आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

“Chinese Dragon 2012” by GoShow
२०१६ साल सुरु झाले आणी चीनने गालबोट लावले. सगळ्या देशातल्या अर्थव्यवस्थेला, शेअर मार्केट्सना याचा धक्का पोहोचला.यामुळे सगळ्यांचीच झोप उडाली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भारतात तसे म्हणायला काही घडले नाही. परंतु सर्व देश एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे भारतातील अर्थव्यवस्थेवरही थोड्याफार प्रमाणांत परिणाम होणारच. याचा मुख्यतः परिणाम क्रूड, विनिमय दर, कमोडीटी मार्केट यावर झाला. सोमवारी शेअर मार्केटमध्ये BSE निर्देशांक सेन्सेक्स ५३० पाईंट घसरला.
आंतरराष्ट्रीय घडामोडी
- उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केली
- सौदी अरेबिया आणी इराणमध्ये धुसफूस वाढली
- चीनचा PMI ४८.६ वरून ४८.२ एवढा घसरला. ती कमकुवत औद्योगिक आकडेवारी समजली गेली. चीनमध्ये आर्थिक मंदीचे संकट डोकावू लागले. आणी युआन या चीनी चलनाचे पुन्हा अवमूल्यन करायचे असे चीनने ठरवले.
- या आठवड्यामध्ये चीनचे शेअर मार्केट ७% पडल्यामुळे दोन वेळेला ट्रेडिंग पूर्णपणे थांबवण्याची वेळ आली. फक्त याच्या परिणामी येन हे चलन strong झाले त्यामुळे मारुतीच्या शेअरवर परिणाम झाला.
- चीन सरकार १३००० कोटी युवान रेपो रेटच्या सहायाने अर्थव्यवस्थेत टाकणार.
सरकारी announcements
- प्रदूषण टाळण्यासाठी काही नियम जाहीर झाले. सी एन जी चा पुरवठा नियमित होण्यासाठी दिल्लीत जादा पंप उघडावेत. दिल्लीमध्ये काम नसेल तर ट्रक्सना दिल्लीत येता येणार नाही असे कोर्टाने जाहीर केले. २००० सी सी च्या वरील डीझेल गाड्यांवरील बंद्द उठवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला.
- HMT ह्या कंपनीचे तीन विभाग बंद करून त्याची मालमत्ता विकून येणाऱ्या पैशांत सरकार VRS आणण्याच्या विचारांत आहे.
- सरकारने आयर्न ओअर पिल्लेट वरची निर्यात ड्युटी रद्द केली.
- कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मधील ५% हिस्सा डायव्हेस्टमेंट करणार आहे.
- सरकार रब्बर आणी स्टील उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी ANTI DUMPING ड्युटी लावण्याच्या विचारात आहे.
खाजगी कंपन्यांच्या घडामोडी
- IRB इन्फ्राला सर्वात मोठी Rs १०००० कोटींची ऑर्डर मिळाली
- ऑटो कंपन्यांचे आकडे जाहीर झाले. बजाज ऑटोने निराश केले
- निर्यातीमध्ये latin अमेरिका आणी नेपाल मधील निर्यात कमी झाल्यामुळे १२% घट झाली
- अशोक leylandचे आकडे चांगले आले
- ग्रासीमने A B केमिकल्स ही कंपनी घेतली
- A B केमिकल्सच्या सोळा शेअर्सना ग्रासीमचा एक शेअर मिळेल
- अपोलो हॉस्पिटल्सच्या ऑफिसेसवर आयकर विभागाने धाडी घातल्या
- गोकुळदास एक्स्पोर्ट ही कंपनी आपली बंगलोर हैदराबाद आणी म्हैसूर येथील मालमत्ता विकणार आहे
- कॅडिला हेल्थकेअर या कंपनीला वर्निंग देवूनही त्यांनी पत्रांत असलेल्या बाबींवर उपाय करण्यासाठी कोणतीही पाऊले उचलली नाहीत असे USFDAने जाहीर केले
- NETFLIX या कंपनीने आपल्या ऑन डिमांड व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा भारतात लाईव केल्या. ही सेवा इंटरनेट कनेक्शन असलेल्या कोणत्याही उपकरणावर मिळू शकेल. याचा फायदा आयनॉक्स,पीव्हीआर, आणी शेमारू या कंपन्याना होईल.
- ग्लेनमार्क फार्मा या कंपनीने GBR १३४२ मोनोक्लोनल ANTIBODY शोधून काढली. याचा उपयोग कर्क रोगाच्या उपचारासाठी होईल असे समजते.
- मारुती त्यांच्या रिट्झ या छोट्या कारचे उत्पादन मे २०१६ पासून बंद करणार. आणी सप्टेंबर २०१६ पासून इग्नीस हे मॉडेल बाजारांत आणणार आहे.
- ITC ही कंपनी Rs 4500 कोटीची गुंतवणूक करून पश्चिम बंगाल मध्ये दोन फूड प्रोसेसिंग पार्क फेब्रुवारी २०१६ पासून सुरु करीत आहे.
IPO news
- BSE वर लक्स इंडस्ट्रीज या कंपनीचे लिस्टिंग झाले
- VLCC आणी L & T इन्फोटेक या कंपन्यांच्या IPOला सेबीने परवानगी दिली
- या आठवड्यांत नारायणा हृदयालय या कंपनीचे Rs २९१ वर लिस्टिंग झाले
या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं
शेअरमार्केटची घसरण चालू आहे. यामध्ये बँकिंग शेअर्सचा वाटा मोठा आहे.. खरे पाहतां चीनमधील घडामोडींशी बँकांचा प्रत्यक्ष संबंध नाही. परंतु चिंनमधील मंदीचा भारतीय कंपन्यांवर परिणाम होईल आणी बँकेतील NPA ( NON PERFORMING ASSET) वाढतील या भीतीने बँकांचे शेअर्स पडले. क्रूड US $ २० पर्यंत जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याची कारणे (१) उबदार हिवाळा (२) रशियामधील क्रूडचे विक्रमी उत्पादन. (३) चीनमधील कमी झालेली मागणी (४) मध्यपूर्वेतील देशांमधील ताणतणाव (५) युरोपमधील अस्थिर अर्थव्यवस्था.
भारताची अर्थव्यवस्था मुलभूतदृष्ट्या चांगली आहे. भारत यातून लवकर सावरेल, शेअर मार्केट सुधारेल पण आपल्याला धैर्य, सबुरी पाहिजे. घरांत काही संकट आले तर आपण घाबरतो कां ? आपण सावरतो आणी इतरांनाही सावरण्यास मदत करतो. फायद्याचा मार्ग शोधतो आणी अनुसरतो. मार्केट पडेल आपण स्वस्तांत शेअर विकत घेऊ असं म्हणणारी माणसे प्रत्यक्षांत मार्केट पडू लागल्यानंतर घाबरून जाऊन मार्केट पासून दूर पळतात उद्या अजून स्वस्त मिळेल त्या वेळी खरेदी करू असा विचार करीत राहतात त्यामुळे समोर दिसत असलेली संधी निघून जाते. मार्केट वाढू लागते त्यावेळी पुन्हा हे लोक जागे होतात त्या ऐवजी आपल्याला जे शेअर्स खरेदी करायचे असतील त्यांची यादी करावी. कोणत्या भावाला खरेदी करायचे ते ठरवावे आणी थोड्या थोड्या प्रमाणात खरेदी करावी कारण अजून खालच्या भावाला मिळालेत तर कोणाला नकोत त्यामुळे जसे जसे मार्केट पडेल तसा तसा फायदा उठवावा. आणी बदललेल्या स्थितीचा कोणत्या कंपन्यांना फायदा होतो आहे आणी होणार आहे हे हेरून त्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी. जसा पाउस असेल तशी छत्री धरली पाहिजे. मार्केट पडू लागले की हल्ली लोकांचे लक्ष साखर उद्योगाकडे असते. या वर्षी विमान वाहतूक कंपन्याचे भाग्य उजळले आहे. समजा क्रूड वाढू लागले तर बरोब्बर सध्याच्या विरुद्ध परिस्थिती येईल. अशा स्थित्यंतरांकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असेल तर प्रत्येक परिस्थिती आपल्या बाजूने वळवता येते. आणी फायदा उठवता येतो.
बजाज कॉर्प या कंपनीचा रिझल्ट आला. त्यांनी Rs ११.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.या लाभांशासाठी रेकॉर्ड डेट २० जानेवारी २०१६ आहे. येणाऱ्या आठवड्यांत टी सी एस आणी इन्फोसिस या IT क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांचे तिमाही रिझल्ट्स आहेत. तुम्ही रिझल्ट कॅलेंडर पाहून त्या प्रमाणे शेअर खरेदी करून थोडाफार फायदा पदरांत पाडून घेऊ शकता.
पिंगबॅक आठवड्याचे समालोचन -११ जानेवारी ते १५ जानेवारी २०१६ – शेअर्सचा लपंडाव मार्केटच्या अंगणांत | Stock Mark
पिंगबॅक आठवड्याचे समालोचन -११ जानेवारी ते १५ जानेवारी २०१६ – शेअर्सचा लपंडाव मार्केटच्या अंगणांत | Stock Mark