आठवड्याचे समालोचन – ९ मे ते १३ मे २०१६ – बातम्यांचा सूळसुळाट आणी ट्रेडर्सचा गोंगाट

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या आठवड्यांत जाहीर झालेले कंपन्यांचे रिझल्ट्स, IIp, आणी महागाईचे आकडे, MSCI निर्देशांकांत केलेले बदल, आणी सरकारने धोरणात्मक घेतलेले निर्णय यामुळे गुंतवणूकदार आणी ट्रेडर्स यांना बर्याच वेळेला बुचकळ्यांत टाकले. याचा फटका ट्रेडर्सना जास्त बसला. घेतलेले निर्णय फायद्याचे किंवा तोट्याचे की कोणताही परिणाम शेअर्सच्या किंमतीवर न होणारे ते कळायला, समजावून घ्यायला वेळ लागत होता. तेवढ्यांत stoploss ट्रिगर होत होते त्यामुळे गोंधळाचे वातावरण होते.

 

 

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • भारताने मॉरीशस आणी सिंगापूरबरोबर केलेल्या tax treaty मध्ये बदल केल्यामुळे आता मॉरीशसमधील entities नी जर भारतीय कंपन्यांचे शेअर्स विकले तर भारत सरकारने त्यावर कॅपिटल गेन्स कर आकारण्यांत येईल असे सांगितले. हा कर एप्रिल २०१७ किंवा त्यानंतर खरेदी केलेल्या किंवा acquireकेलेल्या शेअर्स वर लागू होइल. एप्रील २०१७ ते मार्च २०१९ ह्या काळांत हा कर स्थानीय कॅपिटल गेन्स कराच्या अर्ध्या दराने आकारला जाईल.
 • तसेच मॉरीशस आणी सिंगापूरबरोबर माहितीचे आदानप्रदान आंतरराष्ट्रीय standards प्रमाणे केले जाईल. याचा परिणाम म्हणज मॉरीशस आणी सिंगापूरमध्ये बेस बनवून भारतातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी विक्री करणाऱ्या entitiesच्या उत्पनावर आता कॅपिटल गेन्स कर आकारला जाईल. हा बदल फक्त शेअर्सच्या खरेदीविक्रीला लागू होईल. युनिट्स ऑफ म्युच्युअल फंड, DERIVETIVES आणी कर्जरोखे यांना लागू होणार नाही.स्थानिक गुंतवणूकदार आणी परदेशी गुंतवणूकदार यांत कराच्या बाबतीत समान वागणूक असावी म्हणून करार केला आहे.
 • सोन्याची किंमत कमी होते आहे तर क्रूडची किंमत वाढत आहेहा US $ मजबूत होत असल्याचा परिणाम आहे.
  आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये साखरेच्या किंमती वाढत आहेत.
 • MSCI निर्देशांकात बजाज फायनान्स, HAVELLS, यस बँक आणी TITAN हे शेअर्स सामील केले जातील. आणी RCOM, REC, आणी युनायटेड ब्रुअरीज हे शेअर्स काढले जातील.
 • एस्सेल PROPAK बलरामपुर चीनी आणी SPICEJET हे शेअर्स MSCIच्या smallकॅप यादीत सामील केले. .

सरकारी announcements

 • सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांना इशारा दिला आहे की त्यांना भांडवल पुरवण्याचा निर्णय त्यांच्या कर्जवसुलीशीसंबंधीत प्रयत्न लक्षांत घेवून घेतला जाईल. आर्थिक वर्ष २०१७ मध्ये बंकाना कॅपिटल adequacy १०.२५ % ठेवावी लागेल.
 • या आठवद्यांत INSOLVENCY आणी BANKRUPTCY CODE २०१५ संसदेच्या दोन्ही सदनांत पास झाले.हे कोड खाजगी सार्वजनिक कंपन्या, पार्टनरशिप्स, लिमिटेड लायाबिलीटी पार्टनरशिप्स आणी व्यक्ती यांना लागू होईल. INSOLVENCYची प्रक्रिया सामान्यतः १८० दिवसांत तर अपवादात्मक केसेसमध्ये २७० दिवसांत पुरी केली पाहिजे.
 • या काळांत ASSETS, INSOLVENCY PROFESSIONALSच्या ताब्यांत असतील. या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी सरकार एक १० सदस्य (ज्यांत RBI आणी सरकारचे सदस्य असतील) असलेले ‘THE INSOLVENCY AND BANKRUPTCY BOARD’ स्थापन करेल. जर ठरलेल्या मुदतीत INSOLVENCY चा प्रश्न सुटला नाही तर मुदत संपल्यावर ASSET विकून त्याचे पैसे कोडमध्ये दिलेल्या प्राधान्याप्रमाणे परत दिले जातील. यांत शेअरहोल्डर्सचे स्थान सर्वांत शेवटचे आहे.

सरकारी अन्नौंसमेंट

 • सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांना इशारा दिला आहे की त्यांना भांडवल पुरवण्याचा निर्णय त्यांच्या कर्जवसुलीशीसंबंधीत प्रयत्न लक्षांत घेवून घेतला जाईल. आर्थिक वर्ष २०१७ मध्ये बंकाना कॅपिटल adequacy १०.२५ % ठेवावी लागेल.या आठवद्यांत INSOLVENCY आणी BANKRUPTCY CODE २०१५ संसदेच्या दोन्ही सदनांत पास झाले.हे कोड खाजगी सार्वजनिक कंपन्या, पार्टनरशिप्स, लिमिटेड लायाबिलीटी पार्टनरशिप्स आणी व्यक्ती यांना लागू होईल. INSOLVENCYची प्रक्रिया सामान्यतः १८० दिवसांत तर अपवादात्मक केसेसमध्ये २७० दिवसांत पुरी केली पाहिजे. या काळांत ASSETS, INSOLVENCY PROFESSIONALSच्या ताब्यांत असतील. या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी सरकार एक १० सदस्य (ज्यांत RBI आणी सरकारचे सदस्य असतील) असलेले ‘THE INSOLVENCY AND BANKRUPTCY BOARD’ स्थापन करेल. जर ठरलेल्या मुदतीत INSOLVENCY चा प्रश्न सुटला नाही तर मुदत संपल्यावर ASSET विकून त्याचे पैसे कोडमध्ये दिलेल्या प्राधान्याप्रमाणे परत दिले जातील. यांत शेअरहोल्डर्सचे स्थान सर्वांत शेवटचे आहे.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • सेवाकर आणी एक्साईज करापासून येणारे उत्पन्न वाढले.
 • CPI (consumer price index) एप्रिल महिन्यांत ५.४ % ने वाढले. मागच्या महिन्यांत ही वाढ ४.८३ % होती.
  औद्योगिक उत्पादन ०.१% ने वाढले. हे मागच्या महिन्यांत २% वाढले होते.
 • IIp मधील घसरण आणी CPI मधील वाढ लक्षांत घेता मार्केट ३०० पाईंट पडले.

सेबी रिझर्व बँक आणी इतर प्रशासकिय संस्था

 • RBI ने परदेशी बँकांना स्थानीय कर्ज देणाऱ्या संस्थांमध्ये १०% गुंतवणूक करण्यास मंजुरी दिली आहे. तसेच व्यक्ती आणी संस्था यांच्या खाजगी बँकांतील गुंतवणुकीची मर्यादाही १०% केली.तसेच नॉनरेग्युलेटेड ,नॉन डायव्हरसीफायीड, आणी अनलीस्टेड वित्तीय entities १५ % गुंतवणूक करू शकतात.
 • सेबीने FPI ना (FOREIGN PORTFOLIO INVESTOR) ना भारतीय AML (ANTI MONEY LAUNDERING) मधील तरतुदी पूर्ण करण्यासाठी एक लिखित प्रक्रिया तयार करण्यास सांगितले आहे. सेबीने ODI ( OFFSHORE DERIVATIVE INSTRUMENTS) घेणाऱ्या ENTITIESची ओळख प्रमाणित करावयास सांगितली आहे.
 • तसेच या ENTITIES भारतातील नियमाप्रमाणे गुंतवणूक करावयास पात्र असल्या पाहिजेत.तसेच PN ( PARTICIPATORY NOTES) होल्डर्ससाठी KYC (KNOW YOUR CUSTOMER) ची प्रक्रिया करण्यास सांगितले आहे. वरील निर्णय सेबीच्या 20 मे च्या मीटिंगमध्ये मंजूर झाल्यावर अमलांत येतील.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • वर्धमान टेक्स्टाईलचा वार्षिक निकाल चांगला लागला. ते त्यांचा ४०% स्टेक Rs ३९६ कोटींना विकणार आहेत.
  मंगलोर केमिकल्स, युबी होल्डिंग, MACDOWELL होल्डिंग, युनायटेड ब्रुअरीज, युनायटेड स्पिरीट या कंपन्यांमध्ये असलेला विजय मल्ल्याचा स्टेक गोठवण्यासाठी NSDL आणी CDSL यांना सरकार सांगेल असा अंदाज आहे.
 • HUL चा वार्षिक निकाल चांगला आला परंतु VOLUME GROWTH कमी आढळली. FMCG कंपन्यांमध्ये गुंतवणूकदार VOLUME GROWTH पाहत असतात. पतंजलीकडून होणार्या स्पर्धेचा परिणाम असावा असे वाटते.
 • लार्जकॅप FMCG कंपन्यांपेक्षा मिडकॅप FMCG कंपन्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरताना दिसते.
 • आयचर मोटर्समधील ४% स्टेक प्रमोटर्सनी विकला.
 • EID PARRY, भारत बिजली, कोटक महिंद्रा बँक ,एशिअन पेंट्स, ग्लेनमार्क फार्मा यांचे वार्षिक निकाल चांगले आले.

Corporate Action

 • पराग मिल्क प्रोडक्ट्स ह्या IPO ची मुदत ११ मे पर्यंत वाढविली. प्राईस band Rs २१५ ते Rs २२७ हाच ठेवला.
  थायरोकेअर या शेअरचे Rs ६६६ वर लिस्टिंग झाले यामुळे गुंतवणूकदारांना Rs २०० लिस्टिंग गेन झाला.
 • उज्जीवन फ़ायन्सिअल्सचे लिस्टिंग Rs २३१ वर झाले. गुंतवणूकदारांना माफक लिस्टिंग गेन्स झाले.
 • CROMPTON GREAVES कन्झुमर इलेकट्रिकल कंपनीचे आज Rs १२७ वर लिस्टिंग झाले. चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु या शेअरला T ग्रूपमध्ये ठेवला.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं

सध्या ट्रेडिंग करताना stop loss लावलाच पाहिजे. ट्रेडिंग call चे रुपांतर इंव्हेस्टमेन्टमध्ये करणे सध्यातरी योग्य वाटत नाही. समजा क्रूडचा भाव कमी झाला म्हणून जेट एअरवेजचा शेअर तुम्ही ट्रेडिंग साठी घेतलांत परंतु क्रुडचा भाव काही काळानंतर वाढेल आणी US $ ५५ ते ६० पर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. त्यामुळे ट्रेडिंग callचे रुपांतर गुंतवणुकीमध्ये केल्यास फायदा होणार नाही. STBT किंवा BTST चे call दिले जातात ते ऐकून ट्रेड करताना त्यावेळची किंमत आणी टार्गेट यांत फरक आहे कां ? योग्य मार्जिन आहे कां ? ते पहा अशा call च्या बाबतीत शेअरची किंमत सुद्धा कमी असली पाहिजे.कारण दलाली आणी सर्व करापासून सुटका होत नाही. मार्केटच्या अस्थिरतेमुळे तेलही गेले तूपही गेले अशी अवस्था होते.

BSE निर्देशांक २५४९० आणी NSE निर्देशांक निफ्टी ७८१४ वर बंद झाला.

This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

2 thoughts on “आठवड्याचे समालोचन – ९ मे ते १३ मे २०१६ – बातम्यांचा सूळसुळाट आणी ट्रेडर्सचा गोंगाट

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – १६ मे ते २० मे २०१६ – दिशा ठरवेल दशा | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s