आठवड्याचे समालोचन – २३ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर – रेट कट आणी GST च्या हिंदोळ्यावर शेअर मार्केट

गेल्या आठवड्यापासून समालोचनाचा format थोडा वेगळा द्यायचा प्रयत्न आहे. हा नवीन format तुम्हाला समजायला सोपा जाईल हि आशा. तुमचा या नवीन format बद्दल जर काही अभिप्राय असेल तर जरूर comment करून कळवा.

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

waves-circles-285359_640

मनुष्यस्वभाव शेअरमार्केटलाही  लागू होतो. मनुष्याला कोणत्याही प्रकारची अनिश्चितता आवडत नाही. लहान मुलेसुद्धा म्हणतात “बाबा तुम्ही एकतर द्या किंवा नाही देत असे स्पष्ट सांगा परंतु आज देतो उद्या देतो असे सांगून लटकत ठेवू नका.” त्याचप्रमाणे फेडच्या व्याज दर वाढीचे झाले आहे. धड रेट वाढवत नाहीत आणी एक वर्ष आम्ही वाढवणार नाही असे सांगतही नाहीत. गुंतवणूकदार या अनिश्चिततेला कंटाळले आहेत. कारण गुंतवणुकीचा निर्णय घेता येत नाही. रेट वाढला तर डॉलर मजबूत होईल त्या तुलनेत जगातील इतर देशांचे चलन कमजोर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तर दुसऱ्या बाजूला GST आहे. २५ तारखेपासून लोकसभेचे शीतकालीन अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनांत GST बील पास होणार की नाही या प्रश्नावर घासाघीस चालू आहे. अशाप्रकारे या आठवड्यांत GST आणी फेडरेट या दोन्हींच्या हिंदोळ्यांत शेअरमार्केट  झुलत राहिले. यांत झुलले ते सर्व प्रकारचे गुंतवणूकदार.

हिंदाल्को आणी वेदान्ता या दोन कंपन्या BSE सेन्सेक्स मधून वगळल्या जातील. आणी त्यांच्या जागी एशियन पेंट्स आणी अडानी पोर्ट या कंपन्या BSE  सेन्सेक्स मध्ये सामील होतील त्यामुळे UNDERPERFORMER असणाऱ्या  कंपन्या जाऊन त्या जागी एशीअन पेंट्स आणी अडानी पोर्ट या नफ्यांत असणाऱ्या कंपन्यांचा समावेश सेन्सेक्समध्ये होत असल्यामुळे सेन्सेक्सचा P. E. रेशियो कमी होईल. म्हणजे सेन्सेक्स स्वस्त होईल त्यामुळे गुंतवणुकीचे प्रमाण वाढेल

आठवड्याच्या ठळक बातम्या

 

 • रुपया US$=६६.३९ पर्यंत पडला. रिझर्व बँकेने याच भावाला US डॉलर्स विकले.
 • हॉटेल्स कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती वाढल्या. उदा: व्हाईसराय हॉटेल्स, ताज जी व्ही के, हॉटेल लीला.
 • या आठवड्यांत  USA अर्थव्यवस्थेचे काही आकडे आले. USGDP ची वाढ २.१% झाली. कन्झ्युमर स्पेन्डिंग  ३% ने वाढले. निर्यात .९% तर आयात २.१% ने वाढली. USA ची अर्थव्यवस्था सुधारली तर फेड आपले रेट डिसेंबरमध्ये वाढवील अशी सर्व तज्ञांची अटकळ आहे. १६ डिसेंबरला फेडची मीटिंग आहे या मीटिंग मध्ये रेट वाढणार हे जवळ जवळ निश्चित आहे. त्यामुळे डॉलर मजबूत होईल. रुपयाची किंमत कमी होईल. रुपयाच्या कमजोरीमुळे कोणत्या कंपन्यांच्या शेअर्सला फायदा होईल हे पाहिले पाहिजे.याचा कमोडीटी मार्केटवर ही परिणाम होईल.
 • या आठवड्यांत पॉवर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्सही वाढले. डायमंड पॉवर , ज्योती STRUCTURE

सरकारी announcements

 

 • NPPA ही औषधाच्या किंमतीवर नियंत्रण ठेवणारी AUTHORITY आहे. WOCKHART या कंपनीची तीन औषधे NPPA च्या कंट्रोल लिस्ट मधून बाहेर पडली.त्यामुळे या कंपनीचा शेअर वाढला.
 • क्रूडवरील सेस कमी करावा  अशी मागणी ओईल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी केली आहे. सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे ओईल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती वाढल्या. उदा ONGC, IOC
 • बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी १ एप्रिल २०१६ पासून बिहार राज्यांत दारूबंदी(ड्राय स्टेट)  जाहीर केली असे जाहीर केल्यामुळे दारूचे उत्पादन करणाऱ्या शेअर्सच्या किमती खाली आल्या.उदा : रेडीको खेतान, युनायटेड स्पिरीट.
 • पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षांना GST बिल पास करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केल्यामुळे GST बिल चालू असलेल्या शीतकालीन अधिवेशनांत पास होईल ही शक्यता वाढली आहे. त्यामुळे फुटवेअर, लॉजीस्टिक, FMCG या क्षेत्रातील कंपन्याना फायदा होईल.
 • रिझर्व बँकेने मायक्रो फायनान्स कंपन्यांना अल्प मुदतीसाठी कर्ज देण्याची मर्यादा Rs १५००० वरून Rs ३०००० केली. याचा फायदा  एस के एस मायक्रो फायनान्स या कंपनीला होइल
 • रिझर्व बँकेने GOLD MONETISATION SCHEME मधील अडचणी दूर करून तिचे परिचालन सोपे करू असे जाहीर केले.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • कोटक महिंद्रा बँकेला जनरल इन्शुरन्ससाठी IRDA कडून परवानगी मिळाली.
 • यु पी एल ही कंपनी ADVANTA या कंपनीमध्ये विलीन  होईल. ADVANTA च्या शेअरहोल्डरना एक UPL चा शेअर आणी तीन प्रेफरन्स शेअर्स मिळतील. या वीलीनकरणानंतर ही CROP SOLUTION Iमधील सर्वांत मोठी कंपनी होईल.
 • तागावर ANTI DUMPING ड्युटी लावल्यामुळे तागासंबंधीचे शेअर्स वाढले. उदा. CHEVIOT, GLOSTER.
 • ASHOK  LEYLAND या ऑटो क्षेत्रातील कंपनीला ३६०० SUVचा पुरवठा करण्यासाठी ऑर्डर मिळाली.

कॉर्पोरेट एक्शन

 • PFIZER ही फार्मा क्षेत्रातील कंपनी इस्त्रायलची  ALLERGAN ही कंपनी विकत घेणार आहे. हे डील Rs १६००० कोटींना झाले.
 • MAX त्यांचा हेल्थ इन्शुरन्समधील स्टेक बुपाला (फॉरीन पार्टनर) विकणार आहे.
 • NIPON LIFE ही परदेशी कंपनी Rs २२६५ कोटींना रिलायंस लाईफ मधील २३% स्टेक विकत घेणार आहे. हा स्टेक खरेदी केल्यानंतर त्यांचा स्टेक रिलायंस लाईफ मध्ये ४९% होईल. यानंतर कंपनीचे नाव रिलायंस NIPPON लाईफ इन्शुरन्स असे होईल.

Results

 • सीमेन्स या कंपनीचा ४ थ्या तिमाहीचा निकाल जाहीर झाला. कंपनीच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा झाली असे निकालावरून जाणवले

 

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं

ज्यावेळी मार्केटमध्ये अनिश्चितता असते तेव्हां वायदा बाजारामध्ये किंवा निर्देशांकात ट्रेडिंग करणे तोट्याचे ठरू शकते. त्यामुळे SMALL CAP आणी MID CAP शेअरमध्ये आणी कॅश मार्केटमधल्या शेअर्समध्ये ट्रेडिंग वाढते. त्यामुळे थोडासा फायदा घेवून झटपट बाहेर पडावे. या पुढील आठवड्यांत अधिवेशन चालूच रहाणार आहे काही महत्वाची बिले पास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लक्ष देवून अडकलेले शेअर्स फायद्यांत निघत असल्यास विकून मोकळे होणे हिताचे ठरेल.पुढील आठवड्यांत मार्केटचा रागरंग पाहू.

 

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

3 thoughts on “आठवड्याचे समालोचन – २३ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर – रेट कट आणी GST च्या हिंदोळ्यावर शेअर मार्केट

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०१५ – भित्यापाठी फेडचा ब्रह्म राक्षस | Stock Market आण

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s