आठवड्याचे समालोचन – १८ जानेवारी ते २२ जानेवारी २०१६ – रात्रीच्या गर्भांत असे उद्याचा उषःकाल

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Source - NASA Image of the day

Source – NASA Image of the day

आभाळ पूर्ण भरून आल्याशिवाय पाउस पडत नाही. म्हणजेच दुखाःचा अतिरेक झाला की सुखाचा शिडकावा होतो. प्रत्येक गोष्टीला  तुम्ही कोणत्या तऱ्हेने सामोरे जाता त्यावरनं तुमचं भविष्य ठरतं.

सध्या शेअरमार्केटमध्ये करेक्शन चालू आहे.या करेक्शनला घाबरून, टी व्ही बंद करून, कानांत बोळे घालून बसायचं की या परिस्थितीचा फायदा उठवायचा, हे तुम्ही ठरवायचं. दोन रात्रीमध्ये एक दिवस की दोन दिवसांत एक रात्र हे ठरवणं तुमच्या हातांत आहे.निफ्टी ९११९ या पातळीपासून साधारण ७२५० पर्यंत कोसळला. ही संधी आहे असे तुम्ही समजू शकता. कदाचित तुम्ही Rs १०० ला एखादा शेअर खरेदी केला आणी दुसऱ्या दिवशी त्याचा भाव Rs ९४ पाहिलंत तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. आणी लगेचच ८ दिवसांनी तो भाव Rs १०७ झाला म्हणून शेअर विकून मार्केटमधून पळ काढण्याची गरज नाही. कमीतकमी भावांत खरेदीसाठी आणी जास्तीतजास्त भावांत विकण्यासाठी मनाच्या शांतपणाची गरज आहे. फक्त चार दिवसांसाठी मी मार्केटमध्ये पैसे गुंतवले आहेत किंवा महिना दीडमहिना मला पैशाची गरज नव्हती म्हणून त्या अवधीत पैसे मिळवण्यासाठी पैसे गुंतवले अशा लोकांसाठी सध्याचे मार्केट उपयुक्त नाही. असा पैसा मिळण्यासाठी बुलरन आवश्यक असते. सध्या मार्केटला भीतीच्या ग्रहणाने ग्रासले आहे. म्युच्युअल फंड अन्द्द एल आय सी मार्केटमध्ये योग्य वेळ गाठून पैसे गुंतवत असतात. ट४ ज्यावेळी पैसे गुंतवतील त्यावेळेला करेक्शन संपत आले असे गृहीत धरता येते. दुसरी खूण म्हणजे चांगल्या गुणवत्तेचे शेअर्स सर्वांत शेवटी कोसळतात. सर्वांत प्रथम वाढू लागतात.त्याच प्रमाणे बुलरनमध्ये जेव्हा मिडकॅप, स्मालकॅप शेअर्सची rally सुरु होते Rs १० ते Rs ३० शेअर्स किंमत असणारे शेअर्स धावू लागतात तेव्हा बुलरन संपत आला असे गृहीत धरावे. अर्थातच हा नियम नव्हे तर माझे निरीक्षण आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • रशिया आणी युरोप मधील समस्या वाढली. त्यामुळे रशियन चलन रुबल्स घसरले. याचा फटका ग्लेनमार्क, dr reddy’स, J. B. केमिकल्स, सन फार्मा, आणी युनिकेम lab बसला.
 • इराणवरील बंधने काढून टाकल्यामुळे इराणमधील क्रूडचा पुरवठा सुरु होईल. इराणची क्रूडची उत्पादनखर्च खूपच कमी आहे. क्रूडचा भाव एवढा खाली आल्यावर सुद्धा इराणमधील कंपन्यांना फायदा होतो आहे.
 • थंडीचा जोर वाढू लागल्यामुळे क्रूडची मागणी वाढेल असा अंदाज आल्याबरोबर क्रूडच्या किंमती स्थिरावल्या आणी रुपयाच्या घसरणीलाही लागाम बसला.

सरकारी announcements

 • युपी राज्य सरकारने उसाच्या SAP (state advisory price) मध्ये काहीही फरक केला नाही. Rs २८०च्या पातळीवरच ठेवली.
 • सिंथेटिक रबर बनविण्यासाठी जे chemical लागते त्याचे कोरिआ, युरोप, थायलंड आणी चीन या देशातून dumping  होते आहे.यावर उपाय म्हणून सरकार antidumping ड्युटी लावणार आहे. नवीन टारीफ पॉलिसी आणली जाईल.
 • रिन्यूएबल एनर्जीसाठी काही सवलती देण्यांत आले आहेत. याचा फायदा सुझलॉन, आयनॉक्सविंड, ओरिएन्ट पॉवर, आणी एस जे व्ही एन, या कंपन्यांना होईल.
 • वैद्यकीय उपकरणांवर कस्टम्स ड्युटी ७.५% वाढवली जाणार आहे. याचा फायदा बी पी एल, सिमेन्स, इंद्रप्रस्थ मेडिकल आणी ओप्तो सर्किट या कंपन्यांना होईल.
 • composite fertilizers आणी STARTUP कंपन्यांना काही सवलती दिल्या जातील.
 • ८ राज्यातील ४३ मिनरल ब्लॉक्स साठी टेंडर मागवले त्यामध्ये सोने IRON ORE आणी limestoneचा समावेश आहे. वर्षाअखेरपर्यंत ७० ब्लॉक्सचा लिलाव केला जाईल.
 • आयकर कायदा आणी प्रक्रिया सोपी करण्यासाठी आणी लवकरांत लवकर असेसमेंट होवून रिफंड मिळण्यासाठी आयकर कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी नेमलेल्या जस्टीस ईश्वर कमिटीने टी डी एसचे  परसेंटेज १०% वरून ५%वर आणण्याची शिफारस केली.
 • पेट्रोलवरील VAT २५% वरून २७% झाला. diesel  वरील VAT १६.६० वरून १८% केला.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • बजाज ऑटोच्या उत्पनामध्ये नायजेरियाला करण्यांत आलेल्या निर्यातीचा १२% हिस्सा आहे.
 • नायजेरिया आपल्या चलनाचे २०% अवमूल्यन करण्याची शक्यता आहे. नायजेरियाने US $ विकण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे बजाज ऑटोचा शेअर पडला.
 • ग्लेनमार्क फार्मा या कंपनीला त्यांच्या बद्दी आणी पिथांपूर या युनिट्ससाठी USFDA कडून मंजुरी मिळाली.
 • विप्रो, इन्फोसिस, डेल्टा, HOEC भारत बिजली, कोटकमहिंद्रा बँक, एक्सिस बँक रिलायंस कॅनफिनहोमेस, अलेम्बिक फार्मा, अल्ट्राटेक सिमेंट यांचे रिझल्ट चांगले आले
 • APPLE स्वतःचे स्टोर सुरु करणार आहे जर असे झाले तर REDDINGTAN या कंपनीचे नुकसान होऊ शकते

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • क्रूडची किंमत पडते आहे आणी त्याबरोबरच रुपयाचे अवमूल्यन होत आहे.
 • २ फेबृआरीला रिझर्व बँकेची पॉलिसी मीटिंग आहे आणी २७-२८ जानेवारीला FED ची मीटिंग आहे सध्याच्या परिस्थितीत फेडणे रेट वाढवले तर US $ वधारण्याची भीती USA ला वाटते आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व बँक काय निर्णय घेते याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे

कॉर्पोरेट action 

 • MINDTREE या कंपनीने एकास एक या प्रमाणांत बोनस जाहीर केला.
 • टाईड वाटर ऑईल या कंपनीची स्प्लिट आणी बोनस या विषयांवरील १५ जानेवारीला असलेली मीटिंग २८ जानेवारीला पुढे ढकलली.
 • टी  सी एस, विप्रो, HCLTEK, या कंपन्यांनी अंतरिम लाभांश जाहीर केला.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं

मार्केटमध्ये जबरदस्त विक्री चालू आहे. बम्पर डिस्काऊंटला शेअर्स उपलब्ध आहेत. म्हणून कोणताही कचरा घरी घेवून येऊ नका. नेहेमी sale मध्ये हाच अनुभव असतो. उपयोग असो अगर नसो लोक वस्तू खरेदी करतात. असे तुम्ही करू नका. बदललेल्या आर्थिक परिस्थितीचा मार ज्या कंपन्यांना बसला असेल त्या कंपन्यांची अवस्था परिस्थिती बदलल्यानंतर सुधारू शकते आणी अशा कंपन्यांचे शेअर्स स्वस्तांतही मिळू शकतात. आताच्या परिस्थितीत जे शेअर्स वाढत आहेत ते शेअर्स परिस्थिती बदलल्यास पडू लागतील याचा मात्र विचार करा. प्रत्येक वेळेला मार्केट करेक्शननंतर ट्रेंड बदलतो. मार्केटमध्ये त्यामुळे नवनवीन किस्से तयार होतात. परंतु आज आलेल्या अनुभवावरून उद्या आपण निर्णय घेऊ लागल्यास तो निर्णय बरोबर येईल याची शास्वती नसते. शुक्रवारी थोडासा मार्केटने सुखद धक्का दिला . मार्केट सावरले परंतु मार्केटचा कल पुढील आठवड्यांत असाच राहतो कां बदलतो ते पाहू.

 

This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

3 thoughts on “आठवड्याचे समालोचन – १८ जानेवारी ते २२ जानेवारी २०१६ – रात्रीच्या गर्भांत असे उद्याचा उषःकाल

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – २५ जानेवारी ते २९ जानेवारी २०१६ – चीनी डंख शेअर बाजारांत शंख | Stock Market आणि मी

 2. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – २५ जानेवारी ते २९ जानेवारी २०१६ – हसले मनी चांदणे | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s