तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – July – Aug २०१५

आधीची प्रशोन्त्तरे वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तुमचे प्रश्न - माझी उत्तरं

Image courtesy – wikipedia 

नाव: Dnyaneshwar Rajput
तुमचा प्रश्न : madam mala intraday baddal mahiti dyana please

इंट्राडे या विषयावर लिहिलेले ब्लोग ३२ ३३ ३४ ३५ ३६ वाचावेत. आपली अडचण दूर होईल.

नाव: हनुमंत शेटे
तुमचा प्रश्न : डे trading करताना विकत घेतलेले शेअर्स त्याच दिवशी विकले पाहिजे का ?

शेअर्स जर एका दिवशी खरेदी करून त्याच दिवशी विकला तरच तो ट्रेड इंट्राडे ट्रेड म्हणून ओळखला जातो. तुम्ही कोणत्या उद्देशाने शेअर्स खरेदी केलेत यावर ते अवलंबून आहे. विकत घेतलेला शेअर चांगला असेल आणी कमी किमतीला मिळाला असेल तर तेवढी रक्कम देऊन तुम्ही डिलिवरी घेऊ शकता. इंट्राडे साठी असलेले ब्रोकरेज डिलिवरी ट्रेडच्या ब्रोकरेजपेक्षा कमी असते.

नाव: sheetal
तुमचा प्रश्न : मी आणि माझ्या मैत्रिणीने दहा हजाराने सुरुवात केली आहे. आम्ही कोटक महिंद्रा बँकेत account ओपेन करून फार्मा, Textile , FMCG , Oil and Gas , ऑटो, Tyre , या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. तुमच्या ब्लॉगचा संदर्भ घेऊन छोट्या छोट्या लॉट मध्ये खरेदी केली . परंतु आता असे समजत आहे कि, Minimum brokerage @ २.५ % + २.५% = ५ % , total खरेदी आणि विक्री वर द्यावे लागत आहे . कृपया हे सांगा कि Minimum brokerage सर्वचजण घेतात का आणिघेत असतील तर ते किती असते. यातून पैसे वाचविण्याचा दुसरा मार्ग आहे का ? धन्यवाद ..
कुठला ब्लोग पोस्ट वाचून हा प्रश्न पडला?: After Investment

मिनिमम ब्रोकरेज द्यावेच लागते त्यापासून सुटका नाही. परंतु त्या ब्रोकरेजचा हिशोब डोक्यांत ठेवूनच फायद्याचे गणित मांडावे. आकारले जाणारे मिनिमम ब्रोकरेज तुम्ही तुमच्या ट्रेडिंग अकौंटमध्ये किती उलाढाल करता यावर आणी ब्रोकरशी असलेल्या सलोख्याच्या संबंधावर अवलंबून असते.

नाव: दिपक चव्हाण
तुमचा प्रश्न : मैडमजी नमस्कार,
आजच्या बिनभरवश्याच्या मार्केट मध्ये कधीही काहीही होऊ शकते, अश्या वेळेत माझ्यासारखा नवख्या व्यक्तिस आपले अमूल्य मार्गदर्शन लाभावे, मैडम मी प्रत्येक महिन्यात 2000 rs शेयर मार्केट मध्ये गुंतवयाची इच्छा ठेवतो तरी ते मई कश्यात गुंतवु याचे मार्गदर्शन करा, तशेच जे पी असोसिएट्स बद्दल ही आपले मॉल कळवा, ही विनंती….
कुठला ब्लोग पोस्ट वाचून हा प्रश्न पडला?: 27 जुलै 2015चा ग्रीस मार्केट डाउन च ब्लॉक

प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने बघा. तुमच्या मते मार्केट बेभरवशाचे आहे म्हणजे मार्केट एकदम वाढते किंवा कमी होते.त्यामुळे शेअर्स स्वस्तांत मिळणे शक्य होते. त्यामुळे संधीचा फायदा उठवावा.J.P. असोसिएंटस हा रिअलिटी सेक्टर मधील शेअर आहे. हा सेक्टर सध्या मंदीत आहे. एखादे दिवशीच काही बातमी असल्यास या सेक्टर मधले शेअर्स वाढतात.

नाव: tushar yargole
तुमचा प्रश्न : market madhe intrady madhe surwat kashi karavi?
Kiti rakkam aaplyjaval thevavi aani kiti guntavavi?

इंट्राडे या विषयावर लिहिलेले ब्लोग ३२ ३३ ३४ ३५ ३६ वाचावेत.. किती रकम गुंतवावी याला बंधन नाही. पण फायदा किंवा तोटा त्या रकमेच्या प्रमाणांत होतो.

नाव: Shashikant Jadhav

तुमचा प्रश्न : नमस्कार, प्रथम या ब्लॉग वरील पोस्ट वाचून शेयर मार्केट विषयी खुप माहिती मिळाली. शेयर मार्केट विषयी तुम्ही ज्या सोप्या भाषेत सांगता त्यामुळे शेयर मार्केट समजन्यास खुप मदत होत आहे. त्याबद्दल धन्यवाद.. फोरेक्स ट्रेडिंग व् कमोडोटी ट्रेडिंग म्हणजे काय? ते कसे करायचे?

FOREX ट्रेडिंग म्हणजे विदेशी चलनामध्ये केले जाणारे ट्रेडिंग.कमोडीटी ट्रेडिंग म्हणजे धातू, शेतमाल, खनिजे या मध्ये होणारे ट्रेडिंग. हे करण्यासाठी तुम्हाला डेरीवेटीव मार्केट शिकावे लागेल, कारण ह्या मार्केटमधील ट्रेडिंग देरीवेटीवच्या माध्यमातूनच होते. धन्यवाद्..

नाव: DEEPAK
तुमचा प्रश्न : what is meaning of f and o contract

पुढे घडणाऱ्या घटना विचारांत घेवून किमतीचा अंदाज बांधून तेवढ्या काळासाठी खरेदी विक्रीचा केलेला करार.

नाव: Sandip Shirsath
तुमचा प्रश्न : Respected madam… Many times i read the notification about the stock,,
like xyz stock above the 50 day moving avarage,, below the 30day moving avarage.. so my Question is what is “Moving avarage” concept and how it helpfull to us or not? Thanking u…

तुम्हाला विकिपेडीयावर मूव्हिंग अवरेजीसबद्दल माहिती मिळेल. शेअर्सच्या बदलणाऱ्या किमतीची ३० दिवस किंवा ५० दिवसाची सरासरी.याचा शेअर्सच्या खरेदीसाठी उपयोग होतो.

नाव: BHARAT BUCHAKE
तुमचा प्रश्न : aapan share market course suru karnar ahhat ka!

संधी मिळाली तर चालू करण्याच्या विचारांत आहे बघु या काय होते ते.

नाव: Sushant Amnek
तुमचा प्रश्न : Madam mala share maret che knowledge ghyayche aahe. Tyasathi mala kashi suruvat karta yeil? Stock market aani share market madhe kahi difference aahe ka?

शेअर मार्केट आणी stock मार्केट मध्ये काही फरक नाही. तुम्ही माझे ब्लोग वाचा, दूरदर्शनवरील वाहिन्यांवरुन तसेच BSE आणी NSE च्या साईटवरून, वर्तमानपत्रांतून माहिती मिळवा.

नाव: Manas.sathe
तुमचा प्रश्न : Namaskarr,positional trading /imvt krum full time trader/investor hota Yete ka? Aslyas kamit kami kti capital lagte.

पोझीशनल ट्रेडिंग करून फुल टाईम ट्रेडर होता येते. भांडवल किती घालावे याला काही मर्यादा नाही. भांडवलाच्या प्रमाणांत फायदा तोटा होतो.पण त्यासाठी तुमचे चहूकडे लक्ष राहिले पाहिजे. .

नाव: pravin tarale
तुमचा प्रश्न : nifty ani sensex mhanje kay ? kadhi kimmat vadhate kami hote mla kalat nahi ahe mo navin ahe mla sangal kay
कुठला ब्लोग पोस्ट वाचून हा प्रश्न पडला?: money controll.com varun

निफ्टी म्हणजे NSE (NATIONAL STOCK EXCHANGE) वर लिस्टेड असणाऱ्या महत्वाच्या ५० शेअर्सचे इंडेक्स. SENSEX म्हणजे BSE (BOMBAY STOCK EXCHANGE) वर लिस्ट असलेल्या महत्वाच्या शेअर्सचे इंडेक्स. तुम्हाला शेअरमार्केटची माहिती देणार्या दूरदर्शनच्या वाहिन्यावरून व रोजच्या निरीक्षणातून ही गोष्ट समजू शकते.

नाव: Yogesh patil
तुमचा प्रश्न : Eka divasat karodpati kase banata yeyil?

एका दिवसांत करोडपती बनण्यासाठी योग्य वेळी घेतलेला निर्णय आणी गुंतवलेले भांडवल तसेच तुमचे नशीब यावर हे अवलंबून असते. आताचे उदाहरण पाहू. काही शेअर्स एका दिवशांत Rs २००० ते Rs ३००० ने वाढतात. गेल्या आठवड्यांत टाटा एलेक्षि हा शेअर Rs ३५०ने वाढला. १ लाख शेअर्स खरेदी केल्यास चार तासांत करोडपती होता येते. ह्या शेअर्सची किमत त्याच प्रमाणांत कमी झाली तर तुमचे भांडवलही तेवढेच कमी होऊ शकते. आगीशी खेळ खेळायचा की नाही ते आपण ठरवायचे

नाव: sandip untwale
तुमचा प्रश्न : bank npa kasa tapasava

बँकेच्या balance sheet मध्ये, तसेच दर तिमाही निकालांमध्ये प्रत्येक बँक आपल्या कडे असलेले NPAचे आकडे घोषित करते.

नाव: rupsen kompe
तुमचा प्रश्न : What to do in Tata motors??

टाटा मोटर्सचा व्यवहार सर्व जगभर चालतो. चीनच्या आर्थिक परीस्थितीचा टाटा मोटर्सच्या व्यवहारावर प्रतिकूल परिणाम होतो आहे त्यामुळे परिस्थिती सुधारायला वेळ लागेल. या शेअर्सच्या बाबतीत काय करावे हे तुमचा ट्रेडिंगचा किंवा दीर्घ मुदतीसाठी गुंतवणुकीचा दृष्टीकोण आहे यावर अवलंबून आहे.

नाव: ABHIJIT TELANG
तुमचा प्रश्न : I want a list of websites in marathi or hindi for basic information and support for actual trading for beginners in share market.

हिंदी आणी गुजराती साठी सीएनबीसी आवाज आणी सीएनबीसी बझार या वाहिन्या आणी त्यांच्या वेबसाईट उपलब्ध आहेत. पण मराठीतून माहितीसाठी माझा ब्लोग वाचा किंवा FACEBOOK PAGE marketaanime उपलब्ध आहे.

नाव: Shubham nalwade
तुमचा प्रश्न : paise kase gantvayche shear market madhe agdi pahilya pasun sanga manje kontya banket account kadauch..n kasali kasali accout lagatat n kiti paise lagatat
कुठला ब्लोग पोस्ट वाचून हा प्रश्न पडला?: konti nhi majya mahitisati vicharl ahe me plz sanga

माझा प्रत्येक ब्लोग्पोस्ट तुम्ही काळजीपूर्वक वाचा. ही सर्व माहिती तेथे उपलब्ध आहे. ब्लोग नंबर १८ ३१ ३९ हे ब्लोग वाचा.

नाव: RAKESH PETKAR
तुमचा प्रश्न : मैडम माजे reliance securuties चे डीमैट अणि ट्रेडिंग अकाउंट आहे. मी 2 महीनै न पासून इंट्रा डे ani कधी मधे डिलेवेर पैन करतो पण माजा सर्व नफा मंजे 80 % ब्रोकरेज अणि टैक्स इतर चार्जेस मधे च गेला पैसा कमी मिळतो इंट्राडे मधे अस्स वाटायला लागले आहे…तै साठी तुमचा कड़े दूसर सलूशन आहे का…………..तै साठी मी CNBC वरच indian trading leg च कमी ब्रोकरेज च अकाउंट ओपन करतो आहे।।। हे कितपत योग्य आहे…………….तुमचा ब्लॉग मुळे माला नेहमीच चगली दिशा मिळाली आहे……माला शेयर मार्किट च 0 क्नॉलेज होत् पण तुमचे ब्लॉग चा माला खुप उपयोग zhala..

शेअर खरेदी केल्यानंतर विकताना खरेदी भावांत खर्च मिळवून मग त्यांत तुम्हाला अपेक्षित असलेला नफा मिळवून विक्रीचा भाव ठरवायचा असतो. साधारणपणे शेअर रोज किती प्रमाणांत वाढतो आणी किती प्रमाणांत कमी होतो याचा तुम्हाला अंदाज असायला हवा. समजा Rs १०० पर्यंत किंमतीचा शेअर डेट्रेडसाठी घेतल्यास एक रुपयाच्या फरकांने विकला तर १०० शेअर्समागे Rs ९० फायदा होतो. आणी साधारणपणे Rs १००च्या पटींत हे गणित तुम्ही करू शकता. म्हणजे Rs १००० चा शेअर Rs. १० च्या फरकाने विकावा.

नाव: komal
तुमचा प्रश्न : bonus share mhanje kay
कुठला ब्लोग पोस्ट वाचून हा प्रश्न पडला?: split

बोनस शेअरवरचा पोस्ट टाकला आहे तो वाचा.

नाव: akshay gore
तुमचा प्रश्न : madam,mala share market made mala intrest ahe an maje papa mala karu nako mantat karan tyala kup money lagta,pn mala karayche ahe tr mala kiti money lagel ,demat account sathi mala sarv details pahije plz

प्रत्येक व्यवसाय कमीतकमी पैशांत सुरू करता येतो. अगदी काही बँका फ्री ‘DEMAT’ अकौंट उघडतात. प्रत्येक गोष्ट थोड्या प्रमाणांत करून पहावी फायदा मिळू लागल्यानंतर घरच्यांना सांगून त्यांचा विश्वास संपादन करावा. आणी जपून पावले टाकत उलाढालीमध्ये झेपेल तशी वाढ करावी.

नाव: sandeep thorat
तुमचा प्रश्न : Dear Madam,Me tumche sarva lekh donda vachle ahet.
Ani manapasun dhanyawad deto, ki tya mule mee share market cha seriously vichar Karun ata D-mat ani trading account suru kelai.Equity market sarkha krupaya derivatives (f&o) war ekhadi lekhan malika lihawi hee namra vinanati.

आपली सुचना चांगली आहे. शक्य होईल तेव्हा विचार करू.

नाव: सुभाष चव्हाण
तुमचा प्रश्न : मला currency Trading विषयी सविस्तर माहिती हवी आहे.

करन्सी ट्रेडिंग फक्त डेरीवेटीवमध्येच करू शकता. त्यामुळे आधी डेरीवेटीवची माहिती करून घ्या. आणी मगच करन्सीमध्ये ट्रेडिंग करा.

नाव: माघुरि वासुदेव शिरवळकर
तुमचा प्रश्न : नमस्कार मि ऐक गृहिणी आहे. वय ४३ आहे. मला शेअर्स मार्केट बद्दल काहिहि माहित नाहि. पण त्या बद्दल जाणुन घ्यायचे आहे. शिकायच आहे. आणि काहि गुंतवणुक करुन घर बसल्या काही मिळकत व फायदा मिळवण्या चि खुप ईच्छा आहे. मला स्वतः चे असे काही करण्या ईच्छा आहे.प्लिज मला योग्य ते मार्गदशन करावे.
कुठला ब्लोग पोस्ट वाचून हा प्रश्न पडला?: मि शेअर्स बद्दल ऐकून होते पण कघि काही करावस वाटल नाहि पण आज काहि कारणास्तव हा मार्ग निवडला. मि अजुन र्पयंत कुढलाच ब्लोग वाचलेला नाहि.

तुम्ही प्रथम माझे सगळे ब्लोगपोस्ट, माझी वहिनी या मासिकातले लेख वाचा, दूर दर्शनवरील वाहिन्यांवरुन (उदा :सी एनबीसी टी व्ही १८ , सीएनबीसी आवाज, झी बिझीनेस इत्यादी) , वर्तमानपत्रातून माहिती तसेच BSE आणी NSE च्या साईट वरून माहिती मिळवू शकता.

नाव: umesh
Email: umeshshinde52@yahoo.com
तुमचा प्रश्न : madem srvpratham tumche manapasun aabhar khar tar me pach varshapurvich share market madhe survat keli asti pn mla tyatl kahich kalt navt tyamule kahi treding kel nvt pn aata tumchyakdun milalel margdarshana mule punha nvyane shri ganesha krt aahe tasech me gele saha mahine hyacha abhyas krt hoto maj mukhya dhyey bankepeksha jast vyajdar milvane evdhach aahe. majha prashn asa aahe ki me jsw steel che share tyacha 52 week low la kharedi kele aahet aagami 3-4 mahinyat mla changla partava milu shkto ka?

स्टील सेक्टर सध्या अडचणींत आहे. सरकार ANTI DUMPING ड्युटी लावण्याच्या विचारांत आहे. तसेच आयात ड्युटी वाढवून भारतीय स्टील उद्योगाला संरक्षण देत आहे. त्यामुळे शेअर्सचा भाव वाढला की विकून पुन्हा खालच्या किमतीला खरेदी करायचा असे ट्रेडिंग करणे हेच इष्ट होय

नाव: Abhijit Ugemuge
तुमचा प्रश्न : चागले शेअर्स कोणते ?
शेअरच्या किमती केव्हा उतरतात ?
शेअरच्या किमती केव्हा चढतात ?

शेअर्सचे भाव आणी गुणवत्तेचे निकशासाठी ब्लोग नंबर १४, १५, १६, १७ वाचा.

नाव: shailesh Krishna Padelkar
तुमचा प्रश्न : Namskar Madam,
mala aase vicharayche aahe ki company ni chi finanacial position tychya balance sheet varun kashi find karaychi tee company pudhe kashi progress karnar aahe tya companicha share gyva ki nahi he kase tharvayche jara mala sangal ka please

कंपनी नियमितपणे लाभांश देते कां, भांडवली गुंतवणूक करते कां कंपनीचे नफ्याचे मार्जिन, विक्रीमधील वाढ आणी मार्केट-शेअर विचारात घ्यावे. ब्लूचिप कंपन्या ‘A’ ग्रूपमधील कंपन्या चांगल्या म्हणून ओळखल्या जातात. प्रत्येक कंपनीच्या तिमाही निकालांमध्ये या सर्व गोष्टीवर प्रकाश टाकलेला असतो.

नाव: प्रवीण
तुमचा प्रश्न : मला डे ट्रेडींगबद्दल माहीती हवी आहे. साधारणतः दिवसाला कितपत गुंतवणुक ही डे ट्रेडींग साठी फायदेशीर असते ब्रोकर फी वगेरे गोष्टी वगळल्यावर. तसेच कुठल्या प्रकारच्या शेअरमधे गुंतवणुक डे ट्रेडींग साठी योग्य असते? लार्ज कॅप, मिड कॅप,
कुठला ब्लोग पोस्ट वाचून हा प्रश्न पडला?: General

इंट्राडे या विषयावर लिहिलेले ब्लोग ३२ ३३ ३४ ३५ ३६ वाचा. डेट्रेडिंगसाठी उपलब्ध बातमी, त्या बातमीचा कोणत्या शेअरवर आणी किती प्रमाणांत परिणाम होईल याचे ज्ञान किंवा अंदाज यावर डेट्रेडचे यश अवलंबून असते. शेअरची किमत जर कमी असेल तर डेट्रेडमध्ये ब्रोकरेज कमी लागते आणी फायदा जास्त होतो. डेट्रेडमध्ये STOPLOSS जरूर लावला पाहिजे.ज्या शेअरच्या किमतीमध्ये रोज चढउतार होत असतात तेच शेअर्स डेट्रेडसाठी योग्य वाटतात.

नाव: vitthal
तुमचा प्रश्न : Namaste madam mala aase vichyarayeche hote ki BSE,NSE,NIFTY & SENSEX yamadhe kutle share yetat. tasech 1 share 100 Rs. La aahe tar to share mala tyach kimtit milel ka tyavar kutle charges lagtat Ka? Aani mi share kharedi /viklyanantar tyache payment online hou shakkt ka te kase tyachi mahiti sanga. Aani tyasathi Kay karav lagel.

मी शेअर खरेदीविक्रीचे बिल ब्लॉगवर टाकले आहे. त्यामुळे तुम्ही ब्लोग वाचल्यास तुम्हाला ही माहिती मिळेल. निफ्टी आणी सेन्सेक्स यामध्ये कोणते शेअर्स आहेत त्याची माहिती NSE आणी BSEच्या साईटवर जाऊन मिळू शकते.तुमचा ट्रेडिंग अकौंट आणी ‘DEMAT’ अकौंट बचत खात्याशी सलग्न केल्यास ही सुविधा तुम्हास मिळू शकते. जास्त माहितीसाठी तुमचा जेथे ‘DEMAT आणी ट्रेडिंग अकौंट आहे तेथे चौकशी करावी.

नाव: ajit
तुमचा प्रश्न : on line trading karnyasati laptop kinva computer garjecha aahe ka
mobile varun nahi ka karu shakat aapan on line trading.??

ओंनलाईन ट्रेडिंग मोबाईलवरुनही करतां येते.

नाव: Shreerang
तुमचा प्रश्न : Madam, I read all your blogs and it gave me inspiration to start learning and trading.I purchased Mastek shares on 15June after reading the news that Mastek record date as 15June for allotment of additional shares of Majesco to each Mastek shareholder. Please guide, will I get Majesco shares since I have purchased Mastek shares on Record date? I request your urgent reply so that I can decide whether to keep these shares or not. If I am getting additional Majesco shares, then only I am interested to keep the same. Please guide urgent.

मजेस्कोचे शेअर्स मिळणार नाहीत. ज्या शेअरहोल्डर्सचे मास्टेकचे शेअर्स १५ जूनला ‘DEMAT’ अकौंटवर जमा असतील त्यांनाच मजेस्कोचे शेअर्स मिळतील. तुम्ही १५ जूनला खरेदी केलेले शेअर्स ‘DEMAT’ अकौंटवर १८ जूनला जमा होतील.

नाव: sandip untwale
तुमचा प्रश्न : share split ka kartat

शेअर्सची किंमत खूप वाढल्यामुळे लिक्विडीटी कमी होते, VOLUME कमी होतो. तसेच शेअर्सची किंमत किरकोळ गुंतवणूकदाराच्या आवाक्याबाहेर जाते. त्यावेळेला कंपनी शेअर्स स्प्लिट करते. काही दिवसांत मी शेअर स्प्लिटवर ब्लोग टाकणार आहे तो तुम्ही वाचा.

नाव: nitin pise
तुमचा प्रश्न : मैडम माझे sbi मधे सेविंग अक्काउंट आहे. मला share market मधे एंट्री करायची आहे. demat अक्काउंट काढल्या नंतर ट्रेडिंग अक्काउंट कसे काढ़ायचे. broker शिवाय आपण online ट्रेडिंग अक्काउंट काढु शकतो काय?

आपण स्टेट बँकेमध्ये ऑन -लाईन ट्रेडिंग अकौंट उघडू शकता. आपण याबद्दलच्या पुढील माहितीसाठी स्टेट बँकेत चौकशी करावी. ट्रेडिंग अकौंट आणी  ‘DEMAT’ अकौंट उघडण्याविषयीचा माझा ‘माझी वहिनी’तील लेख वाचा

नाव: Anil Gaikwad
तुमचा प्रश्न : Dear Madam,i want to know About Future & Option Trading in marathi?

आपली सुचना चांगली आहे. योग्यवेळी ब्लॉगवर या विषयावर पोस्ट लिहू.

 

Advertisements
This entry was posted in Question and answers and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

8 thoughts on “तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – July – Aug २०१५

 1. saeed shaikh

  आजच्या बिनभरवश्याच्या मार्केट मध्ये कधीही काहीही होऊ शकते, अश्या वेळेत माझ्यासारखा नवख्या व्यक्तिस आपले अमूल्य मार्गदर्शन लाभावे, मैडम मी प्रत्येक महिन्यात 2000 rs शेयर मार्केट मध्ये गुंतवयाची इच्छा ठेवतो तरी ते मई कश्यात गुंतवु याचे मार्गदर्शन करा, तशेच जे पी असोसिएट्स बद्दल ही आपले मॉल कळवा, ही विनंती….

  1. surendraphatak

   ​शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वयाची किंवा शिक्षणाची आवश्यकता नाही. तुम्ही तरुण भारत २०१५-१६ या सदरातील पहिला लेख वाचा. तुमच्या शंकांचे निरसन होईल/

 2. पिंगबॅक तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – July – Aug २०१५ | Stock Market आणि मी

  1. surendraphatak

   आपण माझ्या ब्लॉगवर ब्लॉग नंबर ५७ कॉर्पोरेट एक्शन -स्प्लिट हा ब्लोग वाचावा. यांत स्प्लिट विषयी सविस्तर माहिती दिलेली आहे.त्यामुळे आपल्या सर्व शंकांचे निरसन होईल

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s