आठवड्याचे समालोचन – २५ एप्रिल ते २९ एप्रिल – पास/नापास

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
thumbs-up-1172213_640शुक्रवारी मार्केटच्या दृष्टीने एप्रिल महिन्याचा शेवट झाला. वार्षिक निकालांचा मोसम सुरु होऊन एक महिना होत आला. सोमवारपासून मे महिना सुरु होईल. ज्या कंपन्या /जे शेअर्स पास झाले, ज्यांचे रिझल्ट्स चांगले आले त्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती लगेच वाढल्या. ज्यांचे निकाल खराब आले ते शेअर्स धोपटले गेले. दरवेळी लाभांश किती जाहीर होईल ही उत्सुकता असते. परंतु या वर्षी १० लाखावरील DDT मुळे बहुतेक कंपन्यांनी लाभांश, अंतरिम लाभांश म्हणून ३१ मार्चपूर्वी जाहीर करून दिले सुद्धा. ज्या कंपन्यांचे रिझल्ट चांगले आले पण त्या कंपन्यांच्या शेअर्सचा भाव पडला अशा कंपन्यांच्या शेअर्सच्या भावाचे निरीक्षण केल्यास असे आढळले की ह्या कंपन्यांचे रिझल्ट चांगले येणार हे मार्केटने गृहीतच धरले होते. त्यामुळे शेअरच्या किंमतीत त्याचा समावेश होता हेच खरे.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • या आठवड्यांत बँक ऑफ जपान आणी आणी USA मध्ये FOMC ची अशा दोन बैठका झाल्या. FOMC ने आणी बँक ऑफ जपानने आपल्या व्याजदरात तसेच वित्तीय धोरणांत कुठलाही बदल केला नाही.त्यामुळे जपानचे आणी USA चे मार्केट पडले आणी त्याचा परिणाम भारतीय शेअर मार्केटवर झाला. तेजीत असलेल्या मार्केटला ग्रहण लागले असे म्हणावे लागेल.
 • USA मधील क्रूड चा साठा कमी झाल्यामुळे क्रूडचे भाव वाढू लागले आहेत. क्रुडचे भाव आठवड्याच्या शेवटी US $ ४८.८ वर गेले

सरकारी announcements

 • संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली. या अधिवेशनात जास्त काही काम होणार नाही हे मार्केटने गृहीत धरले आहे. BANKRUPTCY बिल पास होईल असा अंदाज आहे. केंद्र सरकार टेक्स्टाईल धोरण जाहीर करेल.
 • डायव्हेस्टमेंट डीपार्टमेंटचे नाव बदलून (DIPAM) डीपार्टमेंट ऑफ इनव्हेस्टमेंट and पब्लिक ASSET MANAGEMENT असे ठेवले. हा विभाग SUUTI च्या सर्व प्रकरणांची काळजी घेईल.
 • तंबाखू आणी तम्बाखुशी संबंधीत उद्योगांत FDI ला बंदी करणार आहेत. याचा परिणाम ITC, GODFREY फिलिप्स, गोल्डन TOBACO, VST इंडस्ट्रीज या कंपन्यांवर होईल.
 • सरकारच्या ‘उजाला योजनेंअतर्गत आणी मेक-इन-इंडियाच्या अंतर्गत २० कोटी LED बल्ब बसवणार आहे. याची ऑर्डर सूर्या रोशनी आणी HAVELLS या कंपन्याना मिळण्याची शक्यता आहे. सूर्या रोशनीने SNAPDEAL बरोबरही करार केला आहे. त्यामुळे या दोन्ही योजना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतील..
 • सरंक्षणसंबंधी कंपन्यांतही ४९% FDI ला मंजुरी देण्याचा सरकार विचार करीत आहे.
 • सरकारने NHPCच्या शेअर्सची OFS (ऑफर फॉर सेल) किरकोळ गुंतवणूकदाराशिवाय बाकीच्या गुंतवणूकदरांसाठी Rs २१.७५ प्रती शेअर या भावाने २७ एप्रिल २०१६ आणली. किरकोळ गुंतवणूकदारांना या किंमतीवर ५% सूट दिली जाईल. आणी ते २८ एप्रिल २०१६ रोजी या OFS मध्ये सहभागी होऊ शकतील.
 • HMTची तोट्यांत चालणारी तीन युनिट्स बंद केली जाणार आहेत. त्यामुळे ITI ला सुद्धा पुनरुज्जीवित केले जाईल असा अंदाज आहे. HOCL( हिंदुस्थान ऑर्गनीक केमिकल्स लिमिटेड) या कंपनीचे पुनरुज्जीवन करण्याचे सरकारने जाहीर केले आहे.
 • चीनमधून आयात होणाऱ्या टेलिकॉम इक्विपमेंट SDH वर ८६.५९% ANTIDUMPING ड्युटी लावली इस्त्रायल मधून आयात होणाऱ्या या इक्विपमेंटवर थोडी कमी ANTIDUMPING ड्युटी लावली आहे. ही ड्युटी ५ वर्षांसाठी लावली आहे.
 • सरकारने साखरेच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी STOCK LIMIT लावायचे ठरवले आहे. साखर उत्पादकांनी यासाठी पंतप्रधानांची भेट घेवून एक महिन्याची मुदत देण्याची विनंती केली. त्यामुळे साखरेच्या किंमतीत तेजी आली. सरकारने राज्य सरकारांना साखरेचा पुरवठा, वितरण, साठवणूक, आणी किंमत याबाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार दिले.सरकारने साखर उत्पादकांची विनंती मान्य केली नाही आणी STOCK लिमिट ठरवले.
 • MCA21 ह्या पोर्टलचे काम सरकारने ‘इन्फोसिस’ला दिले होते. या पोर्टलच्या वर्किंगमध्ये काही अडचणी येत असल्याबद्दल सरकारने इन्फोसिसला जबाबदार धरले आहे.
 • एअर इंडियाला फायदा व्हावा या उद्देशाने सरकारने विमानाच्या इंधनाचे दर खूपच कमी केले. तेवढ्या प्रमाणांत पेट्रोल आणी डीझेलच्या किंमती कमी केल्या नाहीत त्यामुळे विमानकंपन्यांचा फायदा झाला.
 • सरकारने OIL(ओईल इंडिया लिमिटेड),मध्ये १०% तर NFL (NATIONAL FERTILIZERS लिमिटेड) मध्ये १५% तर RCF (राष्ट्रीय केमिकल्स आणी fertilizers) मध्ये ५% डायव्हेस्टमेंट करणार आहे.
 • मुंबई महापालिकेने व्यापारी आणी राहती घरे बांधण्यासाठी अनुक्रमे ५ आणी २ असा FSI करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मुंबईमध्ये ज्या बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांकडे LANDBANK आहे अशा कंपन्यांचे शेअर्स वधारले

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • आपण जरी शेअरमार्केटमध्ये व्यवहार करीत असलो तरी कमोडीटी मार्केटकडेही लक्ष ठेवावे.या आठवड्यांत सोने,चांदी, तसेच इतर धातू यांचे भाव वाढले. ज्यावेळी सोन्याचा भाव वाढू लागतो त्यावेळी इक्विटी मार्केट पडण्याची चिन्हे दिसू लागतात. सोन्यामध्ये आपली गुंतवणूक जास्त सुरक्षित आणी फायदेशीर आहे असे लोकांना वाटू लागते. सध्या लग्नसराईसुद्धा चालू आहे त्यामुळे सोन्याचे भाव वाढण्याचे मार्केटमधील अस्थिरता हे एकच कारण नव्हे.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • रिलायंस इंडस्ट्रीज, रेमंड, व्होल्टास लिमिटेड, महिंद्र आणी महिंद्र फायनांस, भारती इन्फ्राटेल, RALLIES इंडिया, बायोकान रेमिडीज, सिनजेन लिमिटेड, इंडूस इंड बँक, यस बँक, लक्ष्मी बँक, अक्सिस बँक, मारुती यांचे वार्षिक निकाल चांगले आले. परंतु अक्सिस बँकेने भविष्यासाठी गायडंस निराशाजनक दिल्यामुळे शेअर पडला. झेनसार टेक्नोलॉजीज, पर्सिस्टंट टेक्नोलॉजीज,HCL TECH या कंपन्यांचे निकाल असमाधानकारक होते.
 • VOLKSWAGEN या कंपनीने भविष्यासाठी चांगला गायडंस दिला नाही. त्यामुळे त्यांना स्पेअर पार्टस पुरवणाऱ्या मदरसन सुमी या कंपनीचा शेअर पडला.
 • सनफार्मा या कंपनीने मध्य प्रदेशच्या राज्यसरकारबरोबर मलेरिया निर्मुलनासाठी औषध शोधणे, त्याचे उत्पादन करणे यासाठी करार केला. या कराराचा नकारात्मक परिणाम इप्का lab या दुसऱ्या फार्मा कंपनीच्या बिझीनेसवर होईल. कारण भारतांत सर्वत्र मलेरियासाठी इप्का lab तयार केलेले औषध वापरले जाते.
 • गुजरात अंबुजा एक्स्पोर्ट ह्या कंपनीला २५ वर्षे पूर्ण होत असल्यामुळे ती विशेष लाभांश जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 • RCF या सरकारी क्षेत्रातील खत उत्पादन करणाऱ्या कंपनीला लागणारी बरीच केमिकल्स सरकारच्या ANTIEDUMPING ड्युटीच्या यादीमध्ये आली.
 • भारती एअरटेल, फोर्स मोटर्स, सनोफी, अतुल ऑटो, डाबर, मेरिको, कॅन फिना होम्स, कजारिया सेरामिक्स, ACC या कंपन्यांचे रिझल्ट्स चांगले आले.
 • ICICI बँकेचे रिझल्ट्स चांगले आले परंतु त्यांनी रिझर्व बँकेच्या सुचनेप्रमाणे NPA साठी पूर्णपणे प्रोविजन केलीच पण Rs ३६०० कोटींची भविष्यांत येणार्या CONTINGENCIES साठी प्रोविजन केली. त्यामुळे त्यांचे प्रॉफिट कमी झाले. मार्केटने त्यांनी केलेली अतिरिक्त प्रोविजन हा भविष्यासाठी इशारा असल्याचा विचार केला. यामुळे शेअर पडला.

सेबी, RBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • यु को बँक आणी आय ओ बी या दोन बँकांना १ जुलै २०१६ पासून वायदा बाजारातून वगळले आहे.

कॉर्पोरेट एक्शन

 • भारती इन्फ्राटेल ही टेलिकॉम क्षेत्रातील कंपनी शेअर बाय back जास्तीतजास्त Rs ४५० प्रती शेअर या भावाने करेल. यासाठी कंपनीने Rs २००० कोटींची रक्कम निश्चित केली आहे.
 • भारती एअरटेल या कंपनीने शेअर्स buyback जाहीर केले. शेअर buyback साठी Rs ४०० ही जास्तीतजास्त किंमत आणी कंपनी Rs १४३४ कोटी एवढ्या रकमेपर्यंत buyback करेल असे जाहीर केले.या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं

या आठवड्यांत उघडणारे IPO

 • या आठवड्यांत THYROCAREचा IPO २७ तारखेला उघडून २९ तारखेला बंद झाला. IPO तिसऱ्या दिवशी ७३ वेळेला ओवरसबस्क्राईब झाला.
 • उज्जीवनचा IPO २८ तारखेला उघडून २ मे २०१६ ला बंद होत आहे. पहिल्या दोन दिवसांत या IPOला चांगला प्रतिसाद मिळाला.
 • व्होडाफोन (इंडिया) ने आपला IPO आणण्याची तयारी सुरु केली आहे.

यावेळी आलेला अनुभव तुम्हाला त्याचप्रमाणे मलाही नवीनच. थायरोकेअर IPO चा फॉर्म भरायचा होता. मला माझ्या ब्रोकरकडून फोन आला.MADAM, यावेळी IPO चा फॉर्म भरायचा असेल तर तुमचा ASBA अकौंट यादीत असलेल्या बँकेतच असला पाहिजे.पण त्या यादींत ६ बँकांचाच समावेश होता प्रथम माझ्या ओळखीत जे लोक IPO चा फॉर्म भरणार होते त्यांना कळवले. आता यावर उपाय काय या विचारांत असतानाच साधारण संध्याकाळी ६ वाजता पुन्हा ब्रोकरच्या ऑफिसमधून फोन आला की आता २४ बॅंकामधील अकौंट ASBA म्हणून स्वीकारले जातील. त्यामुळे बऱ्याच जणांची सोय झाली अमरावतीहून मला एका गुंतवणूकदाराचा फोन आला.त्याचा अकौंट ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ मध्ये होता.बँक ऑफ महाराष्ट्रचे नाव या २४ बँकांच्या यादीतही नव्हते..पण यावर एकच उपाय मला सुचला आणी मला माझ्या ब्रोकरनेही तोच उपाय सुचवला.

ज्या माणसाचा अकौंट त्या २४ बँकांच्या यादीमध्ये असलेल्या बँकेत असेल अश्या माणसाचा अकौंट नंबर तुम्ही ASBA अकौंट म्हणून लिहू शकता. याच बरोबर त्या व्यक्तीचा अकौंट नंबर. बँकेचे नाव, पत्ता आणी त्याने ज्या प्रमाणे त्याच्या अकौंट मध्ये स्पेसिमन सही केली असेल तशी सही करणे जरुरीचे आहे. तुम्ही त्या व्यक्तीच्या खात्यामध्ये IPO चा फॉर्म देण्याआधी पैसे आहेत याची खात्री करून घ्यावी. .अशा तऱ्हेने एका तिसऱ्या माणसाच्या ASBA खात्यामधून एका कंपनीच्या IPOसाठी ५ फॉर्मसाठी पैसे भरू शकता. एक मात्र लक्षांत ठेवा की DEMAT अकौंट नंबर तसेच DEMAT अकौंटमधील सहीच्या जागी सही मात्र तुमचीच असली पाहिजे. अशी व्यवस्था केल्यास IPO मध्ये अर्ज करण्याची संधी हुकणार नाही. समजा ‘अ’ चा अकौंट बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचे नाव त्या यादीत नाही. तो ‘ब’ कडे गेला ‘ब’ चा अकौंट स्टेट बँकेत आहे. स्टेट बँकेचे नाव त्या यादीत आहे . अशा वेळी ‘ब’ चा स्टेट बँकेतील अकौंट नंबर,बँकेचा पत्ता, फॉर्मवर लिहायला हवा. ASBA अकौंट होल्डर म्हणून ‘ब’ ने फॉर्मवर सही केली पाहिजे. ‘ब’ च्या अकौंटमध्ये तेवढे पैसे असतील तर ते BLOCK केले जातील. आपोआपच तेवढे पैसे ‘ब’ ला देण्याची जबाबदारी ‘अ’ ची असते. पण शेअर्स मात्र अ च्या DEMAT अकौंटमध्ये जमा होतील.हा व्यवहार पूर्णपणे कायदेशीर आहे तरीसुद्धा अशा व्यवहारांत एकमेकांवर विश्वास असणे महत्वाचे आहे.

कोणतीही समस्या आल्यास त्यावर काही पर्याय आहे कां याची चौकशी करावी किंवा IPO च्या फॉर्मवर पाठीमागच्या बाजूस दिलेल्या रजिस्ट्रारशी संपर्क साधावा. नाहीतर सेबीच्या साईटवर जाऊन पहावे. आपल्या समस्येचे समाधान करून घेतले पाहिजे. हातावर हात ठेवून बसल्यास उत्तर मिळत नाही. वेळेवर शहाणे व्हावे आणी इतरांनाही शहाणे करावे. शेअरमार्केट मधील वातावरण सतत फार वेगांत बदलत असते तेव्हा ही प्रसंगावधानता आपण अंगी बाणवलीच पाहिजे.

BSE सेन्सेक्स २५६०७ आणी निफ्टी ७८५० वर बंद झाले.

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे समालोचन – २५ एप्रिल ते २९ एप्रिल – पास/नापास

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – २ मे ते ६ मे २०१६ – केळीचे सुकले बाग | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s