आठवड्याचे समालोचन – ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०१५ – भित्यापाठी फेडचा ब्रह्म राक्षस

गेल्या आठवड्यापासून समालोचनाचा format थोडा वेगळा द्यायचा प्रयत्न आहे. हा नवीन format तुम्हाला समजायला सोपा जाईल हि आशा. तुमचा या नवीन format बद्दल जर काही अभिप्राय असेल तर जरूर comment करून कळवा.

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

face-23887_640

रेट कट आणी GST च्या हिंदोळ्यावर झुलणारे मार्केट आपण गेल्या आठवड्यांत पाहिले. मार्केट्ची झुलण्याची हौस काही भागेना आणी गुंतवणूकदारांच्या जीवाला काही आराम मिळेना. एखादे हट्टी मुल जसे झोपाळ्यावरून खाली उतरायला तयार नसते, उंच उंच झोके घेते पण त्याच वेळी आईचा जीव मात्र टांगणीला लागतो. असेच काहीसे या आठवड्यांत झाले. BSE निर्देशांक सेन्सेक्स २५६८३ तर निफ्टी ७७८२ वर बंद झाले. आता हा मार्केटचा हट्ट आहे की चेष्टा आहे ते बघू या.

 

आठवड्याच्या ठळक बातम्या

 • US अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्यामुळे १५ डिसेंबरला होणाऱ्या मीटिंगमध्ये फेड दरवाढ जाहीर करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.
 • IMF (INTERNATIONAL MONETARY FUND) युआन या चीनच्या चलनाला आपल्या “RESERVE CURRENCY BASKET मध्ये सामील करणार आहे. यामुळे चीनची युआन या चलनावर आंतरराष्ट्रीय पसंती मिळून चीन जागतिक प्रवाहात USA, युरोप आणी जपान याच्या बरोबर सामील होईल. यामुळे युआन हे चलन फ्रीली युजेबल आणी SDR (SPECIAL DRAWING RIGHTS) मध्ये US डॉलर, युरो, ब्रिटीश पौंड आणी जपानी येन बरोबर सामील होईल. ह्यामुळे चीनी उत्पादनांचे इतर देशांत DUMPING कमी होईल असा अंदाज आहे.

सरकारी announcements

 • सरकार आपल्या IDBI मधिल स्टेकपैकी १५% स्टेक IFC ला ( INTERNATIONAL FINANCE CORPORATION) विकण्याची शक्यता आहे. IDBI आणी IFCI या दोन्ही सरकारी संस्थांचा BSE ( BOMBAY STOCK EXCHANGE) आणी NSE (NATIONAL STOCK EXCHANGE) मध्ये स्टेक आहे. हा स्टेक या दोन्ही संस्था विकू शकतात. IDBI ने स्पष्ट केले की IDBI त्यांचा NSE आणी BSE मधील स्टेक विकणार नाही.
 • सरकारने असे स्पष्ट केले की ते खत आणी तत्सम उत्पादने करणाऱ्या कंपन्याना मदत करून नफ्यांत आणण्याचा प्रयत्न करेल. यामुळे FACT, मद्रास फरटीलायझर, NFL या लिस्टेड आणी हिंद फरटीलायझर या लिस्टेड नसलेल्या कंपन्यांचा फायदा होईल.
 • रिझर्व बँकेने आपल्या पॉलिसी मध्ये कोणत्याही रेटमध्ये बदल केले नाहीत. त्यांनी सांगितले की जरी गेल्या वर्षभरात RBIने १.२५% रेट कट केला असला तरी सरकारी तसेच खाजगी क्षेत्रातील बँकांनी सरासरी .६०% च या रेट कटचा फायदा पुढे कर्जदारांना कर्जाच्या दरांत कपात करुन दिला. या बँकांनी मुदत ठेवीवरचे दरही कमी केले. त्यामुळे आता RBI ने मार्जीनल रेटवर आधारीत बेस रेट निश्चित करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे यापुढे बँकांनी मुदत ठेवीवरचे व्याज दर कमी केले की आपोआप बँकेचा बेस रेट कमी होईल आणी पर्यायाने कर्जावरील दरही कमी होतील. हा बेस रेटचा फॉर्म्युला दोन दिवसांत बँकांना कळवला जाईल असे सांगितले.
 • RBI ने CPI CONSUMER PRICE INDEX) चे लक्ष्य २०१७ या वर्षांत ५% ठेवले आहे.
 • १६ डिसेंबरच्या मीटिंगमध्ये FEDने रेट वाढवले तर सरकार CAD ३.५% ठेवू शकते कां ? ते पाहून RBI पुढील निर्णय घेईल.
 • पुढील RBIची पॉलिसी फेब्रुवारी २०१६ मध्ये असल्यामुळे या वर्षांत आता रेट कट होण्याची शक्यता कमी झाली आहे.
 • SEBI ने असा प्रस्ताव ठेवला आहे की जर प्रमोटर्सनी IPOद्वारा उभारलेल्या पैशांपैकी ७५% पैसे ऑफर डॉक्यूमेंट मध्ये उल्लेखिलेल्या बाबींसाठी वापरले नाहीत तर ज्या शेअरहोल्डरना हे मान्य नसेल तर त्या शेअरहोल्डरकडील शेअर्स त्या त्या वेळी असणाऱ्या मार्केट प्राईसला प्रमोटर्सना BUYBACK करावे लागतील.
 • सरकार देना बँकेतील आपला स्टेक विकून Rs १००० कोटी उभारण्याचा विचार करत आहे
 • शिपबिल्डींग आणी कच्च्या मालावर कस्टम ड्युटी आणी एक्साईज ड्युटी रद्द केली हा निर्णय २४ नोव्हेंबर पासून लागू होईल.
 • सरकारने LED उद्योगाला उत्तेजन देण्यासाठी CFL वरील सबसिडी बंद केली आहे.हे दोन्ही प्रकार इलेक्ट्रिक ग्लोब शी संबंधीत आहेत

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • मोनेत इस्पात या कंपनीला दिलेल्या कर्जाचे शेअर्समध्ये रुपांतर करून कर्जदारांनी या कंपनीचा ताबा घेतला.
 • WOCKHARDT च्या चिखलठाणा युनिटला UK ने क्लीन चीट दिली
 • पी व्ही आर ही चित्रपट उद्योगातील कंपनी आपल्या स्क्रीन्सची संख्या वाढवणार आहे. CCIने डी एल एफ चा चीत्रपट प्रदर्शनाचा उद्योग आणी पीव्हीआर यांच्या एकत्र येण्याला हरकत नोंदविली आहे. कारण या करारामुळे साउथ दिल्ली मध्ये त्यांची मोनोपोली होईल.
 • VOLKSWAGEN या कंपनीने ३.२३ लाख कार्स ज्यामध्ये चुकीचे इंजिन बसवले आहे अशा कार्स परत बोलावल्या आहेत. कंपनी यातील चूक दुरुस्त करून EMISSION इशू येणार नाही याची काळजी घेणार आहे.
 • थंडीचे दिवस असल्याने हॉटेल कंपन्या आणी पर्यटनाशी संबंधीत असलेल्या कंपन्याचे शेअर्स तेजीत होते. उदा: हॉटेल लीला, EIH, कामत हॉटेल्स, रॉयल ORCHID, THOMAS KOOK आणी cox and किंग्स.
 • या आठद्यातील एक ठळक बातमी म्हणजे तामिळनाडूमध्ये अव्याहत कोसळणारा पाउस. या पावसामुळे टेलीकोम IT ऑटो (TVS मोटर्स, आयचर मोटर्स) विमान कंपन्या, तसेच तामिळनाडूमध्ये कारखाने असलेल्या सर्व कंपन्यांवर प्रतिकूल परिणाम झाला. उदा. चेन्नई पेट्रो, SRF ने मनाली प्लांट बंद केला.
 • डाबर कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितले की त्यांच्या विक्रीपैकी काही वाटा नेपाळमधून येतो. नेपाळमधील ज्यूसच्या विक्रीवर नेपाल सीमाबाबत असणाऱ्या वादाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. विक्रीत १०% ते १५% घट होईल.
 • डीशमन फार्माच्या अहमदाबाद प्लांट साठी USFDA ने ४८३ फॉर्म दिला होता पण कंपनीने सुधारात्मक उपाय केल्यामुळे त्याना क्लीन चीट दिली.
 • SEBI ने U B होल्डिंगवर Rs १५ कोटींचा फाईन लावला.

पुढील आठवड्यांत येणारे IPO

 • या आठवड्यांत दोन IPO येत आहेत . (१) मुंबईतील अल्केम labs ही फार्मा क्षेत्रातील नफ्यात असणारी, DEBT FREE आणी दरवर्षी DOUBLE DIGIT प्रगती करणारी कंपनी आहे. ही कंपनी मुख्यतः भारतातच आपल्या उत्पादनाची विक्री करते. ही कंपनी ANTI INFECTIVES मार्केटमध्ये लीडर आहे.कंपनी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्येही पदार्पण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांनी आपली काही उत्पादने USFDA च्या मंजुरी साठी पाठवली आहेत. हा IPO ८ डिसेंबरला उघडून १० डिसेंबरला बंद होईल. प्राईस band Rs १०२० ते Rs १०५० असा आहे. ह्या IPO द्वारे Rs १३११ कोटी ते Rs १३५० कोटी उभारले जातील.
 • दुसरी कंपनी ही दिल्लीतील ‘DR.LAL PATH LABS. ’ही डायग्नोस्टिक हेंल्थकेअर सर्विसेस क्षेत्रातील DEBT FREE कंपनी आहे. ह्या उद्योगातील ही पहिलीच लिस्टेड कंपनी असेल. ही कंपनी हब and स्पोक सिस्टीमवर काम करते. ह्या कंपनीची एक मुख्य LABORATORY असून 150च्या वर ‘SATELLITE LABS’ आहेत. सर्व SATELLITE LABS’ मधून sample गोळा करून ते मुख्य LAB मध्ये टेस्टिंग साठी पाठविले जाते. डायग्नोस्टिक्स हेल्थकेअर उद्योगाची १६ ते १७ % प्रगती होईल असा अंदाज आहे.या IPOची प्राईस Rs ५४० ते Rs ५५० होईल असा अंदाज आहे.
  NSE वर LUX इंडस्ट्रीज ह्या होजियरी क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्सचे सोमवारी लिस्टिंग झाले.

 

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं

GST, फेड रेट, आणी चेन्नईमध्ये आलेला अकाली पाउस आणी ECBने जाहीर केलेले पण अपेक्षेपेक्षा कमी आलेले PACKAGE या सर्व कारणांमुळे हा आठवडा तसा खराबच गेला. आठवड्याच्या बातम्या लिहून लिहून मी कंटाळले. एवढ्या वेगवेगळ्या बातम्या समजत होत्या. काही गोष्टींचा खुलासा शुक्रवारी मार्केट संपल्यानंतर होईल त्याचा परिणाम मात्र पुढील आठवड्यांत पहायला मिळेल. बघुया काय होते.

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

3 thoughts on “आठवड्याचे समालोचन – ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०१५ – भित्यापाठी फेडचा ब्रह्म राक्षस

 1. Manoja shinde

  नमस्कार मैडम,माझा प्रश्न असा आहे की,
  आपण जे शेयर खरेदी करतो,नेमके तेच शेयर खुप दिवस घसरतात.मग डे ट्रेनिंग करताच येत नाही.
  pls.mam ans.my question .
  Thanks.

 2. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – ७ डिसेंबर ते ११ डिसेंबर २०१५ – मार्केट्ची LOC(लाईन ऑफ कंट्रोल) | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s