आठवड्याचे समालोचन – ११ एप्रिल ते १६ एप्रिल – ये रे ये रे पावसा, दे मला पैसा

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

money-rain-1013711_640आता मार्केटला काही ट्रिगर नाही असे बोलले जात असतानाच हवामानाचा अंदाज स्कायमेटने जाहीर केला. गेल्यावेळचा यांचा अंदाज चूकीचा ठरला होता पण या वेळी सरकारी हवामानखात्याने सुद्धा स्कायमेटच्या अंदाजाची पुष्टी केली. या बातमीचे विणकाम मार्केटने अचूक केले. त्यांत मार्केट संपल्यानंतर महागाईचे आणी IIP चे आकडे आले महागाई कमी झाली उत्पादन वाढले आणी त्यांत वरून तुपाची धार IMF ने ( INTERNATIONAL MONETARY FUND) धरली. भारताचा विकास दर ७.५% राहील असे सांगितले. त्यामुळे खुशीची लहर मार्केटमध्ये पसरली आणी मार्केटने निफ्टी ७८०० चा टप्पा लीलया ओलांडला.

 

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • US फेडरल रिझर्वची तातडीची बैठक ११ एप्रिलला झाली. या बैठकीत व्याजदरांवर चर्चा झाली असणे शक्य आहे शक्य आहे.
 • USA मधील क्रूडचे उत्पादन कमी झाल्यामुळे क्रूड ची किंमत वाढण्याची शक्यता आहे. USA मधील नैसर्गिक वायूचे उत्पादन गेल्या पांच वर्षातील सरासरीपेक्षा ३५% ने जास्त झाल्यामुळे नैसर्गिक वायूची किंमत कमी होण्याची शक्यता आहे.
 • दोहा मध्ये ओपेक आणी नॉनओपेक देशांची बैठक होणार आहे. या बैठकीत क्रूडचे उत्पादन गोठवण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

सरकारी announcements

 • बिहार,गुजराथ मधील दारूबंदी आणी तामिळनाडू, मिझोरम या राज्यांत दारूबंदी केली जाईल असे राज्य सरकारांनी जाहीर केल्यामुळे मद्य किंवा मद्यार्क बनवणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स पडले.
 • BPCL या OMC कंपनीमधील FII मर्यादा २४% वरून ४९% केली.
 • USA च्या संरक्षणमंत्र्यांचा भारत दौरा सुरु आहे. त्यामुळे संरक्षणाशी संबंधीत कंपन्यांच्या शेअर वर परिणाम होवू शकतो .
 • रिझर्व बँकेने Rs ५०० कोटीपेक्षा जास्त असलेल्या NPAची यादी सुप्रीम कोर्टाला दिली.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • भारती एअरटेल या टेलिकॉम क्षेत्रातील कंपनीने एअरसेल या कंपनीकडून तामिळनाडू, बिहार, जम्मू & काश्मीर, पश्चिम बंगाल, आसाम, उत्तरपूर्व, आंध्रप्रदेश, आणी ओरिसा या राज्यातील 4G स्पेक्ट्रमची ८ सर्कल्स Rs ३५०० कोटींना खरेदी केली.
 • ओरिसा हायकोर्टाने जिंदाल स्टील & पॉवर्स या कंपनीला सारडा माईन्स या कंपनीकडून आयर्न ओअर घेण्याची आणी त्याची वाहतूक करण्याची परवानगी दिली.
 • पॉस्को या आंतरराष्ट्रीय स्टील उत्पादन करणाऱ्या कंपनीने पर्यावरणाशी संबंधीत कारणांमुळे ओरीसांत आपण स्टील उत्पादन युनिट सुरु करण्यास असमर्थ आहोत असे सांगितले.
 • टाटा स्टील आपले UK मधील स्टील उत्पादन युनिट्स विकण्यासाठी बोलणी सुरु करीत आहे. या कारखान्यांत १५००० कामगार काम करतात. त्यांच्या नोकऱ्या जातील म्हणून UK मधील सरकार मध्यस्थी करीत आहे. ग्रेबुल कॅपिटल ही कंपनी टाटाबरोबर करार करून त्यांचा SCUNTHORPE येथील कारभार GBP ४० कोटींना विकत घेणार. टाटा स्टीलचे हे डील अभ्यास करण्यासारखे आहे. कामगारांना द्याव्या लागणाऱ्या पेंशांची जबाबदारी टाटा स्टीलची राहणार आहे. आता ही जबाबदारी काही प्रमाणांत UK सरकारने उचलण्याची तयारी दाखविली आहे. या बिझिनेससाठी कर्जही टाटा स्टीलच्या नावावर राहणार आहे. ही युनिट कोणी विकत घ्यायला तयार नाही. त्यामुळे चांगली किंमत मिळत नाही. फायदा म्हणण्यासारखा एकच की रोज सहन करावा लागणारा तोटा बंद होईल.
 • अबरदिनने इन्फोसिसचे ५६.२६ लाख शेअर्स Rs ६६५ कोटीना ओपन मार्केटमध्ये विकले. यांच्याजवळ अजून ३% शेअर्स आहेत. ही विक्री अबरदिनकडे काही समस्या असल्यामुळे किंवा इन्फोसिसची काही समस्या असल्यामुळे विकले याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रिझल्ट्सच्या दृष्टीने इन्फोसिसचा शेअर व्हीम्झीकल किंवा म्युझिकल शेअर आहे असे गुंतवणूकदरांचे म्हणणे आहे.
 • डोळ्यांत होणाऱ्या मोतीबिंदुच्या ‘BROMSITE’ या औषधासाठी सन फार्माला USFDA कडून परवानगी मिळाली.
 • ऑरचिड फार्मा या कंपनीच्या कांचीपुरम API युनिटसाठी साठी USFDA कडून क्लीन चीट (ELR) मिळाली.
 • अशोक बिल्डकॉन या कंपनीवर टाकलेल्या धाडीमध्ये आयकर खात्याला कोणतीही अनियमितता आढळली नाही. त्यामुळे कंपनीच्या शेअरची किंमत वाढली.
 • DLF त्यांच्या रेंटल कारभाराचा ४०% हिस्सा Rs १४००० कोटींना विकणार आहे.
 • TTK प्रेस्टीज या कंपनीने UKमधील ‘HORWOOD होमवेअर्स’ ही कंपनी खरेदी केली.
 • विप्रो ही IT क्षेत्रातील कंपनी २० एप्रिलला होणाऱ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मीटिंगमध्ये शेअर BUYBACK वर विचार करेल .याच दिवशी विप्रो त्यांचे वार्षिक निकाल जाहीर करेल.
 • DR REDDY’S LAB या कंपनीचा buy back १८ एप्रिल ते १७ ऑक्टोबर या काळांत होईल.
 • बीर्ला सनलाईफ मधील आपला स्टेक सनलाईफने वाढविला.
 • MONSANTO ही कंपनी रॉयलटी वाढवत आहे. ते शेतकऱ्यांकडून बियाण्यांच्या वाढीव किंमती घेत आहेत. म्हणून सरकार या क्षेत्रातील आपले नियंत्रण वाढविण्याचा विचार करीत आहे.
 • ALCOBA या धातू क्षेत्रातील कंपनीचे रिझल्ट आले. 92% तोटा झाला आहे. कंपनीने भविष्यासाठी गायडंस(अनुमान) फारसे चांगले दिले नाही.
 • कोल इंडियाने कोळशाचे दर ४०% ने कमी केले असे वर्तमानपत्रांत आल्यामुळे ऑपरेटिंग मार्जिन कमी होणार असे वाटून शेअर पडला. आम्ही दर कमी केले नाहीत असे कंपनीने जाहीर केल्यावर शेअरची किंमत पुन्हा वाढू लागली.
 • गोवा कार्बन या कंपनीचा रिझल्ट लागला. गेल्या वर्षीच्या Rs ८ कोटी तोटयाचे यावर्षी Rs ४१ कोटी फायद्यांत रुपांतर झाले.
 • ADB (एशियन डेव्हलपमेंट बँक) आणी IFC (INTERNATIONAL FINANCE कॉर्पोरेशन) या दोन आंतरराष्टीय संस्था IDBI मध्ये स्टेक घेणार आहेत.
 • १५ एप्रिलला इन्फोसिस आणी DCB यांचे वार्षिक निकाल जाहीर होतील.
 • लेडचे भाव वाढल्यामुळे एक्साईडने आपल्या उत्पादनाचे भाव ५% वाढवल्यामुळे त्या कंपनीला फायदा होईल.
 • मार्च महिन्यांत CPI ४.८३ झाला (गेला महिना ५.१८).म्हणजेच महागाई कमी झाली. IIP मध्ये -१.५ वरून २ मध्ये वाढ झाली.
 • बाल्टिक ड्राय निर्देशांक २९० वरून ५५५ झाला. हा निर्देशांक शिपिंग कंपन्यांच्या संदर्भांत वापरला जातो.त्यामुळे शिपिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली.
 • सतत लागून चार पांच दिवस सुट्टी असल्यामुळे पर्यटन क्षेत्रातील हॉटेल आणी पर्यटन कंपन्यांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे डेल्टा कॉर्प, COX AND KINGS, THOMAS & COOK तसेच EIH, रॉयल ऑर्चीड, व्हाईसरॉय आदि हॉटेल कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वाढले.
 • शिल्पा मेडिकेअर या कंपनीला गुड MANUFACTURING पॉलिसी चे प्रमाणपत्र मिळाले

Corporate Action : –

 • Lux इंडस्ट्रीज या कंपनीने आपल्या एक शेअरचे ५ शेअर्समध्ये विभाजन केल्याचे जाहीर केले.
 • L & T इन्फोटेक या कंपनीने आपले सुधारीत DRHP SEBI कडे दाखल केले.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं

‘ये रे ये रे पावसा शेवटी तूच देणार पैसा’ असे म्हणावेसे वाटते. आपले नेहेमीचे गाणे ’ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा’ असे म्हणता येणार नाही कारण देशाच्या १० राज्यांत दुष्काळाचा हाहाक्कार आहे. त्यामुळे आणी वाढणार्या महागाईमुळे लोकांजवळ पावसाला द्यायला पैसा कुठून असणार ? पण पाउस येणार आणी तो नियमित आणी १०६% या हवामानखात्याच्या अंदाजामुळे सगळेजण सुखावले. त्यामुळे पावसाशी संबंधीत सर्व शेअर्स उदा :- बीबियाणे,खते, TRACTOR, सिंचन सुविधा पुरविणाऱ्या, तसेच पावसामुळे ग्रामीण भागांत येणार्या संपन्नतेवर अवलंबून असणाऱ्या बॅंका, टूव्हीलर, FMCG कंपन्यांचे शेअर्स वाढले.यामुळे शेअरमार्केटचे दोन्ही निर्देशांक BSE सेन्सेक्स आणी NSE निफ्टी वाढले.
आता हा सुखद गारवा असाच चालू राहील कां ?हे शुक्रवारच्या इन्फोसिसच्या वार्षिक निकालांवरून समजेल. पाहू या काय होते ते.

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे समालोचन – ११ एप्रिल ते १६ एप्रिल – ये रे ये रे पावसा, दे मला पैसा

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – १८ एप्रिल ते २२ एप्रिल – SEE SAW वर शेअर मार्केट | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s