आठवड्याचे समालोचन – २८ डिसेंबर २०१५ ते १ जानेवारी २०१६ – जे जे नवे ते मला हवे

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

 

"Sale Sign Shop window night" by Paul§

“Sale Sign Shop window night” by Paul§

साल २०१५ ला निरोप देऊन 2016 चे स्वागत करण्याचा हा आठवडा. मोदी लाटेवर स्वार होऊन २०१४ साल गेल्याने मार्केटने बुल रनची झलक पाहिली. २०१४ च्या मानाने २०१५ साल DULL समजावे लागेल. कारण २०१४ मध्ये सेन्सेक्सने ३०००० आणी निफ्टीने ९००० चा आकडा पार केला होता. त्यामुळे अपेक्षा वाढल्या. GST बिल पास होऊ शकले नाही. मार्केट क्रूडच्या घोड्यावर स्वार झाले त्यामुळे लढाई जिंकले असे म्हणावे लागेल.

 

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • RASGAS या कतार देशांतील नैसर्गिक वायू पुरवठा करणाऱ्या कंपनीने ते पुरवत असलेल्या नैसर्गिक वायूची किमत US $ ५.५० MMBTU इतकी कमी केली.
 • GAIL आणी पेट्रोनेट एल एन जी गुजरात GAS, यांनी कराराप्रमाणे खरेदी केली नाही म्हणून आकारलेली US$ १५० कोटींची पेनल्टीही रद्द केली. या करारावर या आठवड्यांत सह्या झाल्या.

सरकारी announcements

 • टेक्नोलॉजी अपग्रेडेशन फंड (TUFF) या योजनेअंतर्गत टेक्स्टाईल सेक्टरला Rs १७८२२ कोटींचे PACKAGE मंजूर झाले . त्यामुळे १ लाख कोटींची नवीन गुंतवणूक होईल अशी अपेक्षा आहे. या सरकारच्या निर्णयाचा फायदा टेक्स्टाईल क्षेत्रातील कंपन्याना होवू शकतो उदा :- सेंच्युरी टेक्स्टाईल, बॉम्बे डाईंग, अरविंद, सेल MANUFACTURING
 • देशभरांत सोलर ROOFTOP साठी Rs ५००० कोटींचे package मंजूर केले. याचा फायदा मोझरबेअर, इंडोसोलर ltd, सोलर इंडस्ट्रीज, उजास एनर्जी, आदी कंपन्यांना होईल.
 • आयात होणाऱ्या टाईल्सवर ANTIDUMPING ड्युटी लावणार या अपेक्षेने टाईल्स उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती वाढल्या. उदा :- नीटको टाईल्स कजारीआ सेरीमीक्स इत्यादी
 • पेट्रोलियम मंत्रालयाने असे जाहीर केले की १ जानेवारी २०१६ पासून ज्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न Rs १० लाखां च्यावर असेल त्यांना एल पी जी सबसिडी मिळणार नाही.
 • आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी NCDEX च्या मुंबई आणी दिल्ली ऑफिसचा सर्व्हे केला. डाळ घोटाळ्यात या कंपनीच्या काही अधिकार्यांचा सहभाग असावा असा आयकर विभागाला संशय आहे.
 • सरकारचे डायवेस्टमेंटचे लक्ष्य पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे ज्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडे कॅश आहे त्यांना सरकार भरपूर प्रमाणांत लाभांश देण्यास सांगेल. यामध्ये SJVN, NHPC, आणी EIL या कंपन्या येतील

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • कॅडिला हेल्थकेअर या कंपनीच्या अहमदाबाद आणी मोरेना युनिटसाठी USFDA कडून वार्निंग लेटर मिळाले. हे एपीआय प्लांट आहेत. ZYFINE या नावाचे औषध येथे तयार होते. त्यावर कॅडिलाने असे स्पष्टीकरण दिले की हे औषध USमध्ये जात नाही. २०११ पासून हा वाद चालू आहे. कॅडिला या कंपनीची १६० औषधे USFDAच्या मंजुरीसाठी पाईपलाईनमध्ये आहेत. त्यांच्या मंजुरीवर याचा परिणाम होऊ शकतो. या बातमीमुळे कॅडीला हेंल्थकेअर च्या शेअरच्या किंमतीत खूपच घट झाली.
 • टायटन LTD या कंपनीने तमिळनाडूत आलेल्या पुरामुळे फायद्यावर परिणाम होईल असा इशारा दिला.
 • KEI इंडस्ट्रीज या कंपनीला इंटिग्रेटेड पॉवर डेव्हलपमेंट सिस्टीम साठी पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनकडून Rs ३८० कोटींची ऑर्डर मिळाली.
 • रिलायंस सिमेंट आपला ५.८ टन उत्पादन क्षमता असलेला सिमेंट प्लांट विकत आहे. हा प्लांट खरेदी करण्यासाठी बिर्ला कॉर्प, BLACK स्टोन, बेअरिंग आशिया या कंपन्या आघाडीवर आहेत. ही विक्री ADAG ग्रूपच्या कर्ज कमी करण्याच्या मोहिमेचा भाग आहे.
 • महिंद्रा फायनान्स ही कंपनी लवकरच जनरल इनशुअरंसच्या क्षेत्रांत उतरणार आहे.
 • पी टी सी इंडस्ट्रीजअल फायनान्स ह्या कंपनीने पॉवर आणी INFRASTRUCTURE या क्षेत्रांसाठी Rs ८२५ कोटींचे कर्ज मंजूर केले.
 • एद्युकॉम्प ltd या कंपनीच्या सबसिडीअरीने आपली जमीन आणी बिल्डींग विकण्याचा करार केला.
 • स्टर्लिंग टेक्नोलॉजी या कंपनीच्या स्टर्लिंग ग्रीड या सबसिडीअरी कंपनीला Rs २६०० कोटींची ऑर्डर मिळाली.
 • SMS फार्मा या कंपनीच्या सात औषधांना USFDA ची मंजुरी मिळाली.
 • ऑरोबिन्दो फार्मा या कंपनीला त्यांच्या FAMOLIDINE या औषधासाठी USFDAची मंजुरी मिळाली. NEXIUM या जनरिक औषधासाठी USFDA कडून आंशिक मंजुरी मिळाली.

Economyच्या गोष्टी

 • IIP चे आकडे चांगले आले नाहीत.
 • सेबीने NSE वायदाबाजारांत कॉनकॉर, जेटएअरवेज, टोरट फार्मा, गोदरेज कन्झुमर या कंपन्यांचा समावेश केला.
 • सेबीने फायझर ,ब्लू डार्ट, कन्साई नेरोलाक, रेप्को, चोलामंडळम या कंपन्यांना ‘ब’ गटातून ए गटांत शिफ्ट केले.
 • HDFC STANDARD लाईफचा Rs १७०० कोटींचा FDI प्रस्ताव FIPBने मंजूर केला.
 • सेबीने कावेरी सीड्सचे फोरेन्सिक ऑडीट करण्यासाठी सरथ & असोसिएशट या चार्टड अकौंटंट फर्मची नेमणूक केली.
 • क्रूडची किंमत सतत कमी होत असल्यामुळे विमानाला लागणारे इंधन १०% स्वस्त झाले. त्यामुळे जेट एअरवेज, स्पाईसजेट, इंडिगो या विमान वाहतूक कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती वाढल्या.

 IPO news

 • लायका labs या कंपनीला Rs १०० कोटीच्या इशूसाठी मंजुरी मिळाली.
 • HDFC standard लाईफ इन्शुअरंस ही कंपनी 2016 च्या उत्तरार्धांत IPO आणील
 • लार्सन & टूब्रो या कंपनीने आपल्या L & T इन्फोटेक या कंपनीच्या Rs २००० कोटींच्या IPO साठी सप्टेंबर २०१५ मध्ये DRHP दाखल केले.
 • बंधन बँक २०१८ सालामध्ये IPO आणेल.

कॉर्पोरेट एक्शन

 • SEQUENT SCIENTIFIC या कंपनीच्या STOCK स्प्लिटसाठी मंजुरी मिळाले.
 • प्रकाश स्टील एज ही कंपनी आपल्या शेअर्सची दर्शनी किंमत Rs१० वरून Rs १ करणार आहे. म्हणजेच कंपनीच्या १ शेअरचे १० शेअर्स होतील. कंपनी त्यांचा TUBACEX प्रकाश या कंपनीतील १२.४७ % स्टेक विकणार आहे
 • झुआरी अग्रो ही कंपनी आपल्या तीन सबसिडीअरी अनुक्रमे झुआरी फरटीलायझर, झुआरी ग्लोबल,आणी झुआरी रोटेम याचे आपल्यांत मर्जर करणार आहे.
 • Crompton Greaves या कंपनीने आपल्या कन्झुमर इलेक्ट्रिकमधील कन्झुमर प्रोडक्ट्सचा बिझीनेस वेगळा केला.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं

यावर्षी मार्केटचा रागरंग बदलला हे मात्र मान्य करावे लागेल. क्रूडची आवश्यकता बऱ्याच कंपन्यांना असते.क्रूड स्वस्त झाले हे एक वरदान ठरल्याने HPCL, BPCL, IOC या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती वाढल्या. मिडकॅप शेअर चालले. विमान वाहतूकक्षेत्राला नवी झळाळी आली. जग जवळ आले असे म्हटले की काही फायदे होत असले तरी कुठेही काहीही वाईट झाले तरी त्याची झळ भारताला लागतेच. क्रूड स्वस्त झाले हे भारताच्या फायद्याचे असले तरी क्रूड उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना तोटा होतो. आणी पर्यायाने त्या कंपन्या ज्या देशांत कार्यरत आहेत त्या देशांची आर्थिक स्थिती खालावत आहे. भारत या देशांना निर्यात करतो. त्यामुळे आपली निर्यात कमी होते. २०१६ मध्ये क्रूडमध्ये मंदी राहील असे वाटते. त्यामुळे सोन्याचा भावही कमी राहील असे वाटते.

आता सध्या बजेटची चर्चा सुरु आहे. या महिन्यांत कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल लागतील. काही कंपन्यांनी प्रॉफिट वार्निंग आधीच दिली आहे. NPA वाढल्यामुळे बँकांचे निकाल चांगले लागणार नाहीत हे माहित आहे. प्रदूषणामुळे बदललेल्या नियमांचा परिणाम ऑटो सेल्सवर होणार हे नक्की.

सध्या बजेटपर्यंत तरी शैक्षणिक, शेतकी, रिन्यूएबल एनर्जी, कुटीरोद्योग (SSI) आणी रेल्वेच्या संबंधातील शेअर्स या कडे लक्ष देण्याचा मी विचार केलाय. योग्य भावांत हे शेअर्स खरेदी केल्यास short term ट्रेड चांगला होईल असे मला वाटते आहे.

जुने जाऊ द्या मरणालागुनी म्हणजेच घडलेल्या घटना सोडून देऊन घडणार्या घटनांकडे नव्या दृष्टीने बघु या. नवे नवे ते मला हवे असे म्हणत शेअरमार्केट हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे असे आपल्याला पटले असल्यास इतरांनाही पटवून देऊ या.

आपल्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा आपण ट्रेडिंग करण्यास शिकला असाल तर लक्ष्मीचा वरदहस्त लाभू दे हीच शुभेच्छा!

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

2 thoughts on “आठवड्याचे समालोचन – २८ डिसेंबर २०१५ ते १ जानेवारी २०१६ – जे जे नवे ते मला हवे

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – २८ डिसेंबर २०१५ ते १ जानेवारी २०१६ – जे जे नवे ते मला हवे | Stock Market आणि मी

 2. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – ४ जानेवारी ते ८ जानेवारी २०१६ – चीनी डंख शेअर बाजारांत शंख | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s