आठवड्याचे समालोचन – १६ मे ते २० मे २०१६ – दिशा ठरवेल दशा

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या आठवड्यांत पांच राज्यांत झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. आसाममध्ये बी जे पी, तर बंगाल आणी तामिळनाडू मध्ये अनुक्रमे ममता आणी जयललिता याच्या पक्षाला बहुमत मिळाले. केरळमध्ये डाव्यांचे सरकार आले.पुडुचेरी मध्ये मात्र कॉंग्रेसला बहुमत मिळाले.

या निकालांमुळे GST चे बिल आता राज्यसभेत मंजूर होईल असे वाटते. तसेच या निकालांचा राज्यसभेतील पक्षोपक्षांच्या ताकदीवर परिणाम होईल आणी बी जे पी ला आपली धोरणे राबविताना येणाऱ्या अडचणी दूर होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. निवडणुकीतील निकालांमुळे सरकार आता आपला प्रगतीशील कार्यक्रम जास्त सुलभतेने आणी जास्त सहजतेने अमलांत आणू शकेल.

GST बिल मंजूर होण्याच्या आशा वाढल्यामुळे लॉजिस्टिक्स कंपन्यांच्या शेअर्स मध्ये वाढ झाली. उदा ब्लू डार्ट, गती, VRL लॉजिस्टिक्स, SNOWMAN लॉजिस्टिक्स, गेटवे डीस्ट्रीपार्क.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • क्रूडचे दर पुन्हा वाढू लागले. यांत नायजेरिया, व्हेनिझुएला, तसेच लिबिया या तीन क्रूड पुरविणाऱ्या देशांकडून क्रूडचा पुरवठा कमी झाल्यामुळे क्रूडचे दर प्रती BARREL US$ ५० पेक्षा जास्त झाले. क्रूडचे दर वाढल्यामुळे सरकारने पेट्रोल आणी डिझेलचे दर वाढवले. तसेच क्रूडच्या दरांत झालेल्या वाढीमुळे विमानवाहतूक कंपन्या, पेंट उत्पादन करणाऱ्या कंपन्या तसेच केमिकल कंपन्यांच्या उत्पादन खर्चावर विपरीत परिणाम होईल.
 • व्हेनिझुएला या क्रूड ऑईल निर्यातीवर अवलंबून असणाऱ्या देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. यांत DR. रेड्डीज, ग्लेनमार्क फार्मा आणी सिप्ला यांना त्यांच्या विक्रीचे पैसे मिळण्यांत अडचण येत आहे भारत सरकारने व्हेनिझुएला सरकारला प्रस्ताव केला आहे की त्यानी बार्टर पद्धतीने भारताला क्रूड पुरविले तर भारत त्या पैशातून औषधी उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या विक्रीचे पैसे त्या त्या कंपन्यांना चुकते करील. हा प्रस्ताव मान्य झाला तर या कंपन्याना व्हेनिझुएला या देशाकडे असलेली त्यांची थकबाकी मिळेल.
 • युरोप आणी US मध्ये होणाऱ्या आतंकी हल्ल्यामुळे पर्यटनासाठी मागणी कमी झाली आहे. याचा परिणाम THOMAS COOK, COX AND KINGS या कंपन्यांवर झाला.
 • भारतीय कंपन्यांनी बनवलेल्या काही कार्स उदा :- मारुती सुझुकी CELERIO, महिंद्रा SCORPIO, ह्युंदाई EON GNCAP (GLOBAL NATIONAL CAR ASSESSMENT PROGRAMME) या UK मधील संस्थेने घेतलेल्या ‘CRASH’ टेस्टमध्ये पास होऊ शकल्या नाहीत. या कंपन्यांनी सांगितले की त्या भारतातील कार्सविषयक सुरक्षा नियमांचे पालन करीत आहेत. सरकारने जाहीर केले की सर्व नवीन कार्सना 2017 च्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत BHARAT NATIONAL CAR ASSESSMENT PROGRAMME च्या सुरक्षा टेस्ट पास कराव्या लागतील.या निर्णयाचा फोरव्हीलर्स उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सवर झाला. उदा :- मारुती, महिंद्रा & महिंद्रा
  USA ची अर्थव्यवस्था वाढणार्या किंमती, हौसींग स्टार्टस आणी औद्योगिक उत्पादन यामुळे दुसऱ्या तिमाहीत हळूहळू सुधारत आहे. यामुळे फेड रेट वाढविण्याची शक्यता आहे.
  .

सरकारी announcements

 • सरकारने जाहीर केले की २६ मे २०१६ च्या आधी ते शिक्षणविषयी धोरण जाहीर करेल. त्यामुळे संगणक शिक्षण आणी सामान्यतः शिक्षणाशी संबंधीत कंपन्यांचे शेअर्स वाढण्यास सुरवात झाली. उदा :- झी लर्न, ट्री हाउस, करीअर पाईंट, नवनीत.
 • सरकार विमान वाहतुकीशी संबंधीत धोरण लवकरच जाहीर करेल.
 • सरकार नॉनलेदर प्रोडक्टवरची एक्साईज ड्युटी १२% वरून ६% वर आणणार आहे. याचा फायदा लिबर्टी शूज, बाटा, मिर्झा INTERNATIONAL या सारख्या कंपन्यांना होईल.
 • सरकारने नेस्ले आणी ITC या कंपन्यांना नूडल्समध्ये मैद्याऐवजी गव्हाच्या पीठाचा उपयोग करायला सांगितले आहे.
 • सरकारने चीनमधून आयात होणाऱ्या सीमलेस ट्युब्स आणी पाईपवर antidumping ड्युटी लावली. याचा फायदा ISMT, महाराष्ट्र सीमलेस, या सारख्या कंपन्यांना होईल.
 • सरकारने घोषणा केली आहे की NPA वसुलीच्या बाबतीत आम्ही सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू. जरूर पडली तर बँकांचे CONSOLIDATION करून तसेच जादा भांडवल पुरवून आम्ही या बँकांच्या कारभारांत सुधारणा घडवून आणू.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • सतत १७ महिने कमी होणारे WPI एप्रिल महिन्यांत .३४% वाढले

सेबी रिझर्व बँक आणी इतर प्रशासकिय संस्था

 • P नोट्स हा OFFSHORE DERIVATIVE INSTRUMENT चा एक प्रकार आहे. FOREIGN PORTFOLIO INVESTORS या p नोट्स त्यांच्या विदेशी गुंतवणूकदाराना भारतीय कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करण्यासाठी इशू करतात. हे FPI सेबीकडे रजिस्टर केलेले असतात पण विदेशी गुंतवणूकदार सेबीकडे रजिस्टर केलेले नसतात. सेबीने P नोट्स ( OFFSHORE DERIVATIVE INSTRUMENT) वरील बंधने वाढविली. आता P नोट होल्डरला P नोट दुसऱ्या परदेशी गुंतवणूकदारांना ट्रान्स्फर करण्यासाठी किंवा इशू करण्यासाठी ज्या इशूअरने प्रथम ती P नोट इशू केली असेल त्याची आधी परवानगी घ्यावी लागेल.सेबीने सर्व P नोट इशू करणाऱ्या कंपन्यांना त्यांनी इशू केलेल्या P नोट्सच्या महिन्याभरातील ट्रान्स्फरची माहिती सेबीला रिपोर्ट करायला सांगितले आहे. P नोट इशुअर्ने प्रत्येक BENEFICIARY OWNER साठी भारतातील नियमाप्रमाणे KYC नॉर्म्सचे पालन केले पाहिजे. P नोट्स इशूअरला P नोट्स साठी SUSPICIOUS TRANSACTION रिपोर्ट FIU कडे फाईल करायला सांगितले. आणी प्रत्येक वर्षी KYC रिपोर्ट अपडेट करायला सांगितले. याचा परिणाम FII ज्या कंपन्यांमध्ये आहे त्या कंपन्यांच्या शेअर्स वर होईल.
 • सेबीने मोठ्या लिस्टेड कंपन्यांना त्यांच्या वार्षिक रिपोर्टमध्ये लाभांश देण्याविषयीचे धोरण जाहीर करण्यास सांगितले आहे. लाभांश जाहीर करताना या कंपन्या कोणत्या गोष्टीचा विचार करतील. जर लाभांश जाहीर केला नाहीतर ACCUMULATED profitचा वापर कसा करतील हे जाहीर करायला पाहिजे.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या पांच असोसिंएट बॅंका टेकओवर करण्याच्या विचारात आहे. या बॅंका म्हणजे स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ TRAVANCORE, आणी स्टेट बँक ऑफ बिकानेर एंड जयपूर या लिस्टेड आणी स्टेट बँक ऑफ पटीयाला, आणी स्टेट बँक ऑफ हैदराबाद, आणी भारतीय महिला बँक या अनलिस्टेड बँकांचा समावेश आहे. या टेकओवरमुळे जे काम सहा बँकांना करावे लागते ते एकाच ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये होईल हा फायदा सांगितला जात आहे. या बातमीमुळे स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, आणी स्टेट बँक ऑफ बिकानेर एंड जयपूर या बँकांचे शेअर्स वधारले.
 • शेअर मार्केट नेहेमी भविष्यातील घटनांवर लक्ष ठेवून असते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. तसेच एखाद्या घटनेची बातमी मिळाल्यावर तो शेअर वाढतो पण घटना घडल्यावर मात्र कमी होतो. तसेच काहीसे सन टी व्ही आणी राज टिव्हीचे झाले. एक्झिट पोलमध्ये DMK सत्तेत येणार असे कळल्यावर सन टी व्ही चा भाव वाढू लागला परंतु निवडणुकीच्या निकालांत AIDMKचा विजय झाल्याची बातमी आल्यावर मात्र सन टी व्ही चा भाव कोसळू लागला आणी राज टी व्ही चा भाव वाढू लागला.
 • COMPAT( THE COMPETITION APPELLATE TRIBUNAL) ने CCI (COMPETITION COMMISSION OF INDIA) ची कोल इंडिया या कंपनीवर कोळश्याच्या मोनोपोलीबद्दल लावलेला Rs १७७३ कोटी दंड लावण्याची ऑर्डर सेट असाईड केली. आणी पुनर्विचारार्थ CCI कडे पाठवली.
 • पिरामल एन्टरप्रायझेस आपला हेल्थकेअर आणी वित्तीय बिझीनेस डीमर्ज करण्याच्या विचारांत आहे.
 • BAYER ही जर्मन कंपनी ‘MONSANTO’ ही कंपनी टेकओवर करण्याच्या विचारांत आहे.
 • टाटा COMM ही कंपनी त्यांच्या १७ DATA सेंटरमधील ७४% स्टेक विकणार आहे.
 • या आठवड्यातील महत्वाचे वार्षिक निकाल लुपिन, स्पाईसजेट, पिडीलाईट, JSW स्टील, NBCC, युनिकेम lab, E -CLERX,कर्नाटक बँक, कॅफे कॉफी डे, ITC यांचे वार्षिक निकाल चांगले आले.कर्नाटक बँकेने Rs ५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. ITCने वार्षिक निकालांबरोबर बोनसची साखरही वाटली २ शेअरमागे १ शेअर बोनस म्हणून देण्याची घोषणा केली. तसेच Rs ८.५० पर शेअर लाभांश जाहीर केला.
 • सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांनी वार्षिक निकालाच्या बाबतीत घोर निराशा केली. सर्व बँकांचे NPA वाढले तर काही बँकांनी झालेल्या फ्रौडसाठी तर काही बँकांनी भविष्यांत येणाऱ्या CONTINGENCIES साठी प्रोविजन केली. या मुळे युनियन बँक ऑफ इंडिया आणी तुरळक एखादा अपवाद सोडून बाकी सर्व सरकारी बँकांनी तोटा झाला असे जाहीर केले. यामुळे या बँकांनी आपल्या शेअरहोल्डर्सना काहीही लाभांश दिला नाही.स्टेट बँकेच्या तीन असोसिंएट बॅंका मात्र याला अपवाद आहेत. खाजगी क्षेत्रातील बँकांनी मात्र त्यांच्या पुढे सारखीच समस्या असून लाभांश जाहीर केला.तोटा जाहीर करण्याच्या बाबतीत PNBने मात्र खरोखरीच रेकॉर्ड प्रस्थापित केले.

या आठवड्यातील ipo आणी लिस्टिंग

 • या आठवड्यांत पराग मिल प्रोडक्ट्सचे लिस्टिंग Rs २१७.५० वर झाले शेअरची वाढून दिवसअखेर Rs २४८ वर होता.
 • NBCC या कंपनीच्या स्प्लिटची रेकॉर्ड डेट ३ जून २०१६ ठरवली आहे.

Corporate Action

 • टाटा स्टीलने टाटा मेटलीक्सची आपल्याबरोबर विलय करण्याची योजना रद्द केली.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं

सध्या शेअर मार्केट एकां असमंजस्य स्थितीत आहे. मार्केट एका ट्रेडिंग रेंज मध्ये फिरत आहे. मार्केटच्या वेळांत रोज दोन भाग झाल्यासारखे वाटते. एका भागांत मार्केट तेजीत असते तर दुसऱ्या भागांत ते मंदीत असते. मार्केटचा बेसिक ट्रेंड अजूनही तेजीचाच आहे. पण मार्केट ब्रेकआउट होत नाही किंवा ब्रेक डाऊन ही होत नाही. STOCK स्पेसिफिक मार्केट आहे. आता ज्यावेळी मार्केट दिशा दाखवेल त्याप्रमाणेच गुंतवणूकदारांची चांगली किंवा वाईट दशा सुरु होईल.

BSE निर्देशांक २५३०२ वर आणी निफ्टी ७७४९ वर बंद झाले.

This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे समालोचन – १६ मे ते २० मे २०१६ – दिशा ठरवेल दशा

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – २३ मे ते २७ मे २०१६ – लगीनघाई | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s