आठवड्याचे समालोचन – ७ डिसेंबर ते ११ डिसेंबर २०१५ – मार्केट्ची LOC(लाईन ऑफ कंट्रोल)

गेल्या आठवड्यापासून समालोचनाचा format थोडा वेगळा द्यायचा प्रयत्न आहे. हा नवीन format तुम्हाला समजायला सोपा जाईल हि आशा. तुमचा या नवीन format बद्दल जर काही अभिप्राय असेल तर जरूर comment करून कळवा.

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

mktandme-logo1.jpg

गेल्या आठवड्यापासून मार्केट पडत आहे. ओळीने ६ दिवस पडले. त्यामुळे मार्केट बेअर्सच्या ताब्यांत गेले आहे असे वाटू लागले.जे शेअर्स पडत आहेत ते जबरदस्त volume ने पडत आहेत त्यामुळे मार्केट पडतच राहील असा अंदाज वर्तवला जात होता. मार्केटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्यांचा विश्वास ढळू लागला. फेड रेट वाढवणार आणी GST या शीतकालीन सत्रांत पास होणार नाही या दिशेने जमू लागलेले ढग यामुळे निराशा वाढली त्याचा परिणाम झाला. पण गुरुवारी अचानक काय झाले माहीत नाही. रीलायंसने पुढाकार घेतला आणी मार्केट सावरले. सलमानं खानची निर्दोष मुक्तता आणी मार्केटने घेतलेली २०० अंकांची उसळी या घटना एकापाठोपाठ घडल्या. तेजी करणाऱ्यांना विश्वास नव्हताच पण चित्रविचित्र बातम्यांमुळे मंदी करणाऱ्यांनाही विश्वास नाही. या आठवड्याच्या शेवटी BSE निर्देशांक सेन्सेक्स २५०४४ आणी NSE निर्देशांक निफ्टी ७६१० वर बंद झाले.  शुक्रवारी मार्केटने BSE निर्देशांकांने (सेन्सेक्स) दिवसभरांत २५००० ची आणी NSE निर्देशांक निफ्टीने ७६०० ची मेक ओर ब्रेक लेव्हल तोडून शेअर्सचे सैन्य मंदीच्या मैदानांत घुसवले. त्यामुळे बेअर्सची सरशी झाली. आता पुढील आठवड्यांत धोरणांत बदल करून ट्रेडिंग करावे लागेल असं दिसतय.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • पुढील आठवड्यांत १५ तारखेला फेड या US(UNITED STATES ऑफ AMERICA) मधील सेन्ट्रल बँकेची मीटिंग होणार आहे. या मीटिंगमध्ये USअर्थव्यवस्था सुधारत असल्याने फेड व्याजाचे दर ०.२५% ने वाढवील ही जवळजवळ निश्चिती झाली आहे.
 • रेल्वे इंटरपोल स्थापन होणार आहे हल्लीच्या काळांत सर्व देशांत जे रेल्वेमध्ये अतिरेकी हल्ले झाले त्याला प्रतिबंध करण्यासाठी ही संस्था स्थापन केली जात आहे यांत २०० देश सामील होतील यातील सदस्य देशांना सुरक्षेच्या संबंधांत आंतरराष्ट्रीय युनियन ऑफ रेल्वेज माहिती देईल.
 • या आठवड्यांत जपानचे पंतप्रधान SHINZO ABE हे भारताला भेट देणार आहेत या भेटीत ‘BULLET TRAIN’ भारतांत चालू करण्या विषयी चर्चा चालू होईल. ही BULLET ट्रेन ३०० KM वेगाने मुंबई अहमदाबाद या मार्गावर धावेल. ही योजना पूर्ण व्हायला ६ ते ७ वर्षे वेळ लागेल आणी या साठी जपान $१५ BILLION कर्ज देईल.
 • पाकिस्तानांत आलेल्या पुरामुळे पाकिस्तानांत होणारी कापसाची निर्यात वाढली.

सरकारी announcements

 • सरकार GAS BASED स्टील प्लांटना मदत देण्याच्या विचार्रांत आहे. या कंपन्या एल एन जी वापरत असतील तर ५% आयात ड्युटी कमी करण्याचा विचार करीत आहे. याचा फायदा :-, JSW स्टील , एस्सार स्टील, PSL, वेलस्पन कॉर्प या कंपन्यांना होईल.त्याच बरोबर सरकारने मिनिमम निर्यात किंमत( MEP) ठरवली.
 • आज मंत्रीमंडळाने रिअल एस्टेट रेग्युलेटर बिल मंजूर केले. या बिलाप्रमाणे ५०० स्क्वेअर मीटर एरिआ किंवा ८ flats किंवा यापेक्षा जास्त एरिआ किंवा flats असलेल्या सर्व प्रोजेक्टचे रजिस्ट्रेशन करावे लागेल. FLAT ग्राहकांची संमती घेतल्याशिवाय प्रोजेक्ट आराखडा किंवा अटींमध्ये बदल करता येणार नाही. प्रोजेक्टसाठी जमा झालेल्या रक्कमेपैकी ५०% ते ७०% रक्कम वेगळ्या एस्क्रो अकौंटमध्ये ठेवावी लागेल. प्रोजेक्टसाठी जमा झालेला पैसा त्याच प्रोजेक्टसाठी जास्तीत जास्त वापरावा लागेल. बिल्डर्स आणी डेव्हलपरला दर ६ महिन्यांनी आपल्या अकौंटची तपासणी करावी लागेल. ग्राहकांनी पेमेंट करायला उशिर केल्यास किंवा बिल्डरने किंवा डेव्हलपरने POSSESSION देण्यास उशीर केल्यास दोघांनाही सारखीच पेनल्टी बसवली जाईल.
 • ज्यूट उद्योगाला उत्तेजन देण्यासाठी काही वस्तुंच्या पॅकेजिंगमध्ये ज्यूटचा वापर करण्याचे धोरण सरकार ठरवणार आहे.
 • डाळीचा बफर stock करण्यासाठी सरकारला परवानगी दिली.
 • PROVIDENT फंडावरील व्याजाचा दर वाढविण्याचा सरकार विचार करीत आहे.
 • ETHANOL वर आकारला जाणारा राज्य सरकारचा १.५% ते २% कर रद्द होण्याची शक्यता आहे.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • स्टरलाईट टेक्नॉलॉजी ही कंपनी आपला पॉवर बिझीनेस डीमर्ज करणार आहे. पॉवर बिझीनेसची किमत प्रती शेअर Rs २२ आहे आणी ती आताच्या शेअरच्या किंमतीत समाविष्ट आहे.
 • परदेशांत चहाच्या किंमती वाढल्या त्यामुळे चहा उत्पादन क्षेत्रातील कंपन्याचे भाव वाढले. उदा :- जयश्री टी, हर्रीसन मलयालम, मकलोईड रसेल,
 • क्रूडचे रेट ७ वर्षातील खालच्या पातळीवर गेले आणी पडतच राहिले याचा फायदा पेंट, टायर, विशिष्ट केमिकल्स उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना झाला आणी त्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती वाढल्या.
 • ग्लेनमार्क फार्मा आणी DR. रेड्डीज या फार्मा क्षेत्रांतल्या कंपन्या व्हेनीझूएला या देशाशी व्यवहार करतात. हा देश प्रामुख्याने क्रूडची निर्यात करणारा देश आहे. त्यामुळे सतत ढासळणाऱ्या क्रूडच्या किंमतीचा या देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या फार्मा कंपन्यांच्या बिझिनेसवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.
 • CESC या पॉवर उत्पादन क्षेत्रांत असणाऱ्या IPL ची टीम घेतली. CESC च्या सब्सिसिडीअरीने (न्यू रायझिंग) पुणे बेस्ड IPL टीम विकत घेतली पण हा सौदा त्यांना महागांत पडला.
 • टी सी एस या कंपनीला ओमान हौसींग बँकेकडून फायनानशिअल साफ्टवेअर साठी ऑर्डर मिळाली.
 • इन्फोसिस या कंपनीने इझरेलबेस्ड ‘CLOUDENDURE’ ही क्लाउड टेक्नोलोजीच्या क्षेत्रांत काम करणारी कंपनी विकत घेतली. या मुळे क्लाउड टेक्नोलॉजी या क्षेत्रांत काम करणे इन्फोसिसला सोपे जाईल.
 • आयनाक्स विंड या कंपनीने आंध्रप्रदेशातील सरायू विंड पॉवर ही कंपनी विकत घेतली.
 • स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांचा NSE (NATIONAL STOCK EXCHANGE) मधील १५% स्टेक Rs ६००० कोटीना विकणार आहे.

Economyच्या गोष्टी

 • रिझर्व बँकेने जाहीर केले की रिझर्व बँक १ जानेवारी २०१७ पर्यंत चार समान हप्त्यांत SLR (STATUTORY LIQUIDITY RATIO) मध्ये १०० BPची कपात करेल. SLR आता २१.५ % आहे. याचा अर्थ बँकांना त्यांच्या DEPOSIT पैकी २१.५% गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये गुंतवावे लागतात. आजच्या तारखेमध्ये बँकांचे SLR या पेक्षा जास्त पातळीवर असल्यामुळे (याला कारण म्हणजे कर्जासाठी असलेली कमी होत जाणारी मागणी) बँकांना या घोषणेमुळे फारसा फायदा होईल असे वाटत नाही.
 • CCI (COMPETITION COMMISSION OF INDIA) ने सिमेंट उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर कार्टलायझेशन करण्यासाठी Rs ६३०० कोटी रुपये penalty लावली होती. या कंपन्यांनी केलेल्या अपिलांत COMPACT(COMPETITION APPELLATE TRIBUNAL) ने या कंपन्यांवर लावलेली PENALTY रद्द केली.
 • BSE (BOMBAY STOCK EXCHANGE) यांनी असे जाहीर केले की ते आता प्रत्येक शेअरच्या किंमतीवर रोजच्या सर्किट बरोबर दर आठवड्यासाठी,दर महिन्यासाठी आणी दर तिमाहीसाठी सर्किट ठरवले जाईल. ही सर्किट जास्तीत जास्त किंमत आणी कमीतकमी किंमतीला लागू असतील.

पुढील आठवड्यांत येणारे IPO

 • इंडिअन टेरेन या कंपनीच्या शेअर्स चे स्प्लिट जाहीर झाले. या कंपनीच्या एका शेअर्सचे ५ शेअर होणार आहेत
 • IPO आणी लिस्टिंग :- NSE वर पिलानी इन्व्हेस्टमेंट या कंपनीचे लिस्टिंग झाले.
 • गेल्या आठवड्यातील IPO अल्केम lab हा इशू ४४ वेळा तर DR लाल पाथ lab हा इशू ३३ वेळा सबस्क्राईब झाले.
 • या आठवड्यांत ‘नारायणा हृदयालय’ या कंपनीचा IPO येत आहे. याचा प्राईस band Rs २४५ ते Rs २५० आहे.ही कंपनी या ipo द्वारे Rs ६०० ते Rs ६१२ कोटी रुपये उभारेल. हा ipo १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०१५ या अवधीत खुला राहील. ही कंपनी प्रसिद्ध हृदयतज्ञ DR देवी शेट्टी यांनी स्थापन केलेली असून ती ३१ शहरांमध्ये ३१ हॉस्पिटल्स आणी प्राथमिक सेवा केंद्रे चालवते. कंपनीचे उत्पन्न ३०% CAGR ने गेल्या चार वर्षांत वाढत आहे. कंपनी आपला बिझीनेस वाढवत असल्याने त्यांना वारंवार गुंतवणूक करावी लागते. कंपनी प्रगतीपथावर आहे. हा ipo येत असल्यामुळे अपोलो हॉस्पिटल्स, SRL डायग्नोस्टिक्स , इंद्रप्रस्थ मेडिकल, लोटस आय केअर, अगरवाल आय हे हॉस्पिटल्स क्षेत्रातील शेअर्स वाढले.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं

जेव्हां मार्केटमध्ये मंदी असेल किंवा अचानक मार्केट पडू लागले तर शेअर्स खरेदी साठी लावलेल्या ऑर्डर्स रद्द कराव्यात किंवा त्यांत वेळोवेळी मार्केटमधील हालचांलीप्रमाणे बदल करावा त्याउलट ज्यावेळी मार्केट तेजीत असेल तेव्हा विक्रीच्या ऑर्डर्स काढाव्यांत किंवा सुधाराव्यांत असे केल्यामुळे खरेदी स्वस्तात होते आणी शेअर्स चढ्या भावाला विकले जातात.

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे समालोचन – ७ डिसेंबर ते ११ डिसेंबर २०१५ – मार्केट्ची LOC(लाईन ऑफ कंट्रोल)

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – १४ डिसेंबर ते १८ डिसेंबर २०१५ – FED सेट गो… | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s