आठवड्याचे समालोचन – १८ एप्रिल ते २२ एप्रिल – SEE SAW वर शेअर मार्केट

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

source - wikipedia

source – wikipedia

आपल्याला गोड जेवण जेवल्यावर जशी सुस्ती येते तसे काहीसे मार्केटचे झाले. निफ्टी ६८०० पासून ते ७९०० पर्यंत मार्केट वाढले. ज्यांनी काही दिवसापूर्वी शेअर्सच्या किंमती पाहिल्या असतील त्यांना शेअर्स महाग वाटू लागले. पण या महिन्यांत कंपन्यांचे वार्षिक निकाल लागतात. जर निकाल चांगले आले तर रीरेटिंग होण्याची शक्यता निर्माण होईल आणी येथूनही मार्केट वाढण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांना याची चाहूल लागली आहे असे म्हणता येईल. त्यामुळे तेजी मंदीच्या SEE-SAW वर मार्केट खेळतंय असं वाटतय.

 

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • दोहा येथे जी ओपेकची (ओईल प्रोड्युसिंग कंट्रीज) मीटिंग झाली तिच्यांत क्रूडचे उत्पादन गोठवण्यावर कोणताही निर्णय झाला नाही. इराणने या मीटिंगमध्ये भाग घेतला नाही. त्यामुळे क्रुडचा भाव वाढायला वेळ लागेल.
 • ECB ने (युरोपिअन सेन्ट्रल बँक) आपल्या व्याज दरांत कोणताही बदल केला नाही. डीपॉझीट रेट -०.४ % आणी लेंडिंग रेट ०.२५ % कायम ठेवला.
 • चीनने मार्च २०१६ पर्यंत १२० मिलियन टन स्टील निर्यात केले. यामुळे इतर देशातील (यांत भारत, USA, UK हे देशही आले) स्टील उद्योगाला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. परंतु चीन आपले स्टीलचे उत्पादन आणी निर्यात कमी करण्यास तयार नाही. त्यामुळे आता बहुतेक देश आपला स्टील उद्योग वाचवण्यासाठी स्टील आयातीवर ड्युटी लावण्याची शक्यता आहे. प्रत्येक देश स्टील आयातीवर antidumping ड्युटी लावत आहे आणी आपला स्टील उद्योग वाचवण्यासाठी इतर उपाय करत आहे.
 • UK सरकारने टाटा स्टीलच्या UK बिझीनेसमधील २५% स्टेक घेण्याची तयारी दाखवली आहे. तसेच कर्जातही सूट देण्याची तयारी दाखवली आहे. टाटाने आपला लॉंग प्रॉडकट बिझीनेस ग्रे बुल कॅपिटलला विकला आहे. त्यांच्या पोर्ट टोलबॉट येथील बिझीनेस विकत घेण्यांत लिबर्टी हाऊस आणी टोलबॉटच्या व्यवस्थापनाने स्वारस्य दाखवले आहे.
 • एपिक सिस्टीम या US मधील अमेरिकन कंपनीने अमेरिकन कोर्टांत दाखल केलेल्या केसमध्ये टी सी एस या IT क्षेत्रातील दिग्गज कंपनीला कोर्टाने US$ ९४० मिलियन दंड ठोठावला आहे.टी सी एस ने जाहीर केले आहे की याबाबतीत ते योग्य ती कार्यवाही करतील.

सरकारी announcements

 • मेथीलीन क्लोराईड या केमिकलच्या बाबतीत सरकार ANTIDUMPING ड्युटी लावण्याच्या विचारात आहे. यामुळे S H केळकर, गुजराथ फ्लुरो, गुजरात अल्कली या कंपन्यांना फायदा होईल.
 • तसेच सरकार कोल्ड रोल्ड स्टीलवरही antidumping ड्युटी लावण्याच्या विचारांत आहे.
 • जेम्स and जुवेलरी बिझीनेससाठी ड्युटीफ्री सोने उपलब्ध करून दिले जाईल असे सरकारने जाहीर केले.
 • DOT ने रिलायंस जियो आणी आर कॉम या कंपन्यांना ९ सर्कल मध्ये स्पेक्ट्रम शेअरिंगसाठी मंजुरी दिली.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • भारताचा WPI (होलसेल प्राईस इंडेक्स) सतत १७ व्या महिन्यांत कमी झाला. WPI मे २०१६ मध्ये -२.३३% होता. स्वस्त क्रूड आणी उत्पादित वस्तूंच्या किमतीमधील घट हे दर्शवितात की मागणी कमी झालेली आहे.
 • CPI मार्च मध्ये ४.८३% (फेब्रुआरी ५.१८%) झाला. याचा अर्थ महागाई कमी होत आहे. निर्यात सतत कमी होत आहे.

रिझर्व बँक ऑफ इंडिया, सेबी, आणी इतर प्रशासनिक संस्था

 • RBI ने १५० कर्जफेड करण्याऱ्या कंपन्यांचा परामर्ष घेण्याचे ठरवले आहे. या कंपन्यांना दिलेल्या कर्जांवर RBIने प्रोविजन करावयास सांगितली होती. या कंपन्यांना कर्ज दिलेल्या बँकांनी असे सांगितले आहे की अलीकडच्या काळांत या कंपन्याची आर्थिक स्थिती सुधारत आहे. आणी या कंपन्या कर्जफेड करीत आहेत. त्यामुळे या कंपन्यांना दिलेल्या कर्जावर प्रोविजन करण्यांत RBI सूट देण्याची शक्यता आहे. या निर्णयाचा फायदा जे पी अस्सोसिंएट ग्रूप आणी त्यांना कर्ज देणार्या बँकांना होईल. या RBI च्या निर्णयामुळे बँकांच्या शेअर्स मध्ये वाढ झाली.
 • RBI ने पंजाब राज्याला दिलेल्या फूड क्रेडीटसाठी बँकांच्या कॉन्सोर्शीयमला प्रोविजन करायला सांगितली.या कर्जाला आवश्यक असणारी धान्याच्या साठ्यांची सिक्युरिटी पंजाब सरकारच्या गोदामांत उपलब्ध नव्हती. यामुळे बँकांनी यापुढे आम्ही पंजाबच्या राज्य सरकारला धान्य खरेदी करण्यासाठी कर्ज देणार नाही असा निर्णय घेतला.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • भारती एअरटेल ही कंपनी त्यांच्या भारती इन्फ्राटेलमधील ५% स्टेक विकून आपले कर्ज कमी करणार आहे या विक्रीमधून Rs ३७०० कोटी मिळतील.
 • सुप्राजीत आणी फिनिक्स यांचे मर्जर झाले. सुप्राजीतच्या ४ शेअर्सला फिनिक्सचे ५ शेअर्स मिळतील.
 • २१ ते २३ मार्च या काळांत USFDA ने अलेम्बिक फार्माच्या तालुका प्लांटची तपासणी केली. त्यांत फार्मुलेशन युनिटमध्ये ४ त्रुटी आढळल्या.
 • कंटेनर कॉर्पोरेशन ने PSP लायसेन्स खरेदी केले. त्यामुळे आता कंटेनर बरोबर बल्क गुडस्चे HANDLING करू शकतील.
 • विप्रोचा वार्षिक निकाल निराशाजनक आला. तसेच त्यांनी २०१७च्या पहिल्या तिमाहीसाठी निराशाजनक गायडंस दिला. याचा परिणाम शेअरच्या किमतीवर दिसला. विप्रोने जाहीर केले की ते Rs ६२५ प्रती शेअर या भावापर्यंत Rs २५०० कोटी शेअर्स buyback साठी वापरतील. तसेच Rs १ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
 • इन्फोसिसचा वार्षिक निकाल चांगला लागला. कंपनीने २०१७-२०१८ साठी चांगला गायडंस दिला. कंपनीने Rs १४.२५ लाभांश जाहीर केला.
 • TCS या कंपनीचे बर्याच कालावधीनंतर वार्षिक निकाल चांगले आले. त्यांनी २०१७-१८ साठी चांगला गायडंस दिला. कंपनीने Rs २७ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
 • LIC हौसिंग फायनान्स, गृह फायनांस, इंडस इंड बँक, यांचे वार्षिक निकाल चांगले आले.
 • हिंदुस्थान झिंक या कंपनीचा वार्षिक निकाल ठीक होता.
 • HDFC बँकेचा वार्षिक निकाल चांगला आला. profit Rs ३३७० कोटी झाले NPA ची पोझिशन स्थिर राहिली. कंपनीने Rs ९.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

IPO 

 • या आठवड्यांत इक्वीटास होल्डिंग्स या कंपनीचे चांगले लिस्टिंग झाले. IPOमध्ये Rs ११० दिलेल्या शेअरचे Rs १४५ ला लिस्टिंग झाले. गुंतवणूकदारांना चांगला लिस्टिंग गेन झाला.
 • THYROCARE TECHNOLOGIES ही कंपनी आपला IPO एप्रिल २७ ते एप्रिल २९ या काळांत आणत आहे.प्राईस band Rs ४२० ते Rs ४४६ आहे. ही कंपनी Rs ४४९ कोटी ते ४७७ कोटी उभारत आहे. ही हेल्थकेअर क्षेत्रातील कर्जमुक्त कंपनी आहे. ही कंपनी WATER टेस्टिंग, IMAGING CENTRES या दोन नव्या कॅनसर डायाग्नोस्टिक क्षेत्रांत प्रवेश करीत आहे कंपनीचे यश नवनवीन प्रादेशिक lab उघडण्यावर, तसेच निरनिराळ्या प्रकारच्या टेस्ट्स डेव्हलप करण्यावर आणी लार्जस्केल इकोनोमीज मिळण्यावर अवलंबून आहे. कंपनीचे मॉडेल DR लाल पाथ lab वर आधारीत आहे.
 • पुढील आठवड्यांत उज्जीवन या मायक्रो फायनांस क्षेत्रातील कंपनीचा ipo येत आहे. कंपनीचा IPO २८ एप्रिलला उघडून २ मेला बंद होईल. प्राईस band Rs २०७ ते Rs २१० आहे. ipo द्वारा ही कंपनी Rs ८५० कोटी उभारेल. या कंपनीला small फायनांस बँकेचे लायसेंस मिळाले आहे. या कंपनीच्या २४ राज्यांत आणी केंद्रशासित प्रदेशांत ४७० शाखा आहेत. ही कंपनी ग्रूप कर्ज, मायक्रो आणी SMALL उद्योगांना कर्ज तसेच घरांसाठी कर्ज ही कंपनी देते.

Corporate Action 

 • भारती इन्फ्राटेल या कंपनीची लाभांश तसेच BUYBACK वर निर्णय घेण्यासाठी २६ एप्रिल २०१६ ला कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक आहे.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं

आतापर्यंत आलेले निकाल अपेक्षेपेशा चांगले आले. त्यातून पुढील आठवडा एक्स्पायरीचा आहे. भारताची आर्थिक स्थिती सुधारते आहे. त्यामुळे कल तेजीचा दिसतो आहे. मार्केट पडल्यानंतर खरेदी होते आहे. निराशेचे सावट दूर झाले आहे. पण सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे निफ्टीमध्ये १००० अंकांची वाढ झाली. येथून जर मार्केट पडले तर चढ्या भावाचे शेअर्स आपल्याजवळ राहतील अशी भीती आहे. अदलाबदल किंवा चर्नींग चालू आहे. त्यामुळे काही काळ मार्केट मंदीत राहिले तर लगेच मार्केट तेजीत येते. लहान मुले जशी एका लांब फळीवर बसून पाय जमिनीला टेकवून वर खाली झुलत राहतात तशी स्थिती मार्केट्ची आहे. मार्केटला एक माणूस समजून मनुष्यस्वभावाप्रमाणे मार्केटच्या व्यवहाराचे निरीक्षण केल्यास व्यवहार छान समजतात आणी मजाही येते. शेअरमार्केट आपल्या आयुष्याचा एक भाग बनते.
सेन्सेक्स २५८३८ वर आणी निफ्टी ७९०० वर बंद झाले.

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

2 thoughts on “आठवड्याचे समालोचन – १८ एप्रिल ते २२ एप्रिल – SEE SAW वर शेअर मार्केट

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – २५ एप्रिल ते २९ एप्रिल – पास/नापास | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s