आठवड्याचे समालोचन -१४ मार्च २०१६ ते १८ मार्च २०१६ – तेजी मंदीच्या सरीवर सरी

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

rain-863339_640सगळीकडून अवकाळी पाउस आणी गारपीट होत असतानाही मार्केटमध्ये मात्र सुखद वारे वाहत होते. राजस्थान कर्नाटक गोवा महाराष्ट्र या राज्य सरकारांची अंदाजपत्रक सादर झाली त्यामुळे मार्केटला बातम्यांचा खुराक मिळाला. महागाई कमी झाल्यामुळे RBIने व्याजाचा दर कमी करावा अशी अपेक्षा निर्माण झाली. US $ च्या तुलनेमध्ये रुपया वधारला. येनही वधारला. त्यामुळे अर्थातच इमर्जिंग मार्केट्समध्ये पैशाचा ओघ सुरु झाला.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • USA च्या (सेन्ट्रल बँक) फेडने आपले रेट बदलले नाहीत. जून तिमाही मध्ये रेट वाढवले जातील असा अंदाज व्यक्त केला. तसेच वर्षातून चार वेळेला रेट वाढवण्याएवजी २ वेळेला वाढवले जातील.
 • बँक ऑफ जपानने व्याजदरांत कोणताही बदल केला नाही. बँक ऑफ जपान दरवर्षी ८० लाख कोटी येन अर्थव्यवस्थेत टाकेल.
 • इजिप्तने आपल्या चलनाचे १३% अवमूल्यन केले. याचा परिणाम बजाज ऑटोच्या निर्यात व्यापारावर होईल.

सरकारी announcements

 • सरकारने मार्च २०१७ पर्यंत धातूंवर १८% सेफगार्ड ड्युटीची मुदत वाढवली.याचा फायदा धातू क्षेत्रातील कंपन्यांना होईल.
 • सरकारने अशी घोषणा केली की सरकार जनरल विमा क्षेत्रातील सरकारी कंपन्यांचे लिस्टिंग करून या कंपन्यातील आपला १०% स्टेक विकणार आहे. हे पैसे सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांना भांडवल पुरवण्यासाठी वापरले जातील.
 • सरकारने असे घोषित केले की औषधे बनवताना ड्रग आणी कॉस्मेटिक्स नियमांचे पालन झाले पाहिजे. सरकारने ३०० विविध प्रकारच्या औषधांच्या उत्पादन आणी विक्रीवर बंदी घातली. याविरुद्ध फार्मा कंपन्यानी कोर्टाचा दरवाजा ठोठावला यामुळे फार्मा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सचे भाव खाली आले.
 • सरकार BEL ( भारत अर्थमूवर्स लिमिटेड) या कंपनीतील आपला ५% हिस्सा OFS च्या माध्यमातून विकण्याची शक्यता आहे.
 • दिल्ली सरकारने BSIV COMPLIANCE (हे EMISSION च्या बाबतीत standard आहे) वाहने असली पाहिजेत असे जाहीर केले.
 • गोवा राज्य सरकारने लक्झरी कर ६०% वरून २५% वर आणला.
 • रिझर्व बँकेने खासगी आणी सरकारी क्षेत्रातील बँकांना त्यांच्याकडील बचत खात्यावर दर तिमाहीला व्याज देण्यास सांगितले. हे व्याज आधी दर सहामाहीला दिले जात होते.

सेबी रिझर्व बँक आणी इतर रेग्युलेटरी संस्था

 • सेबीने BSE (BOMBAY STOCK EXCHANGE) ला त्यांचा इश्यू आणण्यासाठी परवानगी दिली. हा इशू पुढील ६ ते ९ महिन्यांत येईल.
 • जर कंपनी WILFUL DEFAULTER असेल तर सेबीने तिला भांडवली बाजारातून पैसा उभारण्यास बंदी घातली.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • CPI ( CONSUMER PRICE INDEX ) ५.६९ वरून ५.१८ वर खाली आला.WPI सतत १६ महिने घसरत आहे. ते -०.९१ होते.कांदे आणी डाळी यांचे भाव बरेच कमी झाले.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • ‘सासकेन’ या कंपनीने युनिस्प्रेडट्रम यांच्याबरोबर समझोता केला. सासकेनला US $ ४ ते ५ कोटी मिळतील. ही रक्कम त्यांच्या मार्केट कॅपिटलायझेशन च्या ५०% एवढी मोठी आहे.त्यामुळे लोकांच्या अंदाजाप्रमाणे Rs २५ विशेच लाभांश आणी Rs ४ अंतरिम लाभांश दिला. लाभांशाची तारीख ३१ मार्च २०१६ आहे.
 • ल्युपिन LTD च्या गोव्याच्या उत्पादन युनिटमध्ये बऱ्याच उणीवा USFDA ने दाखविल्या. एकूण ९ उणीवा दाखवल्या.
 • अजयसिंहनी स्पाईस जेट मध्ये स्टेक घेतल्यावर ही कंपनी अजयसिंहची झाली असा सर्वांचा कयास झाला. पण WARRANT चे शेअर्स मध्ये रुपांतर केल्यानंतर पुन्हा १३% शेअर्स मारन बंधूंकडे जातील या भीतीने स्पाईस जेट पडला आणी सन टी व्हीचा शेअर वधारला.
 • अडव्हांस आयकराचे आकडे आले. या आकड्यावरून कंपनीचे रिझल्ट्स कसे येतील याचा साधारण अंदाज येतो.
 • BPCL, ICICI BANK, बँक ऑफ बरोडा आणी रिलायंस इंडस्ट्रीज या कंपन्यांनी गेल्या वर्षीच्या मानाने चांगला अडव्हांस आयकर भरला तर SBI ने बराच कमी अडव्हांस आयकर भरला.
 • gas पुलिंगची बोली GMR, GVK, NTPC आणी LANCO या कंपन्यांनी जिंकली.
 • रिलायंस इन्फ्रा त्यांची इलेक्ट्रिक आणी पॉवर डिव्हिजन वेगळी करणार आहे.
 • भारती ही टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज कंपनी व्हिडीओकॉनची (१८०० MHZ स्पेक्ट्रम) टेलिकॉम ही डिविजन Rs. ४४२८ कोटीला खरीदणार आहे. बिहार, उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान गुजराथ या राज्यांत ६ सर्कल खरेदी करणार आहे.
 • NCC या infrastructure क्षेत्रातील कंपनी आपला थर्मल पॉवर मालमत्तेतील ५१% स्टेक सिंगापूरमधील सेम्ब्कॉर्प या कंपनीला Rs ३५२ कोटींना विकणार आहे.
 • मोईल या सरकारी कंपनीला मध्य प्रदेश राज्य सरकारने एक नवी खाण allot केली.

कॉर्पोरेट एक्शन

 • कोल इंडिया १४ मार्चला तर अल्केमlab १८ मार्चला ex dividend झाली.
 • आयशर मोटर्स या कंपनीने Rs १०० प्रती शेअर अंतरिम लाभांश दिला.

या आठवड्यांत येणारे IPO :-

 • इंफिबीम ही कंपनी IPO द्वारा Rs ४५० कोटी उभारेल. हा इशू मार्च २१ ला उघडून मार्च २३ ला बंद होईल. IPOचा प्राईस band Rs ३६० ते Rs ४३२ ठेवला आहे. ही कंपनी गुजरात बेस्ड असून या इशुची रक्कम ७५ लॉजिस्टिक केंद्र स्थापन करण्यासाठी वापरेल. ही पहिली Eकॉमर्स खेत्रातील कंपनी आपला ipo आणत आहे.
 • भारत वायर रोप्स ही कंपनी आपला ipo आणून Rs ७० कोटी उभारत आहे हा इशू मार्च १८ला उघडून मार्च २२ला बंद होईल. या इशुच्या रकमेमधून कंपनी नवीन उत्पादन युनिट चालीसगावला सुरु करीत आहे. या IPOचा प्राईस band Rs ४० ते Rs ४५ आहे.
 • खेमानी डीस्ट्रीब्युटर्स and मार्केटिंग ही SME विभागातील कंपनी ipo द्वारा Rs १५.८४ कोटी उभारेल. ही रक्कम ही कंपनी अनसिक्यूर्ड कर्ज फेडण्यासाठी आणी इतर कॉर्पोरेट कामासाठी खर्च करेल.
 • हेल्थकेअर ग्लोबल एन्टरप्रायझेस या कंपनीचा इश्यू पूर्णपणे भरला.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं

या आठवड्यांत जवळ जवळ सर्व सेक्टरमधले शेअर्स आलटूनपालटून तेजीत होते. या आठवड्यांतल्या मार्केटने तेजी करणाऱ्यांना आणी मंदी करणाऱ्यांना सारखीच संधी दिली. कोणत्याही प्रकारचा ट्रेड करणाऱ्यांना प्राप्ती झाली असावी असा हा सुखद आठवडा म्हणावा लागेल. या वेळेला IT कंपन्यांचे निकाल चांगले असतील याची चाहूल मार्केटला लागली आहे असे जाणवले. ५००० कोटींचा पहिला हफ्ता सरकार बँकांना नजीकच्या काळांत देणार आहे आणी RBI ०.२५ % रेट कट करेल अशा अपेक्षेने बँकिंग निर्देशांक तेजीत होता. IPO ची तर रेलचेल आहेच. अशाप्रकारे फुललेल्या बाजारांत मजा आली आणी मंदीचे मळभ दूर झाले. आज मार्केटने पुन्हा निफ्टी ७६०० ची पातळी गाठली.

या आठवड्याच्या शेवटी BSE सेन्सेक्स २४९५३ वर तर NSE निफ्टी ७६०४ वर बंद झाला.

This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे समालोचन -१४ मार्च २०१६ ते १८ मार्च २०१६ – तेजी मंदीच्या सरीवर सरी

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – २१ मार्च २०१६ ते २५ मार्च २०१६ – रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा | Stock Market

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s