आठवड्याचे समालोचन – ३० मे ते ३ जून २०१६ – घरचं झालं थोडं व्याह्याने धाडलं घोडं

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

MKTandMe Logoमार्केटवर तर अनेक गोष्टींचा परिणाम होतच असतो. पण ब्लॉगवर सुद्धा सभोवतालच्या गोष्टीचा परिणाम होतो हे जाणवते.मी, माझे यजमान आणी माझा मुलगा यांच्या सामुदायिक प्रयत्नातून हा ब्लॉग लिहिला जातो आणी आपणास वाचावयास मिळतो. सध्या ठाण्याला रस्ता रुंदीकरण चालू असल्याने वीज पाणी टेलीफोन इंटरनेट या सेवांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे ब्लॉग वेळेवर टाकता आला नाही नाईलाज आहे.

 

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • सौदी अरेबिया एका बाजूला तर इराक़ दुसऱ्या बाजूला. सौदी अरेबियाला क्रूडचे उत्पादन कमी करायचे नाही. नवीन ओईल मिनिस्टर आले. देशाची अर्थव्यवस्था जी ऑईलवर अवलंबून आहे त्याचे प्रमाण कमी करून इतर रेव्हेन्यूचे मार्ग पहाणे गरजेचे आहे. इराण आणी सौदी अरेबिया यांच्यांत ऑईल उत्पादनावर बंधने घालण्याबाबत एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे क्रूडची किंमत US $ ४५ ते ५५ या मर्यादेत राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. OPEC च्या मीटिंगमध्ये असा निर्णय झाला की क्रूडचे उत्पादन कमी केले जाणार नाही.
 • युरोपिअन सेन्ट्रल बँकेने (ECB) आपल्या व्याज दरांत किंवा वित्तीय धोरणांत कोणतेही बदल केले नाहीत.
 • FEDची पुढील आठवड्यांत मीटिंग आहे. पण US मधील जॉब डेटा निराशाजनक आल्यामुळे सध्यातरी फेड रेट वाढवेल असे जाणकारांना वाटत नाही.
 • नजीकच्या काळांत २३ जूनला UKने युरोपिअन युनियन मध्ये राहायचे की नाही यावर UK मध्ये सार्वमत घेतले जाईल. याचा परिणाम जागतिक मार्केट्सवर तसेच भारतीय शेअरमार्केटवरही होईल.
 • मार्केट वर्षभरांत पाउस किती पडेल यावर लक्ष ठेवून असते. कारण जर पाउस योग्य त्या प्रमाणांत आणी सर्व क्षेत्रांत पुरेसा पडला तर पिकांचे उत्पादन चांगले होते. त्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील लोकांचे उत्पन्न वाढते आणी त्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील मागणी वाढते. आणी सर्व क्षेत्रातील उत्पादन वाढते. यावर्षी IMD (INDIAN METEOROLOGICAL DEPARTMENT) ने भाकीत केले आहे की पाउस ७ JUN पासून सुरु होईल आणी दीर्घ मुदतीच्या सरासरीप्रमाणे १०८ % पडेल. यामुळे मार्केटला एक आनंदाची वार्ता समजल्यामुळे मार्केट वाढले.

सरकारी announcements

 • सरकारने टपाल खात्याला पेमेंट बँकेचा दर्जा दिला. या बँकेचे नाव इंडिया पोस्ट पेमेंट बँक असे राहील आणी तिचे कामकाज मार्च २०१७ पासून सुरु होईल.
 • सोडीयम क्लोरेट वर सरकारने ANTIDUMPING ड्युटी लावली. याचा फायदा गुजरात अल्कली, DCW इत्यादी कम्पन्यांना होईल.
 • नवीन शिपिंग धोरण सरकारने जाहीर केले. सरकारने शिपिंग आणी शिपयार्ड कंपन्यांनी त्यांची balance sheet CLEAR केली पाहिजे. तसेच शिपिंगशी संबंधीत सर्व ऑर्डर्स भारतीय कंपन्यांना दिल्या पाहिजेत.
 • सरकारने  ‘भारत आवो इलाज करावो’ या योजनेतून हेल्थ पर्यटनाला आणी हेल्थशी संबंधीत कंपन्यांच्या शेअर्सचा फायदा होईल.

सेबी, RBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • RBI ने बँकांना सायबर सिक्युरिटी पॉलिसी निश्चित करायला सांगितले. या पॉलिसीत सायबर क्षेत्रातील धोक्यांचे कमी, मध्यम, हाय आणी खूप हाय असे वर्गीकरण करून त्यासाठी प्रतिबंधक उपाय सुचवायला आणी अमलांत आणायला सांगितले आहेत.
 • RBI गव्हरनर राजन यांचा कार्यकाल सप्टेंबर २०१६ मध्ये संपत आहे. त्यामुळे मार्केटचे आणी विशेषतः FII चे लक्ष सरकार राजन यांना दुसऱ्या वेळेला RBI गव्हरनर नेमते की नाही इकडे आहे. त्याच बरोबर पुढील आठवड्यांत ७ जूनला RBI आपले वित्तीय धोरण जाहीर करेल त्यांत RBI आणखी रेट कट करते कां किंवा कर्जवाढीसाठी काही सवलती जाहीर करते कां याकडे मार्केटचे लक्ष आहे.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • HUL (HINDUSTAN UNILEVER LIMITED) या FMCG क्षेत्रातील दिग्गज कंपनीने आपला फूड आणी रीफ्रेशमेंट बिझीनेस दोन डिविजनमध्ये विभागण्याचे ठरविले आहे.
 • झी लर्न आणी ट्री हाउस यांच्या मर्जरमध्ये अडचणी येत आहेत.
 • पी सी ज्युवेलर्सनी आपले शेअर्स PLEDGE केले. कंपनीने शेअर्स PLEDGE केले ही बातमी मार्केटला सहसा पसंत पडत नाही.
 • टाटा स्टील ही कंपनी टाटा मोटर्समधील मोठा हिस्सा विकणार अशी बातमी आहे. तसेच टाटा स्टीलची जर UK सरकारशी समाधानकारक बोलणी होऊ शकली तर टाटा स्टील पोर्ट टालबॉटचा कारभार स्वतःकडे ठेवण्याची शक्यता आहे.
 • अमुलने दुधाचे भाव Rs २ ने वाढविले. अमूल पाठोपाठ सर्व दुध आणी त्याच्याशी संबंधीत पदार्थ बनविणार्या कंपन्या भाव वाढवतील. उदा :- पराग मिल्क, क्वालिटी इत्यादी.
 • ग्राविस्स्ने क्वालिटी वर हायकोर्टात केलेली केस मागे घेतली. त्यामुळे क्वालीटीच्या शेअरची किंमत वाढली.
 • PFCने महेश्वर हैडल पॉवरमध्ये हिस्सा खरेदी केला.
 • JP ग्रूप या कंपनीने Rs ४५३९ कोटीची परतफेड करण्यामध्ये DEFAULT केला आहे.
 • TECH महिंद्रा या कंपनीला US $ ७५ मिलियन रकमेचे SYSMOD प्रोजेक्टचे काम ५ वर्षांसाठी नेवाडा MOT VICHICLE DEPT कडून मिळाले.
 • BPCL या कंपनीला FII लिमिट ४९% करायला परवानगी दिली.

Corporate Action

 • LUX इंडस्ट्रीज ने एका शेअरचे ५ शेअर्समध्ये , तसेच NBCC ने एका शेअरचे ५ शेअर्स मध्ये विभाजन करण्याचे ठरवले आहे.
 • जून ७ २०१६ रोजी NMDC आणी MOIL या कंपन्यांच्या शेअर BUYBACKवर विचार करण्यासाठी मीटिंग आहे. या कंपन्यांकडे असलेल्या कॅश मधून हे BUYBACK केले जाईल.
 • HDFC ERGO ने L&T जनरल इन्शुरन्स कंपनी Rs ५५१ कोटींना खरेदी करायचे ठरवले आहे.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं

राज्यसभेच्या निवडणुकांचे निकाल लागण्याची वेळ जवळ आली. त्यामुळे GST पास होण्याची आशा निर्माण झाली.सध्या निफ्टीने ८२०० ची पातळी ओलांडली आहे. GST पास झाल्यास मार्केट ८६०० ते ८७०० पर्यंत जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आहे ती पोझिशन होल्ड करणे योग्य की प्रॉफीट बुकिंग करणे योग्य या संभ्रमांत सर्वजण आहेत. पण स्वतःचे गुंतवलेले भांडवल बाहेर काढून घेणे हाच मध्यमार्ग होय.

BSE निर्देशांक सेन्सेक्स २६८४३ आणी निफ्टी ८२२० वर बंद झाले

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे समालोचन – ३० मे ते ३ जून २०१६ – घरचं झालं थोडं व्याह्याने धाडलं घोडं

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – ६ जून ते १० जून २०१६ – कमाईसाठी शिक्षण आणी शिक्षणातून कमाई | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s