आठवड्याचे समालोचन – १३ जून ते १७ जून २०१६ – ढगांचा गडगडाट आणी पावसाचा खडखडाट

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

rain-863339_640

या आठवड्यांत महत्वाच्या घटनांची रांगच लागली आहे. IIP, महागाईचे आकडे, फेडची मीटिंग, ब्रेक्झीट, भारताला NSG(न्युक्लीअर सप्लायर्स ग्रूप) मध्ये सामील करणार कां ? या गोष्टी घडणार आणी त्याचे परिणाम काय होतील हे सर्वजण बघत होते. ब्रेक्झीटचे परिणाम तर सर्वांना नवीनच त्यामुळे प्रत्येकजण चाचपडत होता. त्यामुळे small कॅप, मिडकॅप शेअरमधील थोडी तेजी वगळता अधिक काल मंदीचाच होता.

 

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • मायक्रोसॉफ्ट ही कंपनी LinkedIn ही कंपनी US $ २६ बिलियन किमतीला विकत घेणार आहे. मायक्रोसॉफ्ट LinkedIn च्या शेअरहोल्डर्सना US$ १९६ प्रती शेअर या भावाने कॅश पेमेंट करेल.
 • चीन मधले ‘A’ ग्रुपचे शेअर्स सध्या तरी MSCI निर्देशांकांत सामील केले जाणार नाहीत. २०१७ मध्ये रिव्हूसाठी हे शेअर्स ठेवले जातील.
 • नायजेरियामध्ये ज्या कंपन्या काम करतात त्याना तोटा होईल कारण नायजेरीयाच्या चलनाची किंमत कमी होत आहे. उदा :- भारती एअरटेल.
 • २३ जून २०१६ रोजी UK ECU (युरोपिअन कॉमन युनियन) मध्ये राहणार की नाही यावर सार्वमत घेतले जाईल. एक्झिट पोल असे दाखवीत आहेत की सार्वमताचा कौल ECU मधून बाहेर पडण्याकडे आहे. UKच्या अर्थमंत्री आणी UKच्या सेन्ट्रल बँकेने इशारा दिला आहे की ब्रेक्झीटमुळे UK मधून भांडवल बाहेर पडेल, त्यामुळे CAD मध्ये वाढ होईल, GBPचा विनिमय रेट कमी होऊन UK मधील महागाई वाढेल. याचा परिणाम म्हणजे ECU मधून बाहेर पडण्यासाठी बाकीच्या देशांतील मागणी वाढेल आणी ECU चे आणी त्यांच्या युरो या चलनाचे अस्तित्व धोक्यांत येईल.
 • फेडने वाढणारी अर्थव्यवस्था पण ढासळणारे लेबर मार्केट यामुळे व्याजदरांत करायची वाढ पुढे ढकलली.
  तसेच बँक ऑफ जपानने आपल्या धोरणांत कोणताही बदल केला नाही.

सरकारी announcements

 • सरकारने एव्हिएशन पॉलिसी जाहीर केली.या पॉलिसीनुसार आता आंतरराष्ट्रीय वाहतूक करण्यासाठी पुर्वानुभावाची जरूर नाही पण त्या एअरलाईनकडे २० विमाने असली पाहिजेत. १ तासापेक्षा कमी वेळ लागणाऱ्या उडडानांसाठी सरकारने Rs २५०० ची विमान भाड्यावर मर्यादा ठरवली. जर एअरलाईन्सला या उड्डाणासाठी Rs २५०० पेक्षा जास्त खर्च येणार असेल तर Rs २५०० पेक्षा जास्त लागणार्या खर्चाएवढी सरकार सबसिडी देईल. यासाठी सरकार प्रत्येक उड्डानामागे Rs ८००० कर आकारेल. या प्रमाणे गोळा केलेल्या Rs ५००० कोटी फंडामधून सबसिडी देईल. तसेच मेंटेनन्स आणी रिपेअर्स ऑपरेशनसाठी भारतामध्ये जो कर लावला जातो त्यांत २५% कपात केली जाईल. यामुळे आपल्या देशातच मेंटेनन्स आणी ऑपरेशन करणे स्वस्त होईल. तसेच जे प्रादेशिक विमानतळ बांधले जातील त्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमातळावर असतात त्या सर्व सुविधा असणार नाहीत त्यामुळे या विमानतळावरून विमानांचे उड्डाण करणे सोपे जाईल. तसेच या विमानतळांवर ज्या मेंटेनन्स आणी ऑपरेशन सुविधा असतील त्यांना infrastructure सेक्टरमध्ये सामील केले जाईल
 • GST चा मसुदा दोन बाबी सोडून राज्य सरकारांच्या अर्थमंत्र्यांच्या हाय पॉवर कमिटीमध्ये मंजूर झाला. या दोन बाबींवर जुलैमध्ये होणाऱ्या राज्य सरकारच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत एकमत होऊन हे बिल संसदेच्या पावसाळी अधिवेशनांत मंजूर होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
 • भारत बांगलादेश दरम्यान हाय पॉवर नेटवर्क करायचे आहे याचा फायदा सिमेन्सला होईल.
 • तनेजा एअरोस्पेस आणी ग्लोबल व्हेक्ट्रा या MRO(मेंटेनन्स, रिपेअर्स आणी ओवरहॉलिंग) स्पेसमध्ये असणाऱ्या कंपन्यांना इंफ्राचा दर्जा दिला जाईल.
 • सरकारने स्टेट बँकेत स्टेट बँकेच्या ५ असोशीएट बँकांच्या आणी भारतीय महिला बँकेच्या स्टेट बँकेत होणाऱ्या मर्जरला मान्यता दिली. सरकारच्या या निर्णयामुळे स्टेट बँकेच्या असोसिएट बँकांच्या शेअर्सची किंमत मोठ्या प्रमाणांत वाढली.
 • नीती आयोगाने ३२ सार्वजनिक क्षेत्रातील तोट्यांत चालणाऱ्या कंपन्याच्या बाबतीत डीसइन्व्हेस्टमेंट करण्याचे ठरवले आहे. त्यापैकी १० कंपन्यांत ताबडतोब डीसइन्व्हेस्टमेंट केली जाईल तर उरलेल्या २२ कंपन्या पुनरुज्जीवित करून नंतर त्यांची डीसइन्व्हेस्टमेंट केली जाईल.

सेबी, RBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • NIIT टेक आणी सिंटेक्स ह्या कंपन्यांचे शेअर्स १ जुलै २०१६ पासून F & O मध्ये सामील होतील.
 • सेबी लवकरच ALGORITHMIC ट्रेडिंगवर काही बंधने घालण्याच्या विचारांत आहे. हे ट्रेडिंग गुंतवणूक करणाऱ्या संस्था आणी प्रोप्रायटरी ट्रेडर्समध्ये लोकप्रिय आहे.
 • RBI ने NPA असणाऱ्या कंपन्यांसाठी SUSTAINABLE STRUCTURING OF STRESSED ASSETS (S4A ) ही योजना जाहीर केली. यांत बॅंका लोनचे दोन भाग करतील (१) SUSTAINABLE लोन (२) UNSUSTAINABLE लोन. यासाठी बॅंका प्रोजेक्टच्या कॅश फ्लोचा विचार करतील. जो लोनचा भाग वर्तमान किंवा भविष्यांत अंदाज बांधण्यासारख्या कॅश फ्लोने SUSTAIN करण्यासारखा आहे तो पार्ट A म्हणजेच SUSTAINABLE आणी उरलेला भाग B म्हणजे UNSUSTAINABLE असेल आणी हा B भाग इक्विटीमध्ये किंवा कन्व्हरटिबल सिक्युरिटीमध्ये बदलला जाईल. ह्या लोनचे दोन भाग TECHNO-ECONOMIC VIABILITY स्टडीनंतर ठरवले जातील. ज्या प्रोजेक्टना Rs ५०० कोटी लोन दिले आहे आणी ज्यांनी कमर्शिअल ओपरेशंस सुरु केले असतील असे अकौंट S4A योजेनेखाली पात्र असतील. JOINT लेन्डर्स फोरम ह्या योजनेखाली प्लान तयार करून IBA च्या ओवरसीइंग कमिटीकडे देईल.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • IIP ( इंडेक्स ऑफ इंडस्ट्रीअल प्रोडक्शन) -०.८ झाले. कन्झुमर गुड्स प्रोडक्शन एप्रिल २०१६ मध्ये १.२% कमी झाले तर कन्झुमर नॉन ड्युरेबल आउटपुट ९.७% ने कमी झाला. ह्यामुळे ग्रामीण मागणी कमी झाली असे दर्शवले जाते.
 • कॅपिटल गुड्सचे प्रोडक्शन २४.९% ने कमी झाले. ह्यामुळे भांडवली गुंतवणूक कमी प्रमाणांत झाली असे दर्शविते.
 • कन्झुमर्स ड्युरेबल गुड्सचे उत्पादन ११.८ % ने वाढले ही वाढ शहरी आणी अर्ध शहरी भागांत मागणी वाढल्याचे दाखविते.
 • CPI (कन्झुमर प्राईस इंडेक्स) मे महिन्यांत ५.७६% ने वाढला. ही वाढ मुख्यतः डाळी, साखर, आणी भाजीच्या भावात झाली. ही वाढ RBIने ठरवलेल्या ५% लक्ष्यापेक्षा जास्त आहे.
 • WPI (होलसेल प्राईस इंडेक्स) मध्ये मे २०१६ मध्ये ०.७९% वाढ झाली.एप्रिल महिन्यांत ही वाढ ०.३४% होती.
  भारताच्या निर्यातीमध्ये गेल्या १८ महिन्यांतली कमीतकमी घट झाली (०.७९%) आयातीमध्ये १३.१६% घट झाली त्यामुळे ट्रेड डेफिसिट मे महिन्यांत US $ ६.३ बिलियन एवढी झाली.
 • या आठवड्यांत रुपयाचा US $ मध्ये विनिमय दर १ US $ =Rs ६७ एव्हढा झाला सोने Rs ३००००/झाले.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • टाटा पॉवर या कंपनीने आपल्या सबसिडी टाटा पॉवर रिन्यूवेबल एनर्जी मार्फत वेलस्पनचे ग्रीन एनर्जी युनिट Rs. १०००० कोटींना खरेदी केले. यांत ९९० mw सोलर पॉवर प्रोजेक्ट आणी १५० mw विंड पॉवर प्रोजेक्टचा समावेश आहे. टाटा पॉवर ही कंपनी रीसर्जंट पॉवर या कंपनीट २५ % स्टेक US$ ३०० मिलियनला खरेदी करणार आहे. यांत मुख्यतः कोळशावर चालणारे आणी हायड्रोपॉवर बेस्ड assets आहेत.
 • RCOM आणी एअरसेल या दोन कंपन्यांचे मर्जर या महिन्यांत पुरे होईल. या दोन कंपन्यांचे मर्जर झाल्यावर अस्तीवांत येणारी कंपनी भारतांत तिसऱ्या नंबरची कंपनी असेल.
 • MCX वर आता AGRI कमोडीटीमध्ये व्यवहार करणार आहे. सुरुवात काळी मिरी पासून करणार आहेत
 • HAVELLS ही कंपनी सोलर पॉवर जनरेटिंग सिस्टीम, सोलर पंप्स, सोलर स्ट्रीट लाईट्स, होम लाईटिंग किट्स जून २०१६ मध्ये देशभरांत LAUNCH करील. निमराना येथे ही प्रोडक्ट्स ASSEMBLE केली जातील.
 • आंध्र प्रदेश आणी तेलंगाणा येथे सिमेंटची मागणी वाढली आहे. त्यामुळे NCL, आंध्र सिमेंट, डेक्कन सिमेंट, इंडिया सिमेंट काकतिया सिमेंट, या कंपन्याच्या शेअर्सच्या किंमती वाढल्या.
 • सोमवारी चहा कॉफी साखर तांदूळ यांच्याशी संबंधीत कंपन्यांचे शेअर्स जोरांत वाढले.
 • टाटा स्पॉंजला कोल इंडिया कोल लिंकेज देते. हा करार आता १० वर्षांकरता केला जाईल.
 • ‘उडता पंजाब’ हा सिनेमा वितरणापूर्वीच खूप प्रसिद्धीत आला. हा सिनेमा १७ जून रोजी रिलीज होईल याचा फायदा बालाजी टेलि या कंपनीला होईल.

Corporate Action

 • SKS मायक्रोफायनान्स या कंपनीने आपले नाव बदलून भारत फ़ायनान्सिअल इन्क्लुजन असे ठेवले.
 • कजारिया सेरेमिक्स ही कंपनी एका शेअरचे २ शेअरमध्ये तर व्ही गार्ड ही कंपनी एका शेअरचे १० शेअर्स मध्ये विभाजन करेल.
 • HDFC लाईफ आणी MAX लाईफ यांचे मर्जर करण्याचा निर्णयाला पुष्टी मिळाली. .
 • इमामी REALTY आणी इमामी रेनबोचे विलीनीकरण इमामी इंफ्रामध्ये होईल.
 • भारती इन्फ्राटेल ही टेलिकॉम क्षेत्रातील भारती एअरटेल ग्रूपची कंपनी ४७ मिलियन शेअर्स Rs ४२५ प्रती शेअर या भावाने अंदाजे Rs २००० कोटींना BUYBACK करेल.
 • Iप्रिमीयर एक्स्प्लोझीव्स ही कंपनी १७ जून २०१६ ला NSE वर लिस्ट झाली.

नजीकच्या काळांत येणारे IPO

 • CICI प्रूडेनशीअल लाईफचा iPO सप्टेंबर २०१६ मध्ये येईल. या IPO द्वारा Rs ६५०० ते Rs ७५०० कोटी उभारले जातील. Rs २६० ते Rs २८० हा प्राईस band असेल.
 • SBI STANDARD लाईफचा इशू येणार आहे.
 • महानगर gas या कंपनीचा IPO २० जून २०१६ ते २२ जून २०१६ या कालावधीत येणार आहे. या IPO चा प्राईस band Rs ४५५ ते Rs ४८५ असेल. या IPO द्वारा कंपनी Rs १००० ते Rs १२०० कोटी उभे करील.
 • हुडकोच्या IPO ला मंजुरी मिळाली. हुडकोमधील १०% स्टेक सरकार डायव्हेस्ट करेल.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं

या आठवड्यांत जे ढग जमा झाले होते त्यावैकी WPI आणी CPI म्हणजेच घाऊक आणी किरकोळ बाजारातील किंमती वाढल्या, IIP चे आकडे निराशाजनक आले, भरीसभर म्हणून पावसानेही आपले आगमन लांबवले.यामुळे RBIने रेट कट न करण्याचा निर्णय घेतला.  फेडने मात्र रेट वाढवले नाहीत. BREXIT ची टांगती तलवार मार्केटला अस्वस्थ करीत आहे.मात्र स्टेट बँकेत स्टेट बँकेच्या असोसिएट बँकांच्या होणार्या मर्जरमुळे या बँकांचे शेअर्स वाढून सगळ्यांच्या झोळीत भरपूर दान पडले. जेव्हा अशा मोठ्या घटनांची नांदी असते त्यावेळी फक्त निरीक्षण करणेच योग्य ठरते. जे स्माल कॅप आणी मिडकॅप शेअर चालतात त्यांत volume आहे कां ते पहावे आणी ट्रेड करावा. डिलिव्हरी volume जास्त असेल तर short टर्म ट्रेड करावा. पण ट्रेडिंग volume जास्त असेल तर stoploss ठेवून इंट्राडे ट्रेड करावा.

BSE निर्देशांक सेन्सेक्स २६६२५ वर तर निफ्टी ८१७० वर बंद झाले

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

One thought on “आठवड्याचे समालोचन – १३ जून ते १७ जून २०१६ – ढगांचा गडगडाट आणी पावसाचा खडखडाट

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – २० जून ते २४ जून २०१६ – हवा बदलली, पोर्टफ़ोलिओ बदला | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s