आठवड्याचे समालोचन – १ फेबुवारी ते ४ फेबुवारी २०१६ – ये लाल रंग कब हमे छोडेगा !

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
flag-40949_640 आता मला मार्केट वाढण्याची आणी पडण्याची सवय झाली आहे आधी तसं नव्हत. मार्केट पडलं ही गोष्ट माझ्या आवाजावरून, माझ्या चेहऱ्यावरून लगेच कळत असे. मार्केटचा दुखवटा माझा चेहरा पट्कन सांगत असे. त्यावेळी माझी समजूत काढताना माझे यजमान म्हणत “ फक्त तुला काही शेअर खरेदी करायचे आहेत आणी तेही स्वस्तांत किंवा कमीतकमी भावांत, त्यावेळी मार्केट त्या शेअर्सपुरतेच पडणार आहे कां ? मार्केट म्हटल्यावर तेजी  मंदी आलीच. मार्केट जेव्हा मंदीत असेल तेव्हा तुझ्याजवळ जे शेअर्स आहेत त्यांचा भाव मार्केटमध्ये कमी होईल. त्यामुळे तुझ्या पोर्टफ़ोलिओची किंमत कमी होईल. पण तुला स्वस्तांत खरेदी करता येईल. त्याविरुद्ध जेव्हा तेजी येईल तेव्हा तुझ्या पोर्टफ़ोलिओची किंमत वाढेल पण तुला स्वस्तात खरेदी करायला मिळणार नाही. पण तू असे करू नकोस. दुःख करत बसण्यापेक्षा तेजीच्या वेळेला विकत जा आणी मंदीत खरेदी करत जा. आपणच पावसाप्रमाणे छत्री धरावी. जरा दमादमाने प्रत्येक गोष्ट घ्यावी. घाईघाई करू नकोस.”

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • USA सरकारने जाहीर केले की ‘ACTIVE PHARMA INGREDIENT’चे उत्पादन अमेरिकेतच केले पाहिजे. या निर्णयाचा परिणाम म्हणून ज्या भारतीय कंपन्या वरील API ची अमेरिकेत निर्यात करतात त्या कंपन्यांचे शेअर्स पडले.
 • तसेच करन्सी मार्केटमध्ये US$ कमजोर झाल्यामुळे आणी कमोडीटी मार्केटमध्ये सर्व किंमती US$ मध्ये असल्यामुळे सर्व धातूसंबंधीत कंपन्यांचे शेअर्स वधारले.
 • क्रुड संबंधांत रशिया आणी ओपेक देशांमध्ये क्रूड उत्पादनाविषयी काही तोडगा निघेल अशी आशा वाढल्यामुळे क्रुडच्या किंमती वाढल्या. तसेच US$ कमजोर झाल्यामुळेही क्रुडची किंमत वाढली.
 • लंडनमधील बाल्टिक निर्देशांक ऑगस्ट २०१५ पासून सतत खाली येत आहे. हा आता ३०३ आहे. या निर्देशांकातील ही घट म्हणजे जगातील बहुतांश शिपिंग कंपन्यांकडे काम नाही असे दाखवते

सरकारी announcements

 • सरकारने डिझेल आणी पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी वाढवली. ATF ( विमानांत वापरले जाणारे इंधन) च्या किंमती १२% ने कमी केल्या. याचा फायदा जेट, इंडिगो, तसेच स्पाईसजेट या विमानवाहतूक करणाऱ्या कंपन्यांना होईल.
 • नॉन-पॉवर क्षेत्रासाठी कोळश्याच्या खाणींच्या लिलावाला सरकारने परवानगी दिली.
 • २३ फेबृआरी २०१६ पासून संसदेचे अंदाजपत्रक सादर करण्यासाठी अधिवेशन सुरु होईल.हे अधिवेशन दोन सत्रांत होईल. पहिले सत्र २३ फेब्रवारी ते १६ मार्च २०१६ आणी दुसरे सत्र २५ एप्रिल ते १३ मे पर्यंत असेल. २५ फेब्रूवारीला रेल्वे अंदाजपत्रक सदर केले जाईल. २६ फेब्रूवारीला इकोनोमिक सर्वे सादर केला जाईल. २९ फेब्रूआरीला अंदाजपत्रक सादर केले जाईल. २०१६-२०१७ साठीचे अंदाजपत्रक लोकप्रियतेकडे लक्ष न देता सुधारणावादी अंदाजपत्रक असेल असे कळते.

RBI, SEBI आणी इतर रेग्युलेटरी संस्था:-

 • रिझर्व बँकेने आपली पॉलिसी २ फेब्रूआरीला जाहीर केली. रिझर्व बँकेने रेपो रेट, रिवर्स रेपो रेट, तसेच सी आर आर आणी एस एल आर यामध्ये कोणताही बदल केला नाही.
 • किरकोळ महागाईचा निर्देशांक सतत ५ व्या महिन्यांत वाढल्याबद्दल RBI ने चिंता व्यक्त केली.
 • RBIने स्टार्टअप कंपन्यांसाठी गुंतवणुकीचे, आणी केलेली गुंतवणूक परत परदेशांत पाठवण्याचे नॉर्म्स सोपे करू असे सांगितले. भारताची आर्थिक स्थिती स्थिर राहण्यासाठी धीम्या गतीने महागाई कमी होण्याची गरज, माफक CAD (CURRENT ACCOUNT DEFICIT) , आणी फिस्कल शिस्त जरुरीची आहे असे सांगितले.
 • RBI ने आर्थिक प्रगतीचे उद्दिष्ट आर्थिक वर्ष २०१७ साठी ७.६% आणी मार्च २०१७ साठी महागाईचे उद्दिष्ट ६% निश्चित केले.
 • सरकार आणी RBI नव्या बँकिंग परवान्यासाठी जुलै २०१६ पासून एक महिन्याभर अर्ज स्वीकारतील. यावेळी नवीन बँकांना सुरुवातीपासूनच ७४% परदेशी गुंतवणुकीसाठी मंजुरी देण्याचा विचार सुरु आहे.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • लुपिन या फार्मा क्षेत्रातील कंपनीला USFDA ने क्लीन चीट दिली
 • अमेरिको, पिडीलाईट, सिमेन्स, ग्रासिम, व्ही आय पी इंडस्ट्रीज,बजाज फायनान्स, आयशर मोटर्स,लुपिन यांचे निकाल चांगले आले.
 • JUST DIAL या कंपनीचे तिमाही निकाल खूपच खराब आले. यामुळे या शेअरची किंमत लिस्टिंग प्राईसच्या खाली गेली.
 • टाटा स्टील या कंपनीचे निकाल असमाधानकारक आले.
 • ऑटो विक्रीचे आकडे आले. त्यांत मारुतीची विक्री आणी निर्यात दोन्हीही कमी झाली. आयशर मोटर्स ची विक्री वाढली पण निर्यात कमी झाली. अशोक LEYLAND ची विक्री वाढली.
 • बजाज ऑटोने आपली नवी १५० CC मोटारबाईक ‘V’ मार्केटमध्ये आणली तर रॉयल एन्फिल्डने त्यांची ‘हिमालयन, ही मोटारबाईक मार्केटमध्ये आणण्याची घोषणा केली.
 • टाटांनी ‘नानो’ ही लहान गाडी इकोनॉमिक मॉडेल या नावावर बाजारांत आणली परंतु तिचे मार्केटिंग आणी जाहिरात नीट न झाल्यामुळे या कार मॉडेलला जास्त यश मिळाले नाही. आता टाटा मोटर्सच्या नव्या मॉडेलचे नाव ‘झिका’ असे ठेवले पण हे एका प्राणघातक व्हायरसचे नाव असल्यामुळे कंपनीने हे नाव बदलण्याचे ठरवले आहे.
 • अदानी एन्टरप्राईजेसला ‘कारमायकेल’ या कोळश्याच्या खाणीसाठी आस्ट्रेलियन सरकारकडून पर्यावरण मंजुरी मिळाली.
 • इप्का lab या कंपनीला USFDA कडून त्यांच्या रतलाम, इंदोर आणी पिपरिया या उत्पादन युनिट्ससाठी वार्निंग लेटर मिळाले.
 • महिंद्रा आणी महिंद्रा इलेक्ट्रिक मोबाईल कारभारांत ७०% पर्यंत स्टेक वाढवणार आहे. इलेक्ट्रिक मोबाईल उद्योगाचे नाव बदलून त्याचे नाव महिंद्रा इलेक्ट्रिक असे ठेवले.
 • गोदरेज कन्झुमर्स या कंपनीने केनयातील ‘कैनेन केमिकल’ ही कंपनी विकत घेतली. ह्या कंपनीतील ७५% स्टेक गोदरेज कन्झुमरने विकत घेतला.
 • कोलगेट पामोलिव या कंपनीला माउथवाशसाठी USFDAची मंजुरी मिळाली.
 • रिलायंस इन्फ्राने त्यांचा सिमेंट उत्पादन करणारे युनिट बिर्ला कॉर्पला Rs ४८०० कोटी रुपयांना विकले.

या आठवड्यांत येणारे IPO :-

 • ‘क्विक हिल’ हा IPO ८ फेब्रूवारी २०१६ पासून सुरु होतो आहे. याचा प्राईस band Rs ३११ ते Rs ३२१ आहे.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं

यावेळी असं ध्यानात येतंय की रिझल्ट चांगले आले तरी त्याचा शेअरच्या किंमतीवर परिणाम दिसत नाही. सध्या आपण हेच ऑस्ट्रेलियन क्रिकेट दौऱ्यांत एकदिवशीय सामन्यांत अनुभवले. आपले खेळाडू चांगले खेळत होते. तरी आपण जिंकत नव्हतो.

मी निरीक्षण केलं तेव्हा मला असं लक्षात आलं की फायदा वाढतो आहे पण विक्री कमी होत आहे त्यामुळे ही सुधारणा टिकावू आहे असे गुंतवणूकदारांना वाटत नसावं. त्याचबरोबर ‘अन्य आय’ म्हणजेच इतर उत्पन्न जास्त झाल्यामुळे रिझल्ट चांगला दिसत असेल तर गुंतवणूकदार तो निकाल चांगला मानत नाही. बजाज ऑटोच्या बाबतीत हेच झाले. मागील तिमाहीतील Rs ९५ कोटी अन्य आय या तिमाहीत Rs २०० कोटी झाली  म्हणून शेअर पडला. आपण नेहेमी काय विचार करतो की अन्य उत्पन्नातून पैसा मिळो शेवटी पैसा तो पैसाच असतो. पण उद्योग धंद्यांत तसे चालत नाही. अन्य उत्पन्न हे धंद्याची प्रगती दर्शवत नसते. पुष्कळ लोक निकालाचे नीट आकलन होण्याच्या आधीच डेट्रेड करण्याची घाई करतात आणी संकटांत सापडतात.

 

 

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे समालोचन – १ फेबुवारी ते ४ फेबुवारी २०१६ – ये लाल रंग कब हमे छोडेगा !

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – ८ फेब्रूआरी ते १३ फेब्रूआरी २०१६ – भय इथले संपत नाही ! | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s