडाणी पोर्ट बरोबर करार केला.फेअर FAX (इंडिया) या कंपनीने NCMS मधील ७४% स्टेक US$१२६ बिलीयनला विकत घेतला. कावेरी सीड्स कंपनीने कर्नाटक सरकारला द्याव्या लागणाऱ्या ROYALTY साठी प्रोविजन केली नाही आणी प्रमोटर्स शेअर्स विकत असल्याने कंपनीच्या शेअर्सची किंमत कमी झाली. ILFS ट्रान्सपोर्ट ही कंपनी २६ ऑगस्ट २०१५ रोजी होणाऱ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स च्या मीटिंगमध्ये RIGHTS इश्यू आणण्यावर विचार करणार आहे. स्टेट बँकेने ACCENTURE आणी मास्टरकार्ड यांच्या सहकार्याने मोबाईल WALLET APP  LAUNCH  केले. ओबेराय रिअल्टी ह्या कंपनीने क्रॉम्पटन ग्रीव्झ या कंपनीच्या ऑफिस बिल्डींगची वरळी येथील सुमारे १ एकर जागा खरेदी केली. या जमिनीवर ऑफिसची बिल्डींग पाडून तेथे निवासी कॉम्प्लेक्स बनविण्याचा कंपनीचा विचार आहे INFOSYS या कंपनीचे चेअरमन विशाल सिक्का यांनी कंपनीची नवीन STRATEGY जाहीर केली. या STRATEGYचे नाव त्यांनी AiKiDo(ARTIFICIAL INTELLIGENCE, KNOWLEDGE BASED IT  AND DESIGN THINKING) असे  ठेवले.

रबर आणी कॉफी यांच्या प्रोसेसिंग आणी प्लानटेशन करणार्या कंपन्यांमध्ये १००% FDI करण्यासाठी सरकार परवानगी देणार अशी बातमी होती. यामुळे रबराची आयात कमी होईल आणी कॉफीची निर्यात वाढेल अशी अपेक्षा आहे बुधवारी DIPPने जाहीर केले की सरकारचा असा कुठलाही विचार नाही.चीन मधून पेंटसंबंधीत येणाऱ्या मालावर सरकारने एन्टीडम्पिंग ड्युटी लावली.तांब्याच्या किमती सहा वर्षाच्या कमीत कमी स्तरावर आहेत त्यामुळे मारुती, हिरोमोटो, बजाज ऑटो, HAVELLS, KEI, आणी तांबे कच्चा माल म्हणून वापरणाऱ्या कंपन्यांना याचा फायदा होईल. पण यामुळे ज्यांचा पक्का माल तांबे आहे अशा हिंदाल्को, नाल्को, हिंदुस्थान कॉपर, वेदांत इत्यादी कंपन्यांच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होईल.

सेबीने अल्केमिस्ट या कंपनीच्या प्रमोटर्स डायरेक्टर यांच्यावर खरेदी विक्रीसाठी ४ वर्षासाठी बंदी घातली आहे. ओखला पक्षी अभयारण्याच्या इकोसेन्सिटिव्ह झोनच्या मर्यादा निश्चित केल्यामुळे नोइडामध्ये बांधलेल्या इमारतींमधील सुमारे  ५००००  FLATSचे  OCCUPATION CERTIFICATE मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.त्यामुळे बिल्डर्स, FLAT बुकिंग करणार्या ग्राहकांनी सुटकेचा निश्वास सोडला.DLF ने सांगितले की नोइडा MALL  डिसेंबर २०१५ पर्यंत चालू होईल त्यापासून वर्षाला Rs २०० कोटी उत्पन्न मिळण्यास सुरुवात होईल. या निर्णयाचा फायदा UNITECH आणी J.P. इन्फ्राटेक या कंपन्यांनाही होईल. या कंपन्यांची काय अवस्था आहे हे गुंतवणूकदारांना चांगलेच माहित आहे. त्यामुळे हा उपायसुद्धा बुडत्याला काडीचा आधारच म्हणावा लागेल.

कॅफे कॉफी डे या कंपनीच्या Rs११५० कोटींच्या IPO (INITIAL PUBLIC OFFER) ला सेबीने हिरवा कंदील दाखवला.मास्टेक या कंपनीने आपला इन्शुरन्स बिझीनेस वेगळा करून MAJESCO ही कंपनी स्थापन केली. या MAJESCO कंपनीचे बुधवारी शानदार लिस्टिंग झाले. या कंपनीचे NYSE ( NEWYORK STOCK  EXCHANGE)वर याआधीच लिस्टिंग झाले आहे.पुष्कर केमिकल आणी फरटीलायझर या कंपनीचा IPO २५ ऑगस्टला सुरु होऊन २७ ऑगस्टला बंद होईल.  ३० ऑक्टोबर पासून अम्टेक ऑटो हा शेअर F&O मधून बाहेर पडेल.

या आठवडाभर सतत रुपयाची किमत घसरत आहे. चीनने प्रथम सुरुवात केली आणी त्यामुळे जणू काही चलनयुद्ध सुरु झाले. सगळ्या देशांच्या चलनाच्या किमतीत घट झाली. ज्या कंपन्यांचे परदेशी कर्ज जास्त असेल त्या कंपन्यांना याचा सगळ्यांत जास्त फटका बसला उदा : R COMM

गुंतवणूकदारांना सुद्धा काडीच्या आधाराची गरज असते. काही वेळा शेअरचा भाव पडू लागतो व ट्रेड तोट्यांत जातो. असा तोट्यांत गेलेला ट्रेड अचानक एखाद्या बातमीमुळे शेअरचा भाव वाढून फायद्यांत रुपांतरीत होऊ शकतो त्या वेळी फायदा कमी होतोय हा विचार न करता शेअर विकून मोकळे व्हावे. पूर्णच बुडीत खाते होण्यापेक्षा थोडासा फायदा घेणे योग्य नव्हे काय ! म्हणजेच काडीचा आधार घेवून बुडण्यापासून स्वतःला वाचवावे.

 

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे समालोचन -१७ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट – बुडत्याला काडीचा आधार

  1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – २४ ते २८ ऑगस्ट २०१५ – आभाळच फाटलं ठिगळ लावायचे तरी कुठे | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s