आठवड्याचे समालोचन – ६ जून ते १० जून २०१६ – कमाईसाठी शिक्षण आणी शिक्षणातून कमाई

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

source - wikipediaकमाईसाठी शिक्षण आणी शिक्षणातून कमाई  हे मुख्य सूत्र आहे. जर तुम्हाला तुमच्या शिक्षणापासून काही उत्पन्न मिळायची पात्रता येणार नसेल तर ते शिक्षण आपण ‘पुस्तकी विद्या’असे म्हणतो. पंतप्रधानांचा ‘अमेरिकेचा दौरा’ ही बातमी किती जणांना माहिती असेल हा प्रश्न आहे. या दौर्यातून काय साधले, कोणते करार झाले, त्याचा झालाच तर कोणत्या क्षेत्राला,कोणत्या कंपन्याना फायदा होईल आणी प्रत्येक कंपनीला किती फायदा होईल हा झाला तर्क आणी त्या तर्काधीष्ठीत अभ्यासावर त्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती वाढल्या. आणी ते शेअर्स गुंतवणूकदार,ट्रेडर्स यांनी खरेदी केले. ही सगळी हवेतल्या हवेत घातलेली गणिते ! ही गणीते घालावी लागतात. आणी समजून घ्यावी लागतात. अशा अभ्यासातूनच कमाई होण्याची शक्यता असते.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • क्रूडचे भाव US $ ६० पर्यंत जाईल असे वाटते. याचा फायदा ऑफशोअर कंपन्याना होईल. याचा फायदा दीप इंडस्ट्रीज, अबन ऑफशोअर, सेलन एक्सप्लोरेशन, ONGC, ऑईल इंडिया, केर्न्स इंडिया या कंपन्यांना होईल.
 • सोन्याचे भाव वाढत असतील तर ज्या कंपन्या सोन्याच्या तारणावर कर्ज देतात अशा कंपन्यांचा फायदा होतो. कारण तारण म्हणून ठेवलेल्या सोन्याची किमत वाढते. उदा मुथुट फायनान्स, मन्नापुरम
 • पंतप्रधानांच्या अमेरिका भेटींत मुख्यत्वे सरंक्षणासंबंधी करार झाले. अमेरिकेने भारताला आपला संरक्षण क्षेत्रातील मुख्य पार्टनर म्हणून घोषित केला. त्याचप्रमाणे संरक्षणक्षेत्रांत ‘मेक इन इंडिया’ ही योजना यशस्वी करण्यासाठी GOODS, टेक्नोलॉजी, प्रोग्राम्स, आणी जॉइंट व्हेन्चर यांच्या निर्यातीसाठी सोयी उपलब्ध करून देईल. तसेच वेस्टीग हाउस ही USमधील आण्विक क्षेत्रातील दिग्गज कंपनी आंध्र प्रदेशांत ६ AP १००० रिअक्टर उभारेल.
 • अमेरिका आणी भारत US $ २० मिलियन US INDIA CLEAN एनर्जी फंड स्थापन करणार आहेत. आणी १ मिलियन घरांना CLEAN एनर्जी पुरवण्यासाठी US $ ४०० मिलियन उभारण्याचे ठरविले.
  या बातमीमुळे सरंक्षणक्षेत्राशी संबंधीत असणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वाढले. उदा :- BEL, BEML वालचंदनगर इंडस्ट्रीज, L&T,
 • UK मध्ये प्रसिद्ध होणार्या सर्व्हेजप्रमाणे BREXIT ( UK युरोपिअन युनियन मधून बाहेर पडणार की नाही) ला पाठिंबा मिळत आहे त्यामुळे US $ च्या समोर GBPची किंमत कमी झाली.
 • FED चेअरमन जेनेट येलेन यांनी आपल्या भाषणांत असे सांगितले की जरी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होत असली तरी अर्थव्यवस्थेची स्थिती बर्याच कारणांवर अवलंबून असल्यामुळे फेड आपला रेट वाढवण्यास कधी सुरुवात करेल या बाबतीत काही निश्चित सांगतां येत नाही.

सरकारी announcements

 • GST बिलाचा फायनल मसुदा राज्य सरकारच्या अर्थमंत्र्यांच्या एमपॉवरड कमिटीला देण्यांत आला. हे बिल मंजूर होण्यासाठी जी आवश्यकता आहे ती या राज्यसभेच्या सत्रांत पुरी होऊन बिल मंजूर होईल असा सरकारचा विश्वास आहे.
 • सरकारने कॅन्सर, मधुमेह, उच्च रक्तदाब या रोगांसाठी वापरली जाणाऱ्या 56 औषधांच्या किंमती २५% ने कमी केल्या. याचा परिणाम सिप्ला, लुपिन, BIOCON, नोवार्तीस या कंपन्यांवर होईल.
 • सरकारने जाहीर केले की साखरेच्या निर्यातीवर २५% ड्युटी आकारली जाईल.

सेबी, RBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • RBI ची वित्तीय पॉलिसी ७ जून २०१६ रोजी जाहीर झाली. रेपो रेट, रिवर्स रेपो रेट, CRR, SLR या मध्ये कोणताही बदल केला नाही. वाढत्या महागाईसंबंधी चिंता आणी उशीरा येत असलेला पाउस, BREXIT आणी फेडचा निर्णय यासारखे आंतरराष्ट्रीय विषय यामुळे रेट कट करण्याचा निर्णय घेता आला नाही. GDP मध्ये ७.६% प्रगतीचे लक्ष्य कायम ठेवण्यांत आले. योग्य त्या वेळेला bond खरेदी करून लिक्विडीटी कायम वाढवली जाईल.
 • RBI ने असे जाहीर केले की योग्य त्या केसेस मध्ये प्रोविजनिंग नार्म्स सौम्य केले जातील.
 • अर्थमंत्र्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांना NPA वसुलीसाठी नव्या उपाययोजना सुचवायला सांगितल्या. त्यासाठी त्यांनी ५ TOP बँकांची स्टिंअरिंग कमिटी नेमण्याची घोषणा केली. त्यांनी खालील उपाय सुचविले (१)फोरेन्सिक ऑडीट (२) CHANGE ऑफ MANAGEMENT (३) DUE DILIGENCE प्रोसेस (४) डीप RESTRUCTURING ऑफ युनिट.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • पाउस चांगला झाला तर हायड्रोपॉवर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना फायदा होईल. उदा :- SJVN, NHPC .
 • चहाचा लिलाव गेल्या तीन महिन्यांच्या जास्तीजास्त स्तरावर झाले. त्यामुळे चहा उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरचे भाव वाढले. उदा :- टाटा ग्लोबल, जयश्री टी, MACLEOD RUSSEL
 • ट्यूब इन्व्हेस्टमेंट ही कंपनी एक नवा PLANT सुरु करणार आहे.
 • PACKAGING नियमांचे पालन केले नाही म्हणून DR. REDDY’S या कंपनीवर केस दाखल केली. तर लुपिन या कंपनीने आपली इंजेक्शन परत मागवली.
 • ३० जून २०१६ पर्यंत इंडिअन बँक ‘इंडोसोलर’ या कंपनीचे ASSETS विकेल.
 • भारती इन्फ्राटेल ही कंपनी ‘टॉवर व्हिजन” ही ८५०० टॉवर्स असलेली कंपनी Rs ४००० कोटींना विकत घेण्याची शक्यता आहे. भारती इन्फ्राटेल ही कंपनी हे टॉवर्स 4 G आणी 3 G ऑपरेटर्स च्या गरजा लक्षांत घेवून खरेदी करीत आहे.
 • BIOCON या फार्मा क्षेत्रातील कंपनीच्या ब्रेस्ट कॅन्सरच्या treatment मध्ये उपयोगी असणाऱ्या ‘TRASTUZUMAB’ या औषधाचा ग्लोबल क्लिनिकल स्टडी पूर्ण झाला. या बातमीमुळे ‘BIOCON’ च्या शेअरची किंमत वाढली.
 • सन फार्मा या कंपनीने आपले US मधील दोन PLANTS, FRONTIDA BIOPHARMA या कंपनीला विकले.
 • सन फार्माचे प्रमोटर्स ऑईल आणी gas क्षेत्रांत गुंतवणूक करणार आहेत. त्यांनी स्पष्ट केले की ही गुंतवणूक ही त्यांची वैयक्तिक गुंतवणूक आहे.
 • ONGC आणी GSPN या कंपन्या मर्ज होण्याची शक्यता आहे.
 • नागार्जुना ऑईल रीफायनरी या कंपनीचे पुनरुज्जीवन केले जाईल अशी घोषणा केली आहे. त्यामुळे ह्या शेअरची किंमत वाढत आहे.
 • YES बँक QIP द्वारे US $ ८०० मिलियन उभारणार आहे. हा QIP इशू १ महिना सुरु राहील. ह्या इशुला US $ २०० मिलीयनचे ग्रीन शु ऑप्शन असेल.
 • मंगलोर केमिकल्स चा युरिआ PLANT बंद पडला होता. तो ५ जून पासून सुरु झाला.
 • डेल्टा कॉर्पच्या दमण कॅसिनोला मंजुरी मिळेल आणी कंपनी सिक्कीममध्ये नवीन कॅसिनो सुरु करील.
 • लाफार्ज होल्सिमच्या श्री लंकेतील assetsच्या खरेदीसाठी दालमिया भारत सिमेंट, श्री सिमेंट, RAMCO या कंपन्यांना SHORTLIST केले आहे.
 • इन्फोसिसने १ल्या तिमाहीसाठी प्रॉफीट वार्निंग दिली. रिटेल, उर्जा, आणी विमा क्षेत्रावरील ग्राहकांच्या खर्चाचे अंदाजपत्रक कमी झाल्यामुळे तसेच वेतनवाढ आणी व्हिसा चार्जेसवाढीमुळे १ल्या तिमाहीतील प्रॉफीट मार्जिन २०० बेसिस पाईंट कमी होईल असे सांगितले त्यामुळे इन्फोसिसचा शेअर पडला.
 • कमोडीटीजचे भाव वाढत आहेत मेटल्स मध्ये तेजी आहे, त्यामुळे कमोडीटी मार्केटमध्ये VOLUME वाढले आहेत. त्याचा फायदा MCXला होत आहे.
 • पातंजलीची वितरण व्यवस्था मजबूत नसल्यामुळे सध्या तरी पतंजलीपासून तेवढी भीती नाही असे FMCG कंपन्यांनी सांगितले.
 • स्टरलाइट टेक्नोलॉजीच्या डीमर्जरची १६ जून तारिख निश्चित केली.

Corporate Action

 • MOIL ने Rs २४४ प्रती शेअर या भावाला buyback जाहीर केले. २०.७२% इक्विटी कॅपिटल buyback करणार.
 • NMDC ने Rs ९४ प्रती शेअर या भावाला buyback जाहीर केले. २०.२% इक्विटी buyback करणार

नजीकच्या काळांत येणारे IPO

 • ‘टाटा टेक’ या कंपनीचा IPO लवकरच येईल.ही कंपनी टाटा मोटर्स साठी इंजिनीअरिंग सोल्युशन्स आणी आय टी प्रोडक्ट्स डेव्हलप करते. ही टाटा ग्रुपची प्रॉफीट मध्ये असणारी कंपनी असून ती निर्यात क्षेत्रांतही असून मुख्यत्वे ऑटो, एअरस्पेस, आणी औद्योगिक मशिनरी या क्षेत्रांत काम करते.
 • INDIAMART.COM ही इकॉमर्स कंपनी आपल्या IPO द्वारे Rs ५०० कोटी उभारणार आहे.
 • सिटी gas वितरण कंपनी महानगर gas चा ipo आणण्याचा विचार आहे. यामुळे गुजरात gas, इंद्रप्रस्थ gas या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये हालचाल होईल.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं

खरे पाहता आजकाल ज्या शिक्षणातून पैसा मिळतो असेच शिक्षण आपण घेतो. आपण ज्ञानार्थीपेक्षा धनार्थी झालो आहोत. पण शेअरमार्केटच्या अभ्यासांत तुम्हाला सांधे जोडून इमारत उभी करायची असते. कमाई जास्त कशी होईल. तेवढ्याच गुंतवणुकीतून जास्त फायदा कसा होईल हे पहायचे असते. त्यामुळे प्रत्येक बातमी वाचून त्या बातमीचा परिणाम कोणत्या कंपनीच्या शेअरवर होईल हे बघणे महत्वाचे असते. खरे पाहता साखरेच्या निर्यातीवर २५ % ड्युटी बसवल्यावर साखरेचे शेअर्स पडतील असा सर्वांचा अंदाज होता. पण तसे घडले नाही. साखरेचे शेअर्स मात्र वाढतच राहिले म्हणजेच काही काळानंतर साखर कंपन्याना अनुकूल अशी बातमी येत असावी अशी शंका आली. अशा प्रकारे बातमीचा परिणाम शेअरवर योग्य प्रकारे होत आहे कां ? आणी योग्य प्रकारे होत नसेल तर त्याची कारणे शोधणे गरजेचे आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स २६६३५ आणी NSE निर्देशांक निफ्टी ८१७३ वर बंद झाला.

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे समालोचन – ६ जून ते १० जून २०१६ – कमाईसाठी शिक्षण आणी शिक्षणातून कमाई

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – १३ जून ते १७ जून २०१६ – ढगांचा गडगडाट आणी पावसाचा खडखडाट | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s