आठवड्याचे समालोचन – ७ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर २०१५ – जनरल वार्डमध्ये शेअर मार्केट

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

Share Market terms in marathi

सोमवारी METने सांगितले की ‘अल-निनो’ च्या परिणामामुळे पावसाचा परतीचा प्रवास अपेक्षेपेक्षा लवकर सुरु झाला आहे त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होऊन दुष्काळाची शक्यता वाढली आहे ही बातमी येताच मार्केट पडू लागले आणी पुन्हा एकदा सोमवारने त्याची ख्याती कायम राखली आणी सेन्सेक्स ६०० पाईंट पडले.सर्वांनी आशा सोडून दिली. निफ्टी ७६०० च्या पेक्षा कमी झाला. विशेषज्ञ निफ्टी ७२००, ७०००, ६८०० अशी खालची खालची टार्गेट देऊ लागले.

मंगळवारी ग्लोबल निर्देशांक चांगले आले. चीनने ५% लाभांशावरील कर रद्द केला. आजच्या मार्केट रिकव्हरी मध्ये VOLUME कमी होते. UBS आणी MOODY या रेटिंग एजन्सीने भारताच्या GDPचे अनुमान ७% पर्यंत कमी केले. चीनमध्ये मागणी कमी होईल. व्याजाच्या दरामध्ये कपात झाली आणी वेळेवर रीफार्म्स होऊ शकले तरच स्थिती सुधारेल. आज पंतप्रधानांनी भारतातील दिग्गज उद्योगपती आणी बँकर्स तसेच नामांकित अर्थशास्त्री यांच्या बरोबर आर्थिकस्थिती आणी ती सुधारण्याचे उपाय यावर विचारमंथन केले.

आता जी RALLY सुरु आहे तिला ‘RELIEF RALLY’ असे म्हणतात. निफ्टी ९१०० पासून आणी सेन्सेक्स ३०००० पासून पडत आहे. मार्केट ओवरसोल्ड झोनला पोहोचले आहे. सोप्या मराठी भाषेंत सांगायचे झालं तर  मार्केट सतत पडण्याच्या ताणातून या RALLYने सुटका केली म्हणून ही RELIEF RALLY होय.

बुधवारी कमोडीटी मार्केटमध्येही सुधारणा झाली. सर्व धातूंच्या किमती थोड्याफार प्रमाणांत वाढल्या. त्याचा परिणाम म्हणून धातुशी संबंधीत असणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती वधारल्या. ब्राझीलला S&P ने जंक म्हणून डॉउनग्रेड केले.व्हेनिझुएलाची अर्थव्यवस्था कमजोर आहेच. हवेल्ल्स, ग्लेनमार्क TORRENT फार्मा या कंपन्या या देशांशी व्यापार करतात. त्यामुळे त्यांच्या शेअर्सच्या किमती कमी झाल्या.

JSW एनर्जी या कंपनीने JP असोसिएटच्या बीना थर्मल पॉवर प्लांट Rs ३५०० कोटींना विकत घेण्याचे ठरविले आहे.बीना पॉवर प्लांटची ‘installed capacity’ ५०० mw आहे आणी ही १५०० mw पर्यंत वाढवण्यासाठी पुरेशी साधनसामुग्री उपलब्ध आहे. ही खरेदी धरून JSW एनर्जीची पॉवर उत्पादनाची capacity ३१४० mw वरून ६००० mw होईल. JP असोसिएटने आतापर्यंत Rs २५०००कोटींचे विविध प्लांट्स विकले आहेत. सिमेन्स एजी ही जर्मन कंपनी भारतांत ‘मेक-इन-इंडिया’ योजनेअंतर्गत युरो १ बिलियन गुंतवणूक करून ४००० लोकांना नोकरी उपलब्ध करून देईल.

हिंदुस्थान युनिलीवरने त्यांचा ‘MODERN’ या नावाने चालणारा ‘ब्रेंड आणी बेकरी’’ बिझीनेस त्यांच्या सहा प्लांटसहित ‘NIMMAN’ या एवरस्टोन ग्रूपच्या कंपनीला अन्दाजे Rs २०० कोटी ते Rs २५० कोटींना विकायचे ठरविले आहे. ही विक्री हिंदुस्तान लीवरच्या इतर बिझीनेसमधून बाहेर पडण्याच्या पॉलिसीअंतर्गत आहे. युनायटेड स्टेट्स मधील इन्फोसिस आणी टीसीएस या कंपन्यांची H1 विसाच्या संबंधांत चौकशी पूर्ण झाली आहे या मध्ये या दोन्ही भारतीय कंपन्यांनी H1 विसा नियमांचे कोणतेही उल्लंघन केलेले नाही असे आढळून आले.पिरामल एनटअरप्राईझेस आपला फ़ायनान्सिअल सर्विसेस बिझीनेस वेगळा काढून तो ILFS खरेदी करून त्याच्यांत विलीन करण्याची शक्यता आहे.

नवकर या कंपनीचे (इशूप्राईस १५५ ) Rs १५२ ला लिस्टिंग झाले आणी हा शेअर Rs १६६ वर बंद झाला. गुरुवारी पेन्नार बिल्डिंग ब्लॉक्स आणी पुष्कर केमिकल्स या कंपन्यांच्या शेअर्सचे लिस्टिंग झाली. कोलगेट या कंपनीने १;१ या प्रमाणांत दिलेल्या बोनसवर शेअरहोल्डर्सनी शिक्कामोर्तब केले. वेदांतने कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आणी कर्मचाऱ्यांमध्ये कपात करायचे ठरवले आहे. AMTECH ऑटो ग्रूपच्या कंपन्यांचे स्पेशल ऑडीट झाल्यावरच त्याना कर्ज देण्याचा विचार केला जाईल असे जाहीर झाले.कंपनीने असे सांगितले की प्रमोटर्स कंपनीमध्ये गरज लागल्यास पैसे आणतील. कंपनी वेळ आल्यास काही प्लांट्स विकून किंवा परदेशातील स्टेक विकून पैसा उभा करेल. हे सांगताच शेअरची किंमत ७०% वाढळी अशी एखादी बातमी आल्यास इंट्राडे ट्रेड होऊ शकतो.

आज सरकारने स्पेकट्रम ट्रेडिंग नॉर्म्स जाहीर केले. जर एखाद्या कंपनीकडे एखाद्या राज्यामध्ये स्पेक्ट्रम शिल्लक असला तर ती कंपनी तो शिलकी स्पेक्ट्रम विकू शकते. या मध्ये सर्व BANDमधील स्पेक्ट्रममध्ये ट्रेडिंग होऊ शकते. जी कंपनी स्पेक्ट्रम खरेदी करेल तिला १% ‘TRANSACTION’ फी भरावी लागेल. कोणतीही कंपनी त्यांच्या स्पेक्ट्रमपैकी २५% स्पेक्ट्रम प्रती सर्कल आणी प्रती OPERATOR विकू शकते.मात्र हे स्पेक्ट्रम विकत घेवून किंवा साकारी लिलावांत विकत घेवून दोन वर्षे झालेली असली पाहिजेत. दोन्ही कंपन्याना या खरेदीविक्रीसाठी पूर्वपरवानगी घेण्याची आवश्यकता नाही. पण ४५ दिवसांच्या आंत असे एक डिक्लरेशन द्यावे लागले की आवश्यक त्या कायदेविषयक आणी प्रोसिजरल बाबी पूर्ण केल्या आहेत. यामुळे जे स्पेक्ट्रम कंपन्या काही कारणांमुळे वापरू शकत नाहीत त्यांचे मोनेटायझेशन आणी VALUE-UNLOCKING होईल. सरकारच्या या निर्णयानंतर सर्व मोठ्या टेलिकॉम कंपन्यांचे शेअर्स वाढले. सर्वांत जास्त फायदा Rcom या कंपनीला झाला. RCOM आणी रिलायंस जियो हे आपापसांत स्पेक्ट्रम ट्रेडिंग करू शकतात.

सरकारने आज राष्ट्रीय ऑफशोअर विंड एनर्जी पॉलिसीची घोषणा केली.या पॉलिसीअन्वये सरकार भारताच्या समुद्र किनाऱ्यावर ऑफशोअर विंड एनर्जी प्रोजेक्टची शक्यता पडताळून पाहिलं आणी त्याच्यासाठी टेंडर्स मागवेल. या योजनेअंतर्गत १०६००० MW पॉवर उत्पादन वाढेल अशी अपेक्षा आहे. सरकारने आज व्हाईट लेबल एटीएम मशीन उपलब्ध करणाऱ्या बँक्स सोडून इतर एजन्सीला १००% FDI(FOREIGN DIRECT INVESTMENT) ला मंजुरी दिली.

सरकारने सोवरीन गोल्ड बोंड आणी गोल्ड मोनटायझेशन योजनेला मंजुरी दिली. भारतांत २०००० टन सोने आहे असा सरकारचा अंदाज आहे. हे सोने जर मुख्या प्रवाहांत आणता आले तर भारताला करावी लागणारी सोन्याची आयात कमी होईल असा अंदाज आहे. सोवरीन गोल्ड बॉंडला (जे रिझर्व बँक इशू करेल) केंद्रीय सरकारची पूर्ण हमी असेल.हे बॉंड फक्त निवासी भारतीयच विकत घेऊ शकतील. हे बॉंड ५ ग्राम पासून १० ग्राम, ५० ग्राम, १०० ग्राम याप्रमाणे वेगवेगळ्या वजनाच्या परिमाणांत उपलब्ध केले जातील. या बॉंडची मुदत ५ ते ७ वर्षे असेल.या बॉंडची विक्री बँक्स. पोस्ट ऑफिसेस, नॉन-बँकिंग फायनांशीअल कंपन्या आणी इतर नेमलेल्या एजंटमार्फत केली जाईल. एक व्यक्ती एका वर्षांत ५०० ग्राम्पेक्षा जास्त सोवरीन गोल्ड बॉंड घेऊ शकणार नाही. या बॉंडच्या REDEMPTION साठी एजन्सीज नियुक्त केल्या जातील.या बॉडवर व्याजही मिळेल. हे बोंड EXCHANGEवर ट्रेड केले जातील. हे बॉंड कर्जासाठी collateral सिक्युरीटी म्हणून ठेवता येतील.

गोल्ड मोनटायझेशन योजनेअंतर्गत तुम्ही कमीतकमी ३० ग्राम सोने बँकेकडे १वर्ष ते १५ वर्षापर्यंत DEPOSIT ठेवू शकता. यावर तुम्हाला करमुक्त व्याज मिळेल. हे DEPOSIT तुम्ही सोने किंवा सोन्याच्या किमतीएवढ्या पैश्याच्या स्वरूपांत परत घेऊ शकता. हे सोने बँकेत ठेवण्यासाठी सोन्याची शुद्धी सांगणारे प्रमाणपत्र Assaying and Hallmarking केंद्राकडून घ्यावे लागेल.जर आपण अल्पमुदतीसाठी सोने ठेवले असाल तर आपल्यास सोने किंवा पैसे ह्या depositची मुदत संपल्यानंतर मिळू शकेल. पण आपण जर दीर्घ मुदतीसाठी सोने deposit केले असेल तर मात्र depositची मुदत संपल्यानंतर आपल्यास पैश्याच्या स्वरुपांतच पेमेंट घ्यावे लागेल.

नीती आयोगाच्या उपाध्यक्षांनी सांगितले की रिझर्व बँकेने रेट मध्ये .२५ ते १ % एवढी कपात करण्यासाठी हे योग्य वेळ आहे. भारताची पुढील वर्षांत ८% प्रगती होईल. त्यामुळे रेटकपात करण्यासाठी रिझर्व बँकेवर दबाव वाढत आहे. कमोडिटी मार्केट पडत आहे त्यामुळे वर्ष २०१६ मध्ये इंडस्ट्री मार्जीन आणी नफा वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सेबीनेसुद्धा लगाम टाईट करायला सुरुवात केली आहे.प्रत्येकाला लेवल प्लेईंग फिल्ड मिळावे अशी सेबीची इच्छा आहे. बँकेतील आपल्या depositसाठी असलेला विमा सरकार वाढवायच्या विचारांत आहे. आता हा विमा आपल्या सर्वप्रकारच्या depositसाठी फक्त Rs.१००००० एवढाच उपलब्ध आहे.

शेअरमार्केट मधील पडझडीचे निदान लागले की औषध लागू पडले की शेअर मार्केट्ची इच्छाशक्ती मजबूत आहे माहित नाही पण शेअरमार्केटने धीर धरला आणी मंगळवारपासून मार्केटमध्ये जीव आला मार्केट सुधारू लागले.जरी पडले तरी उसळी घेऊ लागले. गुंतवणूकदारांना व ट्रेडर्सना उत्साह आला. डॉक्टर्स म्हणजेच मार्केटचे विश्लेषक मार्केट सुधारल्याची ग्वाही देऊ लागले. आता मार्केट्ची तब्येत बरी आहे I C U मध्ये ठेवण्याची गरज नाही. जनरल वार्ड मध्ये ठेवू या. मात्र अजूनही दक्षता घ्यावी लागेल. त्यामुळे ८ तारखेपासून मार्केटला I C U मधून जनरल वार्ड मध्ये आणले आता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज कधी मिळतो ते बघू या.

 

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

4 thoughts on “आठवड्याचे समालोचन – ७ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर २०१५ – जनरल वार्डमध्ये शेअर मार्केट

 1. mayurssss

  Amtek Auto २००० शेअर्स मी ५५ रुपयांनी १५ सप्टेंबर २०१५ ला विकत घेतले आहेत आता त्यांची किमत ४८.०० आहे मी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हे शेअर्स घेतले आहेत पण गेले काही दिवस Amtek Auto बद्दल खूप अफवा येत आहेत. कंपनी वर खूप कर्ज आहे आणि ते डीफोल्त करणार आहेत अशा प्रकारच्या अफवा येतायत, अशा परिस्थितीत मी काय करू शकतो? शेअर्स तोट्यात विकून टाकू कि होल्ड करू? कृपया मार्गदर्शन करा.

  धन्यवाद

  1. surendraphatak

   ​मी ठराविक शेअरच्या बाबतींत कोणताही सल्ला कोणालाही देत नाही. फक्त शेअर मार्केट समजावून देणे आणी धोक्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा हे मी सांगते. ज्यावेळी एखादा शेअर अव्वाच्या सव्वा पडत असेल किंवा अव्वाच्या सवा वाढत असेल तर त्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करावा. धोका जाणवल्यास दूर राहावे. शक्यतो विस्तवाशी खेळ करू नये. धोका माहित असूनही तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर ते अगदी थोड्या प्रमाणांत करावे आपण किती धोका पत्करू शकतो याचा अंदाज घ्यावा. ​

 2. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – 14 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर २०१५ – गणरायाची स्वारी, शेअरमार्केटच्या द्वारी | S

 3. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – 14 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर २०१५ – गणरायाची स्वारी, शेअरमार्केटच्या द्वारी | S

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s