तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – Mar 2015 – Apr 2016

आधीची प्रशोन्त्तरे वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तुमचे प्रश्न - माझी उत्तरं

Image courtesy – wikipedia

 

नाव: Anil Savande

तुमचा प्रश्न : मी बँकेत फोन केला होता त्यांनी मला DMat a/c ओपन करायच सांगीतले तर मला ट्रेडीं a/c पण ओपण करावे लागेल का 

शेअर्सची खरेदी विक्री करण्यासाठी ट्रेडिंग अकौंट ओपन करणे जरुरीचे असते. जर आपला ट्रेडिंग अकौंट याआधीच उघडलेला असेलं तर पुन्हा उघडण्याची जरुरी नाही. तुम्ही तुमचा ट्रेडिंग अकौंट कोणत्याही ब्रोकरकडे ओपन करू शकता.

नाव: Pallavi

तुमचा प्रश्न : Namaskar, mi ek private company madhe service karat aahe. mala ya share market subject chi kahich mahiti nahi pan karnyachi ichha khup aahe. basic level kuthun aani kashi survat karu? mala kay purva tayari karavi lagel?

माझा ‘मार्केट आणी मी’ हा ब्लोग पूर्ण वाचा. आपल्या सर्व प्रश्नाची उत्तरे आपल्याला त्यांत मिळतील. दूरदर्शन वाहिन्यांवरून, इकॉनॉमिक टाईम्स सारख्या वर्तमानपत्रातून आपल्याला माहिती मिळू शकेल.

नाव: ABHIJIT

तुमचा प्रश्न : Namaskar Madam Tumchya ya blog mule Mala market madhe trading kartana khup madat hot ahe tyamule tumche manapasun khoop dhanyavad.

आपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहे. ज्यांना कोणाला शेअरमार्केटमध्ये काम करताना अडचण येत असेल त्यांना मदत करा आणी ब्लोगचा फायदा घ्यायला सांगा.

नाव: Milind G. Raut

तुमचा प्रश्न : Sir Namaskar, sir mala kontya market madhe invest karne changle rahil, konti trading karaychi ani tyachi study kasi karaychi, mala future madhe invest karne changle rahil ka, karan mi ata beginners ahe, ani mala share market baddal sagle janun ghayche ahe. Thankyousir.

कोणत्याही मार्केटमध्ये ट्रेडिंग करा पण फायदा मिळवणे हे ध्येय ठेवा. आणी त्या प्रकाराची पूर्ण माहिती घेऊनच व्यवहार करा. माझा ‘मार्केट आणी मी’ हा ब्लोग पूर्ण वाचा. आपल्या सर्व प्रश्नाची उत्तरे आपल्याला त्यांत मिळतील. दूरदर्शन वाहिन्यांवरून, इकॉनॉमिक टाईम्स सारख्या वर्तमानपत्रातून आपल्याला माहिती मिळू शकेल.

नाव: Siddhesha

तुमचा प्रश्न : support ani resistance levels baddal thod kalel ka mala? because ,,mi attta tri treading karat nahi aahe …but…i want more information for better treading.

सपोर्ट म्हणजे पाठींबा आणी रेझिस्टन्स म्हणजे प्रतिकार. जर मार्केटचा कल तेजीचा असेल तर ज्या पाईंटला आल्यानंतर मार्केट वाढते त्याला सपोर्ट म्हणतात. आणी ज्या पाईंटला आल्यानंतर मार्केट पडते त्या पाईंटला रेझिस्टन्स असे म्हणतात. मार्केटचा ट्रेंड किंवा विशिष्ट शेअरचा ट्रेंड या दोघानाही हे लागू आहे. पण जर मार्केटचा कल मंदीचा असेल तर सपोर्टचा पाईंट रेझिस्टन्स बनतो आणी रेझिस्टन्सचा पाईंट सपोर्ट बनतो. हे शेअर्सच्या किंमातीलाही लागू आहे.

नाव: DARADE PRAVIN

तुमचा प्रश्न : MI M.COM FINAL YEAR LA AAHE MALA SECURETIES ANALYSIS BOOK MARATHI MADHE HAV AAHE KUT MILEL KA? DR.BAM University Aurangabad. Plz Help Me . Maza Paper Aahe 18 March 2016. YA AGODER ML;A BOOK HAV AAHE

नाव: minakshi

तुमचा प्रश्न : mala online intraday trading karayche ahe. tyabaddl mala information mile

ओंन लाईन ट्रेडिंगस्कीममध्ये डेट्रेडिंग करण्याची प्रक्रिया आपण समजावून घ्या. माझ्या ‘मार्केट आणी मी’ या ब्लोगवरील ३२ ते ३६ हे इंट्राडेशी संबंधीत लेख वाचा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.

नाव: Bhushan Bivalkar

तुमचा प्रश्न : सर्वसाधारणपणे असे दिसून येते ( असे माझे निरीक्षण आहे ) की FMCG चे समभाग बाजार खाली असताना देखील बर्यापैकी स्थिर राहतात फार घट होत नाही पण सध्या काही दिवस FMCG चे दादा colgate नि HUL गटांगळ्या खात आहेत . रामदेवबाबा factor चा परिणाम आहे कि खरोखर त्यांची विक्री नि नफ्याची क्षमता खालावली आहे?

अगदी थोडा पातंजलीचा परिणाम आहे परंतु जागतिक पातळीवर पाहतां सगळीकडे मंदी आहे. आणी त्यामुळे या कंपन्यांच्या volumeवर परिणाम होत आहे. कोलगेट आणी HUL या आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत त्यामुळे जागतिक मंदीचा फटका त्यांनाही बसत आहे.

नाव: sagar jain

तुमचा प्रश्न : equity cash madhye trading karne aani F/o madhye trading karne hya madhil farak kay aahe ?

कॅश मार्केट मध्ये ट्रेडिंग करायचे असेल तर आपण कोणतीही वस्तू विकत घेतों त्याप्रमाणे शेअर विकत घेतो. आपण त्या शेअर्सचे मालक बनतो. लाभांश, बोनस, राईट्स हे सर्व फायदे मिळतात. तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला शेअर विकता येतो. पण शेअर्सची पूर्ण किंमत मोजावी लागते. आता वायदा बाजारांत फक्त मार्जिन मनी भरावा लागतो लॉट मध्ये खरेदी करावी लागते. फ्युचर्स ट्रेडमध्ये अमर्याद फायदा किंवा अमर्याद तोटा होतो. परंतु ऑप्शन ट्रेडमध्ये मात्र तुमचा फायदा, तोटा मर्यादेत राहतो. पण वायदेबाजारांत कॅश मार्केटपेक्षा कमी रक्कम गुंतवावी लागते.पण लाभांश बोनस राईट्स इत्यादी फायदे मिळत नाहीत.

नाव: sagar jain

तुमचा प्रश्न : 30000/- Rs. prati maha kamavinyasathi kiti margin guntavavi lagel aani kiti shares war kaam karave lagel.

तुमची शेअर्सची निवड जर बरोबर असली तर तुम्हाला त्या शेअर्सची किंमत वाढल्यावर खूप फायदा होऊ शकतो त्यासाठी किती कंपन्यांचे शेअर्स खरेदी करावे, किती रकम गुंतवावी यावर मिळणारा फायदा अवलंबून नाही. शेअर्सची किंमत पुष्कळ परस्पर विरोधी गोष्टींवर अवलंबून असते. त्यामुळे तुमची शेअरची निवड, ती निवड करायची वेळ, आणी शेअर्स विकायची योग्य वेळ निवडलीत तर तुम्हाला एका कंपनीच्या शेअर्समध्येही खूप फायदा होऊ शकतो. परंतु आपल्या पोर्टफ़ोलिओ मध्ये असे १० ते १५ शेअर्स असले तर उत्तमच. …..

नाव: amit shankar teli.

तुमचा प्रश्न : Namaste madam,mala share market madheley kahich mahiti nahi. pan mala interest bharpur ahe.Mala share market madhe investment karayachi khup icha aahe.mala sawthala tradeing karayachi asun tyababat mala kahihi mathi nahi. taybabat mala mahiti milane babat

माझा ‘मार्केट आणी मी’ हा ब्लोग पूर्ण वाचा. आपल्या सर्व प्रश्नाची उत्तरे आपल्याला त्यांत मिळतील. दूरदर्शन वाहिन्यांवरून, इकॉनॉमिक टाईम्स सारख्या वर्तमानपत्रातून आपल्याला माहिती मिळू शकेल

नाव: rahul

तुमचा प्रश्न : लाभांश बद्ल माहिती हवी आहे

कंपनी आपल्या शेअरहोल्डर्सना लाभांश देते. हा लाभांश तीन प्रकारचा असू शकतो. फायनल, अंतरिम, विशेष. कंपनीला होणार्या फायद्यापैकी काही भाग कंपनी शेअर होल्डर्सना देते. फायनल लाभांश वार्षिक निकालांबरोबर जाहीर होतो. तर अंतरिम लाभांश कंपनी वर्षात कधीही जाहीर करू शकते. विशेष लाभांश कंपनीला जर भरपूर अतिरिक्त नफा झाला किंवा कंपनीला २५, ५० , १०० वर्ष झाली तर कंपनी जाहीर करते. परंतु कंपनी कितीही नफा करीत असली तरी लाभांश देण्याचे किंवा लाभांश किती द्यावा याचे बंधन कंपनीवर नसते. रेकॉर्ड डेटला ज्या शेअरहोल्डर्सच्या नावे शेअर्स असतील त्यांना हे लाभांश मिळतात.

नाव: WARPE BALASAHEB

तुमचा प्रश्न : 1]BOOK VALUE MHANJE KAY?,2]GOVERMENT CHE INVESMENT KITI AAHE HE KASE OLKHAYCHE? VIDESHI GUNTAVNUK KITI,COMPANICHA PROFIT KITI,SRIPT KONTYA GROUP CHI AAHE ,eps KAY AAHE,COMPANYT KAMGAR KITI AAHET? PRODUCTION?

ही सर्व माहिती कंपनीच्या साईटवर गेल्यास आपल्याला उपलब्ध होईल. तसेच यापैकी काही माहिती BSE वर त्या शेअर्सच्या किमतीचे पेज उघडले तरी मिळते. बुक VALUE म्हणजे :- कंपनीचे ASSETS वजा कंपनीच्या लायबिलीटीज (देणी) भागिले कंपनीच्या शेअर्सची संख्या

नाव: PRAVIN

तुमचा प्रश्न : share market madhe investment kothe karaychi

वेगवेगळ्या कंपन्यांचा अभ्यास करून आपल्याला योग्य वाटेल त्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करा. पण गुंतवणूक करताना आपल्याला जास्तीतजास्त फायदा होईल याची काळजी घ्या.

नाव: Amol Shirke

तुमचा प्रश्न : S&P BSE IPO share mhanje kay, yamdhil share madhe invest kelyane kiti fayada hoto

या शेअर्स मध्ये गुंतवणूक केल्यावर फायदा होतोच असे नाही. फायदा होणे हे या कंपनीच्या गुणवत्तेवर अवलंबून असते.

नाव: shrikant gavade

तुमचा प्रश्न : 1)balance sheet kashi pahaychi.2)व kay pah कंपनीच्या BALANCE SHEET मध्ये कंपनीची नफा कमवण्याची क्षमता, कंपनी ज्या उद्योगांत काम करीत आहे त्या उद्योगामध्ये प्रगतीची शक्यता. सरकारी हस्तक्षेप., नफ्याचे प्रमाण,,

कंपनीला असलेल्या कर्जाचे प्रमाण, कंपनीत असलेले प्रमोटर्सचे शेअरहोल्डिंग, कंपनी देत असलेले लाभांशाचे प्रमाण, जर कंपनी एकापेक्षा जास्त उद्योगांत कार्यरत असेल तर कोणत्या उद्योगांत जास्त नफा कमवीत आहे या गोष्टी पहाव्यात …

नाव: sagar waydande

तुमचा प्रश्न : madam me trchnical anlysis cha course join kela ahe mala chat and indicator candlestick sagle jamte ahe pn… mala equty market,option market,futuers market,currency market baddal sanga ya saglya amdhe kai kai rules ahet ani trading kashi karavi

आपण एकाचवेळी इतक्या मार्केट्स मध्ये व्यवहार करण्या ऐवजी कोणत्यातरी एका विभागाचे व्यवहार आत्मसात केल्यास आपल्याला फ्यादेशीर होईल.

नाव: Mahesh Shete

तुमचा प्रश्न : How to pay short term gain tax?

या बाबतीत तुम्ही तुमच्या TAX सल्लागाराचा सल्ला घ्या. .

नाव: Nitin R Shingan

तुमचा प्रश्न : sharmarket kase kahredi karayche

माझा ‘मार्केट आणी मी’ हा ब्लोग पूर्ण वाचा. आपल्या सर्व प्रश्नाची उत्तरे आपल्याला त्यांत मिळतील. दूरदर्शन वाहिन्यांवरून, इकॉनॉमिक टाईम्स सारख्या वर्तमानपत्रातून आपल्याला माहिती मिळू शकेल. माझ्या ब्लोगमध्ये इंट्राडे, अल्प मुदतीसाठी मध्यम मुदतीसाठी आणी दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करताना शेअर्सची निवड कशी करावी हे स्पष्ट केले आहे.

नाव: shivraj lande

तुमचा प्रश्न : Discount broker ani full service broker madhe kay phark ahe? Ani discount brokre che charges kami ka?

जे शेअर ब्रोकर्स आपल्या गीर्हैकांसाठी शेअर्सची खरेदीविक्री करतात पण गुंतवणुकीच्या बाबतीत कोणताही सल्ला देत नाहीत ते हे काम standard ब्रोकर्सपेक्षा कमी ब्रोकरेज आकारून करतात. आपल्याला जर आपला स्वतःचा अभ्यास करून शेअर्सची खरेदी विक्री करायचे असेल तर आपण डीसकौंट ब्रोकरच्या मार्फत खरेदी विक्री कार्यास हरकत नाही.

नाव: amit

तुमचा प्रश्न : what is the rights issu

कंपनी वाढीव भांडवल उभारताना जेव्हा आपल्या वर्तमान भागधारकांना त्यांच्या शेअरहोल्डीन्ग्च्या प्रमाणांत आणी एका ठराविक भावाने शेअर्स ऑफर करते त्याला राईट्स इशू असे म्हणतात.. हे राईट्स इशू वर्तमान शेअर होल्डर दुसऱ्या माणसाच्या नावाने RENUNCIATE करू शकतात. तसेच राईट्स ऑफर मध्ये ऑफर केलेल्या शेअर्स पेक्षा जास्त शेअर्स साठी अर्ज करू शकतात.

नाव: Dinesh

तुमचा प्रश्न : R/ Madam , Me Navin Trading A/c Suru Kele asun me inerday Buy & Sell Karto , je ke ti Rs.70,000 or jast pan hote pan mazhe sarasari profit 1000 te 2000 tar kadhi loss pan hoto  pan jar maje trading 50000 hot asel tar mala income tax sathi konati rakkam pakadli jate trading rakkam ki profit ple reply

तुमच्या शेअर्समधील उलाढालीवर नाही तर तुम्हाला होणार्या नक्त नफ्यावर ( तुमचा नफा – ब्रोकरेज आणी इतर कर – तुम्हाला झालेला तोटा ) आयकर आकारला जातो

नाव: Vaidehi

तुमचा प्रश्न : Dear Madam, I am inspire to read your this blog. I am 34 year old house wife & aai of one kid. Earlier I was working in Cipla. a pharma company. Due to my pregenecy I drop my job, Now my kids is 18 month old & I am trying to join some where. My husbond are working in a private job & earning 24,000 per month. From long time I was thinking on to enter in share market. Hope you will give me a direction. I am completely new, fresher. Please advise how to enter in share market. Shall I take any training? but from whom? many many question I have, But startly please advise How to enter in market where to open my account? what is demat account? How can I do it?

आपल्याला कुठलेही ट्रेनिंग घेण्याची जरुरी नाही पण चिकाटी धैर्य आत्मविश्वास आणी सातत्य या गोष्टींची जरुरी आहे. त्याचबरोबर आपली अर्थव्यवस्था, आपल्याला गुंतवणूक करण्यासाठी योग्य

वाटणार्या कंपन्या यांची दूरदर्शनवरील वाहिन्या, BSEची साईट तसेच प्रत्येक कंपनीच्या साईटवर जाऊन आपण माहिती मिळवू शकता.. आपण माझा ‘मार्केट आणी मी ‘हा ब्लोग पूर्ण वाचा.

आणी प्रत्यक्ष पैशाची गुंतवणूक करण्याआधी आपले निर्णय बरोबर येतात की नाही ते वहीतल्या वहीत लिहून बाघा.

नाव: saarth

तुमचा प्रश्न : balance sheet chekc kartanna kahi formule ahet ka? ani te konte?

डेटइक्विटी रेशियो, प्राईस तो बुक रेशियो, रिटर्न ओंन इक्विटी, CAGR (COMPOUNDED ANNUAL GROWTH RATE), रिटर्न on कॅपिटल, SOLVANCY रेशियो, प्राईस अर्निंग रेशियो, ऑपरेटिंग मार्जिन,. प्रत्येक उद्योगातील कंपनीच्या BALANCE SHEET च्या अभ्यासासाठी काही विशिष्ट रेशियो महत्वाचे असतात.

नाव: sachin bhalerao

तुमचा प्रश्न : Dear Mam, Mala online gold treding sandharbhat mahiti dyal please, ufx sarkhya apps varun online treding karne yogya asel ka?

मी गोल्डमध्ये ट्रेडिंग करत नाही.

नाव: sachin bhalerao

तुमचा प्रश्न : Dear Mam,Mala online gold treding sandharbhat mahiti dyal please, ufx sarkhya apps varun online treding karne yogya asel ka?

नाव: Rupali Chavan

तुमचा प्रश्न : How i get information about share market?

माझा ‘मार्केट आणी मी’ हा ब्लोग पूर्ण वाचा. आपल्या सर्व प्रश्नाची उत्तरे आपल्याला त्यांत मिळतील. दूरदर्शन वाहिन्यांवरून, इकॉनॉमिक टाईम्स सारख्या वर्तमानपत्रातून आपल्याला माहिती मिळू शकेल.

नाव: onkar giri

तुमचा प्रश्न : मला इंट्रा डे ट्रेडिंग विषयी व शेअर माक्रे्े़ेट नविन खाते काढणे संबधीत माहीती द्यावी

माझा ‘मार्केट आणी मी’ हा ब्लोग पूर्ण वाचा. आपल्या सर्व प्रश्नाची उत्तरे आपल्याला त्यांत मिळतील. दूरदर्शन वाहिन्यांवरून, इकॉनॉमिक टाईम्स सारख्या वर्तमानपत्रातून आपल्याला माहिती मिळू शकेल. माझे ३२ ते ३६ नंबरचे लेख इंट्राडे ट्रेड विषयी आहेत ते वाचावे.

नाव: hemlata salunke

तुमचा प्रश्न : i everytook some shares of some company eg autolite india,morepen lab, prises are not rising what to do

जर आपली होल्डिंग CAPACITY असेल तर थांबा. आणी नसेल तर याच कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीवर लक्ष ठेवून किंमत सुधारल्यावर हे शेअर विकून टाका. आणी प्रगतीशील आणी ब्लुचीप कंपन्यांमध्ये गुंतवा म्हणजे तोट्याचे रुपांतर फायद्यांत होईल. आणी काळजी लागणार नाही.

 

नाव: yogesh kedar

तुमचा प्रश्न : mutal fund madhe loss hou shakto ka ? ani to ksa kay ? plz exlpain . i am starting my shear market carreer from mutal fund investment.

thank you

म्युच्युअल फंडस्सुद्धा शेअर मार्केटमध्येच गुंतवणूक करीत असतात. त्यामुळे शेअरमार्केटमधील धोक्यांपासून म्युच्युअल फंडाची सुटका होऊ शकत नाही. जर अर्थव्यवस्थाच ढासळत असेल तर प्रत्येकालाच कमी अधिक प्रमाणांत तोटा होतो त्याला म्युच्युअल फंड्स अपवाद नाहीत

नाव: vinod bhujbal

तुमचा प्रश्न : mala share market vishe mahiti pahij kas trading krayche

माझा ‘मार्केट आणी मी’ हा ब्लोग पूर्ण वाचा. आपल्या सर्व प्रश्नाची उत्तरे आपल्याला त्यांत मिळतील. दूरदर्शन वाहिन्यांवरून, इकॉनॉमिक टाईम्स सारख्या वर्तमानपत्रातून आपल्याला माहिती मिळू शकेल

नाव: sandeep untwale

तुमचा प्रश्न : sir intraday trading stitiges badal sanga

माझ्या ब्लोगवरील ३२ ते ३६ लेख वाचा.

नाव: sandeep untwale

तुमचा प्रश्न : intraday trading madhe kiti % profit hou shakto

इंट्राडे ट्रेडिंग मध्ये तुम्हाला कितीही % नफा होऊ शकतो तुमची खरेदीची किंमत ,वेळ शेअरची किंमत किती वाढते आणी तुम्ही किती मर्यादेपर्यंत शेअर वाढण्याची वाट पाहू शकता या वर अवलंबून असते. पण लक्षांत असू द्या की तोटाही तेव्हढ्याच प्रमाणांत होऊ शकतो.

नाव: sanjay

तुमचा प्रश्न : INTRA DAY BABAT MAHITI MILEL KAY?

माझ्या ‘मार्केट आणी मी ‘ या ब्लोग्मधील ३२ ते ३६ हे लेख वाचा.

नाव: Suresh Mali

तुमचा प्रश्न : Is it right price to take UPL share

कोणत्याही शेअर बद्दल मी टीप देत नाही.

नाव: Tushar suryawanshi

तुमचा प्रश्न : Namaste mam mi engineering student asun mala share market madhe career karaych ahe tumachya anubhava nusar yat future scope ahe ka ? N tyasathi mala kuthla course karava lagen n tumhi ky suggestion dyala thanks for give me ur time.

शेअरमार्केटमढील करिअरला भविष्यांत खूप SCOPE आहे. पण कोणत्याही व्यवसायांत असणारे फायदे तोटे आणी त्याचप्रमाणे धोके यामध्येही आहेत. योग्य आणी त्वरीत निर्णय घेण्याची क्षमता तुमच्या जवळ असली पाहिजे.

नाव: manish

तुमचा प्रश्न : shar market manza kay

माझा ‘मार्केट आणी मी’ हा ब्लोग पूर्ण वाचा. आपल्या सर्व प्रश्नाची उत्तरे आपल्याला त्यांत मिळतील. दूरदर्शन वाहिन्यांवरून, इकॉनॉमिक टाईम्स सारख्या वर्तमानपत्रातून आपल्याला माहिती मिळू शकेल

नाव: namrata fouzdar

तुमचा प्रश्न : madam mutual fund mhanaje kay asat?aani tyachi nivad kashi karavi?

म्युच्युअल फंड म्हणजे पुष्कळ लोकांनी एकत्र येऊन जमा केलेल्या पैशाची परस्परांना फायदेशीर गुंतवणूक करणे आणी झालेला फायदा सभासदांना वाटणे.हे गुंतवणूकदार ह्या गुंतवणुकीसाठी

जबाबदारी व्यावसायिक व्यवस्थापनाकडे सोपवतात. ही युनिट्स या भांडवलाच्या छोट्या छोट्या भागांच्या माध्यमातून गुंतवणूकदार विकत घेतात. हे भांडवल शेअर्समध्ये कर्जरोख्यामध्ये गुंतवले जाते. .

नाव: vvipsservice

तुमचा प्रश्न : Call put option ची माहिती सविस्तर नाही समजली .

मी वायादेबाजारांत ट्रेडिंग करीत नाही.

नाव: Akshay

तुमचा प्रश्न : Madam, me Tanla Solutions che 40 Rs. chya bhavane 500 share ghetle Ahet. Sadhya cha bhav 36.80 Rs. ahe. Kay karu?

मी कोणत्याही शेअर्सबद्दल टीप डेट नाही.

नाव: ganesh

तुमचा प्रश्न : majhe atach graduation zale ahe mala stock market mahit ahe pn mi ajhun earning karayla shikal

माझा ‘मार्केट आणी मी’ हा ब्लोग पूर्ण वाचा. आपल्या सर्व प्रश्नाची उत्तरे आपल्याला त्यांत मिळतील. दूरदर्शन वाहिन्यांवरून, इकॉनॉमिक टाईम्स सारख्या वर्तमानपत्रातून आपल्याला माहिती मिळू शकेल

 

Advertisements
This entry was posted in Question and answers and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

3 thoughts on “तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – Mar 2015 – Apr 2016

  1. Anil Savande

    मॅडम ब्रोकरची आवशकता असतेच का?
    आणि नसेल तर कोणत्या पध्दतीने आणि कसे व्यवहार करावे
    Dmat & treding a/c बॅक काढुन देउ शकते का?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s