आठवड्याचे समालोचन – १४ डिसेंबर ते १८ डिसेंबर २०१५ – FED सेट गो…

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

By U.S. Government [Public domain], via Wikimedia Commons

By U.S. Government [Public domain], via Wikimedia Commons

हा आठवडा थोडा उत्साह्वर्धक होता गेल्या आठवड्यांत लोकांनी आपली गुंतवणूक फेड रेट, आणी GST यातील धोक्यांचा विचार करून कमी केली होती. या अडचणीला सामोरे जाण्यासाठी सर्वप्रकारे तयारी केली होती. GST बिल पास होणार नाही आणी फेड ०.२५ बेसिस पाईंट रेट वाढवेल याचा लोकांना अंदाज होताच. ६-७ दिवस मार्केट थोड्याफार प्रमाणांत ढासळत असल्यामुळे मार्केट ओव्हरसोल्ड झाले होते. गेल्या काही वर्षांचा इतिहास पहातां फेडने रेट वाढवल्यानंतर मार्केटमध्ये तेजी येते असे निदर्शनास आले होते. आणी फेडने सुद्धा आपल्या पॉलिसी डॉक्युमेंट मध्ये आगामी वर्षांत आम्ही सारासार विचार करून आणी US अर्थव्यवस्थेचा राग रंग बघून  निर्णय घेऊ असे सूचित केले. त्यामुळे गुंतवणूकदार आश्वस्त झाले मार्केटचा मूड सुधारला. आणी त्याचे प्रतिबिंब दोन्ही निर्देशांकांत (BSE सेन्सेक्स, आणी NSE निफ्टी) दिसले

 

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • USA च्या (सेन्ट्रल बँक) फेडने त्यांच्या व्याजदाराच्या रेंज मध्ये ० ते .२५ पासून ०.२५ ते ०.५० बेस पाईंट अशी वाढ केली. त्यासाठी फेडने रिटेल इन्फ्लेशन ०.५%, बेकारी वाढण्याच्या रेट मध्ये ५% घट, आणी USA अर्थव्यवस्थेच्या GDP मध्ये गेल्या दोन तिमाहीत झालेळी २.५% वाढ आणी घरगुती खर्च, वाढती उद्योगधंद्यातील गुंतवणूक आणी हौसिंग क्षेत्रातील वाढती गुंतवणूक यामुळे USA अर्थव्यवस्थेला आलेली स्थिरता हे कारण दिले.फेडने आपल्या पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये सांगितले की २०१६ या वर्षांत आम्ही सावकाश आणी USA अर्थव्यवस्थेचा अभ्यास करून रेट वाढवण्याचा निर्णय घेऊ. फेडच्या या दरवाढीचा शेअरमार्केटवर प्रतिकूल परिणाम झाला नाही कारण आपल्या शेअर मार्केटने हा अंदाज घेवूनच हालचाल केली होती. त्यामुळे फेडने रेट वाढव्ल्याच्या दुसऱ्या दिवशी सेन्सेक्सने ३०९ अंकांची उसळी मारली.
 • USAच्या आमसभेने उच्चशिक्षित भारतीय IT व्यावसायिकांसाठी “ऑउटसोर्सिंग फी” US $ २००० वरून US $ ४००० पर्यंत वाढवली.यामुळे भारतीय IT क्षेत्रातील कंपन्यांवर US $ ४०० MILLION चा अतिरिक्त बोजा पडेल.याचा परिणाम इन्फोसिस,विप्रो, HCL- INFOTECH या कंपन्यांच्या शेअर्सवर होवू शकतो.
 • PARIS या फ्रान्सच्या राजधानी मध्ये हवामानाच्या संदर्भांत जो करार झाला त्याचा रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रातील कंपन्यांना फायदा होईल असा अंदाज आहे.
 • नेपाळमध्ये रिअल जूसचे कंटेनर जप्त केले. हे कंटेनर डेटबार झालेले होते. याचा परिणाम डाबर या जूस उत्पादन करणाऱ्या कंपनीवर होवू शकतो.
 • अर्जेन्टिनाचे चलन ‘पेसो’चे २९% अवमूल्यन झाले त्यामुळे या देशाशी व्यवहार आणी व्यापार असणाऱ्या UPL, बजाज ऑटो, ADVANTAA या कंपन्यांवर परिणाम होवू शकतो.

सरकारी announcements

 • गेल्या आठवड्यांत सांगितल्याप्रमाणे RBI ने बँकांना ओव्हरनाईट, एक महिना, तीन महिने सहा महिने आणी १ वर्ष या ५ वेगवेगळ्या मुदतींसाठी बेंचमार्क रेट ठरवायला सांगितले. हे बेंचमार्क रेट एप्रिल १ २०१६ पासून अमलांत येतील.आणी दर महिन्याला प्रत्येक बँकेला हे रेट जाहीर करावे लागतील. कर्जावरील व्याजाचे दर ठरवण्यासाठी RBI ने ‘मार्जीनल कॉस्ट बेस्ड’ (MCLR) फॉरमयुला जाहीर केला. MCLR हे कर्जावरील रेट १ एप्रिल २०१६ नंतर दिल्या जाणाऱ्या कर्जांना लागू होतील. हे रेट केव्हा बदलण्यांत येतील हे बँकांना कर्जदारांना आधी सांगावे लागेल. बॅंका हे MCLR वर्षाने किंवा त्यापेक्षा कमी मुदतीनंतर बदलू शकतात. या फोर्म्युलामुळे RBIने रेट कमी केल्यावर बँकांना हा रेट कटचा फायदा कर्जदारांना त्वरीत देता येईल असा अंदाज आहे. तसेच यामुळे मुदत ठेवींवरील व्याज आणी कर्जांवरील व्याज यांची सांगड रिझर्वबँकेच्या रेटकट बरोबर घालणे सोपे जाईल. रिझर्व बँकेच्या ऑडीट रिपोर्टमध्ये असे निरीक्षण केले गेले आहे की काही बॅंका NPA कमी दाखवत आहेत तर काही बॅंका महत्वाची माहिती दडवायाचा प्रयत्न करत आहेत.
 • अर्थमंत्रालयाने आपल्या अर्धवार्षिक रिपोर्टमध्ये आर्थिक प्रगतीचे अनुमान १% ने कमी करून ७.५% केले. CPI ६% राहील. आणी वित्तीय घाटा ३.९% राहील. रेव्हेन्यू घाटा २.९ राहील.
 • सुप्रीम कोर्टाने आज आपल्या एका निर्णयान्वये डिझेलवर चालणाऱ्या SUV आणी 2000CC आणी त्यावरची इंजिन असणाऱ्या कार्सच्या रजिस्ट्रेशनवर दिल्ली आणी NCR मध्ये (NATIONAL CAPITAL REGION) ३१ मार्च २०१६ पर्यंत बंदी घातली. जे ट्रक दिल्लीला जात नसतील त्यांना दिल्लीत विनाकारण प्रवेश दिला जाणार नाही. ज्या ट्रकचे रजिस्ट्रेशन २००५ सालाच्या आधी झाले आहे ते ट्रक दिल्लीत प्रवेश करू शकणार नाहीत. १ एप्रिल २०१६ पासून दिल्ली आणी NCR मध्ये चालणाऱ्या सर्व TAXI CNG इंधनावर चालणाऱ्या असल्या पाहिजेत सुप्रिम कोर्टाने ग्रीन सेस दुप्पट केला.दिल्लीतील वाढते प्रदूषण कमी व्हावे या उद्देशाने ही उपाययोजना केली.  सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा सगळ्यांत प्रतिकूल परिणाम महिंद्र &महिंद्रा या ऑटो क्षेत्रातील कंपनीवर होवू शकतो.कंपनीने सांगितले की कंपनी सध्याच्या डीझेल कार्समध्ये पेट्रोलवर चालणारे इंजिन बसवण्याचा प्रयत्न करेल. तसेच कंपनीच्या इलेक्ट्रिक पॉवरवर चालणार्या कार्स लोकप्रिय होतील असा अंदाज व्यक्त केला.तसेच कंपनीने SUVKUV ही पेट्रोलवर चालणारी नवी SUV लौंच करण्याची घोषणा केली. या निर्णयाचा अनुकूल परिणाम (CNG च्या वापरांत वाढ होणार असल्यामुळे) इंद्रप्रस्थ gas, गुजरात gas, तसेच GAIL या कंपन्यांवर होवू शकतो.
 • केंद्रसरकार या शीतकालीन राज्यसभेच्या अधिवेशनांत GST पास करून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी त्यानी हवी तेवढी लवचिकता दाखविण्याची तयारी दाखविली आहे. पण आजच्या तारखेला तरी हे शक्य होईल असे वाटत नाही.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • मारुती लिमिटेडच्या अल्पसंख्यांक भागधारकांनी गुजरातमध्ये उत्पादन युनिट काढण्यासाठी सुझुकी मोटार कॉर्पोरेशनच्या १००% सबसिडीला मंजुरी दिली. या उत्पादन युनिटमध्ये सुझुकी कंपनी Rs८००० कोटी ते Rs. १०००० कोटी पर्यंत इक्विटी शेअर्सच्या माध्यमातून गुंतवणूक करेल.
 • HUL(हिन्दुस्थान युनिलीवर लिमिटेड) ही कंपनी हेअरकेअर क्षेत्रातील “इंदुलेखा” हा brand Rs.३३० कोटींना विकत घेणार आहे. हा brand आयुर्वेदिक केशतेल विकत असून केरळ, तामिळनाडू आणी कर्नाटकांत लोकप्रिय आहे..
  टी सी एस या IT क्षेत्रातील दिग्गज कंपनीने चेन्नईत आलेल्या पुरांमुळे प्रॉफिट कमी होईल अशी प्रॉफिट वार्निंग दिली. याचा परिणाम टी सी एस कंपनीच्या शेअरवर झाला.
 • इन्फोसिस ही कंपनी आपले तिसऱ्या तिमाहीचे रिझल्ट्स १४ जानेवारीला जाहीर करणार आहे. या कंपनीचे निकाल पुढे येणार्या निकालांची झलक दाखवतात. इन्फोसिस या कंपनीने व्हूप या कंपनीत २०% हिस्सा US $ ३० लाखाला खरेदी केला.
 • ILFS ENGG या कंपनीला गुजरातमध्ये मेट्रो रेल प्रोजेक्टची Rs ३७४.६४ कोटींची ऑर्डर मिळाली.
  ADAG (ANIL DHIRUBHAI AMBANEE GROUP) आपल्या कंपन्यांवरील कर्ज कमी करण्याच्या प्रयत्नांत आहे.
  जर्मन विमा कंपनी ERGO आपल्या HDFC बरोबरच्या विमाक्षेत्रातील जॉईट व्हेन्चर मधील स्टेक ४९% पर्यंत वाढवणार आहे.या साठी कंपनी Rs ११२२ कोटींची गुंतवणूक करेल हा स्टेक वाढवल्यानंतर standard लाईफ चा IPO येईल.
 • प्राज इंडस्ट्रीज ही कंपनी इथनोलवर चालणारी कार डिझाईन करण्याच्या प्रयत्नांत आहे.
 • दिलवाले आणी बाजीरावमस्तानी हे दोन्ही चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे या चित्रपटांच्या यशापयशाचा परिणाम INOX, PVR आणी EROS(INT) या कंपन्यांच्या शेअर्स किंमतीवर होईल.

Economyच्या गोष्टी

 • किरकोळ महागाई निर्देशांक CPI नोव्हेंबर २०१५ मध्ये ५.४१% ने वाढला. WPI -३.८१ ऐवजी – १.९९ % झाला. क्रूडच्या किंमतीत सतत घसरण होत आहे. सोने आणी चांदी यांच्या किंमतीतही घसरण चालू आहे.

पुढील आठवड्यांत येणारे IPO

 • गेल्या आठवड्यांत १० तारखेला बंद झालेल्या ALKEM LAB आणी DR. LAL PATH LAB या दोन्ही शेअर्सचे लिस्टिंग २३ डिसेंबर २०१५ रोजी होईल..
 • नारायणा हृदयालय हा IPO १७ डिसेंबर २०१५ ला ओपन झाला.हा IPO २१ डिसेंबरला बंद होईल. प्राईसband Rs २४५ ते Rs २५० असून मिनिमम लॉट ६० शेअर्सचा आहे.

कॉर्पोरेट एक्शन

 • ग्रीन PLY या कंपनीने शेअर्सचे स्प्लिट जाहीर केले. कंपनीच्या एका शेअरचे ५ शेअर होतील.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं

जे शेअर्स पडत असतील किंवा वाढत असतील त्यांच्या VOLUME कडे लक्ष द्यावे. वाढणार्या शेअर्समध्ये VOLUME जास्त असेल तर लोकांच्या भीतीचे प्रमाण कमी झाले आणी हाव वाढली असे समजावे.आणी पडणाऱ्या शेअर्समध्ये volume वाढला असेल तर भीती वाढली आणी हाव कमी झाली असे समजावे. हे हल्ली ‘फीअर आणी ग्रीड’ निर्देशांकाद्वारे दाखवले जाते. मार्केटचे निरीक्षण करताना कोणत्या शेअर्समध्ये मजबुती आहे? कुठे PULLBACK आहे ? कोठे shortcovering? तर कोठे news बेस्ड हालचाल आहे हे पहायला शिकावे.

पुढील आठवड्यामध्ये अधिवेशनाचे तीन दिवस शिल्लक आहेत. त्यांत काही बिल्स पास होण्याची शक्यता आहे GST बिल पास होण्याची आशा अजूनही लोकांनी सोडलेली नाही. ख्रिसमसच्या सुट्टीमुळे बाजारांत volume कमी असण्याची शक्यता आहे, बघुया काय होते ते पुढील आठवड्यांत.

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

2 thoughts on “आठवड्याचे समालोचन – १४ डिसेंबर ते १८ डिसेंबर २०१५ – FED सेट गो…

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – गाजराची पुंगी वाजली तर वाजली – २१ डिसेंबर ते २४ डिसेंबर | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s