आठवड्याचे समालोचन – २० जून ते २४ जून २०१६ – हवा बदलली, पोर्टफ़ोलिओ बदला

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
या आठवड्यांत ‘चलनाची अस्थिरता’ ही भीती कायम होती. रुपया US$ च्या तुलनेत कमजोर झाला. रुपया आणी US $ चा विनिमय रेट १US$ = Rs ६७च्या वर होता. श्री रघुराम राजन सप्टेंबर २०१६ नंतर RBI गव्हर्नर असणार नाहीत. चलन  स्थिर ठेवणे हे त्यांचे सर्वात मोठे काम होते. त्यामुळे या बातमीनेही रुपया कमजोर झाला. करायला गेलो एक आणि झालं भलतंच अशी Great ब्रिटन च्या पंतप्रधानांची स्तिथी झाली. ब्रिटन नि युरोपमधून बाहेर पडायचं का या प्रश्नाचं उत्तरं त्यांनी जनतेला विचारलं. ब्रिटनच्या जनतेनी युरोप मधून बाहेर पडायचा कौल दिला. याचे राजकीय, आर्थिक आणि सगळ्याच प्रकारचे परिणाम होतीलचं पण अस्थिरता मात्र नक्कीच निर्माण होईल. हा फ़क़्त कौल आहे आणि खरी brexit व्हायला अजून २ वर्ष तरी लागतील. brexit वर एक लेख नंतर लिहायचा विचार आहे , त्यात सविस्तर बोलूया या विषयावर.

 

आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • या आठवड्यांत प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी चीनला जाऊन NSG मधील भारताच्या समावेशाला पाठिंबा देण्यासाठी चीनचे मन वळवण्याचा प्रयत्न करतील.सेउल मध्ये या आंतरराष्ट्रीय संस्थेची बैठक आहे. यामुळे संरक्षणाशी संबंधीत असणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्स कडे लक्ष ठेवावे.
 • सरकारने टेक्स्टाईल उद्योगासाठी Rs ६००० कोटींचे package जाहीर केले. यांत Rs १५००० पेक्षा ज्यांचा पगार कमी आहे अशा कामगारांचा १२% उद्योजकाला भरावयाचा PF सरकार भरेल तसेच गारमेंट कंपन्यांना मिळणार्या ड्युटी DRAWBACK मध्ये वाढ जाहीर केली असे जाहीर केले.
 • सरकारने आपल्या FDI (FOREIGN DIRECT INVESTMENT) धोरणांत मोठे बदल जाहीर केले. सरकारने बहुतेक क्षेत्रांत ऑटोमटिक रूटने FDI ला परवानगी दिली. ज्या क्षेत्रांत अशी परवानगी नाही अशा क्षेत्रांची एक छोटीशी निगेटिव्ह यादी सरकारने प्रसिद्ध केली आहे. संरक्षण क्षेत्रांत ४९% च्या वर FDI साठी ‘मॉडर्न टेक’ क्षेत्रांत सरकारची मंजुरी लागेल.
 • विमानवाहतूक क्षेत्रांत सरकारने १००% FDI साठी परवानगी दिली. पण त्यांत ४९% ऑटो रूटने आणी ४९% पेक्षा जास्त FDI साठी सरकारची मंजुरी लागेल. ‘BROWNFIELD’ विमानतळासाठी सरकारने १००% ऑटोरूटने FDI साठी मंजुरी दिली. ‘BROADCASTING CARRIAGE’ या क्षेत्रांतही १००% ऑटो रूटने FDI साठी परवानगी दिली.यामुळे टेलीपोर्ट, DTH, केबल नेटवर्क्स, मोबाईल टी व्हीज, आणी HITS या क्षेत्रांत १००% FDI ऑटो रूटने येऊ शकेल. सरकारने भारतांत बनवलेल्या अन्नपदार्थांत व्यापार करण्यासाठी ( यांत ECOMMERCE ही आले) सरकारच्या मंजुरीने १००% FDI साठी परवानगी दिली आहे.
 • MANMADE FIBREवरील एक्साईज ड्युटी १२% वरून ६% वर आणणार आहे. याचा फायदा नाहर स्पिनिंगला होईल.
 • या आठवड्यांत सरकार नवीन टेक्स्टाईल पॉलिसी आणी NATIONAL URBAN RENTAL HOUSING पॉलिसी जाहीर करणार आहे.
 • खाजगी सिक्युरिटी एजन्सीमध्ये एकूण ७४% FDI साठी परवानगी दिली त्यांत ४९% FDI ऑटोरूटने तर ४९% च्यावर सरकारची मंजुरी लागेल. ‘BROWNFIELD’ फार्मा क्षेत्रांत सरकारने १००% FDI साठी परवानगी दिली यांत ७४% ऑटो रूटने तर ७४% पेक्षा जास्त FDI साठी सरकारची मंजुरी लागेल.
 • सिंगल ब्रांड रिटेल मध्ये स्थानीय उत्पादित वस्तूंसाठी जे नॉर्म्स होते त्यांत ३ वर्षासाठी सूट दिली. जे उत्पादन स्टेट ऑफ टेक्नोलॉजी आणी CUTTING-EDGE टेकच्या सहायाने केले जाईल त्यासाठी पुढील पांच वर्षांसाठीही सूट दिली जाईल. तसेच संरक्षण, टेलिकॉम, खाजगी सुरक्षा, आणी माहिती आणी प्रसारण क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या परदेशी कंपन्याना, जर त्यांना FIPB ची किंवा संबंधीत मंत्रालयाची किंवा रेग्युलेटरची मंजुरी असेल तर त्यांच्या शाखा किंवा संपर्क ऑफिस उघडण्यासाठी RBI ची मंजुरी किंवा अन्य सुरक्षा CLEARANCE घ्यावा लागणार नाही.
  या सर्व क्षेत्रांत FDI च्या धोरणांत बदल केल्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याला चांगल्या प्रकारे चालना मिळेल अशी सरकारला अपेक्षा आहे.
 • सरकारने ‘POTASSIUM ब्रोमेट’याचा उपयोग अन्नपदार्थांमध्ये करायला बंदी घातली आहे. ब्रिटानिया, जुबिलंट फूड
 • सरकार FM रेडिओच्या प्रसारणाचा लिलाव करणार आहे. याचा फायदा सन टी व्ही, राज टी व्ही, ENIL, हाथवे यांना होईल.
 • आयर्न ओअर क्षेत्रातील कंपन्यांना उत्तेजन देण्यासाठी मालभाडे कमी करण्यांत येणार आहे. याचा फायदा वेदांतला होईल पण तोटा कॉन्कोर या कंपनीला होईल.
 • सरकारने २२०० MHZ एअरवेव्हजचा लिलाव करण्यासाठी मंजुरी दिली. यांत ७०० MHZ मधील 4G एअरवेव्हचा समावेश आहे. यासाठी आकारले जाणारे SUC (SPECTRUM USAGE CHARGE) ची रकम आणी हे चार्जेस ठरवण्याची पद्धत या बाबतचे निर्णय लांबणीवर टाकले. यासाठी त्यांनी ही बाब TRAI या रेग्युलेटरी ऑथारिटीकडे परत पाठवली.
 • सरकारने शिक्षणासाठीच्या FDI नियमांत बदल केले.
 • औषधे बनवणार्या कंपन्या आणी वैद्यकीय उपकरणे आणी साधने बनविणाऱ्या कंपन्यांना एकाच तराजूत तोलले जात होते. पण आता वैद्यकीय उपकरणे आणी साधने बनवणाऱ्या कंपन्याना वेगळे करून त्यांच्यासाठी वेगळे धोरण ठरवले जाईल. याचा फायदा सिमेन्स, ऑपटो सर्किट्स, इंद्रप्रस्थ मेडिकल आणी BPL या कंपन्यांना होईल.

सरकारी announcements

 • RBI चे गव्हरनर रघुराम राजन यांनी आपण सप्टेंबर २०१६ रोजी आपला RBI मधील कार्यकाल संपल्यावर पुन्हा ACEDAMICS मध्ये जाणार आहोत असे जाहीर केले. या त्यांच्या निर्णयानंतर शेअर मार्केट कोसळेल असे वाटले होते पण सुरुवातीच्या थोड्या पडझडीनंतर मार्केटने “रामकृष्णही आले गेले “ म्हणत आपला बुल मूड व्यवस्थित चालू ठेवला.आता वित्तीय धोरण ठरवण्यासाठी मॉनेटरी पॉलिसी कमिशन नेमले जाईल.
 • सेबीने CURRENCY मार्केटमधील VOLATALITY कमी करण्यासाठी CURRENCY डेरीव्हेटीवच्या संबंधातील नियम सोपे केले. याचा फायदा आदित्य बिर्ला मनी या कंपनीला होईल.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • CLP या हॉंगकॉंग स्थित ग्रुपने सुझलॉन एनर्जी या कंपनीच्या तेलंगणामधील १०० mw प्रोजेक्ट मधील ४९% स्टेक खरेदी केला.
 • टाटा कम्युनिकेशन आपला ८००० WHITE-LABEL ATM असलेला बिझीनेस Rs १००० ते Rs १३५० कोटींना विकणार आहे. ही ATM या कंपनीने निरनिराळ्या बँकांना भाड्याने दिली आहेत.
 • मनधाना इंडस्ट्रीज आपला रिटेल बिझीनेस डीमर्ज करणार आहेत. नवीन रिटेल कंपनी ‘BEING HUMAN’बरोबर नवीन करार करणार आहे. ८ लाख ऑर्डर्स पेंडिंग असल्याने या आठवड्यांत शेअर ४०% पडला.
 • एशियन पेंट्स ही कंपनी विशाखापट्टणम येथे पेंट उत्पादन करण्याचा कारखाना काढणार आहे.
 • PSLVC 34 हा प्रोग्राम तेजीत चालू आहे याला लागणारे सर्व भाग वालचंदनगर इंडस्ट्रीज पुरवते. त्यामुळे या कंपनीला फायदा होईल.
 • BASF ही कंपनी CHEMFALL या कंपनीला Rs ३२०ला खरेदी करेल.
 • टेक महिंद्रा UK बेस्ड BIOएजन्सी खरेदी करणार आहे.
 • एल आय सी चे चेअरमन S. K. रॉय यांनी आपली मुदत संपण्यापूर्वी राजीनामा दिला.
 • BIOCON या कंपनीने आपल्या डोळ्याच्या आजारावरील औषधाधासाठी फेज II आणी फेज III चे संशोधन सुरु केले.

नजीकच्या काळांत येणारे IPO

 • या आठवड्यांत महानगर gasच्या IPOला चांगला प्रतिसाद मिळाला.
 • MAX इंडिया लिमिटेड या कंपनीच्या स्कीम ऑफ आरेंजमेंट प्रमाणे वेगवेगळ्या तीन कंपन्या अस्तित्वांत आल्या. त्या खालील प्रमाणे MAX FINANCIAL, MAX हेल्थ, आणी MAX VENTURES. या पैकी MAX VENTURES या कंपनीचे Rs ४५ वर लिस्टिंग झाले.
 • क्वेस कॉर्प या कंपनीचा सुमारे Rs ४०० कोटींचा IPO २९ जून २०१६ ला उघडेल. THOMAS COOK या कंपनीची यांत ७८% हिस्सेदारी आहे. प्राईस band Rs ३१० ते Rs ३१७ असेल.
 • शोभा लिमिटेड ही कंपनी Rs ३३० प्रती शेअर या भावाने buyback करणार आहे.
 • OIL इंडिया मधील १०% हिस्सेदारी सरकार OFS च्या माध्यमातून विकणार आह
 • DHFL आपल्या ग्रूप मधील आधार हौसिंग फायनांस आणी DHFL व्यासा हौसिंग फायनांस या दोन कंपन्यांचे मर्जर करणार आहे.या मर्जड ENTITY चे लोनबुक Rs ३३०० कोटी असेल.
 • NTPC तिच्या कर्मचाऱ्यांना Rs ११५.२० प्रती शेअर या भावाने शेअर्स OFS द्वारे ऑफर करणार आहे. हे शेअर्स फ्लोटिंग STOCK मध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.
 • लवकरच LNG वर चालणारी दुचाकी वाहने लॉच होणार आहेत. याचा प्रसार करण्यासाठी पेट्रोलीयम मंत्रालया ने ‘हवा बदलो’ हा कार्यक्रम जाहीर केला. GAIL,IGL या कंपन्याच्या मदतीने पायलट प्रोजेक्ट सुरु करणार आहे.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं

२१ जून हा योग दिवस म्हणून सर्व जगभरांत साजरा केला जातो. योग जसा शरीराच्या एका भागाला दुसऱ्या भागाशी जोडतो त्याच वेळी मन स्थिर होते, आरोग्य चांगले रहाते, त्याचवेळी जमिनीवरही घट्ट पाय रोवावे लागतात. हा योगाचा संदेश शेअरमार्केटला तंतोतंत लागू पडतो. प्रत्येक बातमीचे धागे दोरे शोधायचे, त्या बातमीच्या परिणामाचा अंदाज घ्यायचा, मनाला स्थिर ठेवायचे, आवडनिवड बाजूला ठेवायची आणी स्थितप्रज्ञाच्या भूमिकेतून प्रत्येक व्यवहाराचा विचार करून निर्णय घेतल्यास आपल्या शेअरमार्केटमधील व्यवहारांचे आरोग्य चांगले राहून आपली भरभराट होते.
या आठवड्यांत बातम्यांचा पूर लोटला होता. पण मार्केटने मात्र दाद दिली नाही. कारण ब्रेक्झीटचा मोठा बागुलबुवा समोर उभा ठाकला होता. ज्या वेळेला काही मोठी बातमी असते, ज्या बातमीचा जगावर परिणाम होणार असतो, त्यावेळी गुंतवणूकदार छोट्या बातम्यांकडे लक्ष देत नाहीत. brexit मुळे झालेली अस्थिरता गुंतवणूकदारांना आवडली नाही आणि शुक्रवारी मार्केट १००० point पडलं. जेव्हा लोकांना समजलं कि भारतावर याचा परिणाम अगदी कमी होईल आणि किंबहुना भारताला नवीन संधी मिळतील, तेव्हा मार्केट ५०० point सुधारलं. ज्या कंपन्यांच्या उत्पन्नाचा मोठा वाट युरोप किंवा ब्रिटन मधून येतो त्यांचे शेअर पडले – TATA Steel, TATA Motors Bharat Forge, Motherson sumi. पुढील आठवड्यांत मात्र ब्रेक्झीट बद्दल अधिक माहिती उपलब्ध असेल आणी मार्केट नवा विचार करायला मोकळे होईल, हवा बदलली आहे, पाउस सुरु झाला आहे, त्यामुळे वेगळ्या शेअर्सचा विचार केला जाईल. तुम्हीही त्या पद्धतीने तुमच्या पोर्टफ़ोलिओमध्ये बदल करा आणी जोमाने नवे विचार नव्या कल्पना घेवून कामाला लागा.

BSE निर्देशांक सेन्सेक्स २६३५६ आणी NSE निर्देशांक निफ्टी ८०७६ वर बंद झाला.

Advertisements
This entry was posted in Weekly market review and tagged , , , , , , on by .

About bpphatak

मी भाग्यश्री फाटक. तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे. या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कदाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केटबद्दलची भीती कमी होईल.

2 thoughts on “आठवड्याचे समालोचन – २० जून ते २४ जून २०१६ – हवा बदलली, पोर्टफ़ोलिओ बदला

 1. पिंगबॅक आठवड्याचे समालोचन – २७ जून ते १ जुलै – रात्रीच्या गर्भांत असे उद्याचा उषःकाल | Stock Market आणि मी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s