आठवड्याचे समालोचन – १६ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर – मार्केटमधली संगीत खुर्ची

या आठवड्यापासून समालोचनाचा format थोडा वेगळा द्यायचा प्रयत्न आहे. हा नवीन format तुम्हाला समजायला सोपा जाईल हि आशा. तुमचा या नवीन format बद्दल जर काही अभिप्राय असेल तर जरूर comment करून कळवा.

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Marketची संगीत खुर्ची

Photo by Rick Audet via Flickr

या आठवड्यांत मार्केटमध्ये मजाच मजा झाली. BSE SENSEX २५८६८ आणी NIFTY ७८५६ वर बंद झाला. आपण संगीत खुर्ची (MUSICAL CHAIR) हा खेळ खेळतो की नाही तशीच हालचाल मार्केटमध्ये सुरु होती. संगीत खुर्चीच्या खेळांत जसे MUSIC वाजलं की सर्वजण धावायला सुरुवात करतात आणी MUSIC थांबले की खुर्ची शोधून त्या खुर्चीत पटकन बसतात. मार्केटमध्ये MUSIC कोण वाजवत होते ते दिसत नव्हते. MUSIC ऐकू येत नव्हते. पण शेअर्सच्या किंमती मात्र झटपट बदलत होत्या. तटस्थपणे ज्यांनी शेअर्सच्या किंमतीतील हालचालींकडे लक्ष दिले असेल त्यांना नक्कीच मजा वाटली असेल. आता पुढच्या आठवड्यांत कोणत्या शेअर्समध्ये हालचाल होईल ते शोधायचे.

आठवड्याच्या ठळक बातम्या

या आठवड्यांत साखर चहा तांदूळ तंबाखू या नेहेमीच्या वापरातल्या वस्तूंच्या शेअर्स मध्ये हालचाल होती हे सर्व शेअर्स तेजीत होते.

गेले १५ दिवस साखरेच्या शेअर्सच्या भावांत तेजी दिसत आहे. नेहेमी आधी शेअर्सच्या किंमती वाढतात आणी नंतर कांरणे शोधली जातात.साखरेच्या शेअर्सच्या किंमती वाढू लागल्याबरोबर हे शेअर्स कां वाढत आहेत याचा शोध घेतला गेला. तेव्हां पुढील कारणे मिळाली. साखरेचे जागतिक उत्पादन मागणीपेक्षा कमी आहे. भारतांत आणी युरोपमध्ये दोन्हीकडे साखरेचे उत्पादन आणी मागणी यांत तफावत आहे. रेणुका शुगर्सच्या बाबतींत पाहिल्यास त्यांचा व्यापार ब्राझील मध्ये आहे तेथे इथेनालला चांगला भाव मिळतो आहे. त्याबरोबरच केंद्र सरकारने उस पिकविणाऱ्या शेतकऱ्याला टनामागे Rs. ४५ सबसिडी थेट शेतकऱ्याच्या खात्यांत जमा करणार आहे असे सांगितले.

तांदूळ पिकवून निर्यात करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती वाढत होत्या. थायलंडमध्ये तांदळाचे उत्पादन कमी झाले. इराणने तांदुळाच्या आयातीवरील निर्बंध काढून टाकले. त्यामुळे एल टी फूड्स. कोहिनूर फूड्स, के आर बी एल, उशेर अग्रो या कंपन्यांचे भाव वाढले.

चहा उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स म्हणाले “आम्ही तरी कां मागे राहू.” यावर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे त्यामुळे चहाचे उत्पादन कमी होईल. अल निनोचा जप सुरु आहेच. केंनयामध्ये चहाचे उत्पादन ४५००० टन घटले. थंडीचे दिवस आले की चहाच्या किमती वाढतात. चहाच्या शेअर्सच्या किंमतीही वाढतात. हे एक निरीक्षण आहे.

तंबाखू तसेच तंबाखूशी संबंधीत शेअर्सच्या किंमती वाढत आहेत. गोल्डन टोबको, GODFREY फिलिप्स, VST इंडस्ट्रीज, ITC या शेअर्सच्या किंमती वाढल्या.

जसजसे रेल्वे अंदाजपत्रकाची तारीख जवळ येत आहे त्यामध्ये रेल्वेचे अंदाजपत्रकामध्ये जास्त गुंतवणूक केली जाईल व रेल्वेचे काम करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स वाढण्यास सुरुवात झाली.उदा : टीटाघर WAGON, स्टोन इंडिया, टेक्स माको रेल. कालिंदी रेल ,

या आठवड्यांत टेक्स्टाईल सेक्टरमधील कंपन्यांचे शेअर्सही वाढत होते. नैसर्गिक gas क्षेत्रातील RASGAS या कंपनीने भारतीय कंपन्यांबरोबर नैसर्गिक gas पुरवण्याच्या करारांत किमत कमी करून आणी पेनल्टी माफ करण्याची तयारी दाखवली आहे याचा फायदा पेट्रोनेट एन एन जी, IGL गुजरात gas , आणी GAIL या कंपन्यांना होईल.

सरकारी announcments

GST बिल शीतकालीन अधिवेशनांत पास करण्यासाठी आता केंद्रसरकार पुढाकार घेत आहे. अर्थमंत्री आता JD(U) तसेच कॉंग्रेस या पक्ष्यांना बिलासाठी पाठींबा देण्याची विनंती करीत आहेत.याचा लॉजिस्टिक्स क्षेत्रातील कंपन्यांना फायदा होईल. VRL लॉजिस्टिक्स, गती, BLUE DART

Oil आणी gas सेक्टरसाठी नवीन पॉलिसी आणण्याच्या विचारांत सरकार आहे. नवीन पोलीसीचा मसुदा सरकारच्या विचाराधीन आहे. सरकारने आणखी आठ कोल ब्लॉक्स लिलाव करायचे ठरवले आहे. त्याचे टाईमटेबल कोलसचिवांनी जाहीर केले.

सरकारने SME (SMALL AND MEDIUM ENTERPRISES) निर्यातदारांना ३% व्याजाच्या दरांत सूट देण्याची घोषणा केली.

7व्या वेतन आयोगाच्या शिफारसी या आठवड्यांत येण्याची शक्यता आहे. या शिफारसींमुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे पगार २२% ते २३% वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे अच्छे दिन येण्याची शक्यता हो ! पण प्रत्येक बातमीचे धागेदोरे मार्केट आपल्याशी छान जुळवून घेते. जेव्हां अच्छे दिन आल्यामुळे लोकांच्या हातात जास्त पैसा येतो तेव्हा discretionary spending वाढते. म्हणजेच माणसे नवीन घर शोधतात, असलेल्या घराची दुरुस्ती करतात. सायकल असलेला स्कूटर तर स्कूटर घेणारा कार घेण्याचा विचार करतो. या मुळे ७व्या वेतन आयोगाचे वाढीव पैसे हातात आल्यावर बॅंका, बांधकाम क्षेत्र ऑटो पेंट तसेच व्हाईट गुड्स उत्पादन करणाऱ्या कंपन्या यांचे शेअर्स वाढतील असा अंदाज आहे.

सरकारने जाहीर केलेल्या GOLD MONETISATION SCHEMEला लोकांकडून फारच थंडा प्रतिसाद मिळाला. सर्व देशातून फक्त ४०० ग्राम सोने योजनेंअंतर्गत जमा झाले. तसेच गोल्ड bond आणी सोन्याची नाणी यांचीही फारसी विक्री झाली नाही. सोन्याचे परीक्षण करणारी अधिक केंद्रे उघडण्याची तसेच करआकारणीबाबत निश्चित भूमिका सरकारने घेण्याची जरुरी आहे असे तज्ञाचे मत आहे.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

फार्मा सेक्टरमध्ये बऱ्याच घडामोडी घडत आहेत. डीशमन फार्मा ज्या क्लोवीस या कंपनीला पुरवठा करते त्या क्लोवीस कंपनीला USFDA ने नोटीस दिली. यावर डीशमन फार्माने सांगितले की त्यांना कोणत्याही उत्पादन युनिटसाठी USFDA कडून नोटीस मिळालेली नाही. तसेच डीशमन फार्मा ही कंपनी क्लोवीस या कंपनीशिवाय इतर कंपनीबरोबरही व्यवहार करत आहे त्यामुळे या घटनेचा त्यांच्या कंपनीवर जास्त परिणाम होणार नाही.

आधीच तीन उत्पादन युनिटसाठी USFDA कडून पत्र आलेल्या DR रेडीज कंपनीने आर्थिक माहिती चुकीची दिली असे लुन्दिन LAW या कंपनीने जाहीर करून कंपनीविरुद्ध क्लास एक्शन सूट दाखल करण्याचे आवाहन केले. त्यामुळे DR रेडीज या कंपनीचा शेअर Rs. २५० पडला. नंतर कंपनीने स्वतः आणी नोमुरा या ब्रोकर कंपनीने स्पष्टीकरण दिल्यावर शेअर पडायचा थांबला आणी शेवटी Rs १०० खाली राहिला. हे नेहेमी घडते. कारण हे शेअर्स खूप महाग असतात. हे शेअर विकताना लोक शंभर वेळेला विचार करतात. पुन्हा हे शेअर्स कमी भावाला मिळणे कठीण असते. परंतु कधी कधी अतिशय वाईट बातमी आल्यास ‘विनाशकाले समुत्पन्ने’ असा विचार करून हडबडून जावून लोक शेअर्स विकून टाकतात. त्याचवेळी स्वस्तांत शेअर मिळतो आहे म्हणून विकत घेणारेही तितकेच असतात. एवढ्या जास्त किंमतीच्या शेअरमध्ये फारसे कोणी इंट्रा करीत नाही पण अशी मोठी आणी प्रतिकूल बातमी आल्यास shortसाईड ट्रेड होऊ शकतो.

इन्फोसिस या IT क्षेत्रातील दिग्गज कंपनीने आपल्या ऑपरेटिंग मार्जिनबद्दल वार्निंग जाहीर केली. त्यामुळे इन्फोसिसच्या शेअरची किंमत कमी झाली.

सतत पडणाऱ्या क्रूडच्या किंमतीमुळे विमानवाहतूक करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीमध्ये वाढ दिसून येत आहे. इंडिगोच्या वेगळ्या बिझीनेस मॉडेलमुले हा शेअर लिस्टिंग झाल्यापासून सतत वाढत आहे. त्याबरोबरच जेट एअरवेज आणी स्पाईसजेट या प्रवासी विमान वाहतूक कंपन्यांचे शेअर्सही वाढत आहेत.CCI ने कार्टलायझेशनसाठी बसवलेल्या पेनल्टीचा परिणामही या शेअर्सच्या किंमतीवर दिसून आला नाही तसेच क्रूड सतत पडत असल्यामुळे पेन्ट, टायर, तसेच केमिकल्स उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली.

टाटा स्टील ही कंपनी आपला यु के मधील कारखाना विकणार आहे.एन दी टी व्ही ला एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट कडून फेमा च्या उल्लाघानासाठी नोटीस मिळाली.BOSCH या दिग्गज ऑटो पार्ट्स उत्पादन करणाऱ्या कंपनीला VOKSWAGON संबंधीत घोटाळयासाठी तपासणी अधिकाऱ्याने नोटीस दिली.BOSCH या कंपनीने स्पष्ट केले की आम्ही VOLKS WAGAN या कंपनीला वादग्रस्त पार्टचा पुरवठा केला नाही.

कॉर्पोरेट एक्शन

या आठवड्यांत S H KELKAR LTD या कंपनीच्या शेअर्सचे लिस्टिंग झाले RS १८०ला IPO मध्ये दिलेल्या शेअरचे लिस्टिंग RS २०० च्यावर झाले.  कोची शिपयार्ड या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीचा IPO आणण्यासाठी सरकारने मंजुरी दिली.  कोल इंडिया मध्ये केंद्र सरकार १०% डायव्हेस्टमेंट करणार आहे त्याआधी कंपनी अंतरिम लाभांशाची घोषणा करेल असा अंदाज आहे

Results

या वर्षांत अधिक महिना आल्यामुळे सणासुदीचा मोसम जरा उशिराच सुरु झाला. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यांत हा मोसम सुरु झाल्यामुळे तिसऱ्या तिमाहीचे FMCG ऑटो कंपन्यांचे रिझल्ट्स चांगले येतील अशी अपेक्षा आहे.

Economyच्या गोष्टी

या महिन्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत घाऊक किमतीं ३.८४ % कमी झाल्या,  या आधीच्या महिन्यांत ४.५४% कमी झाल्या होत्या. भारताची निर्यात गेल्या आठ दहा महिन्यांत सतत कमी होत आहे. पण आयातही कमी होत असल्यामुळे CAD (CURRENT ACCOUNT DEFICIT) वर त्याचा परिणाम जाणवत नाही.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं

जेव्हा सेक्टर चर्नींग चालू असते तेव्हा मार्केटला लीडरशिप नाही असे अनुमान काढले जाते. अर्निंग सिझनही फारसा चांगला गेला नाही. नजीकच्या भाविष्यकाळांत मार्केटला काही ट्रिगर नाही. लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये GST बिल पास झाले किंवा काही महत्वाची बिले पास झाली तरच नजीकच्या भविष्यकाळात मार्केट तेजींत राहील. परंतु या सेक्टर चर्नींगच्या कालखंडांत ज्यांच्याकडे शेअर्स अडकलेले असतील त्यानी संधी मिळाल्यास शेअर्स चढ्या भावांत विकून सुटका करून घ्यावी.पुढील आठवड्यांत एक्सपायरी आहे आणी गुरुनानक जयंतीची सुट्टी आहे त्यामुळे काय काय घडेल ते पाहू.

 

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

2 thoughts on “आठवड्याचे समालोचन – १६ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर – मार्केटमधली संगीत खुर्ची

  1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – २३ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर – रेट कट आणी GST च्या हिंदोळ्यावर शेअर मार्केट

  2. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – २३ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर – रेट कट आणी GST च्या हिंदोळ्यावर शेअर मार्केट

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s