आठवड्याचे समालोचन – गाजराची पुंगी वाजली तर वाजली – २१ डिसेंबर ते २४ डिसेंबर

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Bhagyashree Phatak 1 (2)

या आठवड्यांत संसदेच्या शीतकालीन अधिवेशनाच्या लग्नाचे सूप वाजणार हे आधीच ठरलेलेच होते. मांडव घातला, वऱ्हाड आलं, आहेराची देवाण घेवाण झाली पण लग्नच लागले नाही. कोणतेही काम झाले नाही. सरकार आणी विरोधी पक्ष म्हणजे वर आणी वधू पक्षाकडील लोकांनी नुसत्या तक्रारी केल्या. पुढे लग्न कधी लावावे याची तारीख ठरवली इतकेच. बुधवारी हे सूप वाजले. पण मार्केटला काही फरक पडला नाही. जणू काही मार्केटने आधीच ठरवले होते गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली.म्हणजेच मार्केटमधील ट्रेडर्स आणी गुंतवणूकदार दोन्ही दगडावर पाय ठेवून होते. निर्णय झाला तरी वाहवा, नाही झाला तरी वाहवा! GST बिल पास होणार म्हणून लॉजिस्टिक, ऑटो, एफएमसीजी, कंपन्यांचे शेअर्स वाढले होते. आणी सिगारेट कंपन्यांचे शेअर्स पडले होते. आता बरोबर उलट परिस्थिती झाली. GST बिल पुढे ढकलले गेले. त्यामुळे जे शेअर्स वाढले ते पडायला सुरुवात झाली. जे पडले होते ते वाढायला सुरुवात झाली. नेहेमी प्रवाहाबरोबर असाल तर फायदा होतो. प्रवाहाच्या विरुद्ध बाजूने गेले तर त्रास होतो. म्हणूनच म्हणतात TREND IS FRIEND. मार्केट जुन्या गोष्टींचा आणी घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करत बसत नाही. पोझिशन बदलून पुढील मार्ग स्वीकारते. ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ असे तत्व स्वीकारत असते. जुन्या गोष्टी उगाळत बसत नाही नवे स्वीकारत असते आणी त्याचे समारंभाने स्वागत करून पुढे जात असते.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या आठवड्यांत रशियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे संरक्षण क्षेत्रातील करार होतील असा अंदाज आहे. रिलायन्स डिफेन्स या कंपनीने रशियाबरोबर Rs ६६००० कोटींचे करार केले.
 • क्रूडच्या किंमतीमधील घसरण वाढतच चालली आहे. त्यामुळे CAD मध्ये सतत सुधार दिसत आहे. त्याचप्रमाणे क्रूड हा कच्चा माल किंवा कच्च्या मालातील एक घटक म्हणून वापरणाऱ्या कंपन्यांच्या फायद्यांत वाढ होत आहे. क्रूडचा भाव एका वर्षांत US $ ६५ वरुन एका वर्षांत US $ ३३ झाला.

सरकारी announcements

 • सरकारचे राज्यसभेमध्ये बहुमत नसल्यामुळे ‘सगळं कळतं पण काहीच वळत नाही’ अशी अवस्था झाली आहे. राज्यसभेतील गोंधळामुळे BANKRUPTCY बिल, रिअल्टी REGULATOR बिल, GST या महत्वाच्या कोणत्याच बिलाला मंजुरी मिळाली नाही. औद्योगिक क्षेत्राच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची बिल होती.
 • FIPB ने या आठवड्यांत Rs १२०० कोटींच्या ९ FDI प्रस्तावांना मंजुरी दिली. त्यांत कॅडिला हेंल्थकेअर आणी व्ही -मार्ट या कंपन्यांचा समावेश आहे.
 • समुद्रातून मिळणाऱ्या मासळीच्या उद्योगाला प्राधान्य देण्याचे सरकारने ठरवले आहे. त्यामुळे DEEP SEA FISHING करणाऱ्या कंपन्याना फायदा होवू शकतो . उदा :- अवंती फीड्स
 • सरकार वनविभागाचे नियम थोडे सौम्य करणार आहे त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यातील अडचणी कमी होतील.
 • बिहार राज्यामध्ये १५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या डीझेल वाहनांना बंदी घातली.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • USFDA कडून सन फार्माला त्यांच्या हलोल प्लांटसाठी वार्निंग नोटीस मिळाली.ही नोटीस त्यांना आधी एकदा मिळाली होती आता आलेली FOLLOWUP नोटीस होती. हे न बघताच किंवा त्याची शहानिशा न करताच लोकांनी शेअर्स विकले. कंपनीने स्पष्टीकरण दिले तेव्हा पुन्हा शेअर वाढू लागला.
 • एस्सार ओईलच्या डिलिस्टिंगचा सोमवारी शेवटचा दिवस होता. शेअर्स डीलीस्स्ट होण्यासाठी ९.७५ कोटी शेअर्स ऑफर व्हायला पाहिजे होते. पण दिवसअखेर ८.५७ कोटी शेअर्स ऑफर झाले होते. त्यामुळे शेअर्सचे डीलीस्टिंग होणार नाही अशी बातमी आली. कंपनीने प्रथम Rs १३० वर डीलीस्टिंग ऑफर आणली होती. ती नंतर सुधारून Rs १४६ केली. आता पुन्हा डीलीस्टिंगची ऑफर प्राईस वाढेल असे वाटून शेवटच्या १/२ तासांत शेअर्सची किंमत वाढली.बुधवारी मात्र बातमी आली की एलआयसीने डीलीस्टिंगच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या मिनिटात २ कोटी शेअर्स डीलीस्टिंगसाठी ऑफर केले होते, ते काही टेक्निकल कारणांमुळे वेळेच्या आंत डीलीस्टिंग साठी ऑफरमध्ये समाविष्ट होऊ शकले नव्हते. हे शेअर्स STOCKHOLDING CORPकडे होते. सेबीने निर्णय घेतला एल आय सी ने ऑफर केलेले शेअर्स डीलीस्टिंगसाठी ऑफर केलेल्या शेअर्समध्ये समाविष्ट करावेत. हे २ कोटी शेअर्स डीलीस्टिंगसाठी ऑफर केल्या गेलेल्या शेअर्समध्ये समाविष्ट केल्यामुळे कमीतकमी ९ कोटी शेअर्सच्या अटीची पूर्तता होऊन डीलीस्टिंग निश्चित झाले. यावेळी या शेअर्सची किंमत Rs २६२.८० होती. त्यामुळे याच किंमतीवर शेअर्स डीलीस्ट होतील असा अंदाज वर्तवला गेला. ज्यांच्या जवळ हे शेअर्स वर्षाहून अधिक काळ असतील त्यांनी हे शेअर्स मार्केटमध्ये विकले तर त्यांना कॅपिटल गेन्स tax लागणार नाही. पण जर तुम्ही तुमचे शेअर्स डीलीस्टिंग ऑफरमध्ये दिले तर तुम्हाला कॅपिटल गेन्स tax भरावा लागू शकतो.
 • लुपिन या फार्मा क्षेत्रातील कंपनीला त्यांच्या POTASSIUM ड्रग साठी USFDA ची मान्यता मिळाली
 • जनरिक औषध LINEZOLID साठी ग्लेनमार्क फार्मा या कंपनीला ANDA मंजुरी मिळाली.
 • ऑरोबिन्दो फार्मा या कंपनीला OPHTALMIC SOLUTION साठी USFDA ची मंजुरी मिळाली.
 • NBCC या कंपनीला AIIMS कडून Rs ३००० कोटींची ऑर्डर मिळाली.
 • गोदरेज ग्रूप डेअरी उद्योगातला स्टेक वाढवणार आहे. गोदरेज अग्रोवेटमधील स्टेक ५१% केला. यासाठी त्यांनी Rs १५१ कोटी खर्च केले.
 • टाटा स्टील आपला युरोपमधील LONG PRODUCT चा कारभार विकण्यासाठी ग्रे बुल कॅपिटल बरोबर संपर्क करीत आहे.
 • विप्रो, ‘VITEOS फंड सर्विसेस’ ही कंपनी US$१३ कोटीला खरेदी करणार आहे. विप्रो डेन्मार्कची ‘DEGIGNIT’ ही कंपनी विकत घेणार आहे.
 • IDEA या टेलिकॉमक्षेत्रातील कंपनीने आंध्रप्रदेश, तेलंगाणा, केरळ आणी कर्नाटक या चार दक्षिणेकडील राज्यांत 4G सर्विसेस लौंच केल्या.
 • RCOM आणी AIRCEL या कंपन्यांमध्ये मर्जर होण्यासाठी वाटाघाटी चालू आहेत.

पुढील आठवड्यांत येणारे IPO

 • या आठवड्यांत ALKEM LAB आणी DR लाल पाथ LAB यांचे बहारदार लिस्टिंग झाले. गुंतवणूकदारांना DR लाल पाथ LAB मध्ये ६०% तर ALKEM LAB मध्ये ३०% लिस्टिंग गेन्स झाले.
 • नारायणा हृदयालय हा ipo ८.५० वेळेला सबस्क्राईब झाला. या शेअर्सचे लिस्टिंग १ जानेवारी २०१६ला होईल.
 • लवकरच वोडाफोन ही टेलिकॉम क्षेत्रातील कंपनी IPO आणण्याच्या विचारांत आहे.
 • शेअर्ससाठी असलेले प्रायमरी मार्केट बऱ्याचशा काळानंतर पुन्हा तेजीत येत आहे.

कॉर्पोरेट एक्शन

 • या आठवड्यांत मेरिको इंडस्ट्रीज, VENKY’स हे शेअर्स एक्स बोनस झाले.
 • इंडिअन टेरेन या कंपनीचे शेअर्स एक्सस्प्लिट झाले.
 • टाईड WATER OIL या कंपनीने बोनस शेअर्स आणी शेअर्स स्प्लिट वर विचार करण्यासाठी १५ जानेवारी २०१६ ला बोर्ड ऑफ डायरेक्टरची बैठक बोलाविली आहे
 • ग्रीनप्लाय या कंपनीच्या शेअर्स स्प्लिट साठी ७ जानेवारी ही रेकॉर्ड डेट ठरवली आहे.
 • MOLDTEK या कंपनीची ४ जानेवारी २०१६ या दिवशी शेअर्स स्प्लिट साठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक आहे.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं

हा आठवडा नाताळच्या तयारीचा आणी २५ डिसेंबर पासून १ जानेवारी पर्यंत नाताळ साजरा करण्याचा. त्यामुळे म्युचुअल फंड MANAGERS रजेवर असतात. त्याचा शेअरमार्केटमधील VOLUMEवर परिणाम दिसतो. REDEMPTION च्या ही ऑर्डर असतात. या सगळ्याचा परिणाम म्हणून की काय छोट्या शेअर्सची चलती दिसते.हे माझे निरीक्षण आहे. शेवटी कोणी काहीही म्हणो शेअरमार्केटचे निरीक्षण तुम्ही जेवढे कराल तेवढा शेअर्सच्या किंमतीमधील हालचालीचा जास्त मागोवा घेता येतो.

ओळीने सुट्टी आल्यामुळे चार दिवस बॅंका बंद आहेत त्यमुळे शेअरमार्केटमध्ये व्यवहार करणाऱ्यांना लीक्विडीटीची समस्या येते. अशावेळी मार्केटमध्ये volume कमी आढळते. गेले पाच सहा दिवस जी RALLY सुरु आहे त्याला आल्टरनेट rally असे म्हणतात. म्हणजे एक दिवसाआड मार्केट मध्ये तेजी मंदीचा खेळ रंगतो.याचाच अर्थ शेअरमार्केटमध्ये व्यवहार करणारे लोक जास्त धोका पत्करण्यास तयार नाहीत असे जाणवते. अशा मार्केटच्या सुस्त वातावरणांत ट्रेड करणे कठीण जाते.त्यामुळे मी तरी जपूनच पावले टाकते. आपल्या सर्वांना नाताळच्या शुभेच्छा.

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

2 thoughts on “आठवड्याचे समालोचन – गाजराची पुंगी वाजली तर वाजली – २१ डिसेंबर ते २४ डिसेंबर

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – २८ डिसेंबर २०१५ ते १ जानेवारी २०१६ – जे जे नवे ते मला हवे | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s