Stock market information in marathi

आठवड्याचे समालोचन -२९ फेबृआरी २०१६ ते ४ मार्च २०१६ – अंदाजपत्रकातील सुखद वारे !

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

२९ फेबृआरी २०१६ सोमवार हा अंदाजपत्रकाचा दिवस होता. आणी संधीसाधूंचे मार्केट होते. अंदाजपत्रकामध्ये एक  गोष्ट जाहीर झाली की त्याचा फायदा किंवा तोटा ज्या पद्धतीने होईल तशा प्रकारचा ट्रेड करायचा.  ५ राज्यात येऊ घातलेल्या निवडणुका, दुष्काळाचे सावट, जागतिक मंदी, सातव्या वेतन आयोगातील पगारवाढ देण्यासाठी करावी लागणारी तरतूद  आणी शेअरमार्केटमधील मंदी या सर्व बाबींचा विचार अन्दाजपत्रकांत असावा असा कयास करून मोठ्या उत्सुकतेने  सर्वजण अंदाजपत्रकाला सामोरे गेले. अंदाजपत्रकातील तरतुदींमुळे सगळ्यांना आनंद झाला. दिवाळीसारखे वातावरण पसरले. शेअरमार्केटने सुंदरच सलामी दिली. पाठोपाठ तीन दिवस मार्केट तेजींत राहिले. सेन्सेक्समध्ये १६०० पाईंटची वाढ झाली.  गुंतवणूकदारांची मरगळ दूर झाली.  मार्केटला गती आली. नवा विचार मिळाला.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • ओपेक देशांनी या महिन्यांत क्रूडचे उत्पादन कमी केले असल्याचे आढळते.
 • चीनच्या बँकेने ०.५० पाईंट रेटकट केला.
 • आंतरराष्ट्रीय मॉनेटरी फंड या संस्थेने भारताच्या प्रगतीचे लक्ष्य २०१६ साठी ७.३% आणी २०१७ साठी ७.५% ठेवले.

सरकारी announcements

 • या वर्षीच्या अंदाजपत्रकांत जर तुमचे लाभांशापासून मिळणारे उत्पन्न Rs १०००००० पेक्षा जास्त असेल तर १०% DDT (DIVIDEND DISTRIBUTION TAX) लागेल अशी प्रोविजन केली आहे.याचा परिणाम या वर्षी ३१ मार्च २०१६ पूर्वी दिसेल असे कळते.प्रमोटर्स होल्डिंगवर मिळणाऱ्या लाभांशावर DDT लागू नये म्हणून ज्या कंपन्यांमध्ये प्रमोटर्स होल्डिंग जास्त असेल, BALANCE SHEET वर जास्त कॅश असेल, कंपनी जर नियमितपणे चांगला लाभांश जाहीर करत असेल तर त्या कंपन्या ३१ मार्च २०१६ पूर्वी अंतरिम लाभांश जाहीर करतील. अशा प्रकारच्या कंपन्यांच्या शेअर्सना मागणी येईल आणी short term ट्रेडिंगसाठी फायद्याचे ठरेल. अशा ७० कंपन्यांच्या ३१ मार्च २०१६ पूर्वी लाभांश जाहीर करण्याचा विचार करण्यासाठी मीटिंग आहेत.
 • स्पेक्ट्रमच्या देवाणघेवाणीला सेवा कर लागू होईल.
 • सेवा करात वाढ सुचवली.
 • तंबाखू आणी तंबाखूची उत्पादने यांच्या करामध्ये अपेक्षेपेक्षा कमी वाढ केली.
 • श्रीमंतावर आयकर लावून गरीब आणी शेतकर्यांना सवलती दिल्या.
 • शेती, सिंचन, फूड प्रोसेसिंग उद्योग यांना सवलती दिल्या.
 • पेट्रोलच्या किमती कमी केल्या डीझेल च्या किंमती वाढवल्या.
 • ATF ( विमानाला लागणारे इंधन ) ची किंमत वाढवली.
 • वेगवेगळ्या प्रकारे घर बांधणी क्षेत्राला उत्तेजन दिले.
 • बँकांना Rs २५००० कोटी भांडवल सरकार पुरवेल अशी तरतूद केली.
 • विजया बँक आणी IDBI बँक या सरकारी क्षेत्रातील बँकांमधील स्टेक विकून सरकार डायव्हेस्टमेंट करणार आहे.
 • STOCK EXCHANGE मधील परदेशी गुंतवणुकीची सीमा ५% वरून १५% वर नेली. याचा फायदा MCX या कंपनीला होईल.
 • खतावर मिळणारी सबसिडी आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होईल.
 • १० वर्षापेक्षा जुनी असलेली गाडी विकून तुम्ही नवीन गाडी विकत घेत असाल तर एक्साईज करामध्ये ५०% सवलत दिली.

रिझर्व बँक ऑफ इंडिया सेबी इत्यादी

रिझर्व बँकेने बँकांना त्यांच्या मालकीच्या असलेल्या प्रॉपरटीजची value तसेच विदेशी चलनाची value त्यांच्या Tier १ कॅपिटलची रक्कम निश्चित करताना विचारांत घेण्यासाठी परवानगी दिली. या रिझर्व बँकेच्या परवानगीमुळे बँकांच्या भांडवलामध्ये Rs ४५००० कोटी रुपयाची वाढ होण्याची शक्यता आहे.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • इन्फोसिस या IT क्षेत्रातील दिग्गज कंपनीला कुवैत बँकेकडून मोठी ऑर्डर मिळाली.
 • भेल या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीला Rs ५६०० कोटींची ऑर्डर मिळाली.
 • अल्ट्राटेक सिमेंट या कंपनीने J P असोशीएट या कंपनीची सहा उत्पादन युनिट्स विकत घेतली. या बातमीचा परिणाम JP असोसिएट चे कर्ज कमी होईल.
 • ICICI बँकेची BALANCE SHEET सुधारेल, जरी कर्ज कमी झाले तरी त्याबरोबर उत्पनाची साधने कमी झाली हे लक्षांत घ्यावयास हवे.
 • गेल्या आठवड्यांत युनियन बँकेचा शेअर एका मिनिटांत Rs ११४ वरून Rs १०८ वर आला होता. असे का झाले? याचा पाठपुरावा केला असता Rs ७९४ कोटींचा fraud झाला असे ऐकिवांत आले. याची माहिती लोकसभेतही दिली गेली. पण नंतर बँकेने खुलासा केला व तो इंटरनेटवर वाचावयास मिळाला . अशाप्रकारे काही घडले असल्यास त्याचा पाठ पुरावा करावा खरेखोटे जाणून घ्यावे, नंतरच गुंतवणुकीच्या बाबतीत निर्णय घ्यावा.
 • नवी मुंबई एअरपोर्टच्या प्रोजेक्टसाठी GVK, GMR INFRA, टाटा या कंपन्यांच्या बोली SHORTLIST झाल्या आहेत. या बाबतीत पुढील आठवड्यांत कॅबिनेटची मंजुरी मिळेल.
 • टाटा स्टीलला त्यांच्या जमशेदपूर प्रोजेक्टच्या Rs १८७७ कोटींच्या विस्तार प्रकल्पाला पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी मिळाली.
 • हरिद्वारमधील आपल्या उत्पादन युनिटला आता एक्साईज मध्ये सवलत मिळत होती तिची मुदत संपल्यामुळे ती आता मिळणार नाही असे M & M ने जाहीर केले.
 • सदभाव इंजिनिअरिंगने आपली त्यांच्या रोड प्रोजेक्टमधील Rs १० कोटीची हिस्सेदारी Rs ७२ कोटीला विकली

IPOच्या बातम्या :-

 • NATIONAL STOCK EXCHANGE ने आपला IPO आणण्यासाठी एक कमिटी नेमली आहे.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं

पुट call रेशियो ०.७० च्या आसपास असेल तर तो शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये आहे असे समजतात. सध्या हा रेशियो ०.92 आहे. जर हा रेशियो १ झाला तर ही अंदाजपत्रकीय rally संपत आली असे समजावे. नेहेमी अंदाजपत्रकीय rally अंदाजपत्रकाच्या आधी येते. या वेळेला ही rally अंदाज पत्रक सादर झाल्यावर आली.पण सध्या मार्केट बदलते आहे असे जाणवते. सध्या क्रूड LOWEST लेवलला पोहोचले आहे. त्यामुळे हळू हळू क्रूडचा भाव वाढण्याची शक्यता आहे. क्रूडच्या किमती ढासळत असताना ज्या कंपन्यांना फायदा होत होता त्यांना तेवदह्या प्रमाणांत फायदा होणार नाही. ज्या कंपन्यांचे नुकसान होत होते त्यांचे नुकसान कमी होईल.

जागतिक अर्थव्यवस्था चांगली नाही पण भारताची अर्थव्यवस्था सुधारते आहे. परिणामी करेक्शन थांबून ‘सेल on RALLIES’ चे मार्केट जाऊन ‘BUY on DEEPS’ मार्केट सुरु होईल असे वाटते. जर पावसाने साथ दिली तर सोन्याहून पिवळे !
गेल्या सात वर्षांत हा आठवडा चांगला होता. आठवडाभरांत मार्केट १६०० पाईंट वाढले.

 

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

2 thoughts on “आठवड्याचे समालोचन -२९ फेबृआरी २०१६ ते ४ मार्च २०१६ – अंदाजपत्रकातील सुखद वारे !

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन -७ मार्च २०१६ ते ११ मार्च २०१६ – लाभांशाची बरसात शेअरमार्केटच्या अंगणांत. | Stock

 2. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन -७ मार्च २०१६ ते ११ मार्च २०१६ – लाभांशाची बरसात शेअरमार्केटच्या अंगणांत. | Stock

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s