आठवड्याचे समालोचन – २६ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर – उधळू रिझल्ट्सचे रंग वाचकांच्या संग

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Stock market information in marathi

या आठवड्यांत मला दोन तीन वाचकांचे फोन आले – “आठवड्याचे समालोचन हे सदर तुम्ही नियमितपणे देता त्याबद्दल तुमचे आभार परंतु त्यामध्ये दिलेल्या सर्व घटना घडून गेलेल्या असल्यामुळे आम्ही हे सदर फक्त डोळ्याखालून घालतो.” असे एकंदरीत वाचकांचे म्हणणे होते.

आठवड्याचे समालोचन या सदरांत जवळजवळ ८०% गोष्टी घडून गेलेल्या असतात.त्या घडलेल्या गोष्टींवर मी स्पष्टीकरण देते. त्याचा नव्याने मार्केटमध्ये व्यवहार करू इच्छिणाऱ्यांना लोकांना उपयोग होतो. तसेच सर्व लोकांचा शेअरमार्केट हा पूर्णवेळ व्यावसाय नसतो. त्यामुळे ते दिवसाचा पुरेसा वेळ शेअरमार्केटमधील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी देऊ शकत नाहीत. दिवसभर आपल्या नोकरी उद्योग धंदा यात अंग मोडून काम केल्यावर आठवड्याच्या शेवटी आपली गुंतवणूक असलेल्या कंपन्याच्या बाबतीत काही बातमी किंवा घटना आहे कां हे समजते. त्यामुळे एका अर्थाने आपल्या पोर्टफोलीओचेही एक सिंहावलोकन करता येते.तसेच आठवड्यातील मार्केटशी संबंधीत बातम्या एकत्र मिळतात. जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा तिचे पडसाद काय उमटले ह्याची मी चर्चा करते. तशीच घटना काही काळानंतर दुसऱ्या कंपनीच्या बाबतीत घडल्यास त्याप्रमाणे खरेदीविक्रीची योजना करता येते. प्रत्येक अनुकूल किंवा प्रतिकूल घडामोडीमुळे शेअर किती वाढेल किंवा शेअर किती पडेल याचा अंदाज बांधून खरेदीविक्रीचा निर्णय घेता येतो. त्याच बरोबर काही कंपन्यांच्या बाबतीत काही विपरीत बातमी असेल तर ती बातमी मी आवर्जून देते. त्या कंपनीच्या संदर्भांत तुम्हाला गरज वाटल्यास तुम्ही अधिक माहिती मिळवावी हा त्यामागील उद्देश असतो. या आठवड्यांत EROS INTERNATIONAL चा उल्लेख केला. काही गोष्टी मला कंपनीची press CONFERENCE ऐकत असताना समजतात त्या तुमच्या नजरेस आणून दयाव्यांत असे वाटते.

कोणताही IPO येणार , RIGHTS इशू येणार, अशी जेव्हा मी बातमी सांगते तेव्हा तुम्ही तशी तयारी करू शकता. भांडवलाची सोय करू शकता. RIGHTS इस्शुचा फार्म आपल्याला मिळाला कां हे बघून मिळाला नसल्यास ब्रोकरकडून आणता येतो. जेव्हा लाभांशाची किंवा बोनस इशुची बातमी दिलेली असते तेव्हा आपल्या खात्याला लाभांश किंवा बोनस शेअर्स जमा झाले कां हे तुम्ही बघू शकता. एकंदरीतच तुम्हाला सावध ठेवणे हा माझा उद्देश आठवड्याचे समालोचन लिहिताना असतो .त्यामुळे फक्त डोळ्याखालून न घालता काळजीपूर्वक हे सदर वाचा अशी विनंती.

EROS INTERNATIONAL या कंपनीमध्ये काही कॉर्पोरेट गव्हरनन्सच्या संबंधांत इशू निर्माण झाला आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअरची किंमत खूप कमी झाली. कंपनीने दिलेल्या स्पष्टीकरणाने आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचे समाधान झाले नाही. भारती एअरटेलचा निकाल समाधानकारक लागला. उत्पन्नामध्ये इतर उत्पनाचा वाटा बराच आहे. ARPUS मध्येही फारसी वाढ झाली नाही.

HDFC आणी HDFC बँक या दोन्हीचा रिझल्ट त्यांच्या परंपरेनुसार चांगला लागला. पेट्रोनेट एल एन जी ने RASGAS या विदेशी कंपनीशी TAKE OR पे या टर्म्स वर करार केला होता. नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढल्यामुळे त्याची किंमत कमी झाकी. त्यामुळे पेट्रोनेतट एल एन जी ही कंपनी RASGAS कडून घेतलेला gas विकण्यांत अडचणी अनुभवत आहे. त्यामुळे पेट्रोनेट एल एन जी या कंपनीला ठरल्याप्रमाणे Rs ९४०० कोटी RASGAS या कंपनीला द्तावे लागतील किंवा ठरल्याप्रमाणे त्यांच्याकडून ठरलेल्या किंमतीला gas घ्यावा लागेल. हा करार अवास्तव असल्याने RASGAS बरोबर नव्याने वाटाघाटी सुरु केल्या आहेत.

इंडिगो या प्रवासी विमानवाहतूक करणाऱ्या कंपनीचा IPO (INITIAL PUBLIC OFFER) आला आहे. ही कंपनी विमानवाहतूक क्षेत्रांत आहे की विमानांचा व्यापार करत आहे अशी शंका यावी असे त्यांचे बीझीनेस मॉडेल आहे. ते प्रथम AIRBUS कंपनीकडून विमाने विकत घेवून ती इतर कंपन्यांना विकतात आणी नंतर तीच विमाने त्या कंपन्यांकडून परत लीजवर घेतात.या कंपनीची नेटवर्थ नेगेटीव्ह झाली आहे. कारण त्यांनी असलेला पैसा प्रमोटर्सना लाभांश म्हणून वाटून टाकला. शेअरची ऑफर महाग आहे असे IPO तज्ञाचे मत आहे. समाजामध्ये काही माणसे आशावादी तर काही माणसे निराशावादी असतात. आशावादी माणसे एखादी गोष्ट घडेल असा होकारार्थी विचार करतात आणी निराशावादी माणसे एखाद्या गोष्टीत येणाऱ्या अडचणीचाच विचार करतात. मार्केटमध्येसुद्धा BULLS (मार्केटमध्ये शेअर्सची किंमत सतत वाढत राहील अशी अपेक्षा करणारे) आणी बेअर्स ( मार्केटमध्ये शेअर्सच्या किमती सतत कमी होत राहतील अशी अपेक्षा करणारे) असे दोन प्रकार असतात. त्यामुळे एकाच घटनेची वेगवेगळ्या प्रकारची चर्चा आणी मते ऐकायला मिळतात. अशीच चर्चा सध्या ‘इंडिगो’ च्या IPO बद्दल सुरु आहे. बुल्स म्हणतात लिस्टिंग गेन्स होणार नाहीत पण सतत ५ वर्षे कंपनी फायद्यांत आहे त्यामुळे ३ ते 5 वर्षांनी चांगला फायदा होईल. बेअर्स म्हणतात शेअरची ऑफर खूप महाग आहे. IPO साठी अर्ज करू नका. बाकीचे लोक म्हणतात की एविएशन ( विमानवाहतूक) क्षेत्रातील कंपन्यांनी शेअरहोल्डर्सना आजपर्यंत फारसा फायदा मिळवून दिला नाही. उदा :जेट एअरवेज, त्यामुळे या IPO च्या वाट्याला न गेलेले बरे अशी या स्थितप्रज्ञ लोकांची भूमिका आहे .

एखादा IPO आला की त्याच सेक्टरमधल्या बाकीच्या कंपन्यांचे रीरेटिंग होते आणी IPO आणणाऱ्या कंपनीबरोबर इतर कंपन्यांची तुलना होत असते.त्यामुळे त्याच क्षेत्रातील इतर कंपन्याच्या शेअर्सची किमत वाढते उदा:जेट एअर वेज, स्पाईस जेट.

एस एच केळकर या अत्तरे आणी सुगंधी पदार्थे बनविणार्या कंपनीचा IPO आला आहे. IPO चा प्राईस band Rs १७३ ते Rs १८० असा आहे. प्रमोटर्स आणी BLACKSTONE स्वतःच्या मालकीचे शेअर्स विकणार आहेत. प्रमोटर्स ज्याज्या वेळी आपला स्टेक विकतात तेव्हा कंपनीच्या भविष्याविषयी लोकांना काळजी वाटते.

सरकारचे लक्ष ज्या सेक्टरकडे जाते त्याबाबतीत सावधानता बाळगली पाहिजे. फार्मा कंपन्या अवाच्या सव्वा नफा कमवत आहेत आणी लोकांना औषधे महाग मिळत आहेत त्यामुळे त्यांनी COST DATA दिला पाहिजे असे सांगितले जात आहे.अर्थातच कंपन्यांची प्रायसिंग पॉवर कमी झाल्यामुळे मार्जीन कमी होण्याची शक्यता निर्माण होते.

सरकारने स्वतः डायव्हेस्टमेंटसाठी निर्धारित केलेले लक्ष कमी केले. कारण ज्या कंपन्याच्या शेअर्सची डायव्हेस्टमेंट करायची होती त्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव मार्केटमध्ये खूपच कमी आहेत . त्यामुळे डायव्हेस्टमेंटचे लक्ष्य पुरे होईल असे वाटत नाही. सरकारने आपल्या ताब्यांत असलेली ६ प्रतिष्ठीत हॉटेल्स लीजवर देण्याचे ठरवले आहे.

ICICI BANK ही खासगी क्षेत्रातील बँक परदेशांत गायडन्स देते. PROBLEMATIC कर्ज Rs १५७०० कोटी आहेत असे सांगितले होते.शुक्रवारी ICICI बँकेचा रिझल्ट आला. अपेक्षा फारशी नव्हतीच तरी रिझल्ट ठीकठाकच म्हणावा लागेल. ICICI LOMBARD ची VALUE Rs १७२२५ कोटी केली जात आहे. त्यातील ९% स्टेक विकण्याची ICICI बँकेला परवानगी मिळाली. AXIS बँकेला सुद्धा CONTINGENCY फंडातून प्रोविजन करावी लागली. दोन पॉवर प्रोजेक्टसाठी कर्ज दिली पण ती दोनही प्रोजेक्ट एकाच कंपनीची आहेत असे आढळून आले. एकूण Rs १८५० कोटींची लोन कमी किमतीत ARC (ASSET RECONSTRUCTION COMPANY) ला विकली. यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांप्रमाणे खाजगी क्ष्त्रातील बँकांनाही NPA ची लागण झाली की काय असे वाटू लागले आहे. याला अपवाद मात्र येस बँक आणी कोटक महिंद्रा बँक ठरली आहे. या दोन्हीही बँकांचे रिझल्ट चांगले आले.

नवीन फ्लूओरीन, अंजनी PORTLAND सिमेंट, DR REDDY,स, ग्लेनमार्क फार्मा, येस बँक, मारुती फोर्स मोटर्स, ग्रासिम, बजाज ऑटो,हिरो मोटो ,MRF, टीव्हीएस मोटर्स, VIP इंडस्ट्रीज, EMPHASIS BFL या कंपन्यांचे रिझल्ट चांगले आले. JUST DIAL भारत फोर्ज ITC याचे रिझल्ट समाधानकारक आले नाहीत. डिश टी व्ही चा रिझल्ट चांगला आला. पण त्यांच्या CEOव्यंकटेश यांनी कंपनीतून राजीनामा दिल्यामुळे शेअर पडला. श्री व्यंकटेश यांनी कंपनीला चांगली प्रगती करून दिली होती. ज्या कारणांमुळे कंपनीच्या कामकाजावर आणी पर्यायाने शेअरच्या किमतीवर परिणाम होऊ शकतो त्यांत महत्वाच्या पदांवरील माणसांनी कंपनी सोडली तर कंपनीच्या प्रगतीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होउ शकतो हे कारणसुद्धा लक्षांत ठेवणे जरुरीचे आहे.

NTPC या सरकारी कंपनीचा नफा वाढला [परंतु त्यांनी नंतर असे जाहीर केले की आम्हाला Rs ७३० कोटींचा करपरतावा मिळाल्यामुळे आम्ही एवढा नफा दाखवू शकलो.  BUYBACK ऑफ शेअर्सचा विचार करण्यासाठी सन टी व्ही ने ५ नोव्हेंबरला बोर्ड मीटिंग बोलावली आहे. सन टीव्ही ही DEBT FREE कंपनी असून त्यांच्याकडे Rs ७५० कोटी कॅश आहे.

सांगायचा मुद्दा असा कि शेअरमार्केटमधील घडामोडींकडे लक्ष द्या. हे मार्केट फार हुशार आहे प्रत्येल घडणाऱ्या घटनेचे प्रतिबिंब येथे ताबडतोब बघायला मिळते. तुम्ही प्रत्येक घटनेचा अर्थ लावायचा प्रयत्न केला तर उत्तरही मिळते. मार्केटच्या दृष्टीकोनातून,कोणतीही कंपनी चांगली किंवा कोणतीही कंपनी वाईट असत नाही. कंपनीच्या कामगिरीवर सर्व अवलंबून असते. कंपनीचे चांगल्या कामगिरीसाठी कौतुक होते आणी वाईट कामगिरीसाठी शिक्षा होते. इथे भेदभावाला जागा नाही.

विमान कंपन्या, पेपर क्षेत्रातील कंपन्या, खताचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या, रेल्वेसाठी काम करणाऱ्या कंपन्या, पॉवर उत्पादन करणाऱ्या कंपन्या, आणी infrastructure क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये बऱ्याच लोकांचे पैसे बरेच दिवस अडकले आहेत.

जागतिक बँकेच्या ‘EASE OF DOING BUSINESS’ रेटिंग आणी लिस्टमध्ये भारताचा नंबर वर आला. पहिल्या ५० मध्ये नंबर यावा अशी सरकारची महत्वाकांक्षा आहे. सेबीने गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेवून F & O मार्केटच्या संबंधात लॉट साईझ नाध्ये बदल केला. यामध्ये किरकोळ गुंतवणूकदरांनी F & O मार्केटमध्ये गुंतवणूक कमी करावी कारण या मार्केटमधील धोक्यापासून किरकोळ गुंतवणूकदारांचे रक्षण व्हावे अशी सेबीची इच्छा आहे.

केंद्र सरकारने आज AVIATION पॉलिसीचा ड्राफ्ट जाहीर केला. मेंटेनन्स रिपेअरिंग ओपेरेशनचा विचार या पॉलिसीमध्ये केला आहे. ही पॉलिसी अमलांत आली तर विमान कम्पन्यांना फायदा होईल असे कंपन्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे विमान कंपन्यांचे शेअर वाढले,

FOMC ची मीटिंग झाली FED ने रेटमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. डिसेंबरच्या मीटिंगमध्ये रेट वाढवण्याविषयी विचार होईल असे जाहीर केले

एल आय सी ही आयुर्विमा क्षेत्रातील एक दिग्गज सरकारी कंपनी आहे. या कंपनीकडे असणारा शिलकी पैसा काही प्रमाणांत ती शेअरमार्केटमध्ये गुंतवत असते. या वर्षाच्या पूर्वार्धांत एल आय सी ने शेअरमार्केटमध्ये Rs ४५०००कोटी गुंतवले या मध्ये ऑफर फॉर सेल (OFS) मध्ये Rs १५००० कोटी गुंतवले. या वर्षाच्या उत्तरार्धांत एल आय सी Rs ५०००० कोटी शेअरमार्केटमध्ये गुंतवणार आहे. एल आय सी टेलिकॉम आणी एवीअशन (विमानवाहतुक) क्षेत्रांत गुंतवणूक करण्याचे टाळते, किंवा धोकादायक समजते. एल आय सी काही वेळेला जेव्हा त्यांना वाटते की एल आय सीचे शेअरहोल्डिंग असलेल्या कंपन्यामध्ये अल्पसंख्यांक शेअरहोल्डर्सच्या हिताविरुद्ध काही निर्णय घेतले जात आहेत तेव्हा पुढाकार घेवून अशा निर्णयांना विरोध करते. आपण एल आय सी कुठे गुंतवणूक करते याकडेही लक्ष ठेवावे कारण ही गुंतवणूक करण्यासाठी एल आय सी ची तज्ञाची समिती असते. त्यामुळे आपल्यालाही काही सल्ला मिळाल्यासारखे होते.

आठवड्याचे समालोचन लिहिताना मी एप्रिलमध्ये आलेले वार्षिक रिझल्ट्स आणी जुलैला आलेले पहिल्या तिमाहीचे रिझल्ट्स व ऑक्टोबर\मध्ये आलेले दुसऱ्या तीमाहिच्या रिझल्ट्सची चर्चा केली यातून एकच सुचवायचे आहे रिझल्ट ऐकून इंट्राडे पोझिशन घेणाऱ्यानी घाई करू नये. कधी कधी रिझल्ट वर वर पाहतां चांगला असतो परंतु त्यामध्ये इतर उत्पनाचा (करपरतावा, मालमता विकून झालेला नफा, किंवा कोर्ट केस कंपनीच्या बाजूने झाल्यामुळे झालेला फायदा) समावेश असतो. हे उत्पन्न वजा जाता कंपनी फारशी प्रगतीपथावर नाही असे दिसत असते. त्याउलट एखाद्या कंपनीचा रिझल्ट वर वर पाहतां खराब असतो परंतु “one time loss किंवा one time खर्च’ असतो तो यावर्षी केल्यामुळे नफा कमी होतो किंवा त्याचे तोट्यांत रुपांतर झालेले असते. त्याच बरोबर जाहिरातीवर खर्च करीत असतात. पण त्यामुळे कंपनीच्या प्रगतीसाठी केलेला खर्च असे गुंतवणूकदार मानतात. नुकताच ब्लोग लिहित असताना L & T चा रिझल्ट आला. वर वर पाहतां रिझल्ट चांगला आहे परंतु प्रॉफीट मध्ये Rs ३०९ कोटींच्या इतर उत्पन्नाचा समावेश आहे. त्यामुळे घाईघाईने इंट्राडे साठी खरेदी किंवा विक्री केल्यास तोटा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.ज्या काही कंपन्यांचे रिझल्ट उरले आहेत ते पुढील महिन्यात लागतील. त्याची चर्चा ओघाओघाने पुढील सामालोचानांत आपण वाचू शकाल. .

 

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

3 thoughts on “आठवड्याचे समालोचन – २६ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर – उधळू रिझल्ट्सचे रंग वाचकांच्या संग

  1. Datta Deshmukh

    Namaskar mam aaplya blog baddal dhanyawad market baddal khup aawad hoti pan entry karnyasathi adhar kahich navta jo aaplya market animi blog ni dila
    Mi aaple purn blog read kelet Ani angel broking madhe dmat a/c kadhlay athavdyache samalochan sudha khup khup Chan Ani faydeshir aahe mam intraday baddal ankhi kahi mahiti shakya zalyas dyach mam ek Don divas Tari class ghyach maza mobile no. What’s app no. 7588066693 ahe dhanyawad mam
    From nanded (marathwada)

  2. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – २ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबर – नाच नाचुनी अति मी दमले | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s