आठवड्याचे समालोचन – ४ एप्रिल ते ८ एप्रिल – गुढी यशाची उंच उंच उभारा

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Gudi Padwa Share Market

Image – Redtigerxyz at English Wikipedia

मार्केट रुसव्या फुगव्यामध्ये वस्ताद ! लहान मुलाला जसे हवे,  जे हवे ते मिळाले नाही की अकांडतांडव करते तसेच हे मार्केट ! मार्केट्ची अपेक्षा होती ५० बेसिस पाईंट रेट कट होईल तेव्हढा रेट कट झाला नाही हे निमित्त पुरले. लिक्विडीटी पुरवली जाईल ही गोष्ट मार्केटने ऐकूनच घेतली नाही. ५०० point सेन्सेक्स (BSE चा निर्देशांक) पडला.सत्कार आणी धिक्कार दोन्हीही बरोबरीने मार्केट करते.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • क्रूडचा भाव या आठवड्यांत पुन्हा खाली येण्यास सुरुवात झाली.
 • या आठवड्यांत आपले शेअर मार्केट ग्लोबल मार्केटचा रागरंग पाहून आपला पवित्र बदलत होते.
 • जपानमध्ये गुंतवणूक वाढते आहे. त्यामुळे येन strong होतो आहे. करन्सीमध्ये गोंधळ चालू आहे. येन मजबूत झाल्यामुळे मारुतीला जी रॉयलटी द्यावी लागते आणी पार्टस आयात करावे लागतात त्यासाठी जास्त किंमत मोजावी लागते.त्यामुळे मारुतीच्या शेअर्सची किंमत कमी झाली.

सरकारी announcements

 • सिगारेट किंवा विडीच्या पाकिटावर पाकिटाच्या आकाराच्या ८५% वैधानिक वार्निंग असली पाहिजे असे सरकारने जाहीर केले. याच्या विरोधांत सिगारेट आणी विडी उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी सिगारेट आणी विड्यांचे उत्पादन बंद केले. त्यामुळे ITC, गॉडफ्रे फिलिप्स, VST, आणी गोल्डन टोबको या कंपन्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
 • नवीन क्रूड पॉलिसी जाहीर झाली. IOC, HPCL, BPCL या तीन OMC (ऑईल मार्केटिंग कंपनी) एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर क्रूडची आयात करू शकतील. त्यामुळे या कंपन्यांची बार्गेनिंग पॉवर वाढेल. क्रूड स्वस्त असताना पुढील कालखंडासाठी आयात करून ठेवता येईल. ज्यावेळी क्रुडचे  भाव वाढतील तेव्हा देशाचा फायदा होईल.
 • केंद्र सरकारने ‘STAND UP इंडिया’ या योजनेची घोषणा केली. महिलांना १० लाखापासून ते १ कोटीपर्यंत कर्ज मिळू शकेल. बँकेची प्रत्येक शाखा दोन महिलांना या योजनेमध्ये लोन देऊ शकेल.
 • नीती आयोगाने इलेक्ट्रॉनिक उत्पादनासाठी MAKE-in –INDIA या योजनेखाली नवीन पॉलिसी जाहीर केली. या द्वारे या सेक्टरसाठी एक मेगा कोस्टल इकोनॉमीक झोन स्थापन करून तेथे सर्व प्रकारच्या INFRASTRUCTURE सोयी आणी करसवलती देऊन या सेक्टरला उत्तेजन देण्याचे ठरविले आहे. या पॉलिसीमुळे मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध होतील अशी आशा नीती आयोगाने व्यक्त केली आहे.

RBI आणी सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था

 • रिझर्व बँकेने त्यांची वित्तीय पॉलिसी ५ एप्रिलला जाहीर केली.
 • रेपो रेटमध्ये २५ बेसिस पाईंट कट करून ६.५०% केला. CRR मध्ये काहीही बदल न करता ४% वर स्थिर ठेवला.
 • रिव्हर्स रेपो रेट २५ बेसिस पाईंट वाढवून ५.७५% वरून ६% केला.
 • MSF रेट ७५ बेसिस पाईंट कमी करून ७% केला. दैनिक CRR ९५% वरून ९०% केला.
 • आर्थिक वर्ष २०१७ मध्ये CPI ( CONSUMER PRICE INDEX) ५% राहील असे अनुमान RBIने केले आहे.
 • तसेच RBI Rs १५००० कोटींचे ओपन मार्केट ऑपरेशन करेल असे जाहीर केले. जर पाउस अपेक्षेप्रमाणे झाला आणी ग्रामीण मागणी वाढली तर RBI आणखी रेट कट करू शकेल असे जाहीर केले.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • रिको इंडिया या कंपनीच्या शेअरला ९ ट्रेडिंग सेशन लोअर सर्किट लागत होती. शुक्रवारी प्रथमच अप्पर सर्किट लागले.
 • BLACKSTONE या खाजगी इक्विटी दिग्गज ग्रूपने एम्फसिस बी एफ एल या IT क्षेत्रातील कंपनीतील ६०.५ % स्टेक HEWLETT-PACKARD ENTERPRISE कडून प्रती शेअर Rs ४३० या भावाने विकत घेतला. या कंपनीतील २६% स्टेक साठी Rs ४५७.५४ प्रती शेअर या भावाने ओपन ऑफर आणली जाईल. हा व्यवहार ७५% स्टेकसाठी US$ १ बिलियन चा होईल (Rs ७०७१)
 • HCL TECH ही IT क्षेत्रातील कंपनी त्याच क्षेत्रातील जॉमेट्रिक सोफ्टवेअर ही कंपनी US$ २०० मिलियन किंमतीला शेअर SWAP व्यवहारांत विकत घेतली. या व्यवहारांत HCL TECH चे Rs २ दर्शनी किंमतीचे १० शेअर्स जॉमेट्रिक सोफ्टवेअर या कंपनीच्या Rs २ दर्शनी किंमतीच्या ४३ शेअर्सच्या बदल्यांत मिळतील.
 • बिल्ट ही कंपनी त्यांची थायलंडमढील सबसिडीअरी विकणार आहे. येणार्या रकमेमधून कर्जफेड केली जाईल असे कळते.
 • IFCI ने NSE चे ९.५ लाख शेअर RS ३५९० प्रती शेअर या भावाने विकले.

या आठवड्यांत येणारे IPO :-

 • या आठवड्यांत इंफिबिम या कंपनीचे लिस्टिंग झाले. लिस्टिंग समाधानकारक झाले.
 • या आठवड्यांत इक्विटास होल्डिंग या मायक्रोफायनांस क्षेत्रातील कंपनीचा ipo एकूण १७ वेळा ओवरसबस्क्राईब झाला. परंतु रिटेल क्वोटा मात्रा १.७८ वेळा ओव्हर सबस्क्राईब झाला.
 • HAL या कंपनीने आपल्या IPO साठी DRHP दाखल केले. हा IPO नोव्हेंबर डिसेंबर २०१६ पर्यंत येईल असा अंदाज आहे.
 • NBCC या सार्वजनिक क्षेत्रांतील सरकारी कंपनीने आपण Rs १० दर्शनी किंमतीच्या शेअरचे विभाजन Rs २ दर्शनी किंमतीच्या ५ शेअर्समध्ये करायचे ठरविले आहे. तसेच कंपनीचे नाव NBCC (INDIA) बदलायचे ठरविले आहे.
 • GLAND फार्मा ही हैदराबाद स्थित कंपनी विकत घ्यायचा DR Reddy’s LAB आणी TORRENT फार्मा आणी BAXTER या कंपन्या प्रयत्न करीत आहेत.
 • USFDAने इप्का lab या कंपनीला त्यांच्या मलेरियाच्या लस उत्पादन करणाऱ्या प्लांटसाठी वार्निंग लेटर दिल्यामुळे ग्लोबल फंडाने कंपनीला कळवले की ते इप्का कडून आता ही लस विकत घेणार नाहीत.
 • रिलायंस इंडस्ट्रीजला दिलेले 4G लायसन्स रद्द करावी ही याचिका सुप्रीम कोर्टाने रद्द केली.
 • टाटा स्टील या कंपनीने आपले UK मधील आपली उत्पादन युनिट्स विकण्याची प्रक्रिया ११ एप्रिल पासून सुरु करू असे जाहीर केले. जर्मन दिग्गज कंपनी THYSSENKRUPP आणी लिबर्टी हॉउस या कंपन्या टाटा स्टीलची उत्पादन युनिट्स विकत घेण्यामध्ये रस घेत आहेत.
 • टाटा मोटर्सने त्यांची नवी कार ‘TIAGO’ मार्केटमध्ये आणली.
 • गोदरेज कनझ्युमर्स ही कंपनी US HAIR प्रोडक्ट्स केअर कंपनी ‘SON’(STRENGTH OF NATURE) खरेदी करण्याच्या विचारांत आहे.ह्या कंपनीचा प्रसार मुख्यतः आफ्रिका आणी CARIBBEAN मध्ये आहे.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं

या आठवड्यांत चलनाच्या दरांत खूप गोंधळ होता. प्रत्येक देशाचा निर्यात व्यापार वाढवण्याकडे कल आहे. त्यामुळे चलनामध्ये कृत्रिमरीत्या वाढ करूनदेखील चलनाचे मूल्य कमी ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. चीन पुन्हा devaluation करेल असे वाटते.

या आठवड्यांत मार्केटमध्ये अस्थिरता होती. वित्तीय पॉलिसीनंतर मार्केट झोडपले गेले पण त्यानंतर सावरले नाही. पण छोट्या रेंजमध्ये फिरत राहिले. पण निरीक्षण केले असता असे आढळते की वाढणाऱ्या शेअर्समध्ये volume जास्त त्यामानाने पडणाऱ्या शेअरमध्ये volume कमी म्हणजेच मार्केटचा तेजीचा कल टिकून आहे. पण मार्केट ६८०० पासून वाढत असल्यामुळे मार्केटला ही थकवा आला आहे. काही काळ मार्केट विश्रांतीच्या मूडमध्ये आहे असे दिसते. पुढील आठवड्यांत ३ च दिवस मार्केट आहे. शुक्रवारी बँक ब्युरोची बैठक झाली. त्यांत काय निर्णय झाले आणी त्या निर्णयांचे परिणाम काय होतील ते पुढील आठवड्यांत बघू.

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

3 thoughts on “आठवड्याचे समालोचन – ४ एप्रिल ते ८ एप्रिल – गुढी यशाची उंच उंच उभारा

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – ११ एप्रिल ते १६ एप्रिल – ये रे ये रे पावसा, दे मला पैसा | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s