आठवड्याचे समालोचन -११ जानेवारी ते १५ जानेवारी २०१६ – शेअर्सचा लपंडाव मार्केटच्या अंगणांत

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

By Şahzadə (Own work) via Wikimedia Commons

By Şahzadə (Own work) via Wikimedia Commons

हा आठवडाभर मार्केट मंदीतच होते. चीनमधील गोंधळातून कोणतेही शेअर मार्केट सावरले नाही. पण आयुष्यात जशा काही घटना आपल्या मनांत घर करतात. तशाच शेअरमार्केटमध्ये व्यवहार करताना काही दिवस फारच मजेशीर येतात. तसा या आठवड्यातला बुधवार ! मार्केट आता २०० पाईंट खाली जाईल हे ध्यानीमनी आले नाही मार्केटने दोन वेळा ७४९०चा बॉटम टच केला. त्यामुळे डबल बॉटम फार्मेशन झाले आहे असे वाटले. ‘आत्ता इथं होता गेला कुठं’  आता Rs १९० चा भाव दिसत होता एवढ्यांत Rs १७९ कसा ! अहो, काय चाललंय काहीच कळत नव्हते. मलाही दोन वेळा वाटलं कि माझंच  काही चुकतंय, माझ्या अभ्यासाची दिशा चुकत असावी पण सर्वांनाच असं वाटलं कि काहीतरी विचित्र होतंय. जणू बुल्स आणी बेअर्सचा कुस्तीचा फड रंगला आहे आणि जणु तेल लावून पैलवान उतरलेत. आकाशवाणी एकदाच होते तसा असा एखादाच दिवस उगवतो.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • क्रुडची घसरण चालूच राहिली, इराणने उत्पादन कमी करायला नकार दिला तर रशियाने ज्या खाणीतून तेल काढणे फायद्याचे  होत नाही त्या खाणीतून तेल काढणे बंद केले.
 • ओपेक देशांतील क्रूडचे उत्पादन करण्यासाठी येणारा खर्च तुलनेने नॉन ओपेक देशांपेक्षा कमी असल्यामुळे बाकीच्या देशांना हळू हळू क्रुडच्या उत्पादनांत घट करावी लागेल.
 • ब्रिटीश पेट्रोलियम या कंपनीने ४००० कर्मचारी कमी करू असे सांगितले.
 • अमेरिकेमध्ये क्रूड आणी नैसर्गिक वायूचे साठे वाढले आहेत. त्यामुळे जरी पहिल्या सहा महिन्यांत क्रूडचा भाव पडत राहिला तरी पुढील सहा महिन्यानी नाईलाजास्तव उत्पादन कमी करावे लागल्यामुळे क्रूडचे भाव वाढतील असा अंदाज आहे. क्रूडला पोलिटिकल कमोडीटी कां म्हणतात हे आत्ता कळलं..

सरकारी announcements

 • साखरेवरील सबसिडी कमी केली.कंपोस्ट खतांसाठी Rs १५०० कोटींची सबसिडी जाहीर होईल असं दिसतंय.
 • सरकारने शिपयार्ड उद्योगाला INFRASTRUCTURE STATUS दिला.
 • सरकारनी जाहीर केलं की २०१६-२०१७ साठीचे अंदाजपत्रक २९ फेबृआरी २०१६ ला सादर होईल. यांत दोन ते तीन वर्षांत करावयाच्या प्रगतीचा आलेख मांडण्यांत येईल.
 • सरकारने घोषणा केली की IDBI मधील सरकारी स्टेक सध्याच्या ५२% वरच ठेवण्याचा सरकारचा विचार आहे.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • टी सी एस चा रिझल्ट प्रॉफिट वार्निंग दिलेली असूनही चांगला आला. टी सी एस ने प्रती शेअर Rs ५.५० अंतरिम लाभांश जाहीर केला.टेलिकॉम एनर्जी आणी इंशुअरंस मध्ये थोडा थंडा रिस्पॉन्स होता असे सांगितले. येणार्या तिमाहीत बिझीनेस सुधारेल असे कंपनीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितले.टी सी एस जपानने क्लाऊड कम्युनिकेशन इन्फ्रा सर्विस , मित्सुबिशी या कंपनीसाठी सुरु केली.
 • इन्फोसिस चा रिझल्ट अपेक्षेपेक्षा आणी वर्तविलेल्या सर्व अंदाजापेक्षा चांगला आला . इन्फोसिसने आपला पुढील वर्षाच्या प्रगतीविषयीचा अंदाज म्हणजेच गायडंस वाढवला. रेव्हेन्यू गायडंस १२.८ वरून १३,२ वर वाढवला. डॉलर रेव्हेन्यू ८.९ वरून ९.३ पर्यंत वाढवला. रुपया रेव्हेन्यू २०१६ साठी १६.२ वरून १६.९ वर वाढवला. इन्फोसिसला ४ मोठे ग्राहक ( टोटल contract value US $३६२ मिलियन ) मिळाले. ATTRITION रेट १३.४ एवढा कमी झाला. यावरून कर्मचार्यांची कंपनीच्या प्रगतीविषयी आणी कंपनीने त्यांच्यासाठी दिलेल्या सवलती योग्य होत्या असे सिद्ध होते. भारतातील बिझीनेस GST रोलऑऊटचे काम मिळाल्यामुळे २३.१% वाढला.तिसर्या तिमाहीत इन्फोसिसचा रेव्हेन्यू. Rs १३५६२ कोटी तर नेट प्रॉफिट Rs ३४६५ कोटी झाले. एकूणच इन्फोसिसला पुन्हा एकदा भारताची ‘BELLWETHER’ कंपनी हा दर्जा मिळाला.
 • एअरटेल आफ्रिकेच्या दोन देशांत असणाऱ्या सबसिडीज ऑरेंज या कंपनीला विकणार आहे.
  GODPHREY PHILIPHS या कंपनीतील स्टेक जपान TOBACCO घेणार आहे.
 • इंडसइंड बँक, डी सी बी बँक, तसेच एवरेस्ट इंडस्ट्रीज या कंपन्यांचा रिझल्ट चांगला आला. तर फेडरल बँक आणी करुर वैश्य बँक याचे रिझल्ट्स, फेडरल बँकेच्या NPA तील वाढीमुळे तर करुर वैश्य बँकेने Rs ८२ कोटींचे NPA विकल्यामुळे) थोडेसे चिंताजनक वाटले.
 • मास्टेक या कंपनीचा रिझल्ट समाधानकारक लागला अही.
 • HUL चे रिझल्ट्स चांगलेच म्हणावे लागतील ६% volume ग्रोथ झाली. Rs ८० कोटी अतिरिक्त घाटा दाखविल्यामुळे नक्त नफ्याची रक्कम कमी झाली. तसेच नवीन लौंच केलेल्या प्रोडक्ट्सना फारसा रिस्पोंस मिळाला नाही. HUL ने असे सांगितले की त्यांच्या जवळ असलेले Rs २२०० कोटी कंपनी शेअरहोल्डर्सना देण्याचा विचार करत आहे.
 • मार्क्सन फार्माला UK कडून नोटीस मिळाल्यामुळे शेअर १५% पडला. त्यांच्या प्लांटची तपासणीही झाली.
 • WOCKHARDT फार्माच्या अहमदाबाद प्लांटमध्ये USFDAने १५ दिवसांत सुधारणा करावी लागेल असे सांगितले. चिकलठाणा आणी वाळूंज येथील प्लांटसाठीही नोटीस दिली.

इकोनोमिच्या गोष्टी

 • नोव्हेम्बरसाठीचे  IIP चे आकडे निराशाजनक आले. -३.२ म्हणजे निगेटिव्ह ग्रोथ झाली.
 • दिसेम्बरसाठीचे CPI  ( कन्झुमर प्राईस इंडेक्स) ५.६१%  इतका  वाढला.
 • डिसेंबर WPI (होलसेल प्राईस इंडेक्स) डिसेंबरमध्ये -०.७३ आला. हा नोव्हेंबरमध्ये -१,९९ होता.
 • भारताचे चलन रुपयाची किंमत US डॉलर्स च्या तुलनेत सतत पडत होती. शुक्रवारी US $ १ = Rs. ६७.६६ झाली.

Corporate action

 • MINDTREE या IT क्षेत्रातील मिडकॅप कंपनीने बोनस देण्याचा विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ DIRECTORS ची मीटिंग बोलावली आहे.
 • MAX इंडिया चे तीन कंपन्यांमधील विभाजन आज पूर्ण झाले

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं

सध्या मार्केटमध्ये करेक्शन चालू आहे. त्यामुळे आज शेअर्स खरेदी केलेत आणी महिन्या-दोन महिन्यांत पैसे मिळतील असे नाही. इंट्राडे करायला गेलं तरी कुठून काहीतरी बातमी येते आणी STOP LOSS  ट्रिगर होतात . बरोबर हेच बुधवारी घडले होते. घटकेत २०० पाईंट वरती तर घटकेत २०० पाईंट खाली असे चालले होते. खरेदी करणार्यांची आणी short करणार्यांची दोघांचीही मार्केटने गाळण उडवली. पण मार्केट पडण्याचा आणी वाढण्याचा वेग अनाकलनीय होता. या मार्केटच्या नाटकामध्ये  ट्रेडर्सचा रोल नाही. हे मार्केट गुंतवणूकदारांचे म्हणजेच इन्व्हेस्टर्सचे आहे. कारण गुंतवणूकदार स्वस्तांत विकत घेतात आणी तीन ते पाच वर्षासाठी गुंतवणूक करतात. अशा लोकांनी या सुवर्ण संधीचा फायदा उठवावा

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

3 thoughts on “आठवड्याचे समालोचन -११ जानेवारी ते १५ जानेवारी २०१६ – शेअर्सचा लपंडाव मार्केटच्या अंगणांत

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – १८ जानेवारी ते २२ जानेवारी २०१६ – रात्रीच्या गर्भांत असे उद्याचा उषःकाल |

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s